< मत्तय 28 >

1 मग शब्बाथानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजडतांच पहाटेस मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया कबर पाहावयास तेथे गेल्या
తతః పరం విశ్రామవారస్య శేషే సప్తాహప్రథమదినస్య ప్రభోతే జాతే మగ్దలీనీ మరియమ్ అన్యమరియమ్ చ శ్మశానం ద్రష్టుమాగతా|
2 त्यावेळी पाहा, तेथे मोठा भूकंप झाला. परमेश्वराचा दूत स्वर्गातून उतरून तेथे आला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला लोटली व तो तीवर बसला.
తదా మహాన్ భూకమ్పోఽభవత్; పరమేశ్వరీయదూతః స్వర్గాదవరుహ్య శ్మశానద్వారాత్ పాషాణమపసార్య్య తదుపర్య్యుపవివేశ|
3 त्याचे रूप चमकणाऱ्या विजेसारखे व त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते.
తద్వదనం విద్యుద్వత్ తేజోమయం వసనం హిమశుభ్రఞ్చ|
4 पहारा करणारे शिपाई खूप घाबरले, ते थरथर कापू लागले आणि ते मरण पावलेल्या मनुष्यांसारखे झाले.
తదానీం రక్షిణస్తద్భయాత్ కమ్పితా మృతవద్ బభూవః|
5 देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, “भिऊ नका, कारण मी जाणतो की, ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही शोधत आहात.
స దూతో యోషితో జగాద, యూయం మా భైష్ట, క్రుశహతయీశుం మృగయధ్వే తదహం వేద్మి|
6 पण तो इथे नाही कारण तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्यास मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्यास ठेवले होते ती जागा पाहा.
సోఽత్ర నాస్తి, యథావదత్ తథోత్థితవాన్; ఏతత్ ప్రభోః శయనస్థానం పశ్యత|
7 आता लवकर जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा, तो मरणातून उठला आहे आणि बघा, तो तुमच्यापुढे गालील प्रांतात जात आहे आणि तुम्ही त्यास तेथे पाहाल. पाहा, मी तुम्हास सांगितले आहे.”
తూర్ణం గత్వా తచ్ఛిష్యాన్ ఇతి వదత, స శ్మశానాద్ ఉదతిష్ఠత్, యుష్మాకమగ్రే గాలీలం యాస్యతి యూయం తత్ర తం వీక్షిష్యధ్వే, పశ్యతాహం వార్త్తామిమాం యుష్మానవాదిషం|
8 तेव्हा त्या स्त्रिया भयाने व मोठ्या आनंदाने कबरेजवळून घाईने निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यासाठी त्या धावत गेल्या.
తతస్తా భయాత్ మహానన్దాఞ్చ శ్మశానాత్ తూర్ణం బహిర్భూయ తచ్ఛిష్యాన్ వార్త్తాం వక్తుం ధావితవత్యః| కిన్తు శిష్యాన్ వార్త్తాం వక్తుం యాన్తి, తదా యీశు ర్దర్శనం దత్త్వా తా జగాద,
9 मग पाहा; येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, “शांती असो!” त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्यास नमन केले.
యుష్మాకం కల్యాణం భూయాత్, తతస్తా ఆగత్య తత్పాదయోః పతిత్వా ప్రణేముః|
10 १० तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “भिऊ नका, जा, माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालील प्रांतात जावे. ते तिथे मला पाहतील.”
యీశుస్తా అవాదీత్, మా బిభీత, యూయం గత్వా మమ భ్రాతృన్ గాలీలం యాతుం వదత, తత్ర తే మాం ద్రక్ష్యన్తి|
11 ११ त्या स्त्रिया शिष्यांना सांगण्यासाठी गेल्या. तेव्हा कबरेवरील पहारेकरी शिपायांतील काहीजण नगरात गेले आणि त्यांनी घडलेले सर्व मुख्य याजकांना सांगितले.
స్త్రియో గచ్ఛన్తి, తదా రక్షిణాం కేచిత్ పురం గత్వా యద్యద్ ఘటితం తత్సర్వ్వం ప్రధానయాజకాన్ జ్ఞాపితవన్తః|
12 १२ नंतर याजक जाऊन वडीलजनांना भेटले आणि त्यांनी एक कट रचला. त्यांनी शिपायांना पुष्कळ पैसे देऊन असे म्हणण्यास सांगितले.
తే ప్రాచీనైః సమం సంసదం కృత్వా మన్త్రయన్తో బహుముద్రాః సేనాభ్యో దత్త్వావదన్,
13 १३ ते म्हणाले, “लोकांस असे सांगा की, आम्ही रात्री झोपेत असताना येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर चोरुन नेले.
అస్మాసు నిద్రితేషు తచ్ఛిష్యా యామిన్యామాగత్య తం హృత్వానయన్, ఇతి యూయం ప్రచారయత|
14 १४ हे जर राज्यापालाच्या कानावर गेले तर आम्ही त्याच मन वळवू देऊ आणि तुम्हास काही होऊ देणार नाही.”
యద్యేతదధిపతేః శ్రోత్రగోచరీభవేత్, తర్హి తం బోధయిత్వా యుష్మానవిష్యామః|
15 १५ मग शिपायांनी पैसे घेतले व याजकांनी सांगितले तसे केले आणि ही गोष्ट यहूदी लोकात आजवर बोलण्यात येते.
తతస్తే ముద్రా గృహీత్వా శిక్షానురూపం కర్మ్మ చక్రుః, యిహూదీయానాం మధ్యే తస్యాద్యాపి కింవదన్తీ విద్యతే|
16 १६ पण अकरा शिष्य गालील प्रांतात येशूने त्यांना सांगितलेल्या डोंगरावर निघून गेले.
ఏకాదశ శిష్యా యీశునిరూపితాగాలీలస్యాద్రిం గత్వా
17 १७ आणि त्यांनी त्यास बघितले तेव्हा त्यांनी त्याची उपासना केली. पण काहींना संशय आला.
తత్ర తం సంవీక్ష్య ప్రణేముః, కిన్తు కేచిత్ సన్దిగ్ధవన్తః|
18 १८ तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आला आहे.
యీశుస్తేషాం సమీపమాగత్య వ్యాహృతవాన్, స్వర్గమేదిన్యోః సర్వ్వాధిపతిత్వభారో మయ్యర్పిత ఆస్తే|
19 १९ म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.
అతో యూయం ప్రయాయ సర్వ్వదేశీయాన్ శిష్యాన్ కృత్వా పితుః పుత్రస్య పవిత్రస్యాత్మనశ్చ నామ్నా తానవగాహయత; అహం యుష్మాన్ యద్యదాదిశం తదపి పాలయితుం తానుపాదిశత|
20 २० आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.” (aiōn g165)
పశ్యత, జగదన్తం యావత్ సదాహం యుష్మాభిః సాకం తిష్ఠామి| ఇతి| (aiōn g165)

< मत्तय 28 >