< स्तोत्रसंहिता 37 >

1 दाविदाचे स्तोत्र. दुष्टकृत्ये करणाऱ्यांवर चिडू नकोस, जे अनीतीने वागतात त्यांचा हेवा करू नकोस.
大卫的诗。 不要为作恶的心怀不平, 也不要向那行不义的生出嫉妒。
2 कारण ते लवकरच गवतासारखे वाळून जातील; व हिरव्या वनस्पतीसारखे सुकून जातील.
因为他们如草快被割下, 又如青菜快要枯干。
3 परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर; देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर.
你当倚靠耶和华而行善, 住在地上,以他的信实为粮;
4 परमेश्वरामध्ये आनंद कर, आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल.
又要以耶和华为乐, 他就将你心里所求的赐给你。
5 तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील.
当将你的事交托耶和华, 并倚靠他,他就必成全。
6 तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.
他要使你的公义如光发出, 使你的公平明如正午。
7 परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा. जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो, तर काळजी करू नको.
你当默然倚靠耶和华,耐性等候他; 不要因那道路通达的和那恶谋成就的心怀不平。
8 रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस. त्याने फक्त त्रास होतो.
当止住怒气,离弃忿怒; 不要心怀不平,以致作恶。
9 कारण दुष्टकृत्ये करणारे नाश पावतील, परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल.
因为作恶的必被剪除; 惟有等候耶和华的必承受地土。
10 १० थोड्याच काळात दुष्ट नाहीसे होतील; तू त्यांच्या ठिकाणाकडे बघशील, परंतु ते सापडणार नाहीस.
还有片时,恶人要归于无有; 你就是细察他的住处也要归于无有。
11 ११ परंतु नम्र पृथ्वीचे वतन मिळवतील, आणि मोठ्या समृद्धित ते हर्ष करतील.
但谦卑人必承受地土, 以丰盛的平安为乐。
12 १२ दुष्ट मनुष्य नितीमानाच्या विरोधात योजना आखतो, आणि त्याच्याविरुध्द आपले दातओठ खातो.
恶人设谋害义人, 又向他咬牙。
13 १३ प्रभू त्यास हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे, हे तो पाहत आहे.
主要笑他, 因见他受罚的日子将要来到。
14 १४ जे पीडलेले आणि गरजवंत आणि जे सरळ आहेत, त्यांना ठार मारण्यास दुष्टांनी आपली तलवार उपसली आहे आणि आपले धनुष्य वाकविले आहेत.
恶人已经弓上弦,刀出鞘, 要打倒困苦穷乏的人, 要杀害行动正直的人。
15 १५ परंतु त्यांचे धनुष्य मोडले जातील व त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदतील.
他们的刀必刺入自己的心; 他们的弓必被折断。
16 १६ अनेक दुष्ट लोकांच्या विपुलतेपेक्षा, नितीमानाकडे जे थोडे ते उत्तम आहे.
一个义人所有的虽少, 强过许多恶人的富余。
17 १७ कारण दुष्ट लोकांचे बाहू मोडले जातील परंतु परमेश्वर नितीमानांना आधार देईल.
因为恶人的膀臂必被折断; 但耶和华是扶持义人。
18 १८ परमेश्वर निर्दोषास दिवसेन दिवस बघतो, आणि त्यांचे वतन सदैव राहील.
耶和华知道完全人的日子; 他们的产业要存到永远。
19 १९ वाईट समयी ते लज्जीत होणार नाहीत. जेव्हा दुष्काळ येईल तेव्हा त्यांच्याकडे खाण्यास पुरेसे असेल.
他们在急难的时候不致羞愧, 在饥荒的日子必得饱足。
20 २० परंतु दुष्ट मनुष्य नाश पावतील, परमेश्वराचे शत्रू कुरणाच्या शोभेसारखे होतील; ते नाश होतील आणि धुरामध्ये नाहीसे होतील.
恶人却要灭亡。 耶和华的仇敌要像羊羔的脂油; 他们要消灭,要如烟消灭。
21 २१ दुष्ट पैसे उसने घेतो परंतु त्याची परत फेड करत नाही. परंतु नितीमान मनुष्य उदारतेने देतो.
恶人借贷而不偿还; 义人却恩待人,并且施舍。
22 २२ जे देवाकडून आशीर्वादित झालेले आहेत, ते भूमीचे वतन पावतील; आणि जे त्याच्याकडून शापित आहेत, ते छेदून टाकले जातील.
