< एस्तेर 2 >
1 १ या गोष्टी झाल्यानंतर, राजा अहश्वेरोशचा राग शमला, त्याने वश्तीची आणि तिने जे काय केले त्याचा विचार केला. तिच्याविरूद्ध दिलेल्या आदेशाचाहि त्याने विचार केला.
१इन बातों के बाद जब राजा क्षयर्ष का गुस्सा ठंडा हो गया, तब उसने रानी वशती की, और जो काम उसने किया था, और जो उसके विषय में आज्ञा निकली थी उसकी भी सुधि ली।
2 २ तेव्हा राजाच्या सेवेतील तरुण सेवक त्यास म्हणाले की, राजासाठी तरुण, सुंदर कुमारींचा शोध घ्यावा.
२तब राजा के सेवक जो उसके टहलुए थे, कहने लगे, “राजा के लिये सुन्दर तथा युवा कुँवारियाँ ढूँढ़ी जाएँ।
3 ३ आपल्या राज्यातील प्रत्येक प्रांतातून राजाने एकेक अधिकारी नेमावा, त्या अधिकाऱ्यांनी सर्व सुरेख व सुंदर कुमारीकांना शूशन राजवाड्यात अंत: पुरात ठेवावे. तेथे राजाचा अधिकारी हेगे, याच्या निगराणीखाली स्त्रीयांना त्यांच्या ताब्यात द्यावे आणि त्याने त्यांना त्यांची सौंदर्य प्रसाधने द्यावीत.
३और राजा ने अपने राज्य के सब प्रान्तों में लोगों को इसलिए नियुक्त किया कि वे सब सुन्दर युवा कुँवारियों को शूशन गढ़ के रनवास में इकट्ठा करें और स्त्रियों के प्रबन्धक हेगे को जो राजा का खोजा था सौंप दें; और शुद्ध करने के योग्य वस्तुएँ उन्हें दी जाएँ।
4 ४ त्यांच्यामधून मग जी तरुण कन्या राजाला पसंत पडेल तिला वश्तीच्या जागी राणीपद मिळावे. राजाला ही सूचना आवडली आणि त्याने ती मान्य केली.
४तब उनमें से जो कुँवारी राजा की दृष्टि में उत्तम ठहरे, वह रानी वशती के स्थान पर पटरानी बनाई जाए।” यह बात राजा को पसन्द आई और उसने ऐसा ही किया।
5 ५ बन्यामीनाच्या घराण्यातील मर्दखय नावाचा एक यहूदी शूशन शहरात होता. तो याईराचा पुत्र आणि याईर शिमईचा पुत्र आणि शिमई कीश याचा पुत्र होता.
५शूशन गढ़ में मोर्दकै नामक एक यहूदी रहता था, जो कीश नाम के एक बिन्यामीनी का परपोता, शिमी का पोता, और याईर का पुत्र था।
6 ६ बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदाचा राजा यखन्या याच्याबरोबर जे लोक पकडून नेले होते त्यांच्यामध्ये यालाही यरूशलेमेहून पकडून नेले होते.
६वह उन बन्दियों के साथ यरूशलेम से बँधुआई में गया था, जिन्हें बाबेल का राजा नबूकदनेस्सर, यहूदा के राजा यकोन्याह के संग बन्दी बना के ले गया था।
7 ७ तो आपल्या चुलत्याची कन्या हदस्सा, म्हणजे एस्तेर, हिची काळजी घेत असे. कारण तिला आईवडील नव्हते. मर्दखयाने तिला आपली स्वतःची कन्या मानून वाढवले होते. ती तरुण स्त्री सुंदर बांध्याची आणि अतिशय रुपवती होती.
७उसने हदास्सा नामक अपनी चचेरी बहन को, जो एस्तेर भी कहलाती थी, पाला-पोसा था; क्योंकि उसके माता-पिता कोई न थे, और वह लड़की सुन्दर और रूपवती थी, और जब उसके माता-पिता मर गए, तब मोर्दकै ने उसको अपनी बेटी करके पाला।
8 ८ जेव्हा राजाची आज्ञा लोकांपर्यंत पोचल्यावर, पुष्कळ मुलींना शूशन राजवाड्यात आणून हेगेच्या देखभालीखाली ठेवण्यात आले. त्या मुलींमध्ये एस्तेरही होती. हेगे राजाच्या जनानखान्याचा प्रमुख होता.
