< स्तोत्रसंहिता 54 >
1 १ दाविदाचे स्तोत्र हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव, आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर.
Til sangmesteren, med strengelek; en læresalme av David, da sifittene kom og sa til Saul: David holder sig skjult hos oss. Gud, frels mig ved ditt navn, og hjelp mig til min rett ved din kraft!
2 २ हे देवा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या शब्दाकडे कान दे.
Gud, hør min bønn, vend øret til min munns ord!
3 ३ कारण माझ्याविरूद्ध परके उठले आहेत, आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत; त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही.
For fremmede har reist sig imot mig, og voldsmenn står mig efter livet; de har ikke Gud for øie. (Sela)
4 ४ पाहा, देव माझा मदतनीस आहे; प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे.
Se, Gud hjelper mig, Herren er den som opholder mitt liv.
5 ५ तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील; तू माझ्यासाठी आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश कर.
Det onde skal falle tilbake på mine fiender; utrydd dem i din trofasthet!
6 ६ मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण; हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे.
Med villig hjerte vil jeg ofre til dig; jeg vil prise ditt navn, Herre, fordi det er godt.
7 ७ कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे; माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात.
For av all nød frir han mig ut, og på mine fiender ser mitt øie med lyst.