< 1 Samuels 1 >
1 Det var en mann fra Ramata'im-Sofim i Efra'im-fjellene; han hette Elkana og var sønn av Jeroham, sønn av Elihu, sønn av Tohu, sønn av Suf, en efra'imitt
१एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामाथाईम-सोफीम या नगरामधील एक पुरुष होता व त्याचे नाव एलकाना होते. तो यरोहामाचा मुलगा तो एलीहूचा मुलगा तो तोहचा मुलगा तो सूफाचा मुलगा तो एलकाना एफ्राईमी होता.
2 Han hadde to hustruer; den ene hette Hanna og den andre Peninna; og Peninna hadde barn, men Hanna hadde ikke.
२त्यास दोन स्त्रिया होत्या, एकीचे नाव हन्ना व दुसरीचे नाव पनिन्ना होते. पनिन्नेला लेकरे होती परंतु हन्नेला नव्हती.
3 Denne mann drog år efter år op fra sin by for å tilbede og ofre til Herren, hærskarenes Gud, i Silo; der var Elis to sønner, Hofni og Pinehas, prester for Herren.
३तो पुरुष आपल्या नगराहून प्रतिवर्षी शिलो येथे सैन्यांचा देव परमेश्वर ह्याची उपासना करायला व यज्ञ करायला जात असे. तेथे एलीचे दोन पुत्र हफनी व फिनहास देवाचे याजक होते.
4 Og når dagen kom da Elkana bar frem sitt offer, da gav han sin hustru Peninna og alle hennes sønner og hennes døtre hver sitt stykke av offeret;
४यज्ञ करायचा दिवस आला म्हणजे एलकाना आपली पत्नी पनिन्ना हिला व तिची सर्व मुले तिच्या सर्व मुली यांना मांसाचे वाटे देत असे.
5 men Hanna gav han et dobbelt stykke, for han elsket Hanna, enda Herren hadde tillukket hennes morsliv,
५परंतु हन्नेला तो दुप्पट वाटा देत असे कारण हन्नेवर तो जास्त प्रीती करत असे, पण परमेश्वराने तिची कुस बंद केली होती.
6 og hennes medbeilerske krenket henne også sårt for å egge henne til vrede, fordi Herren hadde lukket for hennes morsliv.
६परमेश्वराने तिची कुस बंद केल्यामुळे तिला खिन्न करण्यासाठी तिची सवत तिला फारच चिडवत असे.
7 Således gjorde han år efter år, så ofte hun drog op til Herrens hus, og således krenket Peninna henne, og hun gråt og vilde ikke ete.
७ती प्रतिवर्षी असेच करीत असे, ती आपल्या परिवारासोबत परमेश्वराच्या मंदिरात जाई तेव्हा तिची सवत तिला असाच त्रास देई म्हणून ती रडत असे व काही खात नसे.
8 Da sa Elkana, hennes mann, til henne: Hanna, hvorfor gråter du, og hvorfor eter du ikke? Hvorfor er du så sorgfull? Er jeg ikke mere for dig enn ti sønner?
८तेव्हा तिचा पती एलकाना तिला नेहमी म्हणत असे, “हन्ना तू कां रडतेस? तू का खात नाहीस? आणि तुझे मन का दु: खीत आहे? मी तुला दहा मुलांपेक्षा जास्त नाही काय?”
9 Da de nu engang hadde ett og drukket i Silo, og mens Eli, presten, satt på sin stol ved dørposten i Herrens tempel, stod Hanna op,
९मग अशाच एका प्रसंगी, त्यांनी शिलो येथे खाणेपिणे संपवल्यावर हन्ना उठली. आता एली याजक परमेश्वराच्या घराच्या दाराजवळच्या आपल्या आसनावर बसला होता.
10 og i sin hjertesorg bad hun til Herren og gråt sårt.
१०तेव्हा ती खूप दु: खीत अशी होती आणि ती परमेश्वराजवळ प्रार्थना करून फार रडली.
11 Og hun gjorde et løfte og sa: Herre, hærskarenes Gud! Dersom du vil se til din tjenerinne i hennes nød og komme mig i hu og ikke glemme din tjenerinne, men la din tjenerinne få en sønn, så vil jeg gi ham til Herren for hele hans levetid, og det skal ikke komme rakekniv på hans hode.
११ती नवस करून म्हणाली, “हे सैन्याच्या परमेश्वरा जर तू आपल्या दासीचे दुःख पाहशील व माझी आठवण करशील व तुझ्या दासीला विसरणार नाहीस व दासीला पुरूष संतान देशील तर मी त्यास त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात परमेश्वरास देऊन टाकीन आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही.”
12 Således bad hun lenge for Herrens åsyn, og Eli gav akt på hennes munn;
१२आणि असे झाले की ती परमेश्वराच्या पुढे प्रार्थना करीत असता एलीने तिच्या तोंडाकडे पाहिले.
13 for det var i sitt hjerte Hanna bad; bare hennes leber rørte sig, men hennes røst hørtes ikke. Derfor tenkte Eli at hun var drukken,
१३हन्ना तर आपल्या मनात बोलत होती. तिचे ओठ मात्र हालत होते पण तिची वाणी ऐकू येत नव्हती म्हणून ती मद्य पिऊन नशेत बोलत असेल असे एलीला वाटले.
14 og han sa til henne: Hvor lenge vil du te dig som drukken? Se til å bli av med ditt rus!
१४तेव्हा एली तिला म्हणाला, “किती वेळ तू मद्याच्या नशेत मस्त राहशील? तू मद्याचा अंमल आपल्यापासून दूर कर.”
