< निर्गम 18 >
1 १ देवाने मोशे व इस्राएल लोक यांच्यासाठी जे केले तसेच त्यांना परमेश्वराने मिसर देशातून सोडवून बाहेर आणले यासंबंधी मोशेचा सासरा मिद्यांनी याजक इथ्रो याने ऐकले;
És meghallá Jethró, Midián papja, Mózes ipa, mindazt a mit Isten Mózessel és Izráellel az ő népével cselekedett vala, hogy kihozta az Úr Izráelt Égyiptomból.
2 २ मोशेने आपली पत्नी सिप्पोरा पूर्वी परत पाठवली होती, तिला आणि तिच्या दोन पुत्रांना घेऊन मोशेचा सासरा इथ्रो आला;
És felvevé Jethró, a Mózes ipa Czipporát, a Mózes feleségét – miután haza bocsátotta őt –
3 ३ पहिल्या मुलाचे नाव गेर्षोम होते कारण त्याचा जन्म झाला त्यावेळी मोशे म्हणाला होता, “मी या देशात परका आहे.”
És az ő két fiát is, a kik közűl az egyiknek neve Gersom, mert azt mondotta vala: Bujdosó valék az idegen földön;
4 ४ दुसऱ्या मुलाचे नाव एलियेजर असे होते, कारण तो जन्मला तेव्हा मोशे म्हणाला होता, “माझ्या पित्याच्या देवाने मला मदत केली व मला फारोच्या तलवारीपासून वाचवले.”
A másiknak neve pedig Eliézer; mert: Az én atyám Istene segítségül volt nékem és megszabadított engem a Faraó fegyverétől.
5 ५ तेव्हा इथ्रो रानात देवाच्या पर्वताजवळ जेथे मोशेने तळ दिला होता तेथे त्याची पत्नी सिप्पोरा व त्याचे दोन पुत्र घेऊन मोशेकडे आला.
Eljuta tehát Jethró, a Mózes ipa, az ő fiaival és feleségével Mózeshez a pusztába, a hol ő táborozott vala az Isten hegye mellett.
6 ६ त्याने मोशेला निरोप पाठवला, “मी तुझा सासरा, इथ्रो, तुझी पत्नी व तिचे दोन पुत्र यांना घेऊन तुझ्याकडे आलो आहे.”
És megizené Mózesnek: Én Jethró a te ipad megyek te hozzád a te feleségeddel és az ő két fia is ő vele.
7 ७ तेव्हा मोशे आपल्या सासऱ्याला सामोरा गेला; त्याने त्याच्यापुढे लवून त्यास नमन केले, आणि त्याचे चुंबन घेतले. त्या दोघांनी एकमेकांची खुशाली विचारल्यावर ते तंबूत गेले.
Kiméne azért Mózes az ő ipa eleibe és meghajtá magát és megcsókolá őt; és megkérdék egymást állapotuk felől és bemenének a sátorba.
8 ८ परमेश्वराने इस्राएली लोकांसाठी फारोचे व मिसरी लोकांचे काय केले, तसेच मिसराहून प्रवास करताना काय काय संकटे आली व कसा त्रास झाला परमेश्वराने त्यांना कसे वाचवले ती सर्व हकिकत मोशेने आपल्या सासऱ्याला सांगितली.
És elbeszélé Mózes az ő ipának mind azt, a mit az Úr a Faraóval és az Égyiptombeliekkel cselekedett vala Izráelért; mindazt a sok bajt, a melyek útközben érték vala őket, és mimódon szabadította meg őket az Úr.
9 ९ परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या ऐकल्यावर आणि मिसराच्या लोकांपासून परमेश्वराने इस्राएल लोकांस स्वतंत्र केले म्हणून इथ्रोला फार आनंद झाला.
És örvendeze Jethró mindazon a jón, a mit az Úr az Izráellel cselekedett vala, hogy megszabadítá őt az Égyiptombeliek kezéből.
10 १० इथ्रो म्हणाला, “ज्याने तुम्हास मिसऱ्यांच्या व फारोच्या हातातून सोडवले ज्याने आपल्या प्रजेला मिसऱ्यांच्या तावडीतून स्वतंत्र केले तो परमेश्वर धन्य होय.
És monda Jethró: Áldott legyen az Úr, a ki megszabadított titeket az Égyiptombeliek kezéből és a Faraó kezéből; a ki megszabadította a népet az Égyiptombeliek keze alól.
11 ११ परमेश्वर सर्व देवांहून श्रेष्ठ आहे हे आता मला कळले. इस्राएल लोकांपेक्षा स्वत: ला श्रेष्ठ मानत असलेल्या मिसरी लोकांचे त्याने काय केले हे मला समजले.”
Most tudom már, hogy nagyobb az Úr minden istennél; mert az lett vesztökre, a mivel ellenök vétkeztek.
12 १२ मग मोशेचा सासरा इथ्रो याने देवाला होमबली व यज्ञ केले. नंतर अहरोन इस्राएलाच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इथ्रो यांच्याबरोबर देवासमोर जेवण करावयास आला.
És Jethró, a Mózes ipa égőáldozattal és véresáldozattal áldozék az Istennek; Áron pedig és Izráel minden vénei jövének, hogy kenyeret egyenek a Mózes ipával Isten előtt.
13 १३ दुसऱ्या दिवशी मोशे लोकांचा न्यायनिवाडा करावयास बसला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक मोशेसमोर उभे होते.
