< यिर्मया 43 >
1 १ असे घडले की, यिर्मयाने परमेश्वर जो त्यांचा देव याने लोकांस सांगण्यास दिलेली सर्व वचने सांगून समाप्त केली.
Después de que Jeremías terminó de decirles a todos todo lo que el Señor, su Dios, le había enviado a decir,
2 २ होशायाचा मुलगा अजऱ्या, कारेहाचा मुलगा योहानान व सर्व गर्विष्ठ लोक यिर्मयाला म्हणाले, “तू खोटे बोलत आहेस. तुम्ही तेथे मिसरात राहण्यास जाऊ नका, असे सांगण्यास परमेश्वर आमचा देव याने तुला पाठविले नाही.
Azarías hijo de Oseas, Johanán hijo de Carea, y todos los hombres orgullosos y rebeldes le dijo a Jeremías: “¡Mientes! El Señor, nuestro Dios, no te ha enviado para decirnos: ‘No deben irse a vivir a Egipto’.
3 ३ तू आम्हास खास्द्यांच्या हाती द्यावे, यासाठी की, तू आमच्या मरणास कारण व्हावे आणि आम्ही बाबेलात बंदीवान व्हावे. म्हणून नेरीयाचा मुलगा बारूख तुला आमच्याविरूद्ध भडकावीत आहे.”
¡No, es Baruc hijo de Nerías quien te ha puesto en contra de nosotros para entregarnos a los babilonios para que nos maten o nos exilien a Babilonia!”
4 ४ म्हणून कारेहाचा मुलगा योहानान, सर्व सैन्याचे अधिकारी व इतर सर्व लोक ह्यांनी यहूदा देशात राहण्याविषयीची परमेश्वराची वाणी ऐकली नाही.
Así que Johanán hijo de Carea y todos los comandantes del ejército se negaron a obedecer la orden del Señor de permanecer en la tierra de Judá.
5 ५ पण कारेहाचा मुलगा योहानान व सैन्यांचे सर्व अधिकारी यांनी वाचलेले सर्व यहूदी जे ज्या सर्व राष्ट्रांत पसरले होते. त्यातून यहूदा देशात राहण्यास परत आले होते त्यांना आपल्याबरोबर घेतले.
En lugar de eso, Johanán hijo de Carea y todos los comandantes del ejército se llevaron a todos los que quedaban del pueblo de Judá, los que habían regresado al país desde todas las naciones donde habían sido dispersados.
6 ६ त्यांनी पुरुष व स्त्रिया, मुले व राजांच्या मुली आणि राजाचा अंगरक्षकांचा नायक नबूजरदान याने जे सर्वजण शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या याच्याजवळ ठेवले होते त्यांना आणि यिर्मया संदेष्टा व नेरीयाचा मुलगा बारूख ह्यांनाही बरोबर नेले.
Entre ellos había hombres, mujeres y niños, las hijas del rey y todos los que Nabuzaradán, el comandante de la guardia, había permitido que se quedaran con Gedalías, así como Jeremías y Baruc.
7 ७ ते मिसर देशात, तहपन्हेस येथे गेले, कारण त्यांनी परमेश्वराची वाणी ऐकली नाही.
Fueron a Egipto porque se negaron a obedecer el mandato del Señor. Fueron hasta Tafnes.
8 ८ मग तहपन्हेसात यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले आणि म्हणाले,
Un mensaje del Señor llegó a Jeremías en Tafnes:
9 ९ “तू आपल्या हातात काही मोठे धोंडे घे आणि ते तहपन्हेस येथील फारोच्या घराच्या प्रवेशदाराजवळ पादचारीमार्गावर यहूदी लोकांच्या दृष्टीसमोर चुन्याने लपवून ठेव.
Mientras el pueblo de Judá observa, consigue algunas piedras grandes y ponlas en el cemento del pavimento de ladrillos en el camino de entrada al palacio del faraón en Tafnes.
10 १० मग त्यांना सांग, सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, पाहा, मी बाबेलाचा राजा, नबुखद्नेस्सर, माझा सेवक याला येथे निरोप्या पाठवून बोलावून घेईन. यिर्मया तू या पुरलेल्या धोंड्यावर मी त्याचे सिंहासन स्थापीन, नबुखद्नेस्सर त्यावर आपला भव्य गालीचा पसरवील.
Diles que esto es lo que dice el Señor Todopoderoso, el Dios de Israel: Voy a enviar a buscar a mi siervo Nabucodonosor, rey de Babilonia, y lo traeré aquí. Pondré su trono sobre estas piedras que he colocado en el pavimento, y él extenderá su tienda real sobre ellas.
11 ११ कारण तो येऊन व मिसरावर चढाई करील. जे कोणी मरणासाठी नेमलेले असतील त्यांना मरण दिले जाईल. जो कोणी बंदीवांनासाठी नेमलेला आहे, तो बंदीवासात जाईल. आणि जे कोणी तलवारीसाठी असतील, ते तलवारीला दिले जातील.
Vendrá y atacará a Egipto, trayendo la muerte a los que están destinados a morir, la prisión a los que están destinados a ser encarcelados y la espada a los que están destinados a ser muertos por la espada.
12 १२ मग मी मिसराच्या देवांच्या मंदिरांना आग लावील. नबुखद्नेस्सर त्यांना जाळील किंवा त्यांना बंदीवान करून नेईल. मेंढपाळ ज्याप्रमाणे त्याच्या कपड्यावरील पिसवा ओढून काढून आपले कपडे स्वच्छ करतो, त्याप्रमाणे तो मिसर देश साफ करील. तो विजयाने त्या जागेतून जाईल.
Prenderé fuego a los templos de los dioses de Egipto. Nabucodonosor los quemará y saqueará sus ídolos. Limpiará la tierra de Egipto como un pastor limpia su manto de pulgas, y saldrá ileso.
13 १३ तो मिसर देशामधील बेथ-शेमेश त्याचे स्तंभ मोडून टाकील. तो मिसरी देवतांची मंदिरे जाळून टाकील.”
Derribará los pilares sagrados del templo del sol en Egipto, y quemará los templos de los dioses de Egipto.