< स्तोत्रसंहिता 86 >
1 १ दाविदाची प्रार्थना हे परमेश्वरा, माझे ऐक, आणि मला उत्तर दे, कारण मी दीन आणि दरिद्री आहे.
Addu’ar Dawuda. Ka ji, ya Ubangiji, ka kuma amsa mini, gama ni matalauci ne mai bukata kuma.
2 २ माझे रक्षण कर, कारण मी तुझा निष्ठावंत आहे; हे माझ्या देवा, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सेवकाचे रक्षण कर.
Ka tsare raina, gama na ba da kaina gare ka. Kai ne Allahna; ka ceci bawanka wanda ya dogara gare ka.
3 ३ हे प्रभू, माझ्यावर दया कर, कारण मी दिवसभर तुला हाक मारतो.
Ka yi mini jinƙai, ya Ubangiji, gama na yi kira gare ka dukan yini.
4 ४ हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव आनंदित कर, कारण मी आपला जीव वर तुझ्याकडे लावतो.
Ka ba bawanka farin ciki gama gare ka, ya Ubangiji, na miƙa raina.
5 ५ हे प्रभू, तू उत्तम आहेस आणि क्षमा करण्यास तयार आहेस, आणि जे सर्व तुला हाक मारतात त्यांना तू महान दया दाखवतोस.
Kai mai gafartawa da kuma mai alheri ne, ya Ubangiji, cike da ƙauna ga dukan waɗanda suke kira gare ka.
6 ६ हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला कान दे; माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे.
Ka ji addu’ata, ya Ubangiji; ka saurari kukata na neman jinƙai.
7 ७ हे परमेश्वरा, मी आपल्या संकटाच्या दिवसात तुला हाक मारीन, कारण तू मला उत्तर देशील.
A lokacin wahala zan yi kira gare ka, gama za ka amsa mini.
8 ८ हे प्रभू, देवांमध्ये तुझ्याशी तुलना करता येईल असा कोणीही नाही. तुझ्या कृत्यासारखी कोणीतीही कृत्ये नाहीत.
A cikin alloli babu kamar ka, ya Ubangiji; babu ayyukan da za a kwatanta da naka.
9 ९ हे प्रभू, तू निर्माण केलेली सर्व राष्ट्रे येतील आणि तुझ्यापुढे नमन करतील. ते तुझ्या नावाला आदर देतील.
Dukan al’umman da ka yi za su zo su yi sujada a gabanka, ya Ubangiji; za su kawo ɗaukaka ga sunanka.
10 १० कारण तू महान आहेस व तू आश्चर्यकारक गोष्टी करतोस; तूच फक्त देव आहेस.
Gama kai mai girma ne kana kuma aikata ayyuka masu banmamaki; kai kaɗai ne Allah.
11 ११ हे परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव, मग मी तुझ्या सत्यात चालेन. तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.
Ka koya mini hanyarka, ya Ubangiji, zan kuwa yi tafiya cikin gaskiyarka; ka ba ni zuciya wadda ba tă rabu ba, don in ji tsoron sunanka.
12 १२ हे प्रभू, माझ्या देवा, मी अगदी आपल्या मनापासून तुझी स्तुती करीन; मी सर्वकाळ तुझ्या नावाचे गौरव करीन.
Zan yabe ka, ya Ubangiji Allahna, da dukan zuciyata; zan ɗaukaka sunanka har abada.
13 १३ कारण माझ्यावर तुझी महान दया आहे; तू माझा जीव मृत्यूलोकापासून सोडवला आहेस. (Sheol )
Gama ƙaunarka da girma take gare ni; kai ka cece ni daga zurfafa, daga mazaunin matattu. (Sheol )
14 १४ हे देवा, उद्धट लोक माझ्याविरूद्ध उठले आहेत. हिंसाचारी लोकांची टोळी माझा जीव घेण्यास पाहत आहे. त्यांना तुझ्यासाठी काही आदर नाही.
Masu girman kai suna kai mini hari, ya Allah; ƙungiyar marasa imani suna neman raina, mutanen da ba su kula da kai ba.
15 १५ तरी हे प्रभू, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस. मंदक्रोध, आणि दया व सत्य यामध्ये विपुल आहेस.
Amma kai, ya Ubangiji, kai Allah mai tausayi ne da kuma mai alheri, mai jinkirin fushi, mai yawan ƙauna da aminci.
16 १६ तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या दासास आपले सामर्थ्य दे; आपल्या दासीच्या मुलाचे तारण कर.
Ka juyo gare ni ka yi mini jinƙai; ka ba wa bawanka ƙarfi; ka ceci ni gama na bauta maka yadda mahaifiyata ta yi.
17 १७ हे परमेश्वरा, तुझ्या अनुग्रहाचे चिन्ह दाखव. कारण तू माझे साहाय्य व सांत्वन केले आहे. मग माझा द्वेष करणाऱ्यांनी ते पाहावे, आणि लज्जित व्हावे.
Ka ba ni alamar alherinka, don abokan gābana su gani su kuma sha kunya, gama kai, ya Ubangiji, ka taimake ni ka kuma ta’azantar da ni.