< यहेज्केल 4 >

1 परंतू मानवाच्या मुला, तू एक वीट घे आणि तुझ्या पुढे ठेव. व यरूशलेम शहराचे चित्र रेखाट.
Thou also, son of man, take thee a tile, and lay it before thee, and portray upon it a city, even Jerusalem.
2 तिला वेढा पडला आहे आणि तिच्या समोर बुरुज रचून मोरचे बांधले आहेत, तिच्या पुढे तळ पडला आहे, टक्कर देऊन भिंत पाडण्याची यंत्रे तिच्याभोवती लागली आहे, असे चित्र काढ.
And lay siege against it, and build forts against it, and cast up a mound against it. Also set camps against it, and plant battering rams against it round about.
3 तू आपल्याकरता लोखंडाची कढई घेऊन ती लोखंडी भिंत असी तुझ्यामध्ये आणि नगराच्यामध्ये ठेव आणि तू आपले मुख तिच्याकडे कर, म्हणजे तिला घेरा पडेल आणि तू तिला वेढा घालशील. इस्राएलाच्या घराण्याला चिन्ह होईल.
And take thou to thee an iron pan, and set it for a wall of iron between thee and the city. And set thy face toward it, and it shall be besieged, and thou shall lay siege against it. This shall be a sign to the house of Israel.
4 मग आपल्या डाव्या कुशीवर झोप आणि इस्राएलाच्या घराण्याचे पाप स्वतःवर घे; इस्राएलाचे पाप जितके दिवस तू झोपून राहाशील, तितके दिवसाच्या गणतीप्रमाणे तू त्याचा अन्याय वाहाशील.
Moreover lie thou upon thy left side, and lay the iniquity of the house of Israel upon it. According to the number of the days that thou shall lie upon it, thou shall bear their iniquity.
5 मी तुझ्यावर त्यांच्या शिक्षेची जबाबदारी प्रत्येक वर्षाची तीनशे नव्वद दिवस सोपवून दिली आहे, तू इस्राएलाच्या घराण्याचे अपराध वाहून नेशील.
For I have appointed the years of their iniquity to be a number of days to thee, even three hundred and ninety days. So thou shall bear the iniquity of the house of Israel.
6 जेव्हा तू हे दिवस पूर्ण करशील, तेव्हा दुसऱ्यांदा उजव्या कुशीवर नीज, चाळीस दिवस यहूदाच्या घराण्याचे पाप तू वाहशील, मी तुला प्रत्येक वर्षाला एक दिवस सोपवून दिला आहे.
And again, when thou have accomplished these, thou shall lie on thy right side, and shall bear the iniquity of the house of Judah forty days, each day for a year. I have appointed it to thee.
7 आपले तोंड यरूशलेमेच्या विरुध्द दिशेला कर जे चित्र रेखाटले आहेस, ज्याला वेढा पडलेला आहे, आपल्या बाहुंनी झाकु नको; आणि त्यांच्या विरुध्द भाकीत कर.
And thou shall set thy face toward the siege of Jerusalem, with thine arm uncovered, and thou shall prophesy against it.
8 पहा, तुला दोरीने करकचून बांधतील, तू एका बाजूहून दुसरीकडे वळू शकणार नाही जोपर्यंत तू वेढा पडलेला समय पूर्ण करणार नाहीस.
And, behold, I lay bands upon thee, and thou shall not turn thee from one side to the other, till thou have accomplished the days of thy siege.
9 स्वतःसाठी तू गहू, जव, सोयाबीन, कडधान्य, बाजरी, ज्वारी, आणि काठ्या गहू घेऊन जितके दिवस तू एका बाजूस रहाशील तेवढ्या दिवसासाठी एका भांड्यात ते घे आणि आपल्यासाठी भाकर तयार कर, जे तू तीनशे नव्वद दिवस खाशील.
Also take thou to thee wheat, and barley, and beans, and lentils, and millet, and spelt, and put them in one vessel, and make thee bread of it, according to the number of the days that thou shall lie upon thy side, even three hundred and ninety days, thou shall eat of it.
10 १० हे तुझ्या खाण्यासाठी वीस शेकेल वजनाचे असेल जी वेळोवेळी तुझी उपजीवीका असेल.
And thy food which thou shall eat shall be by weight, twenty shekels a day. Thou shall eat it from time to time.
11 ११ पाणी साठ हिन मोजून वेळो वेळी तुझ्या पीण्यासाठी असेल.
And thou shall drink water by measure, the sixth part of a hin. Thou shall drink from time to time.
12 १२ जवाची भाकर तू भाजून खा पण सर्वांदेखत मनुष्याच्या विष्टेवर भाजून खा!
And thou shall eat it as barley cakes, and thou shall bake it in their sight with dung that comes out of man.
13 १३ यासाठी परमेश्वर देव “सांगतो, ती भाकर म्हणजे, इस्राएलाचे घराणे जे अपवित्र आहेत, ज्या देशातून मी त्यांना हद्दपार करेन.”
And Jehovah said, Even thus shall the sons of Israel eat their bread unclean among the nations where I will drive them.
14 १४ परंतू मी म्हणालो “अहा, हे परमेश्वर! माझे मन कधी अपवित्र झाले नाही! जे मरण पावलेले व मारुन टाकलेले मी कधी खाल्ले नाही, विटाळलेले मांस आजवर माझ्या मुखात गेले नाही.”
Then I said, Ah lord Jehovah! Behold, my soul has not been polluted. For from my youth up even till now I have not eaten of that which dies of itself, or is torn of beasts, neither has abominable flesh come into my mouth.
15 १५ म्हणून तो मला म्हणाला, “पहा! मी तुला मानवाच्या विष्टे ऐवजी गाईच्या विष्टेवर स्वतःसाठी भाकर भाज.”
Then he said to me, See, I have given thee cow's dung for man's dung, and thou shall prepare thy bread of it.
16 १६ तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला पहा! मी यरूशलेमेच्या भाकरीचा पुरवठा काढून टाकेन, आणि अस्वस्थतेत शिधा वाटप ते करतील आणि ते पाणी पितील जोपर्यंत शिधा कपात केली जाईल.
Moreover he said to me, Son of man, behold, I will break the staff of bread in Jerusalem, and they shall eat bread by weight, and with fearfulness, and they shall drink water by measure, and in dismay,
17 १७ कारण त्यांना अन्नपाण्याचा तुटवडा पडून त्यांची त्रेधा उडेल व ऐकमेकात त्यांच्या अपराधामुळे ते भयभीत होतील.”
that they may lack bread and water, and be dismayed one with another, and pine away in their iniquity.

< यहेज्केल 4 >