< गलती 2 >
1 १ नंतर, चौदा वर्षांनी मी पुन्हा, बर्णबाबरोबर, यरूशलेम शहरास वर गेलो, मी आपल्याबरोबर तीतालाही नेले.
Potem, po czternastu latach, udałem się ponownie do Jerozolimy wraz z Barnabą, wziąwszy ze sobą także Tytusa.
2 २ मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो आणि जे शुभवर्तमान मी परराष्ट्रीयात गाजवत असतो, ती मी त्यांच्यापुढे मांडले; पण जे विशेष मानलेले होते त्यांना एकांती मांडले; नाही तर, मी व्यर्थ धावतो किंवा धावलो, असे कदाचित् झाले असते.
A udałem się [tam] zgodnie z objawieniem i przedstawiłem im ewangelię, którą głoszę wśród pogan, osobno zaś tym, którzy cieszą się uznaniem, aby [się] czasem nie [okazało], że biegnę albo biegłem na próżno.
3 ३ पण माझ्याबरोबर असलेला तीत हा ग्रीक असल्यामुळे, त्यालाही सुंता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही.
Lecz nawet Tytusa, który był ze mną, nie zmuszono do obrzezania, mimo że był Grekiem;
4 ४ आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हास दास्यात घालण्याकरता, ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आपल्याला आहे ते हेरण्यास, चोरून आत आले होते.
A [to] z powodu wprowadzonych fałszywych braci, którzy się wkradli, aby wyszpiegować naszą wolność, jaką mamy w Chrystusie Jezusie, aby nas zniewolić.
5 ५ शुभवर्तमानाचे सत्य तुमच्याकडे रहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन त्यांच्या अधीन झालो नाही.
Nie ustąpiliśmy im ani na chwilę i nie poddaliśmy się, aby pozostała wśród was prawda ewangelii.
6 ६ तरीही, जे विशेष मानलेले कोणी होते त्यांच्याकडून (ते कसेहि असोत होते त्याचे मला काही नाही; देव मनुष्याचे बाह्य रूप पाहत नाही.) कारण जे विशेष मानलेले होते त्यांनी मला काही अधिक दिले नाही.
A co do cieszących się uznaniem – jakimi kiedyś byli, jest dla mnie bez znaczenia, Bóg [bowiem] nie ma względu na osobę – ci więc, którzy cieszą się uznaniem, nic [mi] nie narzucili.
7 ७ तर उलट सुंता झालेल्या यहूद्यांना शुभवर्तमान सांगणे जसे पेत्रावर सोपवले होते तसेच सुंता न झालेल्या परराष्ट्रीय लोकांस शुभवर्तमान सांगणे माझ्यावर सोपवले आहे, हे त्यांनी बघितले.
Wręcz przeciwnie, gdy widzieli, że została mi powierzona ewangelia [wśród] nieobrzezanych, jak Piotrowi [wśród] obrzezanych;
8 ८ कारण ज्याने पेत्राच्याद्वारे सुंता झालेल्या लोकात प्रेषितपणा चालवावयास शक्ती पुरवली त्याने मलाही परराष्ट्रीयात तो चालवण्यास शक्ती पुरवली.
(Ten bowiem, który działał skutecznie przez Piotra w [sprawowaniu] apostolstwa [wśród] obrzezanych, skutecznie działał i we mnie wśród pogan);
9 ९ आणि त्यांनी मला दिलेले कृपादान ओळखून, याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ होते त्यांनी मला व बर्णबाला उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की, आपण देवाच्या कार्यांत सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे आणि त्यांनी सुंता झालेल्याकडे जावे.
I gdy poznali daną mi łaskę, Jakub, Kefas i Jan, którzy są uważani za filary, podali mnie i Barnabie prawicę na [znak] wspólnoty, abyśmy my [poszli] do pogan, a oni do obrzezanych.
10 १० मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, अशी त्यांची इच्छा होती; आणि मी तर त्याच गोष्टी करण्यास उत्कंठीत होतो.
