< निर्गम 19 >
1 १ मिसरामधून प्रवासास निघाल्यानंतर तिसऱ्या महिन्यात इस्राएल लोक सीनायच्या रानात येऊन पोहोचले.
På tremåneders-dagen efterat Israels barn var gått ut av Egyptens land, kom de til Sinai ørken.
2 २ ते लोक रफीदिम सोडून सीनायच्या रानात आले होते; इस्राएल लोकांनी पर्वतासमोर आपला तळ दिला.
De brøt op fra Refidim og kom til Sinai ørken og slo leir i ørkenen, og Israel leiret sig der midt imot fjellet. -
3 ३ तेव्हा मोशे पर्वत चढून देवाकडे गेला. परमेश्वराने त्यास पर्वतावरून हाक मारून सांगितले की, “तू याकोबाच्या वंशजांना हे सांग, इस्राएल लोकांस हे सांग.
Men Moses steg op til Gud, og Herren ropte til ham fra fjellet og sa: Så skal du si til Jakobs hus og kunngjøre for Israels barn:
4 ४ मिसऱ्यांचे मी काय केले आणि तुम्हास गरुडाच्या पंखावर उचलून घेऊन माझ्याजवळ कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे.
I har sett hvad jeg har gjort med egypterne, og hvorledes jeg har båret eder på ørnevinger og ført eder til mig.
5 ५ म्हणून मी आता तुम्हास सांगतो की तुम्ही माझी वाणी खरोखर ऐकाल आणि माझ्या कराराचे पालन कराल, तर सर्व लोकांमध्ये माझा खास निधी व्हाल. सर्व पृथ्वी माझी आहे.
Dersom I nu lyder min røst og holder min pakt, da skal I være min eiendom fremfor alle folk; for hele jorden hører mig til.
6 ६ तुम्ही मला, याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. तू इस्राएल लोकांस हेच सांग.”
Og I skal være mig et kongerike av prester og et hellig folk. Dette er de ord du skal tale til Israels barn.
7 ७ मोशेने येऊन लोकांच्या वडिलांना एकत्र बोलावले; परमेश्वराने त्यास जी वचने सांगण्याची आज्ञा केली होती ती सर्व त्याने त्यांच्यापुढे सांगितली.
Da Moses kom tilbake, kalte han folkets eldste til sig og bar frem for dem alle disse ord som Herren hadde pålagt ham.
8 ८ आणि सर्व लोक मिळून म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेले सर्व आम्ही करू.” मोशेने परमेश्वरास लोकांचे म्हणणे सांगितले.
Da svarte folket alle som én og sa: Alt det Herren har sagt, vil vi gjøre. Og Moses bar folkets ord tilbake til Herren.
9 ९ आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी दाट ढगात तुझ्याजवळ येऊन तुझ्याशी बोलेन आणि माझे तुझ्याबरोबरचे बोलणे सर्व लोकांस ऐकू जाईल;” त्यांचा नेहमी तुझ्यावरही विश्वास बसेल, मोशेने लोकांचे म्हणणे परमेश्वरास सांगितले.
Da sa Herren til Moses: Se, jeg vil komme til dig i en tykk sky, så folket kan høre når jeg taler med dig, og alltid tro på dig. Og Moses bar folkets ord frem for Herren.
10 १० परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू जाऊन आज आणि उद्या लोकांस पवित्र कर; त्यांनी आपले कपडे स्वच्छ धुवावेत.
Og Herren sa til Moses: Gå til folket og la dem hellige sig idag og imorgen og tvette sine klær,
11 ११ तिसऱ्या दिवशी त्यांनी तयार रहावे, कारण तिसऱ्या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल.
og la dem holde sig rede den tredje dag; for på den tredje dag skal Herren stige ned på Sinai berg for hele folkets øine.
12 १२ परंतु लोकांसाठी तेथे सीमारेषा आखून लोकांनी ती ओलांडू नये, त्यांना बजावून सांग; पर्वतावर कोणीही चढू नये जो कोणी पर्वताला स्पर्श करेल तो खास आपल्या जिवाला मुकेल.
Og du skal avmerke en grense for folket rundt omkring og si: Vokt eder for å stige op på fjellet eller røre ved dets fot! Enhver som rører ved fjellet, skal visselig late livet;
13 १३ कोणीही त्यास हात लावू नये. हात लावला तर त्यास दगडमार करावी किंवा बाणांनी विंधावे, तो पशू असो किंवा मनुष्य असो, त्यास जिवंत ठेवू नये. शिंगाचा दीर्घ आवाज होईल तेव्हा लोकांनी पर्वताजवळ यावे.”
ingen hånd skal røre ved ham, han skal stenes eller skytes; enten det er dyr eller mennesker, skal de ikke leve. Når basunen lyder med lange toner, da skal de stige op på fjellet.
