< होशेय 13 >
1 १ एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई; तो इस्राएलाचा सरदार झाला; पण पुढे बआलमूर्तीमुळे दोषी होऊन तो लोपला.
CUANDO Ephraim hablaba, hubo temor; fué ensalzado en Israel; mas pecó en Baal, y murió.
2 २ आता ते अधिकाधिक पाप करु लागले ते चांदीच्या ओतीव मूर्ती आपल्या कुशलतेने कारागीर बनवतो तसे बनवू लागले. लोक म्हणू लागले, “जे बलिदान करतात त्यांनी वासरांचे चुंबन घ्या”
Y ahora añadieron á su pecado, y de su plata se han hecho según su entendimiento, estatuas de fundición, ídolos, toda obra de artífices; acerca de los cuales dicen á los hombres que sacrifican, que besen los becerros.
3 ३ म्हणून पहाटेच्या ढगासारखे लवकर उडून जाणाऱ्या दवासारखे खळ्यातून वाऱ्याने उडणाऱ्या भुसासारखे आणि धुराडयातून उडणाऱ्या धुरासारखे ते होतील.
Por tanto serán como la niebla de la mañana, y como el rocío de la madrugada que se pasa; como el tamo que la tempestad arroja de la era, y como el humo que de la chimenea sale.
4 ४ पण मी तुमचा देव परमेश्वर आहे, ज्याने तुम्हास मिसरातून बाहेर काढले, माझ्याशिवाय तुम्हास अन्य देव नाही, माझ्याशिवाय कोणी तारक नाही.
Mas yo soy Jehová tu Dios desde la tierra de Egipto: no conocerás pues Dios fuera de mí, ni otro Salvador sino á mí.
5 ५ मी तुम्हास रानात, रुक्ष प्रदेशात जाणून होतो.
Yo te conocí en el desierto, en tierra seca.
6 ६ जेव्हा तुम्हास चारा मिळाला तेव्हा तुम्ही तृप्त झालात, आणि जेव्हा तुमचे पोट भरले तेव्हा तुमचे हृदय उन्मत्त झाले; त्या कारणास्तव तुम्ही मला विसरला.
En sus pastos se hartaron, hartáronse, y ensoberbecióse su corazón: por esta causa se olvidaron de mí.
7 ७ म्हणून मी सिंहासारखा तुमच्याशी वागेन, चित्याप्रमाणे तुमच्या वाटेवर दबा धरुन बसेन.
Por tanto, yo seré para ellos como león; como un leopardo en el camino los espiaré.
8 ८ जिची पिल्ले चोरी झाली, अशा अस्वली सारखा मी तुमच्यावर हल्ला करीन, मी तुमचे उर फाडीन, आणि सिंहिनीप्रमाणे तुम्हास खाऊन टाकेन, जसा वनपशू तुम्हास फाडून टाकतो.
Como oso que ha perdido los hijos los encontraré, y romperé las telas de su corazón, y allí los devoraré como león: bestia del campo los despedazará.
9 ९ इस्राएला हा तुझा नाश आहे जो येत आहे, कारण तू माझ्या म्हणजे तुझ्या सहाय्यकर्त्यांच्या विरोधात गेला आहेस.
Te perdiste, oh Israel, mas en mí [está] tu ayuda.
10 १० तुझा राजा कोठे आहे? जो तुझ्या सर्व नगरांचे रक्षण करतो तुझे अधीपती कोठे आहेत? ज्याविषयी तू मला म्हटले, “मला राजा आणि अधिपती दे?”
¿Dónde está tu rey, para que te guarde con todas tus ciudades? ¿y tus jueces, de los cuales dijiste: Dame rey y príncipes?
11 ११ मी क्रोधाने तुला राजा दिला आणि रागाने त्यास काढूनही घेतले.
Díte rey en mi furor, y quitélo en mi ira.
12 १२ एफ्राईमाचा अन्याय गोळा केला आहे, त्याच्या अपराधाची रास करण्यात आली आहे.
Atada está la maldad de Ephraim; su pecado está guardado.
13 १३ प्रसूतिवेदना त्याच्यावर येतील, पण तो अक्कलशून्य मुलगा आहे, कारण जन्म घेण्याच्या वेळी तो गर्भातून बाहेर येत नाही.
Dolores de mujer de parto le vendrán: es un hijo ignorante, que [de otra manera] no estuviera tanto tiempo en el rompimiento de los hijos.
14 १४ मी त्यांना खरोखर अधोलोकाच्या बळापासून सोडवीन काय? मी त्यांना खरोखर मरणातून सोडवणार काय? मरणा, तुझ्या महामाऱ्या कोठे आहेत? आणि इथे कळवळा माझ्या समोरुन लपलेला आहे. (Sheol )
De la mano del sepulcro los redimiré, librarélos de la muerte. Oh muerte, yo seré tu muerte; y seré tu destrucción, oh sepulcro; arrepentimiento será escondido de mis ojos. (Sheol )
15 १५ एफ्राईम आपल्या भावांमध्ये जरी प्रगत झाला, तरी पूर्वेचा वारा येईल, परमेश्वराचा वारा रानातून येईल एफ्राईमाचा झरा सुकून जाईल, त्याच्या विहिरीत पाणी राहणार नाही. त्यांचा शत्रू त्याच्या सर्व मौल्यवान वस्तू लुटून नेईल.
Aunque él fructificará entre los hermanos, vendrá el solano, viento de Jehová, subiendo de la parte del desierto, y secarse ha su vena, y secaráse su manadero: él saqueará el tesoro de todas las preciosas alhajas.
16 १६ शोमरोनात दोष येईल, कारण त्याने देवाविरुध्द बंड केले आहे ते तलवारीने पडतील. त्यांची लहान मुले आपटली जातील आणि त्यांच्या गर्भवती स्त्रिया चिरुन टाकण्यात येतील.
Samaria será asolada, porque se rebeló contra su Dios: caerán á cuchillo: sus niños serán estrellados, y sus preñadas serán abiertas.