< गणना 27 >
1 १ मग योसेफाचा मुलगा मनश्शे ह्याच्या कुळातला सलाफहाद हेफेरचा मुलगा होता. हेफर गिलादाचा मुलगा होता. गिलाद माखीरचा मुलगा होता. माखिर मनश्शेचा मुलगा होता. सलाफहादला पाच मुली होत्या. त्यांची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
Tada pristupiše kćeri Selofhada, sina Heferova, sina Gileadova, sina Makirova, sina Manašeova iz roda Josipova sina Manašea. A imena kćeri bila su: Mahla, Noa, Hogla, Milka i Tirsa.
2 २ या पाच स्त्रिया दर्शनमंडप प्रवेशद्वारापाशी गेल्या आणि मोशे, याजक एलाजार, पुढारी आणि इस्राएलाच्या मंडळीसमोर जाऊन उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या,
One stanu pred Mojsija, pred svećenika Eleazara, pred glavare i svu zajednicu na ulazu u Šator sastanka pa reknu:
3 ३ आमचे वडील रानात असताना मरण पावले. ज्या मंडळीने कोरहाच्या समूहाला मिळून परमेश्वरास विरोध केला होता त्यामध्ये तो नव्हता तर तो आपल्याच पापाने मेला. त्याऐवजी त्याच्या स्वतःच्या पापाच्या कारणाने तो मेला.
“Naš je otac umro u pustinji. Nije pripadao družini što se pobunila protiv Jahve - Korahovoj družini - nego je umro od svoga vlastitoga grijeha. Sinova nije imao.
4 ४ त्यास पुत्र नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का काढून टाकावे? आमच्या वडिलांच्या भावांमध्ये आम्हास वतन दे.
Zašto bi se odstranilo ime našega oca iz njegova roda? Budući da nije imao sina, daj nama posjed među braćom našega oca!”
5 ५ तेव्हा मोशेने परमेश्वरासमोर त्यांचे प्रकरण ठेवले.
Mojsije iznese njihov slučaj pred Jahvu.
6 ६ परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
A Jahve reče Mojsiju:
7 ७ सलाफहादाच्या मुलींचे म्हणणे बरोबर आहे. त्यांच्या वडिलांच्या नातेवाईकांबरोबर त्यांना मिळणाऱ्या वतनात त्यांचाही वाटा द्यावा. म्हणून त्यांच्या वडिलांचे वतन त्यांच्या नावे कर.
“Selofhadove kćeri pravo kažu. Treba svakako da im dadneš posjed koji će biti njihova baština među braćom njihova oca. Prenesi na njih baštinu njihova oca.
8 ८ इस्राएल लोकांसाठी हा नियम कर: जर एखाद्याला मुलगा नसला आणि तो निपुत्रिक मेला तर त्याचे वतन त्याच्या मुलींना मिळावे.
Nadalje, reci Izraelcima: 'Kad koji čovjek umre a ne imadne sina, prenesite njegovu baštinu na njegovu kćer.
9 ९ जर त्यास मुलीही नसल्या तर त्याचे वतन त्याच्या भावांना मिळावे.
Ne imadne li ni kćeri, predajte baštinu njegovoj braći.
10 १० जर त्यास भाऊही नसला तर त्याचे वतन त्याच्या चुलत्याला द्यावे.
Ako ne imadne ni braće, njegovu baštinu podajte braći njegova oca.
11 ११ जर त्याच्या वडिलांना भाऊ नसेल तर त्याचे वतन त्याच्या कुळापैकी जो सर्वात जवळचा नातेवाईक असेल त्यास ते मिळावे. इस्राएल लोकांमध्ये हा कायदा असावा अशी आज्ञा परमेश्वराने मोशेला केली. हा इस्राएली लोकांचा कायदा व्हावा.
Ako mu otac ne imadne braće, baštinu njegovu podajte najbližem rođaku njegova roda: neka je on uzme u posjed.' Neka to bude zakonska odredba Izraelcima, kako je Jahve naredio Mojsiju.”
