< उत्पत्ति 29 >
1 १ नंतर याकोबाने आपला प्रवास पुढे चालू ठेवला आणि तो पूर्वेकडील लोकांच्या देशात आला.
Jakop ni pou a cei teh Kanîtholae taminaw e ram dawk a pha.
2 २ त्याने पाहिले तेव्हा त्यास एका शेतात एक विहीर दिसली आणि पाहा तिच्याजवळ मेंढरांचे तीन कळप बसलेले होते. या विहिरीतून कळपांना पाणी पाजीत असत आणि या विहिरीच्या तोंडावरचा दगड मोठा होता.
A khet navah tuikhu kaawm e lawpam vah tuhu kathum touh a kamkawn e hah a hmu. Bangkongtetpawiteh, tuikhu thung e tui hah tunaw ouk a pânei awh. Tuikhu koe lungsong ao.
3 ३ जेव्हा सर्व कळप तेथे जमत तेव्हा मेंढपाळ विहिरीच्या तोंडावरील मोठा दगड ढकलून बाजूला काढीत मग सर्व कळपांचे पाणी पिऊन झाल्यावर ते तो दगड परत त्याच जागेवर ठेवत.
Hote hmuen koe tunaw pueng pâkhueng lah ao han. Tuikhu khannae lungsong hah takhoe vaiteh, tu tui pânei hoi talung teh ama onae hmuen dawk bout teng lah ao han.
4 ४ याकोब त्यांना म्हणाला, “माझ्या बंधूंनो, तुम्ही कोठून आलात?” ते म्हणाले, “आम्ही हारान प्रदेशाहून आलो आहोत.”
Jakop ni ahnimouh koevah, ka hmaunawnghanaw api kho maw, telah a pacei. Ahnimouh ni, Haran taminaw doeh telah atipouh awh.
5 ५ मग तो त्यांना म्हणाला, “नाहोराचा नातू लाबान याला तुम्ही ओळखता का?” ते म्हणाले, “होय, आम्ही त्यास ओळखतो.”
Ahni ni ahnimouh koevah, Nahor capa Laban na panue awh maw telah a pacei. Ahnimouh ni, Oe ka panue awh, telah atipouh awh.
6 ६ याकोबाने त्यांना विचारले, “तो बरा आहे काय?” त्यांनी उत्तर दिले, “तो बरा आहे आणि ती पाहा त्याची मुलगी राहेल मेंढरे घेऊन इकडे येत आहे.”
Ahni ni ahnimouh koevah, a hring rah maw, telah a pacei. Ahnimouh ni, Oe a dam rah doeh, khenhaw! a canu Rachel hai tu hoi a tho lahun, telah atipouh awh.
7 ७ याकोब म्हणाला, “हे पाहा, अद्याप दिवस बराच आहे आणि तसेच कळपांना एकत्र करण्याची अजून वेळ झाली नाही. तेव्हा मेंढरांना पाणी पाजा, आणि चरण्यासाठी त्यांना परत जाऊ द्या.”
Ahni ni, Khenhaw! Kanî asaw rah, saring pâkhueng hanelah khout hoeh rah. Tunaw hah tui pânei awh nateh bout tha awh ei, telah atipouh.
8 ८ परंतु ते म्हणाले, “आम्हांला तसे करता येत नाही, कारण सर्व कळप एकत्र आल्यावरच आम्ही विहिरीवरील दगड बाजूला सारतो व मग सर्व कळपांना पाणी पाजतो.”
Hateiteh, ahnimouh ni, tuhunaw pueng pâkhueng teh tuikhu tengnae talung takhoe hoehnahlan pueng teh tui pânei thai lah awm awh hoeh. Takhoe hnukkhu to doeh tu heh tui ouk ka pânei awh, telah atipouh awh.
9 ९ याकोब त्यांच्याशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली. कारण तीच त्यांना राखीत होती.
Hottelah, lawk a kâpan navah, Rachel teh a na pa e tunaw hoi a tho, bangkongtetpawiteh ahni teh tu ka khoum e napui lah ao.
10 १० जेव्हा याकोबाने आपल्या आईचा भाऊ लाबान याची मुलगी राहेल हिला व आपल्या आईच्या भावाच्या मेंढरांना पाहिले तेव्हा याकोबाने जवळ येऊन विहिरीच्या तोंडावरून दगड लोटला व आपल्या आईचा भाऊ लाबान याच्या मेंढरांना पाणी पाजले.
Hahoi, hettelah ao. Jakop ni a manu e a thangroi Laban e canu Rachel hoi tunaw a hmu toteh, a cei sin teh tuikhu tengnae talung hah a takhoe pouh teh a manu e a thangroi e tu hah tui a pânei pouh.
11 ११ याकोबाने राहेलीचे चुंबन घेतले आणि मोठ्याने रडला.
