< निर्गम 17 >
1 १ सर्व इस्राएल लोकांचा समुदाय सीनच्या रानातून एकत्र प्रवास करत गेला, परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे ते ठिकठिकाणाहून प्रवास करत रफीदिम येथे गेले आणि त्यांनी तेथे तळ दिला; तेथे त्यांना प्यावयास पाणी मिळेना.
Therfor al the multitude of the sones of Israel yede forth fro the deseert of Syn, bi her dwellyngis, bi the word of the Lord, and settiden tentis in Rafidym, where was not watir to the puple to drynke.
2 २ तेव्हा इस्राएल लोक मोशेविरूद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले. ते म्हणाले, “आम्हांला प्यावयास पाणी दे.” मोशे त्यांना म्हणाला, “तुम्ही मजशी का भांडता? तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहत आहात?”
Whiche puple chidde ayens Moises, and seide, Yyue thou water to vs, that we drynke. To whiche Moises answeride, What chiden ye ayens me, and whi tempten ye the Lord?
3 ३ परंतु लोक तहानेने कासावीस झाले होते म्हणून ते मोशेकडे कुरकुर करीतच राहिले; ते म्हणाले, “तू आम्हांला मिसर देशातून बाहेर का आणलेस? आमची मुले, गुरेढोरे यांना पाण्यावाचून मारण्यासाठी तेथून आम्हांला तू येथे आणलेस काय?”
Therfor the puple thristide there for the scarsnesse of watir, and grutchiden ayens Moises, and seide, Whi madist thou vs to go out of Egipt, to sle vs, and oure fre children, and beestis, for thrist?
4 ४ तेव्हा मोशे परमेश्वराकडे धावा करून म्हणाला, “मी या लोकांस काय करू? ते तर मला दगडमार करावयास उठले आहेत.”
Forsothe Moises criede to the Lord, and seide, What schal Y do to this puple? yit a litil, also it schal stone me.
5 ५ परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांपुढे जा. त्यांच्यापैकी काही वडील माणसे तुजबरोबर घे. नील नदीच्या पाण्यावर तू जी काठी आपटली होतीस ती हाती घेऊन लोकांच्या पुढे चाल.
The Lord seide to Moises, Go thou bifore the puple, and take with thee of the eldre men of Israel, and take in thin hond the yerde, `bi which thou hast smyte the flood, and go; lo!
6 ६ पाहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन, त्या खडकावर ती काठी आपट, त्यातून पाणी निघेल. म्हणजे ते हे लोक पितील,” मोशेने हे सर्व इस्राएलांच्या वडिलासमोर केले.
Y schal stonde there before thee, aboue the stoon of Oreb, and thou schalt smyte the stoon, and water schal go out therof, that the puple drynke. Moises dide so byfore the eldere men of Israel;
7 ७ मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा व मरीबा ठेवले; कारण या ठिकाणी इस्राएल लोकांनी तेथे कलह केला आणि “परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही” असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली.
and he clepide the name of that place Temptacioun, for the chidyng of the sones of Israel, and for thei temptiden the Lord, and seiden, Whether the Lord is in vs, ether nay?
8 ८ रफीदिम येथे अमालेकी लोक इस्राएल लोकांवर चालून आले आणि त्यांनी त्यांच्याशी लढाई केली.
Forsothe Amalech cam, and fauyt ayens Israel in Rafidym.
9 ९ तेव्हा मोशे यहोशवाला म्हणाला, “काही लोकांस निवड व त्यांना घेऊन उद्या अमालेकांशी लढाई कर; देवाने मला दिलेली काठी हातात घेऊन मी डोंगराच्या माथ्यावर उभा राहीन.”
And Moises seide to Josue, Chese thou men, and go out, and fiyte to morewe ayens men of Amalech; lo! Y schal stonde in the cop of the hil, and Y schal haue `the yerde of God in myn hond.
10 १० यहोशवाने मोशेची आज्ञा मानली व त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो अमालेकी लोकांविरूद्ध लढावयास गेला, त्या वेळी मोशे, अहरोन व हूर हे डोंगराच्या माथ्यावर गेले.
Josue dide as Moises spak, and fauyt ayens Amalech. Forsothe Moises, and Aaron, and Hur stieden on the cop of the hil;
11 ११ जेव्हा मोशे हात वर करी तेव्हा लढाईत इस्राएलाची सरशी होई; परंतु जेव्हा तो हात खाली करी तेव्हा अमालेकी लोकांची सरशी होई.
and whanne Moises reiside the hondis, Israel ouercam; forsothe if he let down a litil, Amalech ouercam.
12 १२ काही वेळाने मोशेचे हात थकून गेले. तेव्हा त्यांनी एक धोंडा घेऊन मोशाच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला आणि नंतर एका बाजूने अहरोन व दुसऱ्या बाजूने हूर यांनी आधार देऊन मोशेचे हात सूर्य मावळेपर्यंत तसेच वर स्थिर धरून ठेवले.
Sotheli `the hondis of Moises weren heuy, therfor thei token a stoon, and puttide vndir hym, in which stoon he sat. Forsothe Aaron and Hur susteyneden hise hondis, on euer eithir side; and it was don, that hise hondis weren not maad weri, til to the goyng down of the sunne.
13 १३ तेव्हा यहोशवाने या लढाईत तलवारीच्या धारेने अमालेकी लोकांचा पराभव केला.
And Josue droof a wey Amalech and his puple, in `the mouth of swerd, that is, bi the scharpnesse of the swerd.
14 १४ नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “लढाई विषयीच्या या सर्व गोष्टी एका ग्रंथात लिहून ठेव आणि यहोशवाला सांग. कारण मी अमालेकी लोकांस पृथ्वीतलावरून नक्की पूर्णपणे नष्ट करीन.”
Forsothe the Lord seide to Moises, Wryte thou this in a book, for mynde, and take in the eeris of Josue; for Y schal do a wei the mynde of Amalech fro vndur heuene.
15 १५ मग मोशेने तेथे एक वेदी बांधून तिला “परमेश्वर माझा झेंडा” असे नाव दिले.
And Moises bildide an auter, and clepide the name therof The Lord myn enhaunsere,
16 १६ आणि तो म्हणाला, “परमेश्वराच्या सिंहासनावर अमालेकी लोकांनी हात उचलल्यामुळे परमेश्वराचे अमालेकांशी पिढ्यानपिढ्या युध्द होईल.”
and seide, For the hond of the Lord aloone, and the bateil of God schal be ayens Amalech, fro generacioun in to generacioun.