< उत्पत्ति 47 >
1 १ योसेफ फारोकडे जाऊन म्हणाला, “माझा बाप माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी कनान देशातून त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे सर्वकाही घेऊन येथे आले आहेत. ते गोशेन प्रांतात आहेत.”
Ode, dakle, Josip te obavijesti faraona: “Moj otac i moja braća stigoše sa svojim ovcama i govedima i sa svime što imaju iz zemlje kanaanske, i eno ih u gošenskom kraju.”
2 २ त्याने आपल्याबरोबर फारोसमोर जाण्यासाठी आपल्या भावांपैकी पाच जणांना घेतले आणि त्यांची ओळख करून दिली.
I uzevši petoricu između svoje braće, uvede ih faraonu.
3 ३ फारो राजा त्याच्या भावांना म्हणाला, “तुम्ही काय धंदा करता?” ते म्हणाले, “आम्ही आपले दास मेंढपाळ आहोत आणि आमचे पूर्वजही मेंढपाळच होते.”
Onda faraon zapita njegovu braću: “Čime se bavite?” Odgovore faraonu: “Tvoje su sluge stočari, baš kao što su bili naši preci.
4 ४ ते फारोला पुढे म्हणाले, “कनान देशात फारच भयंकर व कडक दुष्काळ पडला आहे. तेथे एकाही शेतात तुमच्या दासांच्या कळपांसाठी हिरवे गवत किंवा हिरवा चारा राहिलेला नाही म्हणून आम्ही या देशात तात्पुरते राहण्यास आलो आहोत. आम्ही आपणांस विनंती करतो की आम्हास गोशेन प्रांतात राहू द्यावे.”
Došli smo da potražimo kratak boravak u ovoj zemlji”, rekoše faraonu, “jer je nestalo paše za stada tvojih slugu, strašna glad pritište kanaansku zemlju. Dopusti da se tvoje sluge nastane u gošenskom kraju.”
5 ५ मग फारो योसेफाला म्हणाला, “तुझा बाप व तुझे भाऊ तुझ्याकडे आले आहेत.
[5a] Faraon reče Josipu: [6b] “Neka se, dakle, nastane u gošenskom kraju. A ako znaš da među njima ima prikladnih, postavi ih za nadglednike moga osobnog blaga.” [5b] Tako, kad Jakov i njegovi sinovi stigoše u Egipat i kad faraon, kralj egipatski, to ču, reče Josipu: “Budući da su tvoj otac i tvoja braća došli k tebi,
6 ६ त्यांना राहण्याकरिता तू मिसर देशातील कोणतेही ठिकाण निवड. त्यांना उत्तम जमीन असलेला प्रदेश दे, त्यांना गोशेन प्रांतात वस्ती करून राहू दे. आणि त्याच्यात जर कोणी हुशार मनुष्य मनुष्ये तुला माहीत असतील तर मग त्यांना माझ्या गुराढोरांवर अधिकारी कर.”
[6a] egipatska ti je zemlja na raspolaganju: smjesti svoga oca i svoju braću u najboljem kraju.”
7 ७ मग योसेफाने याकोब त्याचा बाप याला आणले आणि फारोच्या समोर सादर केले. तेव्हा याकोबाने फारोस आशीर्वाद दिला.
Josip onda dovede svoga oca Jakova faraonu. Jakov blagoslovi faraona.
8 ८ मग फारोने याकोबाला विचारले, “तुमचे वय किती आहे?”
A faraon upita Jakova: “Koliko ti je godina?”
9 ९ याकोबाने फारोस उत्तर दिले, “माझ्या कष्टमय जीवनाची वर्षे फक्त एकशे तीस वर्षे आहेत. परंतु माझ्या पूर्वजांइतके दीर्घ आयुष्य मला लाभले नाही.”
Jakov odgovori faraonu: “Godina moga lutalačkog življenja ima stotina i trideset. Malo ih je i nesretne su bile godine moga života; ne dostižu brojem godine življenja na zemlji mojih otaca.”
10 १० याकोबाने फारोला आशीर्वाद दिला व मग तो फारोपुढून निघून गेला.
Poslije toga Jakov se oprosti s faraonom i ode od njega.
11 ११ योसेफाने फारोच्या आज्ञेप्रमाणे आपल्या बापाला व भावांना रामसेस नगरजवळील प्रांतातील उत्तम भूमी त्यांना रहावयास दिली.
Tako Josip nastani svoga oca i svoju braću davši im u vlasništvo najljepši kraj egipatske zemlje, u kraju Ramsesovu, kako je faraon naredio.
12 १२ आणि त्याने आपला बाप, आपले भाऊ व त्यांच्या कुटुंबाप्रमाणे, त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांच्या संख्येप्रमाणे भरपूर अन्नसामग्री पुरवली.
A Josip opskrbi hranom svoga oca, svoju braću i svu očevu obitelj sve do najmanjega.
