< गीतरत्न 2 >
1 १ (ती स्त्री तिच्या प्रियकराशी बोलत आहे) मी शारोनाचे कुंकुमपुष्प आहे. दरीतले कमलपुष्प आहे.
Ја сам ружа саронска, љиљан у долу.
2 २ (पुरुष तिच्याशी बोलतो) जसे काटेरी झाडांत कमलपुष्प, तसे माझे प्रिये इतर मुलींमध्ये तू आहेस.
Шта је љиљан међу трњем, то је драга моја међу девојкама.
3 ३ (स्त्री स्वतःशी बोलते) जसे सफरचंदाचे झाड वनातल्या झाडांमध्ये तसा माझा प्रियकर इतर पुरुषांमध्ये आहे. त्याच्या सावलीत मला बसायला खूप आनंद झाला. आणि त्याच्या फळाची चव मला गोड लागली.
Шта је јабука међу дрветима шумским, то је драги мој међу момцима; желех хлад њен, и седох, и род је њен сладак грлу мом.
4 ४ त्याने मला मेजवानीच्या घरात आणले, आणि माझ्यावर त्याच्या प्रेमाचा झेंडा फडकावला.
Уведе ме у кућу где је гозба, а застава му је љубав к мени.
5 ५ (ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलते) मनुकांची पोळी देऊन माझ्यात शक्ती आणा. सफरचंद खाऊ घालून मला ताजेतवाने करा. कारण मी प्रेमज्वराने अशक्त झाले आहे.
Поткрепите ме жбановима, придржите ме јабукама, јер сам болна од љубави.
6 ६ (ती स्त्री स्वतःशी बोलते) त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे आणि त्याचा उजवा हात मला आलिंगन देत आहे.
Лева је рука његова мени под главом, а десном ме грли.
7 ७ (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलत आहे) यरूशलेमेच्या कन्यांनो, तुम्हास वनातील हरीणीची आणि रानमृगांची शपथ घालून सांगते की, आमचे प्रेम करणे होईपर्यंत तुम्ही व्यत्यय आणू नका.
Заклињем вас, кћери јерусалимске, срнама и кошутама пољским, не будите љубави моје, не будите је, док јој не буде воља.
8 ८ (ती स्त्री स्वतःशी बोलत आहे) मी माझ्या प्राणप्रियाचा आवाज ऐकत आहे. तो येत आहे, डोंगरावरुन उड्या मारत, टेकड्यांवरुन बागडत येत आहे.
Глас драгог мог; ево га, иде скачући преко гора, поскакујући преко хумова.
9 ९ माझा प्रियकर मृगासारखा, हरीणीच्या पाडसासारखा आहे. आमच्या भिंतीच्या मागे उभा आहे, खिडकीतून डोकावणाऱ्या, झरोक्यातून पाहणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.
Драги је мој као срна или као јеленче; ево га, стоји иза нашег зида, гледа кроз прозор, вири кроз решетку.
10 १० माझा प्रियकर माझ्याशी बोलला आणि म्हणाला, माझ्या प्रिये, ऊठ, माझ्या सुंदरी, ये आपण दूर जाऊ या!
Проговори драги мој и рече ми: Устани, драга моја, лепотице моја, и ходи.
11 ११ बघ आता हिवाळा संपला आहे. पाऊस आला आणि गेला.
Јер гле, зима прође, минуше дажди, отидоше.
12 १२ भूमीवर फुले दिसत आहेत, पक्ष्यांची गाण्याची वेळ आली आहे. आणि आमच्या देशात कबुतरांचा आवाज ऐकू येत आहे.
Цвеће се види по земљи, дође време певању, и глас грличин чује се у нашој земљи.
13 १३ अंजिराच्या झाडावरील हिरवे अंजीर पिकवीत आहे. आणि द्राक्षवेलीस फुले आली आहेत. ती सुगंध पसरीत आहे. अगे माझे प्रिये, माझे सुंदरी, ऊठ आपण आता दूर जाऊ या.
Смоква је пустила заметке своје, и лоза винова уцвала мирише. Устани, драга моја, лепотице моја, и ходи.
14 १४ माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या खडकात लपलेल्या, पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा, मला तुझे मुख पाहू दे. मला तुझा आवाज ऐकू दे. तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि तुझा चेहरा खूप सुंदर आहे.
Голубице моја у раселинама каменим, у заклону врлетном! Дај да видим лице твоје, дај да чујем глас твој; јер је глас твој сладак и лице твоје красно.
15 १५ (ती स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलत आहे) आमच्यासाठी कोल्ह्यांना पकडा. लहान कोल्ह्यांनी द्राक्षमळ्यांचा नाश केला आहे. कारण आमचे द्राक्षांचे मळे फुलले आहेत.
Похватајте нам лисице, мале лисице, што кваре винограде, јер наши виногради цвату.
16 १६ (ती स्त्री स्वतःशी बोलत आहे) माझा प्रियकर माझा आहे आणि मी त्याची आहे. तो आपला कळप कमळांच्यामध्ये चारीत आहे.
Мој је драги мој, и ја сам његова, он пасе међу љиљанима.
17 १७ (ती स्त्री तिच्या प्रियकरांबरोबर बोलत आहे) शिळोप्याची वेळ येईपर्यंत, आणि सावल्या लांब पळून जातील तोपर्यंत, तू फिरत राहा. माझ्या प्राणप्रिया, वियोगाच्या पर्वतावर हरीणासारखा किंवा हरिणीच्या पाडसासारखा परत फीर.
Док захлади дан и сенке отиду, врати се, буди као срна, драги мој, или као јеленче по горама раздељеним.