< गणना 10 >
1 १ परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
És szólt az Örökkévaló Mózeshez, mondván:
2 २ चांदीचे दोन कर्णे बनव. चांदी ठोकून ते बनव. मंडळीला एकत्र बोलवण्यासाठी आणि त्यांचा तळ हलविण्यासाठी या कर्ण्यांचा उपयोग करावा.
Készíts magadnak két ezüst trombitát, vert munkával készítsd azokat, hogy legyenek neked a község egybehívására és a táborok elindítására.
3 ३ सर्व मंडळीला दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र बोलविण्यासाठी याजकाने कर्णे वाजवावे.
Ha megfújják azokat, akkor gyülekezzék hozzád az egész község, a gyülekezés sátrának bejáratához.
4 ४ जर याजकाने एकच कर्णा वाजविला तर मग अधिकाऱ्यांनी, इस्राएलांच्या वंशाच्या अधिपतीनी तुझ्याकडे जमावे.
Ha pedig csak egyet fújnak meg, akkor gyülekezzenek hozzád a fejedelmek, Izrael ezreinek fejei.
5 ५ जेव्हा तू कर्णा मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे पूर्वेकडील छावण्यांनी त्यांचा प्रवासास सुरवात करावी.
Ha pedig riadót fújtok, akkor induljanak a táborok, melyek keletre táboroznak.
6 ६ जेव्हा दुसऱ्या वेळी मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे तेव्हा दक्षिणेकडील छावण्यांनी प्रवासास सुरवात करावी; त्यांच्या प्रवासासाठी मोठ्याने फुंकून इशारा द्यावा.
Ha másodszor fújtok riadót, akkor induljanak a táborok, melyek délre táboroznak; riadót fújjanak indulásukra.
7 ७ जेव्हा मंडळीला एकत्र जमावावयाचे असेल तेव्हा कर्णा फुंका, पण मोठ्याने फुंकू नये.
Midőn pedig egybegyűjtitek a gyülekezetet, akkor egyhuzamban fújjátok, de ne fújjatok riadót.
8 ८ अहरोनाचे मुले, याजक, यांनीच कर्णे वाजवावीत. हा तुमच्या लोकांस पिढ्यानपिढ्याचा कायमचा नियम आहे.
Áron fiai a papok fújják a trombitákat; ez legyen számotokra örök törvény nemzedékeiteken át.
9 ९ तुम्ही जेव्हा तुमच्या देशात तुम्हावर जुलूम करणाऱ्या शत्रूविरूद्ध लढायला जाता, मग तेव्हा तुम्ही कर्ण्याचा गजर करा. मी, परमेश्वर, तुमचा देव तुमची आठवण करीन आणि तुमच्या शत्रूपासून तुमचे रक्षण करील.
És, ha háborúba mentek országotokban, az ellenség ellen, aki szorongat benneteket, akkor fújjatok riadót a trombitákkal, és emlékezetben lesztek az Örökkévaló, a ti Istenetek színe előtt és megszabadultok ellenségeitektől.
10 १० तसेच तुम्ही आनंदाच्या प्रसंगी, तुमचे दोन्ही नियमीत सण व महिन्याच्या सुरवातीच्या दिवशी तुमची होमार्पणाच्या, शांत्यर्पणाच्या यज्ञांच्या सन्मानासाठी तुम्ही कर्णे वाजवावेत. तुमच्या परमेश्वरास तुमची आठवण करून देण्याची ही एक कृती आहे. हे तुम्ही करावे अशी मी तुम्हास आज्ञा देतो. मी तुमचा देव परमेश्वर आहे.
Örömnapjaitokon, ünnepeiteken és újholdjaitokon fújjátok meg a trombitákat égőáldozataitok és békeáldozataitok mellett, hogy legyenek emlékeztetőül a ti Istenetek színe előtt; én vagyok az Örökkévaló, a ti Istenetek.
11 ११ दुसऱ्या वर्षी, दुसऱ्या महिन्यात, महिन्याच्या विसाव्या दिवशी, साक्षपटाच्या निवासमंडपापासून ढग वर घेतला गेला.
És volt a második évben: a második hónapban, a hónap húszadikán, felszállt a felhő a bizonyság hajlékáról.
12 १२ तेव्हा इस्राएल लोक सीनाय रानातून आपल्या प्रवासास निघाले. ढग पारानाच्या रानात थांबला.
És elvonultak Izrael fiai vonulásaik szerint, Szináj pusztájából; és leszállott a felhő Poron pusztájában.
13 १३ परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी हा पहिला प्रवास केला.
És elvonultak elsőízben az Örökkévaló parancsa szerint Mózes által.
14 १४ पहिल्याने यहूदा वंशाच्या छावणीच्या निशाणाखालील त्यांच्या वैयक्तिक सैन्यासह बाहेर निघाले. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन यहूदाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
És vonult Júda fiai táborának zászlaja elsőnek, seregeik szerint; serege élén: Náchsón, Ámminodov fia.
15 १५ सुवाराचा मुलगा नथनेल इस्साखार वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
Isszáchár fiai törzsének serege élén: Neszánél, Cúor fia.
16 १६ हेलोनाचा मुलगा अलीयाब जबुलून वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
Zebúlun fiai törzsének serege élén: Eliov, Chélon fia.
17 १७ गेर्षोन व मरारी वंश निवासमंडपाची काळजी घेण्यासाठी होते, त्यांनी निवासमंडप खाली काढला आणि मग तो उचलून घेऊन त्यांच्या प्रवासास सुरवात केली.
