< गणना 11 >

1 इस्राएल लोक आपल्या त्रासाबद्दल कुरकुर करू लागले तसे परमेश्वराने ऐकले. परमेश्वराने लोकांचे ऐकले आणि तो रागावला. परमेश्वरापासूनचा अग्नी त्यांच्यात पेटला आणि त्याने छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले.
众百姓发怨言,他们的恶语达到耶和华的耳中。耶和华听见了就怒气发作,使火在他们中间焚烧,直烧到营的边界。
2 तेव्हा लोकांनी मोशेकडे मदतीसाठी ओरड केली. मोशेने परमेश्वरास विनंती केली तेव्हा अग्नी विझला.
百姓向摩西哀求,摩西祈求耶和华,火就熄了。
3 त्यामुळे त्या ठिकाणाचे नांव तबेरा असे पडले. लोकांनी त्या ठिकाणाला तसे नांव दिले कारण परमेश्वराच्या अग्नीमुळे छावणीचा भाग जळून गेला.
那地方便叫做他备拉,因为耶和华的火烧在他们中间。
4 जे परराष्ट्रीय इस्राएल लोकाबरोबर राहत होते, त्यांना चांगले अन्न खावेसे वाटू लागले. इस्राएल लोकांनी तक्रार व रडण्यास करण्यास सुरवात केली. “आम्हांला मांस खावयास कोण देईल?
他们中间的闲杂人大起贪欲的心;以色列人又哭号说:“谁给我们肉吃呢?
5 मिसरमध्ये आम्हास मासे फुकट खाण्यास मिळत होते. त्याचप्रमाणे तेथे आम्हास काकड्या, खरबूजे, फळभाजी, कांदे, लसूण मिळत असे त्याची आठवण आम्हास येते.
我们记得,在埃及的时候不花钱就吃鱼,也记得有黄瓜、西瓜、韭菜、葱、蒜。
6 आता आम्ही कमजोर झालो आहोत. मान्न्याशिवाय आम्ही येथे काहीच पाहत नाही!”
现在我们的心血枯竭了,除这吗哪以外,在我们眼前并没有别的东西。”
7 हा मान्ना धण्याच्या बीसारखा होता, त्याचा रंग मोत्यासारखा होता.
这吗哪仿佛芫荽子,又好像珍珠。
8 लोक तो चोहोकडे फिरून गोळा करीत. तो जात्यात दळीत किंवा उखळात कुटीत, भांड्यात शिजवीत व त्याच्या भाकरी करीत. त्याची चव ताज्या जैतून तेलात तळलेल्या पुरीसारखी लागत असे.
百姓周围行走,把吗哪收起来,或用磨推,或用臼捣,煮在锅中,又做成饼,滋味好像新油。
9 जेव्हा रात्री छावणीवर दहिवर पडले म्हणजे मान्नासुध्दा पडत असे.
夜间露水降在营中,吗哪也随着降下。)
10 १० सर्व लोक त्यांच्या कुटुंबात रडत असल्याचा आवाज मोशेने ऐकला. आणि प्रत्येक मनुष्य आपापल्या तंबूच्या दाराशी बसून रडत होते. परमेश्वराचा राग भयंकर भडकला आणि मोशेच्या दृष्टीने त्यांची तक्रार चूक होती.
摩西听见百姓各在各家的帐棚门口哭号。耶和华的怒气便大发作,摩西就不喜悦。
11 ११ मोशे परमेश्वरास म्हणाला, तू आपल्या दासास इतके वाइट का वागवतोस? तू माझ्यावर प्रसन्न नाहीस का? या सर्व लोकांचा भार तू मला वाहण्यास सांगतोस.
摩西对耶和华说:“你为何苦待仆人?我为何不在你眼前蒙恩,竟把这管理百姓的重任加在我身上呢?
12 १२ मी या लोकांचे गर्भधारण केले काय? मी त्यांना जन्म दिला आहे का म्हणून तू म्हणतोस की, जसा पिता आपल्या बाळाला छातीशी धरून घेऊन जातो तसे मी त्यांना न्यावे? जो देश देण्याविषयी त्यांच्या पूर्वजांना तू शपथ दिली त्यांना मी घेऊन जावे का?
这百姓岂是我怀的胎,岂是我生下来的呢?你竟对我说:‘把他们抱在怀里,如养育之父抱吃奶的孩子,直抱到你起誓应许给他们祖宗的地去。’
13 १३ एवढ्या लोकांस पुरेल एवढे मांस देण्यासाठी मी कोठे शोधू? ते माझ्याकडे आसवे गाळून रडत आहेत, ते म्हणतात आम्हास खावयास मांस दे!
