< गणना 19 >
1 १ परमेश्वर मोशेशी आणि अहरोनाशी बोलला. तो म्हणाला,
El Señor le dijo a Moisés y Aarón:
2 २ परमेश्वराने इस्राएल लोकांस जी शिकवण दिली तिचे हे नियम आहेत. निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेवलेले नाही अशी एक लाल कालवड घ्या.
“Esta es una norma que el Señor ha ordenado, diciendo, Dile a los israelitas que te traigan una vaca roja sin defectos, que nunca haya sido uncida.
3 ३ ती याजक एलाजाराला द्यावी. त्याने तिला छावणीबाहेर न्यावे आणि तिथे कोणा एकाने तिला त्याच्यासमोर मारावे.
Entrégasela al sacerdote Eleazar, y él la llevará fuera del campamento y lamandará a masacrar.
4 ४ नंतर एलाजार, हा याजक थोडे रक्त आपल्या बोटावर घेईल आणि काही रक्त दर्शनमंडपाकडे शिंपडेल. त्याने असे सात वेळा केले पाहिजे.
El sacerdote Eleazar pondrá un poco de su sangre en su dedo y la rociará siete veces hacia la entrada del Tabernáculo de Reunión.
5 ५ नंतर संपूर्ण कालवड त्याच्यासमोर जाळून, कातडी, मांस रक्त आणि आतडे सर्वकाही जाळले पाहिजे.
Luego la vaca debe ser quemada mientras él observa. Todo debe ser quemado: su piel, carne y sangre, así como sus excrementos.
6 ६ नंतर याजकाने गंधसरूची एक काठी, एजोबाची फांदी व लाल दोरी घ्यावी. याजकाने या गोष्टी कालवड जळत असलेल्या जाळात फेकाव्या.
El sacerdote arrojará madera de cedro, hisopo e hilo carmesí sobre la vaca en llamas.
7 ७ याजकाने स्वत: ला आणि त्याच्या कपड्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे. आणि मगच छावणीत परत यावे. याजक संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.
“Entonces el sacerdote lavará sus ropas y su cuerpo en agua, y después podrá entrar en el campamento, pero permanecerá impuro hasta la noche.
8 ८ ज्या मनुष्याने कालवडीला जाळले असेल त्याने स्वत: ला धुवावे. स्वत: चे कपडेही पाण्याने स्वच्छ धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.
La persona que quemó la vaca también lavará sus ropas y su cuerpo en agua, y él también permanecerá impuro hasta la noche.
9 ९ नंतर जो मनुष्य शुद्ध असेल तो कालवडीची राख गोळा करेल. तो ती राख छावणीच्या बाहेर स्वच्छ जागी ठेवावी आणि ती इस्राएल वंशाच्या मंडळीकरता अशुद्धी दूर करण्याच्या पाण्यासाठी ती राखून ठेवावी, ती पापार्पण अशी आहे.
“El que esté limpio recogerá las cenizas de la vaca y las guardará en un lugar limpio fuera del campamento. Las guardarán los israelitas para preparar el agua de purificación que sirve para purificar del pecado.
10 १० ज्या मनुष्याने कालवडीची राख गोळा केली असेल त्याने त्याचे कपडे धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. हे नियम नेहमी अस्तित्वात असतील. हा नियम इस्राएलच्या सर्व नागरिकांसाठी आहे आणि तुमच्याबरोबर जे परदेशी लोक राहत आहेत त्यांच्यासाठीही हा नियम आहे.
El hombre que recogió las cenizas de la vaca lavará también sus ropas, y permanecerá impuro hasta la noche. Esta es una regla permanente para los israelitas y para el extranjero que vive con ellos.
11 ११ जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील.
“Si tocas un cadáver serás impuro durante siete días.
12 १२ त्याने स्वत: ला तिसऱ्या दिवशी ती राख घेऊन आपणास शुद्ध करावे व नंतर सातव्या दिवशी तो शुद्ध होईल, पण जर तो तिसऱ्या दिवशी आपणास शुद्ध करणार नाहीतर तो सातव्या दिवशी तो शुद्ध होणार नाही.
Debes purificarte con el agua de la purificación al tercer día y al séptimo día, y entonces estarás limpio. Pero si no te purificas en el tercer y séptimo día, no estarás limpio.
13 १३ जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो अशुद्ध होईल. जर मनुष्य अशुद्ध असताना परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपात गेला तर मंडपही अशुद्ध होईल. म्हणून त्या मनुष्यास इस्राएल लोकांपासून दूर ठेवावे. जर अशुद्ध मनुष्यावर खास पाणी शिंपडले नाहीतर तो अशुद्ध राहील.