15 Da svarte Hanna og sa: Nei, min herre! Jeg er en kvinne som bærer på en tung sorg i sitt hjerte; vin og sterk drikk har jeg ikke drukket, men jeg utøste min sjel for Herrens åsyn.
१५तेव्हा हन्ना उत्तर देऊन म्हणाली, “असे नाही, माझ्या स्वामी, मी दु: खीत आत्म्याची स्त्री आहे. द्राक्षरस किंवा मद्य मी प्याले नाही, तर मी आपला जीव परमेश्वरा पुढे ओतत आहे.”
16 Hold ikke din tjenerinne for en ryggesløs kvinne! For jeg har hele tiden talt av min store sorg og gremmelse.
१६“आपली दासी दुष्ट स्त्री आहे असे तू समजू नका कारण मी माझ्या यातना व क्लेश यांमुळे आतापर्यंत बोलले आहे.”
17 Da svarte Eli og sa: Gå bort i fred, og Israels Gud skal gi dig det du har bedt ham om.
१७मग एली उत्तर देत म्हणाला, “शांतीने जा; इस्राएलाचा देव याच्याजवळ जे मागणे तू मागितले आहेस ते तो तुला देवो.”
18 Hun sa: La din tjenerinne finne nåde for dine øine! Så gikk kvinnen sin vei, og nu åt hun og så ikke mere så sorgfull ut.
१८ती बोलली, “आपल्या दासीवर तुमची कृपादृष्टी होऊ द्या.” मग ती स्त्री निघून आपल्या वाटेने गेली आणि तिने अन्न सेवन केले व पुढे तिचे तोंड उदास राहिले नाही.
19 Morgenen efter stod de tidlig op og tilbad for Herrens åsyn; så vendte de tilbake og kom hjem igjen til Rama. Og Elkana holdt sig til Hanna, sin hustru, og Herren kom henne i hu;
१९आणि सकाळी त्यांनी उठून परमेश्वराची उपासना केली; मग ते निघून रामा येथे आपल्या घरी परतले. आणि एलकानाने आपली पत्नी हन्ना हिला जाणले व परमेश्वराने तिची आठवण केली.
20 og innen året var omme, blev Hanna fruktsommelig og fødte en sønn, og kalte ham Samuel; for sa hun jeg har bedt Herren om ham.
२०नेमलेली वेळ आल्यावर हन्ना गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला आणि तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले; ती म्हणाली कारण मी त्यास परमेश्वरापासून मागून घेतले.
21 Da så mannen - Elkana - drog op igjen med hele sitt hus for å ofre til Herren det årlige offer og sitt løfteoffer,
२१पुन्हा एकदा तो पुरुष एलकाना, आपल्या सर्व कुटुंबासहीत परमेश्वरास वार्षिक यज्ञ अर्पण करायला व आपले नवस फेडायला वर गेला.
22 drog Hanna ikke med op, men sa til sin mann: Jeg vil vente til gutten er avvent; da vil jeg ta ham med mig, så han kan fremstilles for Herrens åsyn og bli der all sin tid.
२२परंतु हन्ना वर गेली नाही; ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, “मुलाचे दूध तोडीपर्यंत मी वर जाणार नाही; त्यानंतर मग मी त्यास नेईन, जेणेकरून तो परमेश्वरापुढे हजर होईल व तो तेथे कायम वस्ती करील.”
23 Elkana, hennes mann, sa til henne: Gjør hvad du finner for godt; bli hjemme til du har avvent ham; bare Herren vil holde sitt ord! Så blev kvinnen hjemme, og hun gav sin sønn die til hun hadde avvent ham.
२३तेव्हा तिचा पती एलकाना तिला म्हणाला, “तुला बरे वाटते ते कर; तू त्याचे दूध तोडीपर्यंत राहा; केवळ परमेश्वर आपले वचन स्थापित करो.” मग ती स्त्री घरी राहिली व आपल्या मुलाचे दूध तोडीपर्यंत तिने त्यास स्तनपान दिले.
24 Og så snart hun hadde avvent ham, reiste hun op med ham og hadde med sig tre okser og en efa mel og en skinnsekk med vin, og hun bar ham inn i Herrens hus i Silo - han var bare en ganske liten gutt.
२४आणि त्याचे दूध तोडल्यावर तिने तीन गोऱ्हे व एक एफाभर सपीठ व द्राक्षरसाचा एक बुधला घेऊन आपणाबरोबर त्यास शिलो येथे परमेश्वराच्या मंदिरात नेले; तेव्हा मूल अजून लहानच होते.
25 Så slaktet de oksen og førte gutten inn til Eli.
२५मग त्यांनी एक गोऱ्हा कापला आणि मुलाला एलीकडे आणले.
26 Og hun sa: Hør mig, min herre! Så sant du lever, min herre: Jeg er den kvinne som stod her hos dig og bad til Herren.
२६आणि ती म्हणाली, “हे माझ्या प्रभू! आपला जीव जिवंत आहे; माझ्या प्रभू, जी स्त्री परमेश्वराची प्रार्थना करीत येथे तुमच्याजवळ उभी राहिली होती, ती मीच आहे.
27 Denne gutt var det jeg bad om, og Herren har gitt mig det jeg bad ham om.
२७या मुलासाठी मी प्रार्थना केली आणि जी माझी मागणी मी परमेश्वरापाशी मागितली होती ती त्याने मला दिली आहे.
28 Og nu gir jeg ham tilbake til Herren for all den tid han er til; det var for Herrens skyld jeg bad om ham. Og de tilbad Herren der.
२८मी तो परमेश्वरास दिला आहे; तो जगेल तोपर्यंत तो परमेश्वरास समर्पित केलेला आहे.” तेव्हा तेथे एलकाना व त्यांच्या कुटुंबाने परमेश्वराची उपासना केली.