És lőn másod napon, leűle Mózes törvényt tenni a népnek; a nép pedig áll vala Mózes előtt reggeltől estig.
14 १४ मोशे लोकांसाठी काय काय करतो ते इथ्रोने पाहिले तेव्हा तो म्हणाला, “तू लोकांबरोबर जे हे करतोस ते काय आहे? तू एकटाच न्यायनिवाडा करण्यासाठी बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्याभोवती उभे राहतात ते का?”
S a mikor látja vala Mózes ipa mind azt, a mit ő a néppel cselekedék, monda: Mi dolog az, a mit te a néppel cselekszel; miért űlsz te egymagad, mind az egész nép pedig előtted áll reggeltől estig?
15 १५ मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, “देवाला प्रश्र विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येतात.
És monda Mózes az ő ipának: Mert a nép Isten akaratát tudakolni jön hozzám;
16 १६ लोकांचा काही भांडणतंटा असेल तर ते माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांचा आपसांत निवाडा करतो आणि देवाचे नियम व विधी यांचे शिक्षण त्यांना देतो.”
Ha ügyök-bajok van, én hozzám jőnek és törvényt teszek az ember között és felebarátja között és tudtára adom az Isten végezéseit és törvényeit.
17 १७ परंतु मोशेचा सासरा त्यास म्हणाला, “हे तू करतोस ते चांगले नाही.
Mózes ipa pedig monda néki: Nem jó az, a mit te cselekszel.
18 १८ तुझ्या एकट्यासाठी हे काम फार आहे, त्यामुळे तू थकून जातोस व लोकही थकून जातात हे काम तुला एकट्याला करवणार नाही.
Felettébb kifáradsz te is, ez a nép is, a mely veled van; mert erőd felett való dolog ez, nem végezheted azt egymagad.
19 १९ तर आता माझे ऐक, मी तुला सल्ला देतो, आणि देव तुला मदत करो. या लोकांचा देवाकडे तू मध्यस्थ हो आणि यांची प्रकरणे देवापाशी ने.
Most azért hallgass az én szavamra, tanácsot adok néked és az Isten veled lesz. Te légy a népnek szószólója az Isten előtt, és te vidd az ügyeket Isten eleibe.
20 २० तू त्यांना नियम व विधी यासंबंधी शिक्षण दे; त्यांनी कोणत्या मार्गाने चालावे व कोणते काम करावे त्यांना तू समजावून सांग.
És tanítsd őket a rendeletekre és törvényekre és add tudtokra az útat, a melyen járniok kell és a tenni valót, a melyet tenniök kell.
21 २१ तू लोकांमधून कर्तबगार देवाचे भय धरणारे, व विश्वासू, सत्यप्रिय, अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकांवर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम.
És szemelj ki magad az egész nép közűl derék, istenfélő férfiakat, igazságos férfiakat, a kik gyűlölik a haszonlesést és tedd közöttük előljárókká, ezeredesekké, századosokká, ötvenedesekké és tizedesekké.
22 २२ या नायक लोकांनी लोकांचा न्यायनिवाडा करावा; जर अगदी महत्वाची बाब असेल तर तिचा न्यायनिवाडा करण्याकरता तो वाद नायकांनी तुझ्याकडे आणावा, परंतु लहानसहान प्रकरणांसंबंधी त्यांनी स्वत: निर्णय द्यावेत. अशा प्रकारे तुझे काम सोपे होईल तसेच तुझ्या कामात ते वाटेकरी होतील.
Ezek tegyenek ítéletet a népnek minden időben, úgy hogy minden nagyobb ügyet te elődbe hozzanak, minden csekélyebb dologban pedig ők ítéljenek; így könnyítve lesz rajtad, ha azt veled együtt hordozzák.
23 २३ तू असे करशील व देव तुला आज्ञा देईल तर तू टिकशील, आणि हे सर्व लोक शांतीने आपल्या ठिकाणास पोहचतील.”
Ha ezt cselekszed és az Isten is parancsolja néked: megállhatsz és az egész nép is helyére jut békességben.
24 २४ तेव्हा मोशेने इथ्रोच्या म्हणण्याप्रमाणे केले.
És hallgata Mózes az ő ipa szavára és mindazt megtevé, a mit mondott vala.
25 २५ मोशेने इस्राएल लोकांतून चांगले लोक निवडले आणि त्यांना हजार हजार, शंभर शंभर, पन्नास पन्नास व दहा दहांवर नायक म्हणून नेमले.
És választa Mózes az egész Izráelből derék férfiakat és a nép fejeivé tevé őket, ezeredesekké, századosokká, ötvenedesekké, és tizedesekké.
26 २६ ते लोकांवर न्यायाधीश झाले. लोक सतत नायकांकडे आपली गाऱ्हाणी आणू लागले व मोशेला फार महत्वाच्या प्रकरणांबद्दलच निकाल देण्याचे काम करावे लागे.
És ítélik vala a népet minden időben; a nehéz dolgokat Mózes elé viszik vala, minden kisebb dologban pedig ők ítélnek vala.
27 २७ मग थोड्याच दिवसानी मोशेने आपला सासरा इथ्रो याला निरोप दिला आणि इथ्रो माघारी आपल्या घरी गेला.
És elbocsátá Mózes az ő ipát, és ez elméne hazájába.