我从哪里得肉给这百姓吃呢?他们都向我哭号说:‘你给我们肉吃吧!’
14 १४ मी एकटा या सर्वांची काळजी घेऊ शकत नाही. हे माझ्यासाठी फारच जड आहे.
管理这百姓的责任太重了,我独自担当不起。
15 १५ जर तू मला अशा मार्गाने वागवतोस, तुझी दया माझ्यावर असल्यास मला आता मारुन टाक आणि माझे दुःख दूर कर.
你这样待我,我若在你眼前蒙恩,求你立时将我杀了,不叫我见自己的苦情。”
16 १६ परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्राएलाच्या वडिलांचे सत्तर मनुष्ये मजकडे आण. मंडळीचे नेते असलेल्या या लोकांस दर्शनमंडपाच्या दारापाशी आण; व तुझ्याबरोबर त्यांना उभे कर.
耶和华对摩西说:“你从以色列的长老中招聚七十个人,就是你所知道作百姓的长老和官长的,到我这里来,领他们到会幕前,使他们和你一同站立。
17 १७ मग मी खाली येऊन तेथे तुझ्याशी बोलेन. मग तुझ्यावर असलेल्या आत्म्यातून काही भाग मी त्यांनाही देईन. मग लोकांची काळजी घेण्यास ते तुला मदत करतील. ह्याप्रकारे इस्राएल लोकांची जबाबदारी केवळ तुझ्या एकट्यावर राहणार नाही.
我要在那里降临,与你说话,也要把降于你身上的灵分赐他们,他们就和你同当这管百姓的重任,免得你独自担当。
18 १८ लोकांस सांग उद्या तुम्ही स्वत: शुद्ध राहा म्हणजे तुम्हास मांस खावयास मिळेल. परमेश्वराने तुमचे रडगाणे ऐकले आहे. आम्हास मांस खाण्यास पाहिजे! आम्ही मिसरमध्ये होतो ते बरे होते, असे तुम्ही म्हणाला ते शब्दही परमेश्वराने ऐकले आहेत. तेव्हा आता परमेश्वर तुम्हास मांस देईल आणि तुम्ही ते खाल.
又要对百姓说:‘你们应当自洁,预备明天吃肉,因为你们哭号说:谁给我们肉吃!我们在埃及很好。这声音达到了耶和华的耳中,所以他必给你们肉吃。
19 १९ तुम्ही ते एक, किंवा दोन, किंवा पाच, किंवा दहा दिवस, वीस दिवसच नाही तर,
你们不止吃一天、两天、五天、十天、二十天,
20 २० परंतु तुम्ही ते पूर्ण महिनाभर तुमच्या नाकपुड्यातून निघेपर्यंत आणि तुम्हास शिसारी येईपर्यंत तुम्ही ते खाल. कारण तुम्ही जो परमेश्वर तुम्हामध्ये राहतो त्यास तुम्ही नाकारले आहे. तुम्ही त्याच्यासमोर रडला. तुम्ही म्हणाला, आम्ही मिसर देश का सोडला?
要吃一个整月,甚至肉从你们鼻孔里喷出来,使你们厌恶了,因为你们厌弃住在你们中间的耶和华,在他面前哭号说:我们为何出了埃及呢!’”
21 २१ नंतर मोशे म्हणाला, परमेश्वरा येथे सहा लाख लोक आहेत आणि तू म्हणतोस की, ह्याना पूर्ण महिनाभर पुरेल एवढे मांस मी खावयास देईन!
摩西对耶和华说:“这与我同住的百姓、步行的男人有六十万,你还说:‘我要把肉给他们,使他们可以吃一个整月。’
22 २२ आम्ही त्यांना तृप्त करावे म्हणून शेरडेमेंढरे व गुरेढोर कापावीत काय? किंवा समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावे काय?
难道给他们宰了羊群牛群,或是把海中所有的鱼都聚了来,就够他们吃吗?”
23 २३ परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा हात तोकडा आहे काय? आता माझे शब्द खरे आहेत की नाही हे तू पाहशील.”
耶和华对摩西说:“耶和华的膀臂岂是缩短了吗?现在要看我的话向你应验不应验。”
24 २४ मोशे बाहेर गेला आणि परमेश्वर जे बोलला ते लोकांस सांगितले. मग मोशेने मंडळीच्या सत्तर वडिलांना एकत्र जमविले आणि त्याने त्यांना तंबू सभोवती उभे केले.