蒙耶和华赐福的必承受地土; 被他咒诅的必被剪除。
23 २३ मनुष्याची पावले परमेश्वराकडून स्थिर केली जातात, असा मनुष्य ज्याचे मार्ग देवाच्या दृष्टीने प्रशंसनीय असतात.
义人的脚步被耶和华立定; 他的道路,耶和华也喜爱。
24 २४ जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही. कारण परमेश्वर त्यास आपल्या हाताने सावरील.
他虽失脚也不至全身仆倒, 因为耶和华用手搀扶他。
25 २५ मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे; तरी नितीमान टाकलेला किंवा त्याच्या मुलांस भाकरी मागताना मी पाहिले नाही.
我从前年幼,现在年老, 却未见过义人被弃, 也未见过他的后裔讨饭。
26 २६ सारा दिवस तो दयाळूपणाने वागतो आणि उसने देतो, त्याची संतती आशीर्वादित असते.
他终日恩待人,借给人; 他的后裔也蒙福!
27 २७ वाईटापासून फिर आणि चांगले ते कर. तेव्हा तू सर्वकाळासाठी वाचवला जाशील.
你当离恶行善, 就可永远安居。
28 २८ कारण परमेश्वरास न्याय प्रिय आहे आणि तो विश्वासाने त्याच्यामागे चालणाऱ्यांस सोडत नाही. ते सर्वकाळासाठी राखून ठेवलेले आहेत. परंतु दुष्टाचे वंशज छेदले जातील.
因为,耶和华喜爱公平, 不撇弃他的圣民; 他们永蒙保佑, 但恶人的后裔必被剪除。
29 २९ नितीमान तर पृथ्वीचे वतन पावतील आणि सर्वकाळ त्यामध्ये वस्ती करतील.
义人必承受地土, 永居其上。
30 ३० नितीमान मनुष्याचे मुख ज्ञान बोलते, आणि न्याय वाढवते.
义人的口谈论智慧; 他的舌头讲说公平。
31 ३१ त्याच्या हृदयात त्याच्या देवाचे नियमशास्त्र असते, त्याचे पाय कधी घसरणार नाहीत.
神的律法在他心里; 他的脚总不滑跌。
32 ३२ परंतु दुष्ट मनुष्य हा नितीमान मनुष्यास बघतो, आणि त्यास मारण्याच्या शोधात असतो.
恶人窥探义人, 想要杀他。
33 ३३ परंतु परमेश्वर त्यांना दुष्ट मनुष्याच्या हातात त्यागणार नाही. किंवा जेव्हा त्याचा न्याय होईल तेव्हा त्यास अपराधी ठरवणार नाही.
耶和华必不撇他在恶人手中; 当审判的时候,也不定他的罪。
34 ३४ परमेश्वराची वाट पाहा आणि त्याचे मार्ग पाळ. आणि तो तुला वर उचलणार म्हणजे तुला भूमी मिळेल. जेव्हा दुष्ट छेदला जाणार तेव्हा तू पाहशील.
你当等候耶和华,遵守他的道, 他就抬举你,使你承受地土; 恶人被剪除的时候,你必看见。
35 ३५ मी विस्तारलेल्या आणि सशक्त झाडासारखा एक दुष्ट मनुष्य पाहिला. जो आपले मूळ जमिनीत पसरवतो.
我见过恶人大有势力, 好像一棵青翠树在本土生发。
36 ३६ परंतु जेव्हा मी त्याच्यापासून पुन्हा गेलो, तर तो तेथे नव्हता. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही.
有人从那里经过,不料,他没有了; 我也寻找他,却寻不着。
37 ३७ प्रमाणिक माणसाकडे लक्ष लाव आणि सरळास निशाणी लाव. कारण शांततेत राहण्याऱ्या मनुष्याचे भविष्य चांगले असते.
你要细察那完全人,观看那正直人, 因为和平人有好结局。
38 ३८ पापी तर पूर्णपणे नाश पावतील, परंतू दुष्टाचा भावीकाळ छेदून टाकला जाईल.
至于犯法的人,必一同灭绝; 恶人终必剪除。
39 ३९ नितीमानाचे तारण हे परमेश्वराकडून येते, संकटसमयी तो त्यांचे रक्षण करीन.
但义人得救是由于耶和华; 他在患难时作他们的营寨。
40 ४० परमेश्वर त्यांना मदत करील आणि त्यांना तारील, तो त्यांचा वाईट लोकांपासून बचाव करतो, कारण त्यांनी परमेश्वराच्याठायी आश्रय घेतला आहे.
耶和华帮助他们,解救他们; 他解救他们脱离恶人,把他们救出来, 因为他们投靠他。

< स्तोत्रसंहिता 37 >