Si tocas un cadáver y no te purificas, harás impuro el Tabernáculo del Señor y deberás ser expulsado de Israel. Sigues siendo impuro porque no se te ha rociado con el agua de la purificación y tu impureza permanece.
14 १४ जे लोक त्यांच्या मंडपात मरतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. जर एखादा मनुष्य त्याच्या मंडपात मेला तर त्या मंडपातले सगळे लोक आणि सगळ्या वस्तू अशुद्ध होतील. ते सात दिवस अशुद्ध राहतील.
“La siguiente norma se aplica cuando una persona muere en una tienda. Todo el que entre en la tienda y todo el que ya esté en ella será impuro durante siete días.
15 १५ आणि ज्यावर झाकण बांधले नाही असे प्रत्येक उघडे भांडे अशुद्ध होईल.
Cualquier recipiente abierto que no tenga una tapa cerrada es impuro.
16 १६ खुल्या मैदानात तलवारीने वधलेल्या जर एखाद्याने प्रेताला हात लावला तर तो सात दिवस अशुद्ध राहील. जर ते प्रेत बाहेर उघड्यावर असेल किंवा तो मनुष्य युद्धात मारला गेला असेल तरच हे लागू आहे. आणि जर एखाद्याने मरण पावलेल्या मनुष्याच्या अस्थींना हात लावला तरी तो मनुष्य सात दिवस अशुद्ध होईल.
Si estás al aire libre y tocas a alguien que ha muerto por la espada o que ha muerto de forma natural, o si tocas un hueso humano o una tumba, entonces serás impuro durante siete días.
17 १७ त्या अशुद्ध मनुष्यास पुन्हा स्वच्छ करण्यासाठी जाळलेल्या कालवडीची राख तुम्ही वापरली पाहिजे. एखाद्या भांड्यात राखेवर ताजे पाणी टाका.
“Este es el proceso para la purificación si eres impuro. Toma algunas de las cenizas del holocausto para la purificación y ponlas en un frasco con agua fresca.
18 १८ शुद्ध मनुष्याने एजोबाची काठी घेऊन ती पाण्यात बुडवावी. नंतर ते पाणी तंबूवर, भांड्यावर आणि मंडपातल्या मनुष्यांवर शिंपडावे. जो प्रेताला हात लावली त्याच्या बाबतीत हे करावे. तुम्ही हे प्रत्येकाला करा. जो युद्धात कबरेला हात लावील किंवा मरण पावलेल्या मनुष्याच्या हाडांना हात लावील त्याच्या बाबतीत हे करा.
El hombre que esté limpio tomará un hisopo y lo mojará en el agua. Luego rociará la tienda y todo lo que haya dentro de ella, y a todos los que estuvieran allí. También deberá rociarlo a usted si ha tocado un hueso, o una tumba, o alguien que ha muerto o ha sido asesinado.
19 १९ नंतर शुद्ध मनुष्याने हे पाणी तिसऱ्या व सातव्या दिवशी अशुद्ध मनुष्याच्या अंगावर शिंपडावे. तो मनुष्य सातव्या दिवशी शुद्ध होईल. त्याने त्याचे कपडे पाण्यात धुवावे. तो संध्याकाळी शुद्ध होईल.
“El hombre que está limpio debe rociarte tanto al tercer día como al séptimo día. Después de que te purifiques al séptimo día, debes lavar tu ropa y a ti mismo en agua, y esa noche estarás limpio.
20 २० एखादा मनुष्य अशुद्ध झाल्यानंतर पुन्हा शुद्ध झाला नाहीतर त्यास इस्राएल लोकांपासून वेगळे ठेवावे. कारण त्याने परमेश्वराचे पवित्र निवास मंडपही अशुद्ध करील.
Pero si no te purificas, serás expulsado de los israelitas, porque has hecho impuro el Tabernáculo del Señor. El agua de la purificación no ha sido rociada sobre ti, y sigues siendo impuro.
21 २१ तुमच्यासाठी हा नियम सदैव असेल. ज्या मनुष्यावर पाणी शिंपडले त्या मनुष्याने स्वत: चे कपडे सुद्धा धुतले पाहिजेत. कोणत्याही मनुष्याने त्या खास पाण्याला स्वर्श केला तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
Esta es una regla permanente para todos. El hombre que rocía el agua de purificación debe lavar su ropa, y cualquiera que toque el agua de purificación será impuro hasta la noche.
22 २२ जर त्या अशुद्ध मनुष्याने दुसऱ्या कोणाला स्पर्श केला तर तो मनुष्य सुद्धा अशुद्ध होईल. तो मनुष्य संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील.
Todo lo que toque la persona impura será impuro, y cualquiera que lo toque será impuro hasta la noche”.