८जब राजा की आज्ञा और नियम सुनाए गए, और बहुत सी युवा स्त्रियाँ, शूशन गढ़ में हेगे के अधिकार में इकट्ठी की गईं, तब एस्तेर भी राजभवन में स्त्रियों के प्रबन्धक हेगे के अधिकार में सौंपी गई।
9 ९ त्यास ती तरुणी आवडली आणि तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. त्याने तिला ताबडतोब सौंदर्यप्रसाधने पुरवली आणि तिच्या अन्नाचा भाग दिला. त्याने राजाच्या राजवाड्यातील सात दासी नेमून तिला दिल्या आणि तिला व तिच्या सात तरुण दासींना त्याने अंत: पुरातील उत्तम जागा राहण्यास दिली.
९वह युवती उसकी दृष्टि में अच्छी लगी; और वह उससे प्रसन्न हुआ, तब उसने बिना विलम्ब उसे राजभवन में से शुद्ध करने की वस्तुएँ, और उसका भोजन, और उसके लिये चुनी हुई सात सहेलियाँ भी दीं, और उसको और उसकी सहेलियों को रनवास में सबसे अच्छा रहने का स्थान दिया।
10 १० मर्दखयाने बजावल्यामुळे एस्तेरने आपल्या लोकांविषयी व नातलगांविषयी कोणालाही सांगितले नव्हते.
१०एस्तेर ने न अपनी जाति बताई थी, न अपना कुल; क्योंकि मोर्दकै ने उसको आज्ञा दी थी, कि उसे न बताना।
11 ११ आणि एस्तेर कशी आहे व तिचे काय होणार हे जाणून घेण्यासाठी मर्दखय प्रत्येक दिवशी अंतःपुराच्या अंगणासमोर फेऱ्या घालीत असे.
११मोर्दकै तो प्रतिदिन रनवास के आँगन के सामने टहलता था ताकि जाने कि एस्तेर कैसी है और उसके साथ क्या हो रहा है?
12 १२ स्त्रियांसाठी केलेल्या नियमाप्रमाणे, बारा महिने झाल्यावर, अहश्वेरोश राजाकडे जाण्याची पाळी एकेका तरुणीला येत असे. तिला बारा महिने सौंदर्योपचार घ्यावे लागत. त्यापैकी सहा महिने गंधरसाच्या तेलाचे तर सहा महिने सुंगधी द्रव्ये आणि प्रसाधने यांचे उपचार होत असत.
१२जब एक-एक कन्या की बारी आई, कि वह क्षयर्ष राजा के पास जाए, और यह उस समय हुआ जब उसके साथ स्त्रियों के लिये ठहराए हुए नियम के अनुसार बारह माह तक व्यवहार किया गया था; अर्थात् उनके शुद्ध करने के दिन इस रीति से बीत गए, कि छः माह तक गन्धरस का तेल लगाया जाता था, और छः माह तक सुगन्ध-द्रव्य, और स्त्रियों के शुद्ध करने का अन्य सामान लगाया जाता था।
13 १३ आणि राजाकडे जायच्या वेळी अशी पध्दत होती, अंत: पुरातून राजमंदिरात जाण्यासाठी जे काही ती मागे ते तिला मिळत असे.
१३इस प्रकार से वह कन्या जब राजा के पास जाती थी, तब जो कुछ वह चाहती कि रनवास से राजभवन में ले जाए, वह उसको दिया जाता था।
14 १४ संध्याकाळी ती राजाकडे जाई आणि सकाळी ती दुसऱ्या अंतःपुरात परत येत असे. तिथे शाशगज नावाच्या खोजाच्या हवाली केले जाई. शाशगज हा राजाच्या उपपत्नीची देखरेख करणारा खोजा होता. राजाला जी कन्या पसंत पडेल तिला तो नांव घेऊन बोलावत असे. एरवी या मुली पुन्हा राजाकडे जात नसत.
१४साँझ को तो वह जाती थी और सवेरे को वह लौटकर रनवास के दूसरे घर में जाकर रखैलों के प्रबन्धक राजा के खोजे शाशगज के अधिकार में हो जाती थी, और राजा के पास फिर नहीं जाती थी। और यदि राजा उससे प्रसन्न हो जाता था, तब वह नाम लेकर बुलाई जाती थी।
15 १५ आता एस्तेरची राजाकडे जायची पाळी आली तेव्हा स्त्रियांचा रक्षक राजाचा खोजा हेगे याने जे तिला देण्याचे ठरविले होते त्याहून अधिक काही मागून घेतले नाही. (मर्दखयाचा चुलता अबीहाईल याची कन्या जिला मर्दखयाने कन्या मानले होते) आता ज्या कोणी एस्तेरला पाहीले त्या सर्वांची कृपादृष्टी तिच्यावर झाली.