12 १२ परमेश्वर मोशेला म्हणाला, यार्देन नदीच्या पूर्वेकडील रानातील अबारीम डोंगरावर तू चढून जा. मी इस्राएल लोकांस जो देश देणार आहे तो तेथून पाहा.
Jahve reče Mojsiju: “Popni se na ovo brdo Abarim i razgledaj zemlju koju dajem Izraelcima.
13 १३ तो पाहिल्यानंतर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजांस जाऊन मिळाला तसा तू आपल्या पूर्वजांस जाऊन मिळशील.
A kad budeš razgledao, pridružit ćeš se svojim precima i ti, kako se pridružio i tvoj brat Aron.
14 १४ त्सीनच्या रानात मंडळीचे भांडण झाले त्यावेळी त्या झऱ्याजवळ त्यांच्यासमोर माझे पावित्र्य प्रगट करावे म्हणून जी आज्ञा होती तिच्याविरूद्ध तुम्ही दोघांनी बंड केले. हे त्सीनच्या रानात कादेश येथील मरीबा झऱ्याच्याजवळ घडले.
Jer ste se u pobuni zajednice u pustinji Sin usprotivili mojim ustima umjesto da vodom očitujete moju svetost pred njihovim očima.” (To su Meripske vode kod Kadeša u Sinskoj pustinji.)
15 १५ मोशे परमेश्वराशी बोलला व म्हणाला,
A Jahvi Mojsije progovori ovako:
16 १६ परमेश्वर सर्व मानवजातीच्या आत्म्यांचा देव याने एका मनुष्यास मंडळीवर नेमून ठेवावे.
“Neka Jahve, Bog duhova u svakom tijelu, postavi čovjeka nad ovom zajednicom
17 १७ तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल. तो त्यांना बाहेर नेईल व आत आणील म्हणजे परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखी होणार नाही.
koji će pred njom izlaziti; koji će pred njom stupati; koji će je izvoditi i uvoditi tako da Jahvina zajednica ne bude kao stado što nema pastira.”
18 १८ तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव, त्याच्याठायी माझा आत्मा राहतो.
“Uzmi Jošuu, sina Nunova!” - reče Jahve Mojsiju. “To je čovjek u kome ima duha. Na nj položi ruku svoju!
19 १९ त्यास याजक एलाजार आणि सर्व मंडळीसमोर उभे करून आणि त्यास त्यांच्या समक्ष आज्ञा कर.
Onda ga odvedi pred svećenika Eleazara i pred svu zajednicu te mu na njihove oči daj naredbe!
20 २० तू आपला काही अधिकार त्यास दे. याकरिता की, इस्राएलाच्या सर्व मंडळीने त्याची आज्ञा मानावी.
Predaj mu dio svoje vlasti da ga sluša sva zajednica sinova Izraelovih.
21 २१ तो एलाजार याजकापुढे उभा राहील, तो त्याच्यावतीने उरीमाच्या निर्णयासाठी परमेश्वरास विचारील. त्याने व त्याच्याबरोबर इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्याच्या सांगण्यावरून बाहेर जावे व आत यावे.
Neka pristupa k svećeniku Eleazaru, koji će za nj tražiti odluke Urima pred Jahvom. Na njegovu zapovijed neka izlaze i na njegovu zapovijed neka ulaze, oni i svi Izraelci s njim - sva zajednica.”
22 २२ मोशेने परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे केले. त्याने यहोशवाला एलाजार याजकाच्या आणि लोकांच्या पुढे उभे केले.
Mojsije učini kako mu je Jahve naredio: uzme Jošuu te ga postavi pred svećenika Eleazara i pred svu zajednicu.
23 २३ परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने त्याच्यावर हात ठेवले आणि त्याने त्यास नेतृत्व करण्याची आज्ञा दिली.
Položi zatim na nj svoje ruke i dade mu svoje naredbe, kako je Jahve zapovjedio preko Mojsija.