13 १३ त्या वेळी सर्व भूमीवर दुष्काळ तर फारच कडक पडला होता; अन्नधान्य कोठेच मिळत नव्हते. त्यामुळे मिसर व कनान देशातील जमीन दुष्काळामुळे उजाड झाली.
Nigdje nije bilo hrane jer je pritisla strašna glad: izmuči ona i zemlju egipatsku i zemlju kanaansku.
14 १४ योसेफाने मिसर आणि कनान देशातील रहिवाशांना अन्नधान्य विकून त्यांच्याकडील सर्व पैसा गोळा केला. त्यानंतर योसेफाने तो पैसा फारोच्या राजवाड्यात आणला.
Josip pobra sav novac što se nalazio u zemlji egipatskoj i zemlji kanaanskoj u zamjenu za žito koje se prodavalo i odnese novac u faraonov dvor.
15 १५ काही काळाने मिसर व कनान देशातील लोकांचे पैसे संपून गेले, त्यामुळे मिसरचे लोक योसेफाकडे येऊन म्हणाले, “आम्हास अन्न द्या! आमचे सर्व पैसे संपले आहेत म्हणून आम्ही तुमच्यासमोरच का मरावे?”
Kad je nestalo novca u zemlji egipatskoj i zemlji kanaanskoj, svi Egipćani dođu k Josipu te mu reknu: “Daj nam kruha! Zašto da pomremo pred tvojim očima? Novca više nema.”
16 १६ परंतु योसेफ म्हणाला, “जर तुमचे पैसे संपले आहेत, तर तुम्ही मला तुमची गुरेढोरे द्या आणि मग मी तुमच्या गुराढोरांच्या बदल्यात तुम्हास धान्य देईन.”
Josip odgovori: “Predajte svoju stoku pa ću vam dati žita u zamjenu za stoku kad je novca nestalo.”
17 १७ तेव्हा लोकांनी त्यांच्याकडील गुरेढोरे, शेरडेमेंढरे, घोडे, गाढवे आणि इतर जनावरे देऊन अन्नधान्य विकत घेतले. त्या वर्षात लोकांकडून गुरेढोरे घेऊन त्यांच्या बदल्यात योसेफाने त्यांना अन्नधान्य दिले.
Tako su oni dovodili svoju stoku Josipu, a Josip im davaše kruh u zamjenu za konje, za sitnu i krupnu stoku i za magarad. Tako ih je one godine opskrbljivao kruhom u zamjenu za sve njihovo blago.
18 १८ परंतु त्या वर्षानंतर, पुढील वर्षी लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले, “आमच्या धन्यापासून आम्ही काही लपवत नाही. आपणास माहीत आहे की, आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत आणि आमची गुरेढोरेही धन्याची झाली आहेत. तेव्हा आमच्या धनाच्यासमोर आमची शरीरे व आमच्या जमिनी याशिवाय दुसरे काहीही उरलेले नाही.
Kad je ona godina prošla, dođu k njemu i druge godine te mu reknu: “Ne možemo sakriti od svoga gospodara: novca je nestalo, blaga su već ustupljena gospodaru; drugo ništa ne preostaje da gospodaru ustupimo nego sebe i svoje oranice.
19 १९ तुमच्या डोळ्यांसमोर आम्ही का मरावे? आमचा व आमच्या जमिनीचाही नाश का व्हावा? परंतु जर आपण आम्हांला अन्नधान्य द्याल तर मग आम्ही आमच्या जमिनी फारोला देऊ आणि आम्ही त्याचे गुलाम होऊ. आम्हास बियाणे द्या म्हणजे आम्ही जगू, मरणार नाही आणि जमिनी ओस पडणार नाहीत.”
Zašto da uništimo na tvoje oči i sebe i svoje zemlje? Uzmi i nas i naše zemlje u zakup za kruh, i tako ćemo zajedno sa svojom zemljom postati faraonovi kmetovi; daj sjemena da preživimo: da ne izginemo i da nam oranice ne postanu pustoš!”
20 २० तेव्हा मिसरमधील सर्व शेतजमिनी योसेफाने फारोसाठी विकत घेतल्या. मिसरी लोकांनी आपल्या शेतजमिनी फारोला विकल्या कारण दुष्काळ भयंकर तीव्र झाला होता.
Tako Josip steče faraonu u posjed sve egipatske oranice, jer je svaki Egipćanin, kako ih pritisnu glad, prodao svoje njive. Tako je zemlja postala faraonovo vlasništvo,
21 २१ मिसरमधील एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या सर्व लोकांस त्याने फारोचे गुलाम केले.
a narod od jednog kraja Egipta do drugoga njegovim robljem.
22 २२ योसेफाने याजकांच्या मालकीच्या जमिनी मात्र विकत घेतल्या नाहीत. फारो याजकांना त्यांच्या कामाबद्दल पगार देत होता. त्या पैशातून ते आपणासाठी अन्नधान्य विकत घेत असत म्हणून त्यांच्यावर आपल्या जमिनी विकण्याची वेळ आली नाही.
