< स्तोत्रसंहिता 9 >

1 प्रमुख गायकासाठी; मूथ लब्बेन रागावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन; मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.
Хвалим Те, Господе, из свега срца свог, казујем сва чудеса Твоја.
2 तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन, हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन.
Радујем се и веселим се о Теби, певам имену Твом, Вишњи!
3 माझे शत्रू माघारी फिरतात, तेव्हा ते तुझ्यासमोर अडखळतात आणि नाश होतात.
Непријатељи се моји вратише натраг, спотакоше се и неста их испред лица Твог;
4 कारण तू माझ्या न्यायाला व माझ्या वादाला समर्थन केले आहे. तू तुझ्या सिंहासनावर न्यायी न्यायाधीश म्हणून बसला आहे.
Јер си свршио суд мој и одбранио ме; сео си на престо, судија праведни.
5 आपल्या युद्धाच्या आरोळीने तू राष्ट्रांस भयभीत असे केले आहेस; तू दुष्टाचा नाश केला आहेस. तू त्यांचे नाव सर्वकाळपर्यंत खोडले आहे.
Расрдио си се на народе и убио безбожника, име си им затро довека, за свагда.
6 जेव्हा तू त्यांच्या शहरांना अस्ताव्यस्त केले, तेव्हा शत्रूंची ओसाडी झाली आहे. त्यांची सर्व आठवण देखील नाहीशी झाली आहे.
Непријатељу неста мачева сасвим; градове Ти си развалио; погибе спомен њихов.
7 परंतु परमेश्वर अनंतकाळ असा आहे; त्याने त्याचे राजासन न्यायासाठी स्थापिले आहे.
Али Господ увек живи; спремио је за суд престо свој.
8 तो जगाचा न्याय प्रामाणिकपणाने करणार, राष्ट्रांसाठी तो न्यायी असा निर्णय देणार आहे.
Он ће судити васионом свету по правди, усудиће народима право.
9 परमेश्वर पीडितांना आश्रयदुर्ग आहे, संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे.
Господ је уточиште убогоме, уточиште у невољи.
10 १० जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही.
У Тебе се уздају који знају име Твоје, јер не остављаш оних који Те траже, Господе!
11 ११ सीयोनामध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. ज्या महान गोष्टी त्याने केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा.
Појте Господу, који живи на Сиону; казујте народу дела Његова;
12 १२ कारण देव, जो रक्तपाताचा सूड उगवतो, त्यांची आठवण आहे. तो गरीबांचा आक्रोश विसरला नाही.
Јер Он освећује крв, памти је; не заборавља јаук невољних.
13 १३ परमेश्वरा माझ्यावर दया कर, जो तू मला मरणाच्या दारातून उचलतोस तो तू, जे माझा द्वेष करतात त्यांच्यामुळे मी कसा पीडिला जात आहे ते पाहा.
Смилуј се на ме, Господе; погледај како страдам од непријатеља својих, Ти, који ме подижеш од врата смртних,
14 १४ म्हणजे मी तुझी स्तुती वर्णीन; सियोन कन्येच्या दाराजवळ मी तुझ्या तारणात हर्ष करीन.
Да бих казивао све хвале Твоје на вратима кћери Сионове, и славио спасење Твоје.
15 १५ राष्ट्रे त्यांच्याच खणलेल्या खाचेत पडली आहेत; त्यांनी लपून ठेवलेल्या जाळ्यात त्यांचाच पाय गुंतला आहे.
Попадоше народи у јаму, коју су ископали; у замку, коју су сами наместили, ухвати се нога њихова.
16 १६ परमेश्वराने त्या वाईट लोकांस पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन.
Познаше Господа; Он је судио; у дела руку својих заплете се безбожник.
17 १७ दुष्ट मृतलोकांत टाकला जाईल, जे राष्ट्रे देवाला विसरले आहेत त्यांचे असेच होईल. (Sheol h7585)
Вратиће се у пакао безбожници, сви народи који заборављају Бога; (Sheol h7585)
18 १८ कारण जो गरजवंत आहे, तो विसरला जाणार नाही. किंवा पीडलेल्यांची आशा कधीच तोडली जाणार नाही.
Јер неће свагда бити заборављен убоги, и нада невољницима неће никад погинути.
19 १९ हे परमेश्वरा, ऊठ, मर्त्य मनुष्य आम्हांवर प्रबळ न होवो; राष्ट्रांचा न्याय तुझ्यासमक्ष होऊ दे.
Устани, Господе, да се не посили човек, и да приме народи суд пред Тобом.
20 २० परमेश्वरा त्यांना भयभीत कर; राष्ट्रे केवळ मर्त्य मनुष्य आहेत, हे त्यांना कळू दे. सेला.
Пусти, Господе, страх на њих; нека познају народи да су људи.

< स्तोत्रसंहिता 9 >