Azután lebontották a hajlékot és vonultak Gérson fiai és Merori fiai, a hajlék vivői.
18 १८ त्यानंतर, रऊबेनाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी त्यांच्या प्रवासास सुरवात केली. शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
Azután vonult Rúbén táborának zászlaja, seregeik szerint; seregei élén: Eliccúr, Sedéúr fia.
19 १९ सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल शिमोन वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
Simon fiai törzsének serege élén: Selúmiél, Cúrisáddoj fia.
20 २० रगुवेलाचा मुलगा एल्यासाप गाद वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
Gád fiai törzsének serege élén: Eljoszof, Deúél fia.
21 २१ कहाथींनी प्रवासास सुरवात केली. ते पवित्रस्थानातील पवित्र वस्तू घेऊन निघाले. ते पुढच्या तळावर जाऊन पोहोचेपर्यंत अगोदरच्या इतरांनी पवित्र निवासमंडप उभा करून तयार ठेवला होता.
Azután vonultak a Kehosziták, a szentély vivői és fölállították a hajlékot, míg azok odaértek.
22 २२ त्यानंतर एफ्राइम वंशाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी प्रवासास सुरवात केली. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
Azután vonult Efráim fiai táborának zászlaja, seregeik szerint; serege élén: Elisomo, Ámmihúd fia.
23 २३ पदाहसुराचा मुलगा गमलीयेल मनश्शे वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
Menásse fiai törzsének serege élén: Gámliél, Pedocúr fia.
24 २४ गिदोनीचा मुलगा अबीदान बन्यामीन वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
Benjámin fiai törzsének serege élén: Ávidon, Gideóni fiai.
25 २५ दान वंशाच्या निशाणाखालील सैन्यांची शेवटची छावणी होती. अम्मीशाद्दै चा मुलगा अहीएजर दान वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
Azután vonult Dán fiai táborának zászlaja, bezárója mind a táboroknak, seregeik szerint; serege élén: Áchiezer, Ámmisádoj fia.
26 २६ आक्रानाचा मुलगा पगीयेल आशेर वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
Ásér fia törzsének serege élén: Págiél, Ochron fia.
27 २७ एनानाचा मुलगा अहीरा नफताली वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.
Náftáli fiai törzsének serege élén: Áchirá, Énon fia.
28 २८ ह्याप्रकारे इस्राएल लोकांचे सैन्य त्यांच्या प्रवासास सुरवात करीत.
Ezek Izrael fiainak vonulásai seregeik szerint; így vonultak.
29 २९ मोशेने आपला सासरा मिद्यानी रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याच्याशी बोलला. रगुवेल मोशेच्या पत्नीचा पिता होता. मोशे होबेबाशी बोलला व म्हणाला, “परमेश्वराने वर्णन केलेल्या देशात आम्ही जात आहोत. तो देश देण्याचे परमेश्वराने आम्हास वचन दिले आहे. तू आमच्याबरोबर ये आणि आम्ही तुझे चांगले करू. परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी चांगले करण्याचे वचन दिले आहे.”
És szólt Mózes Chóvához, Reúél fiához, a midjánitához, aki Mózes apja volt: Mi vonulunk azok a hely felé, melyről az Örökkévaló mondta: Azt fogom nektek adni; jöjj velünk és mi jót teszünk veled, mert az Örökkévaló jót ígér Izraelnek.
30 ३० परंतु होबाबाने उत्तर दिले “मी तुमच्याबरोबर येणार नाही. मी माझ्या देशात व माझ्या स्वतःच्या लोकात जाईल.”
És az mondta neki: Nem megyek; hanem országomba megyek.
31 ३१ मग मोशेने त्यास उत्तर दिले, “कृपा करून तू आम्हास सोडून जाऊ नको. तुला रानात कसा तळ द्यायचा हे माहित आहे. तू आमचा वाटाड्या हो.
De ő mondta: Ne hagyj el kérlek, bennünket, mert te ismered táborozásunkat a pusztában, azért légy nekünk szemekül.
32 ३२ तू जर आमच्याबरोबर येशील तर परमेश्वर जे काही आमचे चांगले करील तेच आम्ही तुझे करू.”
És lesz, ha velünk jössz, akkor abból a jóból, amit az Örökkévaló tesz velünk, jót teszünk veled.
33 ३३ परमेश्वराच्या पर्वतापासून तीन दिवसाचा प्रवास करीत गेले. परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या विसाव्यासाठी जागा शोधायला तीन दिवसाच्या वाटेवर त्यांच्यापुढे गेला.
És vonultak az Örökkévaló hegyétől három napi útra; az Örökkévaló szövetségének ládája pedig vonult előttük három: napi útra, hogy kikémleljen számukra nyugvóhelyet.
34 ३४ जसा ते प्रवास करत होते तसा परमेश्वराचा ढग दिवसरात्र त्यांच्यावर होता.
Az Örökkévaló felhője pedig fölöttük volt nappal, mikor elvonultak a táborból.
35 ३५ जेव्हा कराराचा कोश प्रवासास निघत तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, ऊठ, तुझ्या शत्रूंची पांगापांग कर, जे तुझा द्वेष करतात ते तुझ्यापासून पळून जावोत.”
És volt, mikor elindult a láda, így szólt Mózes: Fel, ó Örökkévaló, hogy elszéledjenek ellened és elmeneküljenek gyűlölőid előled.
36 ३६ जेव्हा कराराचा कोश थांबत असे, तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या लाखो लोकांकडे परत ये.”
Mikor pedig megnyugodott, mondta: Térj vissza Örökkévaló, Izrael ezreinek tízezrei közé.