Hahoi, Jakop ni Rachel hah a paco teh ngawngngawng a ka.
12 १२ याकोबाने राहेलला सांगितले की, तो तिच्या वडिलाच्या नात्यातील आहे, म्हणजे रिबकेचा मुलगा आहे. तेव्हा राहेल धावत गेली आणि तिने आपल्या बापाला सांगितले.
Jakop ni Rachel koe a na pa e a na minca lah a onae hoi Rebekah e capa lah a onae kong hah a dei pouh. Hatdawkvah, Rachel ni a na pa koe ayawng teh a dei pouh.
13 १३ जेव्हा आपल्या बहिणीचा मुलगा याकोब आल्याची बातमी लाबानाने ऐकली, तेव्हा लाबान धावत जाऊन त्यास भेटला. त्यास मिठी मारली, त्याची चुंबने घेतली आणि त्यास आपल्या घरी घेऊन आला. मग याकोबाने सर्व गोष्टी लाबानाला सांगितल्या.
Hahoi, Laban ni a tawncanu e capa Jakop kong a thai tahma, ahni dawn hanelah ayawng. A tapam teh a paco hnukkhu, a im vah a hrawi. Jakop ni Laban koe hno kâhmo e akongnaw pueng a dei pouh.
14 १४ मग लाबान त्यास म्हणाला, “खरोखर तू माझे हाड व माझे मांस आहेस.” त्यानंतर याकोब एक महिनाभर त्याच्यापाशी राहिला.
Laban ni ahni koe, nang teh ka misa katang doeh, telah atipouh teh ahni koevah thapa yung touh ao.
15 १५ लाबान याकोबाला म्हणाला, “तू काही मोबदला न घेता काम करीत राहावेस काय? कारण तू माझा नातलग आहेस तर तुला मी काय वेतन द्यावे ते सांग?”
Laban ni Jakop koevah, Ka minca lah na o dawkvah, aphu laipalah ka thaw na tawk han na maw. Bangmaw na poe han dei haw, telah atipouh.
16 १६ लाबानाला दोन मुली होत्या; थोरल्या मुलीचे नाव होते लेआ आणि धाकटीचे राहेल.
Laban ni canu kahni touh a tawn teh a camin teh Leah a phung, a cahnoung teh Rachel a phung.
17 १७ लेआचे डोळे अधू होते, परंतु राहेल सुडौल बांध्याची व दिसावयास सुंदर होती.
Leah teh a mit roumkawt e lah ao. Hatei, Rachel teh a tungtang hoi a mei kahawi e tami lah ao.
18 १८ याकोबाचे राहेलीवर प्रेम होते, म्हणून तो लाबानास म्हणाला, “तुझी धाकटी मुलगी राहेल हिच्यासाठी मी सात वर्षे तुमची सेवाचाकरी करीन.”
Jakop ni Rachel a ngai dawkvah, na canu kanaw e Rachel hanlah kum sari touh na thaw ka tawk han, telah atipouh.
19 १९ लाबान म्हणाला, “परक्या मनुष्यास देण्यापेक्षा, ती मी तुला द्यावी हे बरे आहे. माझ्यापाशी राहा.”
Laban ni, ayâ alouke ka poe hlak teh nang na poe e heh ahawihnawn han doeh, kai koe awmh, telah atipouh.
20 २० म्हणून याकोबाने सात वर्षे राहेलसाठी सेवाचाकरी केली; आणि राहेलीवरील प्रेमामुळे ती वर्षे त्यास फार थोड्या दिवसांसारखी वाटली.
Hatdawkvah, Jakop ni Rachel hanlah kum sari touh a thaw a tawk pouh, a lungpataw poung dawkvah hnin dawngdengca e patetlah a pouk.
21 २१ नंतर याकोब लाबानास म्हणाला, “आता माझी मुदत भरली आहे, माझी पत्नी मला द्या म्हणजे मी तिच्याशी लग्न करीन.”
Jakop ni Laban koe, ka ikhai thai nahanlah ka yu teh na poe leih, bangkongtetpawiteh, ahnintha teh akuep toe, telah atipouh.
22 २२ तेव्हा लाबानाने तेथील सर्व लोकांस एकत्र केले आणि मेजवानी दिली.
Laban ni khoca pueng a pâkhueng teh bu canae pawi a sak.
23 २३ त्या संध्याकाळी लाबानाने आपली मुलगी लेआ हिला घेतले आणि याकोबाकडे आणले; तो तिच्यापाशी गेला
Hahoi, kho a hmo nah a canu Leah a hrawi teh Jakop koevah a thak pouh teh a ikhai.
24 २४ लाबानाने आपली दासी जिल्पा आपल्या मुलीची दासी म्हणून तिला दिली.
Laban ni a sannu Zilpah hah a canu Leah koevah san hanlah a poe.
