< स्तोत्रसंहिता 83 >
1 १ आसाफाचे स्तोत्र हे देवा, गप्प राहू नकोस. हे देवा, आमच्याकडे दुर्लक्ष करू नको आणि स्वस्थ राहू नकोस.
Песнь псалма Асафу. Боже, кто уподобится Тебе? Не премолчи, ниже укроти, Боже:
2 २ पाहा, तुझे शत्रू गलबला करीत आहेत, आणि जे तुझा द्वेष करतात त्यांनी आपले डोके उंच केले आहे.
яко се, врази Твои возшумеша, и ненавидящии Тя воздвигоша главу.
3 ३ ते तुझ्या लोकांविरूद्ध गुप्त योजना आखतात. आणि ते एकत्र मिळून तुझ्या आश्रितांविरूद्ध योजना करतात.
На люди Твоя лукавноваша волею, и совещаша на святыя Твоя.
4 ४ ते म्हणतात, “या आणि आपण त्यांचा एक राष्ट्र म्हणून नाश करू. यानंतर इस्राएलाचे नावही आणखी आठवणित राहणार नाही.
Реша: приидите и потребим я от язык, и не помянется имя Израилево ктому.
5 ५ त्यांनी एकमताने, एकत्र मिळून मसलत केली आहे, ते तुझ्याविरूद्ध करार करतात.
Яко совещаша единомышлением вкупе, на Тя завет завещаша:
6 ६ ते तंबूत राहणारे अदोमी आणि इश्माएली, मवाब आणि हगारी,
селения Идумейска и Исмаилите, Моав и Агаряне,
7 ७ गबाल, अम्मोन व अमालेकचे, पलिष्टी आणि सोरकर हे ते आहेत.
Гевал и Аммон и Амалик, иноплеменницы с живущими в Тире:
8 ८ अश्शूरानेही त्यांच्याशी करार केला आहे; ते लोटाच्या वंशजांना मदत करीत आहेत.
ибо и Ассур прииде с ними, быша в заступление сыновом Лотовым:
9 ९ तू जसे मिद्यानाला, सीसरा व याबीन यांना किशोन नदीजवळ केलेस तसेच तू त्यांना कर.
сотвори им яко Мадиаму и Сисаре, яко Иавиму в потоце Киссове:
10 १० ते एन-दोर येथे नष्ट झाले, आणि ते भूमीला खत झाले.
потребишася во Аендоре, быша яко гной земный.
11 ११ तू ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या उमरावांना कर, जेबह व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व सरदारांचे कर.
Положи князи их яко Орива и Зива, и Зевеа и Салмана, вся князи их,
12 १२ ते म्हणाले, देवाची निवासस्थाने आपण आपल्या ताब्यात घेऊ.
иже реша: да наследим себе святилище Божие.
13 १३ हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुरळ्यासारखे, वाऱ्यापुढील भुसासारखे तू त्यांना कर.
Боже мой, положи я яко коло, яко трость пред лицем ветра.
14 १४ अग्नी जसा वनाला जाळतो, व ज्वाला जशी डोंगराला पेटवते.
Яко огнь попаляяй дубравы, яко пламень пожигаяй горы:
15 १५ तसा तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर, आणि आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड.
тако поженеши я бурею Твоею, и гневом Твоим смятеши я.
16 १६ हे परमेश्वरा, त्यांची चेहरे लज्जेने भर यासाठी की, त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा.
Исполни лица их безчестия, и взыщут имене Твоего, Господи.
17 १७ ते सदासर्वकाळ लज्जित व घाबरे होवोत; ते लज्जित होऊन नष्ट होवोत.
Да постыдятся и смятутся в век века, и посрамятся и погибнут.
18 १८ नंतर तू, मात्र तूच परमेश्वर, या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळेल.
И да познают, яко имя Тебе Господь, Ты един Вышний по всей земли.