14 १४ मग मोशे पर्वतावरून खाली उतरला; तो लोकांकडे गेला व देवाच्या भेटीसाठी त्याने त्यांना पवित्र केले. लोकांनी आपले कपडे धुवून स्वच्छ केले.
Så gikk Moses ned fra fjellet til folket, og han lot folket hellige sig og tvette sine klær.
15 १५ मग मोशे लोकांस म्हणाला, “तीन दिवस तुम्ही देवाची भेट घेण्यासाठी तयार राहा. तोपर्यंत स्त्रीस्पर्श करू नका.”
Og han sa til folket: Hold eder rede den tredje dag, kom ikke nær nogen kvinne!
16 १६ तिसरा दिवस उजडताच मेघगर्जना झाली व विजा चमकू लागल्या, पर्वतावर दाट ढग आले आणि प्रचंड शिंगाचा फार आवाज होऊ लागला. तेव्हा छावणीत राहणारे सर्व लोक थरथर कापू लागले.
Så skjedde det den tredje dag da morgenen brøt frem, da tok det til å tordne og lyne, og det la sig en tung sky over fjellet, og det hørtes en sterk basunlyd; da skalv alt folket som var i leiren.
17 १७ नंतर मोशेने लोकांस छावणीतून बाहेर काढून देवाच्या दर्शनाला बाहेर आणले आणि ते पर्वताच्या तळाजवळ उभे राहिले.
Men Moses førte folket ut av leiren til møte med Gud, og de stilte sig nedenfor fjellet.
18 १८ परमेश्वर सीनाय पर्वतावर अग्नीतून उत्तरला म्हणून तो पर्वत धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा त्याचा धूर वर आला, आणि सर्व पर्वत थरथरू लागला.
Og hele Sinai berg stod i røk, fordi Herren var steget ned på det i ild, og røken av det steg op som røken av en ovn, og hele fjellet skalv.
19 १९ शिंगाचा आवाज मोठमोठा होऊ लागला. तेव्हा मोशे बोलू लागला आणि देव त्यास आपल्या वाणीने उत्तर देत गेला.
Og basunens lyd tok til og blev sterkere og sterkere; Moses talte, og Gud svarte ham med lydelig røst.
20 २० परमेश्वराने पर्वताच्या शिखरावर उतरून मोशेला सीनाय पर्वताच्या शिखरावर बोलावले. तेव्हा तो पर्वतावर गेला.
Og Herren steg ned på Sinai berg, på fjellets topp; og Herren kalte Moses op på fjellets topp, og Moses steg op.
21 २१ परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू खाली जा आणि लोकांस बजावून सांग की त्यांनी मर्यादा ओलांडून परमेश्वर काय आहे ते पाहण्यास तिकडे येऊ नये. जर ते तसे करतील तर बरेच जण मरतील.
Og Herren sa til Moses: Stig ned og advar folket, så de ikke trenger sig frem til Herren for å se ham, for da kommer mange av dem til å falle.
22 २२ तसेच परमेश्वराजवळ येणाऱ्या याजकांनीही पवित्र व्हावे; नाहीतर परमेश्वर त्यांना शिक्षा करील.”
Også prestene, de som treder Herren nær, skal hellige sig, forat Herren ikke skal bryte inn blandt dem.
23 २३ मोशेने परमेश्वरास सांगितले, “लोक सीनाय पर्वतावर येऊ शकणार नाहीत, कारण तूच स्वत: आम्हांला मर्यादा घालून दिली व सक्त ताकीद दिली व तो अधिक पवित्र करण्यास सांगितले.”
Da sa Moses til Herren: Folket kan ikke stige op på Sinai berg; for du har selv advart oss og sagt at vi skulde avmerke en grense om fjellet og hellige det.
24 २४ परमेश्वर त्यास म्हणाला, “तू खाली लोकांकडे जा व मागे येताना अहरोनाला तुझ्याबरोबर परत आण, परंतु याजक किंवा इतर लोकांस इकडे येऊ देऊ नको; ते जर माझ्याजवळ येतील तर मी त्यांना शिक्षा करीन.”
Og Herren sa til ham: Stig nu ned og kom så her op igjen, både du og Aron; men prestene og folket må ikke trenge sig frem og stige op til Herren, forat han ikke skal bryte inn blandt dem.
25 २५ मग मोशेने खाली जाऊन लोकांस हे सांगितले.
Da steg Moses ned til folket og sa det til dem.