< मत्तय 16 >

1 परूशी आणि सदूकी लोकांस येशूची परीक्षा पाहायची होती म्हणून ते येशूकडे आले व आम्हास आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी त्यांनी केली.
Podeszli faryzeusze i saduceusze i wystawiając go na próbę, prosili, aby pokazał im znak z nieba.
2 परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळ झाली असता म्हणता आजचे हवामान चांगले असेल कारण आकाश तांबूस आहे,
A on im odpowiedział: Gdy nastaje wieczór, mówicie: [Będzie] pogoda, bo niebo się czerwieni.
3 आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हास आकाशाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत काय?
Rano zaś: Dziś [będzie] niepogoda, bo niebo się czerwieni i jest zachmurzone. Obłudnicy, wygląd nieba umiecie rozpoznać, a znaków tych czasów nie możecie?
4 दुष्ट व देवाशी अप्रामाणिक असणारी पिढी चिन्ह शोधते, पण तिला योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.” मग तो त्यांना सोडून गेला.
Pokolenie złe i cudzołożne żąda znaku, ale [żaden] znak nie będzie mu dany oprócz znaku proroka Jonasza. I opuściwszy ich, odszedł.
5 येशू आणि त्याचे शिष्य सरोवराच्या पलीकडे गेले तेव्हा भाकरी घ्यायला विसरले.
A gdy jego uczniowie przeprawili się na drugą stronę [morza], zapomnieli wziąć chleba.
6 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध असा.”
I powiedział im Jezus: Uważajcie i strzeżcie się zakwasu faryzeuszy i saduceuszy.
7 तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून ते असे म्हणत आहे.”
A oni rozmawiali między sobą: Nie wzięliśmy chleba.
8 पण येशूने हे ओळखून म्हटले, “अहो अल्पविश्वासू, आपण भाकरी घेतल्या नाहीत असा विचार तुम्ही आपसामध्ये का करता?
Gdy Jezus to zauważył, powiedział im: Ludzie małej wiary, czemu rozmawiacie między sobą o tym, że nie wzięliście chleba?
9 तुम्हास अजून समजत नाही काय? पाच भाकारींनी पाच हजार लोकांस जेवू घातले ते आणि त्यानंतर तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या ते तुम्हास आठवत नाही काय?
Jeszcze nie rozumiecie ani nie pamiętacie tych pięciu chlebów i pięciu tysięcy [ludzi] oraz ile koszy zebraliście?
10 १० तसेच चार हजारांच्या जेवणाला सात भाकरी आणि तुम्ही किती टोपल्या उचलून घेतल्या हे तुम्हास आठवत नाही काय?
Ani tych siedmiu chlebów i czterech tysięcy [ludzi] oraz ile koszy zebraliście?
11 ११ मी भाकरी विषयी तुम्हास बोललो नाही, तर परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध राहा, असे म्हणालो, हे तुम्हास कसे समजत नाही?”
Jak to jest, że nie rozumiecie, iż nie o chlebie wam powiedziałem, [mówiąc], abyście się strzegli zakwasu faryzeuszy i saduceuszy?
12 १२ तेव्हा त्यांना समजले की, त्याने त्यांना भाकरीच्या खमिराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते तर परूशी आणि सदूकी यांच्या शिकवणुकीविषयी सावधान राहायला सांगितले होते.
Wtedy zrozumieli, że nie mówił, aby się strzegli zakwasu chlebowego, ale nauki faryzeuszy i saduceuszy.
13 १३ येशू फिलिप्पाच्या कैसरीया या भागाकडे गेला. तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?”
A gdy Jezus przyszedł w okolice Cezarei Filipowej, pytał swoich uczniów: Za kogo mnie, Syna Człowieczego, uważają ludzie?
14 १४ आणि ते म्हणाले, “काही बाप्तिस्मा करणारा योहान, तर कित्येक एलीया तर दुसरे काही यिर्मया किंवा संदेष्ट्यापैकी एक असे म्हणतात.”
A oni odpowiedzieli: Jedni za Jana Chrzciciela, inni za Eliasza, a jeszcze inni za Jeremiasza albo za jednego z proroków.
15 १५ मग येशू त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”
I zapytał ich: A wy za kogo mnie uważacie?
16 १६ शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.”
Szymon Piotr odpowiedział: Ty jesteś Chrystusem, Synem Boga żywego.
17 १७ येशू म्हणाला, “शिमोन, बार्योना, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले.
Wtedy Jezus powiedział do niego: Błogosławiony jesteś, Szymonie, synu Jonasza, bo nie objawiły ci [tego] ciało i krew, ale mój Ojciec, który jest w niebie.
18 १८ आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे मृतलोकाच्या द्वारांचे कांहींच चालणार नाही. (Hadēs g86)
Ja ci też mówię, że ty jesteś Piotr, a na tej skale zbuduję mój kościół, a bramy piekła go nie przemogą. (Hadēs g86)
19 १९ मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”
I tobie dam klucze królestwa niebieskiego. Cokolwiek zwiążesz na ziemi, będzie związane i w niebie, a cokolwiek rozwiążesz na ziemi, będzie rozwiązane [i] w niebie.
20 २० तेव्हा त्याने शिष्यांना मी ख्रिस्त आहे ते तुम्ही कोणालाही सांगू नका असे निक्षून सांगितले.
Wtedy przykazał swoim uczniom, aby nikomu nie mówili, że on, Jezus, jest Chrystusem.
21 २१ तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, आपण यरूशलेम शहराला जाऊन वडील, यहूदी नेते व मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राच्या शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याचे अगत्य आहे.
I odtąd zaczął Jezus tłumaczyć swoim uczniom, że musi iść do Jerozolimy i wiele cierpieć od starszych, od naczelnych kapłanów i uczonych w Piśmie, i być zabity, a trzeciego dnia zmartwychwstać.
22 २२ तेव्हा पेत्राने त्यास एकाबाजूला घेऊन निषेध करून म्हटले, “प्रभू, तुझ्यापासून हे दूर असो. असे तुला कधीही होणारच नाही!”
A Piotr, wziąwszy go [na bok], zaczął go strofować, mówiąc: Zmiłuj się nad sobą, Panie! Nie przyjdzie to na ciebie.
23 २३ परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून चालता हो, तू मला अडखळण आहेस, कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.”
Lecz on odwrócił się i powiedział do Piotra: Odejdź ode mnie, szatanie! Jesteś dla mnie zgorszeniem, bo nie pojmujesz tego, co Boże, ale to, co ludzkie.
24 २४ तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.
Wtedy Jezus powiedział do swoich uczniów: Jeśli ktoś chce pójść za mną, niech się wyprze samego siebie, weźmie swój krzyż i idzie za mną.
25 २५ कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास मिळवील.
Bo kto chce zachować swoje życie, straci je, a kto straci swoje życie z mojego powodu, znajdzie je.
26 २६ जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्यास काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल?
Cóż pomoże człowiekowi, choćby cały świat pozyskał, a na swojej duszy poniósł szkodę? Albo co da człowiek w zamian za swoją duszę?
27 २७ कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या स्वर्गदूतांसहित येईल त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल.
Syn Człowieczy przyjdzie bowiem w chwale swego Ojca ze swoimi aniołami i wtedy odda każdemu według jego uczynków.
28 २८ मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यातले काहीजण असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
Zaprawdę powiadam wam: Są wśród stojących tutaj tacy, którzy nie zakosztują śmierci, aż ujrzą Syna Człowieczego przychodzącego w swoim królestwie.

< मत्तय 16 >