摩西出去,将耶和华的话告诉百姓,又招聚百姓的长老中七十个人来,使他们站在会幕的四围。
25 २५ मग परमेश्वर ढगात उतरून आला आणि मोशेशी बोलला. मोशेवर परमेश्वराचा आत्मा होता. त्यातून काही घेऊन परमेश्वराने ते त्या सत्तर वडिलावर ठेवला. तो आत्मा आल्यावर ते संदेश सांगू लागले. परंतु त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही.
耶和华在云中降临,对摩西说话,把降与他身上的灵分赐那七十个长老。灵停在他们身上的时候,他们就受感说话,以后却没有再说。
26 २६ त्यातील दोन वडील एलदाद व मेदाद छावणीच्या बाहेर गेले नाहीत. त्यांची नांवे वडीलांच्या यादीत होती. परंतु ते छावणीतच राहिले; त्यामुळे आत्मा त्यांच्यावरही आला आणि ते छावणीतच संदेश सांगू लागले.
但有两个人仍在营里,一个名叫伊利达,一个名叫米达。他们本是在那些被录的人中,却没有到会幕那里去。灵停在他们身上,他们就在营里说预言。
27 २७ तेव्हा एका तरुणाने पळत जाऊन मोशेला हे सांगितले. तो म्हणाला, एलदाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत.
有个少年人跑来告诉摩西说:“伊利达、米达在营里说预言。”
28 २८ तेव्हा नूनाचा मुलगा यहोशवा मोशेला म्हणाला, मोशे, माझे स्वामी तुम्ही त्यांना बंदी घाला. यहोशवा तरुण असल्यापासून मोशेचा मदतनीस होता.
摩西的帮手,嫩的儿子约书亚,就是摩西所拣选的一个人,说:“请我主摩西禁止他们。”
29 २९ मोशेने त्यास उत्तर दिले, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने त्या सर्वांवर आपला आत्मा ठेविला असता तर किती बरे होते.
摩西对他说:“你为我的缘故嫉妒人吗?惟愿耶和华的百姓都受感说话!愿耶和华把他的灵降在他们身上!”
30 ३० मग मोशे व इस्राएलाच्या वडीलजनासह छावणीत परत गेला.
于是,摩西和以色列的长老都回到营里去。
31 ३१ मग परमेश्वराने समुद्रावरुन जोरदार वारा वाहावयास लाविला. त्या वाऱ्याने लावे पक्षी त्या भागात वाहून आणले. ते लावे पक्षी सर्व छावणीच्या भोंवती उडत राहिले. ते इतके होते की छावणीचे अंगण व सारा परिसर त्यांनी भरुन गेला. त्यांचा जमिनीपासून दोन हात उंचीचा थर साचला. मनुष्य एक दिवसभरात जितका दूर चालत जाईल तिथपर्यंत तो थर होता.
有风从耶和华那里刮起,把鹌鹑由海面刮来,飞散在营边和营的四围;这边约有一天的路程,那边约有一天的路程,离地面约有二肘。
32 ३२ लोक बाहेर पडले व त्यांनी दिवसभर व रात्रभर लावे पक्षी गोळा केले आणि त्यांनी पूर्ण दुसरा दिवसभरही ते गोळा केले. ज्याने सर्वात कमी गोळा केले पक्षी त्यांचे दहा होमर भरले. त्यांनी लावे पक्षी सर्व छावणी सभोवती पसरून ठेवले.
百姓起来,终日终夜,并次日一整天,捕取鹌鹑;至少的也取了十贺梅珥,为自己摆列在营的四围。
33 ३३ ते मांस त्यांच्या दातात होते, ते चावण्याच्या आधीच परमेश्वराचा राग त्यांच्यावर भयंकर भडकला. त्यांने लोकांचा भयंकर आजाराने संहार केला.
肉在他们牙齿之间尚未嚼烂,耶和华的怒气就向他们发作,用最重的灾殃击杀了他们。
34 ३४ त्या जागेला किब्रोथ-हत्तव्वा असे नांव दिले. कारण ज्या लोकांस मांस खाण्याची अतिशय तीव्र इच्छा झाली होती त्यांना तेथे पुरण्यात आले.
那地方便叫做基博罗·哈他瓦,因为他们在那里葬埋那起贪欲之心的人。
35 ३५ किब्रोथ-हत्तव्वापासून लोकांनी हसेरोथ गावापर्यंत प्रवास केला व तेथे त्यांनी मुक्काम केला.
百姓从基博罗·哈他瓦走到哈洗录,就住在哈洗录。

< गणना 11 >