< रोम. 12 >

1 म्हणून बंधूंनो देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय’ यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
我的兄弟姐妹们,因为上帝同情你们,所以我鼓励你们把自己的肉体之躯献给上帝,作为圣洁和喜悦的活祭。这是顺理成章的敬拜方式。
2 आणि या जगाशी समरूप होऊ नका पण तुमच्या मनाच्या नवीनीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी. (aiōn g165)
不要在这世上随波逐流,要通过思想的灵性新生而蜕变,这样就可以彰显上帝真正的旨意:善良、欢喜和完美。 (aiōn g165)
3 कारण मला दिलेल्या कृपेच्या योगे, मी तुमच्यातील प्रत्येक जणाला असे सांगतो की, त्याने स्वतःला जसे मानावे त्याहून अधिक मोठे मानू नये, पण प्रत्येक जणाला देवाने दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार त्याने समंजसपणे स्वतःला मानावे.
通过上帝赐予我的恩典,我要向你们所有人解释一点:每个人都有自己应该成为的样子,你不应自视甚高。你应该根据上帝给你的信的程度,理智地看待自己。
4 कारण आपल्याला एका शरीरात जसे पुष्कळ अवयव आहेत आणि सर्व अवयवांचे काम एक नाही,
正如人体有很多组成部分,但每个部分的作用不尽相同,
5 तसे आपण पुष्कळ असून ख्रिस्तात एक शरीर आहोत; आणि आपण एकमेकांचे अवयव आहोत.
尽管我们人数众多,但我们的身体与基督相同,我们属于彼此。
6 पण आपल्याला पुरविलेल्या कृपेप्रमाणे आपल्याला वेगवेगळी कृपादाने आहेत; जर ते परमेश्वराचा संदेश देणे असेल तर विश्वासाच्या परिमाणानुसार आपण संदेश द्यावेत;
每个人都拥有不同的恩赐,因上帝赋予我们的恩典而异。如果这是在说上帝,就要根据你信的程度行事。
7 सेवा असेल, तर सेवा करण्यात तत्पर रहावे; जो शिक्षण देतो त्याने शिक्षण देण्यात,
如果应该服侍上帝,就去服侍;如果你应该进行教导,就去教导;
8 किंवा बोध करतो त्याने बोध करण्यात तत्पर रहावे; जो दान देतो त्याने औदार्याने द्यावे; जो कारभार चालवतो त्याने तत्परतेने कारभार चालवावा, जो दया करतो त्याने संतोषाने दया करावी.
如果应该鼓励他人,就去鼓励;如果应该给予,就慷慨给予;如果应该引领,就应承诺予以引领;如果应该慈悲,那应该高兴地这样做。
9 प्रीती निष्कपट असावी. वाईटापासून दूर रहा, चांगल्याला बिलगून रहा.
爱必须真诚。憎恨一切邪恶,紧紧抓住善良。
10 १० बंधुप्रेमात एकमेकांशी सहनशील, मानात एकमेकांना अधिक मानणारे,
像爱你的家人一样对彼此奉献,重视他人胜过自己。
11 ११ कामात आळशी न होत, आत्म्यात उत्तेजित होऊन प्रभूची सेवा करणारे व्हा.
不要因付出辛劳而不情愿,要以满腔热忱侍奉主。
12 १२ आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे,
因你的希望而保持欢乐,接受那即将到来的困难,继续祈祷。
13 १३ पवित्रजनांच्या गरजेसाठी भागी देणारे, आतिथ्यात पुढे जाणारे असे व्हा.
通过给予满足上帝子民的需求,热情款待陌生人。
14 १४ जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वाद द्या, शाप देऊ नका.
祝福迫害你的人——祝福他们,而不是诅咒。
15 १५ आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा आणि रडणार्‍यांबरोबर रडा.
与快乐之人一起快乐,与哭泣之人一起哭泣。
16 १६ एकमेकांशी एकमनाचे व्हा, उंच गोष्टींवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नका.
为彼此着想。不要认为自己比别人更重要,要谦逊,不要自负。
17 १७ वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा.
不要以恶报恶。向所有人展示你正在行善,
18 १८ शक्य असल्यास सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने रहा.
在你力所能及的范围内,与所有人和平相处。
19 १९ प्रियांनो, तुम्ही स्वतः सूड घेऊ नका, पण क्रोधाला वाव द्या कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे परमेश्वर म्हणतो.’
亲爱的朋友们,不要想着报复,上帝自会审判。正如经文所说,“主说:‘我必伸张正义,我必报应。’”
20 २० पण तुझा वैरी भुकेला असेल तर त्यास खायला दे; तो तान्हेला असेल तर त्यास प्यायला दे; कारण असे करण्यात तू त्याच्या डोक्यावर विस्तवातल्या इंगळांची रास करशील.
如果你的仇敌饿了,给他们食物,如果他们渴了,给他们水,这样做就如同把火炭堆在他们头顶。
21 २१ वाईटाने जिंकला जाऊ नकोस; पण बऱ्याने वाईटाला जिंक.
不可被恶战胜,要以善胜恶。

< रोम. 12 >