१५जब मोर्दकै के चाचा अबीहैल की बेटी एस्तेर, जिसको मोर्दकै ने बेटी मानकर रखा था, उसकी बारी आई कि राजा के पास जाए, तब जो कुछ स्त्रियों के प्रबन्धक राजा के खोजे हेगे ने उसके लिये ठहराया था, उससे अधिक उसने और कुछ न माँगा। जितनों ने एस्तेर को देखा, वे सब उससे प्रसन्न हुए।
16 १६ तेव्हा अहश्वेरोश राजाच्या महालात एस्तेरची रवानगी झाली. तो राजाच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षातला दहावा म्हणजे तेबेथ महिना होता.
१६अतः एस्तेर राजभवन में राजा क्षयर्ष के पास उसके राज्य के सातवें वर्ष के तेबेत नामक दसवें महीने में पहुँचाई गई।
17 १७ इतर सर्व मुलींपेक्षा राजाने एस्तेरवर अधिक प्रीती केली. आणि इतर सर्व कुमारीहून तिजवर त्याची मर्जी बसली व तिच्यावर कृपादृष्टी झाली. तेव्हा राजा अहश्वेरोशने एस्तेरच्या मस्तकावर राजमुकुट घालून वश्तीच्या जागी तिला राणी केले.
१७और राजा ने एस्तेर को और सब स्त्रियों से अधिक प्यार किया, और अन्य सब कुँवारियों से अधिक उसके अनुग्रह और कृपा की दृष्टि उसी पर हुई, इस कारण उसने उसके सिर पर राजमुकुट रखा और उसको वशती के स्थान पर रानी बनाया।
18 १८ आपले सर्व प्रमुख अधिकारी सेवक यांना राजाने एस्तेरसाठी मोठी मेजवानी दिली. सर्व प्रांतांमध्ये त्याने लोकांस कर माफी जाहीर केली. आपल्या उदारपणाप्रमाणे त्याने लोकांस बक्षीसे दिली.
१८तब राजा ने अपने सब हाकिमों और कर्मचारियों को एक बड़ा भोज दिया, और उसे एस्तेर का भोज कहा; और प्रान्तों में छुट्टी दिलाई, और अपनी उदारता के योग्य इनाम भी बाँटे।
19 १९ आता सर्व मुली दुसऱ्यांदा एकत्र जमल्या तेव्हा मर्दखय राजद्वारी बसला होता.
१९जब कुँवारियाँ दूसरी बार इकट्ठा की गई, तब मोर्दकै राजभवन के फाटक में बैठा था।
20 २० एस्तेरने आपले लोक व नातलगाविषयी कोणाला कळू दिले नव्हते. कारण मर्दखयाने तिला तसे बजावले होते. तो तिचा सांभाळ करत असताना ती त्याचे ऐकत असे तशीच ती अजूनही त्याच्या आज्ञेत होती.
२०एस्तेर ने अपनी जाति और कुल का पता नहीं दिया था, क्योंकि मोर्दकै ने उसको ऐसी आज्ञा दी थी कि न बताए; और एस्तेर मोर्दकै की बात ऐसी मानती थी जैसे कि उसके यहाँ अपने पालन-पोषण के समय मानती थी।
21 २१ मर्दखय राजद्वारी बसलेला असताना, बिग्थान व तेरेश प्रवेशद्वारातील राजाचे अधिकारी, राजावरील रागाने, राजा अहश्वेरोशला मारून टाकण्याचा कट करु लागले.
२१उन्हीं दिनों में जब मोर्दकै राजा के राजभवन के फाटक में बैठा करता था, तब राजा के खोजे जो द्वारपाल भी थे, उनमें से बिगताना और तेरेश नामक दो जनों ने राजा क्षयर्ष से रूठकर उस पर हाथ चलाने की युक्ति की।
22 २२ पण मर्दखयाला त्यांचा बेत कळल्यामुळे त्याने राणी एस्तेरला खबर दिली. राणी एस्तेरने मर्दखयाला या कटाचा सुगावा लागला असे राजाला सांगितले.
२२यह बात मोर्दकै को मालूम हुई, और उसने एस्तेर रानी को यह बात बताई, और एस्तेर ने मोर्दकै का नाम लेकर राजा को चितौनी दी।
23 २३ मग या बातमीचा तपास करण्यात आला आणि खबर खरी असल्याचे आढळून आले आणि त्या दोघा पुरुषांना फाशी देण्यात आले आणि या सर्व गोष्टी राजासमक्ष राजांच्या इतिहासाच्या ग्रंथात नोंदवून ठेवण्यात आल्या.
२३तब जाँच पड़ताल होने पर यह बात सच निकली और वे दोनों वृक्ष पर लटका दिए गए, और यह वृत्तान्त राजा के सामने इतिहास की पुस्तक में लिख लिया गया।