25 २५ सकाळी याकोबाने पाहिले तो पाहा, ती लेआ होती. मग याकोब लाबानाला म्हणाला, “तुम्ही मला हे काय केले आहे? मी राहेलीसाठी तुमची चाकरी केली नाही काय? तुम्ही मला का फसवले?”
Khodai toteh, khenhaw! Leah lah a o, Jakop ni Laban koevah, ka lathueng vah na sak e heh bangmaw. Rachel ka yu nahanlah na thaw ka tawk hoeh na maw. Bangkongmaw na dum, telah atipouh.
26 २६ लाबान म्हणाला, “आमच्या रीतीरीवाजाप्रमाणे थोरल्या मुलीच्या आधी आम्ही धाकट्या मुलीला देत नाही.
Laban ni, Ka ram dawk a hmau hoehnahlan a nawngha ceisak phung roeroe nahoeh.
27 २७ या मुलीचा लग्न विधीचा सप्ताह पूर्ण होऊ दे, म्हणजे मग मी तुला लग्न करण्यासाठी दुसरीही देतो, परंतु त्यासाठी तू आणखी सात वर्षे माझी सेवाचाकरी केली पाहिजेस.”
Hete napui hanlah hnin sari kuep sak ei, hahoi, kum sari touh ka thaw bout na tawk han e dawk alouknaw hai na poe han, telah atipouh e patetlah,
28 २८ त्याप्रमाणे याकोबाने केले, लेआचे सप्तक पूर्ण केले. मग लाबानाने त्याची धाकटी कन्या राहेल त्यास पत्नी करून दिली;
Jakop ni hottelah a sak teh hnin sari touh a kuep sak teh Laban ni a canu Rachel haiyah a yu hanlah a poe.
29 २९ लाबानाने आपली दासी बिल्हा, आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिली.
Hahoi, Laban ni a sannu Bilhah hah a canu Rachel koevah a san hanlah a poe.
30 ३० तेव्हा मग याकोबाने राहेलीशीही लग्न केले; आणि याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम होते, म्हणून लाबानाकडे याकोबाने राहेलीसाठी आणखी सात वर्षे सेवाचाकरी केली.
Rachel bout a ikhai. Leah hlakvah Rachel heh a lung hoe a pataw dawkvah, Laban e thaw kum sari touh bout a tawk pouh.
31 ३१ परमेश्वराने पाहिले की याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम आहे, म्हणून परमेश्वराने लेआला मुले होऊ दिली परंतु राहेल निःसंतान होती.
BAWIPA ni Leah teh lungpataw hoeh tie a panue dawkvah a thun a kamawng sak. Hatei, Rachel teh a carôe.
32 ३२ लेआला मुलगा झाला, तिने त्याचे नाव रऊबेन ठेवले. कारण ती म्हणाली, “परमेश्वराने माझे दुःख पाहिले आहे; कारण माझा पती माझ्यावर प्रेम करीत नाही; परंतु आता कदाचित तो माझ्यावर प्रेम करील.”
Leah teh camo a vawn teh ca tongpa a khe, a min lah Reuben a phung. Bangkongtetpawiteh, BAWIPA ni runae ka kâhmo e a panue. Hatdawkvah, atu teh ka vâ ni na lungpataw han toe, telah ati.
33 ३३ लेआ पुन्हा गरोदर राहिली आणि तिला आणखी एक मुलगा झाला. ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही हे परमेश्वराने ऐकले आहे, म्हणून त्याने मला हा सुद्धा मुलगा दिला आहे,” आणि या मुलाचे नाव तिने शिमोन ठेवले.
Camo bout a vawn teh ca tongpa bout a khe. Kai na hnoun e BAWIPA ni a thai dawkvah, hete ca tongpa hai na poe telah ati teh Simeon telah min a phung.
34 ३४ लेआ पुन्हा गर्भवती झाली व तिला मुलगा झाला. ती म्हणाली, “आता मात्र माझा पती माझ्यावर नक्की प्रेम करील कारण मी त्यांना तीन पुत्र दिले आहेत.” त्यामुळे तिने त्याचे नाव लेवी असे ठेवले.
Camo bout a vawn teh ca tongpa bout a khe. Atu teh ca tongpa kathum touh ka khe pouh toe dawkvah, ka vâ ni na tha mahoeh toe, telah ati. Hatdawkvah, a min lah Levih a sak.
35 ३५ त्यानंतर लेआ पुन्हा गर्भवती झाली आणि तिला आणखी एक मुलगा झाला. ती म्हणाली, “आता मी परमेश्वराची स्तुती करीन.” त्यामुळे तिने त्याचे नाव यहूदा ठेवले; नंतर तिला मुल होण्याचे थांबले.
Hahoi, camo bout a vawn teh ca tongpa bout a khe. Atu teh, BAWIPA ka pholen han, telah ati. Hatdawkvah, a min Judah a phung. Hahoi teh, camo khe hoeh toe.