< स्तोत्रसंहिता 20 >

1 मुख्य गायकासाठी, दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो, याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो.
Psalmus David, in finem. Exaudiat te Dominus in die tribulationis: protegat te nomen Dei Iacob.
2 देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हास मदत पाठवो. तो तुम्हास सियोनातून साहाय्य करो.
Mittat tibi auxilium de sancto: et de Sion tueatur te.
3 तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो, आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो.
Memor sit omnis sacrificii tui: et holocaustum tuum pingue fiat.
4 तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो, आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो.
Tribuat tibi secundum cor tuum: et omne consilium tuum confirmet.
5 तेव्हा आम्ही तुझ्या तारणात हर्ष करू. आणि आमच्या देवाच्या नावात झेंडे उभारू. परमेश्वर तुझ्या सर्व विनंत्या पूर्ण करो.
Laetabimur in salutari tuo: et in nomine Dei nostri magnificabimur.
6 परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मी जाणले आहे. त्याच्या तारण करणाऱ्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने, तो त्याच्या पवित्र स्वर्गातून त्यास उत्तर देईल.
Impleat Dominus omnes petitiones tuas: nunc cognovi quoniam salvum fecit Dominus CHRISTUM suum. Exaudiat illum de caelo sancto suo: in potentatibus salus dexterae eius.
7 काही त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात, तर काही घोड्यांवर, परंतु आम्ही आमच्या परमेश्वर देवाला हाक मारू.
Hi in curribus, et hi in equis: nos autem in nomine Domini Dei nostri invocabimus.
8 ते खाली आणले गेले आणि पडले, परंतु आम्ही उठू आणि ताठ उभे राहू!
Ipsi obligati sunt, et ceciderunt: nos autem surreximus et erecti sumus.
9 हे परमेश्वरा तारण कर, आम्ही आरोळी करू त्या दिवशी राजा आम्हांला उत्तर देवो.
Domine salvum fac regem: et exaudi nos in die, qua invocaverimus te.

< स्तोत्रसंहिता 20 >