Jedino nije preuzeo svećeničkih imanja, jer je faraon davao svećenicima određeni dio, i tako su živjeli od prihoda što im ga je faraon davao. Stoga nisu prodali svojih imanja.
23 २३ तेव्हा योसेफ लोकांस म्हणाला, “पाहा, मी फारोकरता तुम्हास तुमच्या जमिनीसह विकत घेतले आहे तर मी आता तुम्हास बियाणे देतो. ते तुम्ही शेतात पेरा.
Onda Josip reče svijetu: “Budući da sam danas za faraona prekupio i vas i vašu zemlju, evo vam sjeme pa zasijte zemlju.
24 २४ परंतु हंगामाच्या वेळी तुमच्या उत्पन्नातील पाचवा हिस्सा फारोला दिलाच पाहिजे. बाकीचे चार हिस्से तुम्ही तुमच्यासाठी घ्यावेत. त्यातून पुढच्या वर्षाकरता तुम्ही बियाणे ठेवावे व बाकीच्या धान्याचा तुमच्या घरातील लहानथोरांस खाण्यासाठी उपयोग करावा.”
A kad bude pobiranje ljetine, faraonu ćete davati jednu petinu, dok će četiri petine ostajati vama: za zasijavanje polja, za hranu vama i onima koji su u vašim domovima i za hranu vašoj djeci.”
25 २५ लोक म्हणाले, “आपण आम्हांला वाचवले आहे, म्हणून फारोचे गुलाम होण्यात आम्हांला आनंद आहे.”
Oni odgovore: “Život si nam spasio! Mi smo zahvalni svome gospodaru što možemo biti faraonovi robovi.”
26 २६ त्या वेळी मग योसेफाने देशासाठी एक कायदा केला, तो आजपर्यंत चालू आहे; त्या कायद्याप्रमाणे जमिनीच्या उत्पन्नाचा पाचवा भाग फारोचा आहे. फारो मिसरमधील सर्व जमिनीचा मालक आहे. फक्त याजकांची जमीन फारोच्या मालकीची नाही.
Tako Josip napravi za Egipat zemljišni zakon koji i danas vrijedi: petina pripada faraonu; jedino svećenička imanja nisu prešla faraonu.
27 २७ इस्राएल मिसरमध्ये गोशेन प्रांतात राहिला. त्याची संतती खूप वाढली व त्यांची भरभराट झाली. त्यांना मिसरमधील जमीन मिळाली व त्यांनी वतने केली आणि तेथे त्यांचे सर्वकाही चांगले झाले.
Izraelci se nastaniše u zemlji egipatskoj, u kraju gošenskom; u njem stekoše vlasništvo; bijahu rodni i broj im se veoma umnoži.
28 २८ याकोब मिसरमध्ये सतरा वर्षे राहिला, तो एकशे सत्तेचाळीस वर्षांचा झाला.
U zemlji egipatskoj poživje Jakov sedamnaest godina. Tako je duljina Jakovljeva života iznosila sto četrdeset i sedam godina.
29 २९ इस्राएलाच्या मरणाचा काळ जवळ आला, म्हणून मग त्याने आपला मुलगा योसेफ याला आपणाजवळ बोलावले आणि तो त्यास म्हणाला, “तू जर माझ्यावर प्रेम करतोस तर माझ्या मांडीखाली तुझा हात ठेवून मला वचन दे की, मी जे सांगतो ते तू करशील आणि तू माझ्याशी खरेपणाने वागशील. मला मिसरामध्ये पुरू नको.
A kad se približi vrijeme Izraelu da umre, pozva svoga sina Josipa te mu reče: “Ako mi želiš ugoditi, stavi svoju ruku pod moje stegno kao jamstvo svoje odanosti meni: nemoj me sahraniti u Egiptu!
30 ३० जेव्हा मी माझ्या वाडवडिलांसोबत झोपी जाईन, तेव्हा मला मिसरमधून बाहेर घेऊन जा आणि माझ्या पूर्वजांना जेथे पुरले आहे तेथे म्हणजे आपल्या वंशजांसाठी घेतलेल्या पुरण्याच्या जागेत मला मूठमाती दे.” योसेफाने उत्तर दिले, “तुम्ही मला जे करावयास सांगितले ते मी नक्की करीन.”
Kad legnem dolje sa svojim ocima, prenesi me iz Egipta gore i sahrani me u njihovu grobnicu!” “Učinit ću kako si rekao”, odgovori.
31 ३१ मग याकोब म्हणाला, “तू माझ्याशी तशी शपथ वाहा.” तेव्हा तसे करण्याबद्दल योसेफाने शपथ वाहिली. मग इस्राएलाने आपले डोके मागे पलंगाच्या उशावर नम्रतेने खाली वाकून नमन केले.
“Zakuni mi se!” - reče. I on mu se zakle. Tada se Izrael duboko prignu na uzglavlju.