Bylebyśmy tylko pamiętali o ubogich, co też gorliwie starałem się czynić.
11 ११ आणि त्यानंतर, केफा अंत्युखियास आला असता, मी त्याच्यासमोर त्यास आडवा आलो, कारण तो दोषीच होता.
A gdy Piotr przybył do Antiochii, sprzeciwiłem mu się w twarz, bo był godny nagany.
12 १२ कारण याकोबापासून कित्येकजण येण्याअगोदर तो अन्यजाती लोकांबरोबर जेवत असे; पण ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांस भिऊन त्याने माघार घेऊन वेगळा राहू लागला.
Zanim bowiem przyszli niektórzy od Jakuba, jadał razem z poganami. Gdy zaś oni przyszli, odsunął się i odłączył, obawiając się tych, którzy byli z obrzezania.
13 १३ तेव्हा तसेच दुसर्या यहूदी विश्वास ठेवणाऱ्यांनीही त्याच्याबरोबर ढोंग केले; त्यामुळे बर्णबादेखील त्यांच्या ढोंगाने ओढला गेला.
A razem z nim obłudnie postępowali i inni Żydzi, tak że i Barnaba dał się wciągnąć w tę ich obłudę.
14 १४ पण मी जेव्हा हे बघितले की, शुभवर्तमानाच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, तेव्हा सर्वांसमोर मी केफाला म्हटले, “तू स्वतः यहूदी असून तू जर परराष्ट्रीयाप्रमाणे राहतोस आणि यहूद्यांप्रमाणे वागत नाहीस, तर जे परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्याच्यावर जुलूम करितोस हे कसे?”
Lecz gdy zobaczyłem, że nie postępują zgodnie z prawdą ewangelii, powiedziałem Piotrowi wobec wszystkich: Jeśli ty, będąc Żydem, żyjesz po pogańsku, a nie po żydowsku, czemu przymuszasz pogan, aby żyli po żydowsku?
15 १५ आम्ही जन्मापासूनच यहूदी आहोत, पापी परराष्ट्रीयातले नाही.
My, [którzy jesteśmy] Żydami z urodzenia, a nie grzesznikami z pogan;
16 १६ तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे ठरतो, हे ओळखून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो, म्हणून आम्हीही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला; म्हणजे आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी पाळून नाही, कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.
Wiedząc, że człowiek nie jest usprawiedliwiony z uczynków prawa, ale przez wiarę w Jezusa Chrystusa, i my uwierzyliśmy w Jezusa Chrystusa, abyśmy byli usprawiedliwieni z wiary Chrystusa, a nie z uczynków prawa, dlatego że z uczynków prawa nie będzie usprawiedliwione żadne ciało.
17 १७ पण ख्रिस्तात नीतिमान ठरवले जाण्यास पाहत असता जर आपणदेखील पापी आढळलो तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? कधीच नाही.
A jeśli [my], szukając usprawiedliwienia w Chrystusie, sami okazaliśmy się grzesznikami, to czy Chrystus [jest] sługą grzechu? Nie daj Boże!
18 १८ कारण मी जे पाडले आहे ते पुन्हा उभारले तर मी स्वतःला नियमशास्त्र मोडणारा ठरवीन.
Jeśli bowiem na nowo buduję to, co zburzyłem, samego siebie czynię przestępcą.
19 १९ कारण मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मरण पावलो आहे, ह्यासाठी की, मी देवाकरता जगावे.
Bo ja przez prawo umarłem dla prawa, abym żył dla Boga.
20 २० मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्याद्वारे आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले.
Z Chrystusem jestem ukrzyżowany: żyję, ale już nie ja, lecz żyje we mnie Chrystus. A to, że teraz żyję w ciele, żyję w wierze Syna Bożego, który mnie umiłował i wydał za mnie samego siebie.
21 २१ मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही कारण जर नीतिमत्त्व नियमशास्त्राकडून असेल तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले.
Nie odrzucam łaski Boga. Jeśli bowiem przez prawo jest sprawiedliwość, to Chrystus umarł na próżno.