< इफि. 1 >
1 १ इफिस शहरातील पवित्र जन आणि ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणारे यांना, देवाच्या इच्छेद्वारे ख्रिस्त येशूचा प्रेषित, पौल याच्याकडून
Paweł, apostoł Jezusa Chrystusa z woli Boga, do świętych, którzy są w Efezie, i wiernych w Chrystusie Jezusie.
2 २ देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यापासून तुम्हास कृपा व शांती असो.
Łaska wam i pokój od Boga, naszego Ojca, i Pana Jezusa Chrystusa.
3 ३ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याला धन्यवाद असो; स्वर्गीय गोष्टीविषयी प्रत्येक आत्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हास ख्रिस्ताकडून आशीर्वादित केले आहे.
Błogosławiony niech będzie Bóg i Ojciec naszego Pana Jezusa Chrystusa, który pobłogosławił nas wszelkim duchowym błogosławieństwem w [miejscach] niebiańskich w Chrystusie.
4 ४ देवाने ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांना जगाच्या रचनेपूर्वीच निवडले यासाठी की आम्ही त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे.
Jak nas wybrał w nim przed założeniem świata, abyśmy byli święci i nienaganni przed jego obliczem w miłości.
5 ५ देवाच्या प्रीतीप्रमाणे, येशू ख्रिस्ताद्वारे त्याचे स्वतःचे पुत्र होण्याकरता आम्हास दत्तक घेण्यासाठी पूर्वीच आमची नेमणूक केली.
Przeznaczył nas dla siebie, ku usynowieniu przez Jezusa Chrystusa, według upodobania swojej woli;
6 ६ त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हास भरपूर केली.
Dla uwielbienia chwały swojej łaski, którą obdarzył nas w umiłowanym;
7 ७ त्या प्रिय पुत्राच्या ठायी रक्ताने खंडणी भरून आम्हास मुक्त करण्यात आले आहे, देवाच्या कृपेच्या विपुलतेने आम्हास आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे.
W którym mamy odkupienie przez jego krew, przebaczenie grzechów, według bogactwa jego łaski;
8 ८ देवाची ही कृपा आम्हास सर्व ज्ञानाने आणि विवेकाने भरपूर पुरवण्यात आली आहे.
Którą nam hojnie okazał we wszelkiej mądrości i roztropności;
9 ९ देवाने गुप्त सत्याची योजना आपणास कळवली आहे जी त्याने ख्रिस्ताच्याद्वारे आपल्या इच्छेप्रमाणे प्रदर्शित केली.
Oznajmiając nam tajemnicę swojej woli, według swego upodobania, które sam w sobie postanowił;
10 १० देवाच्या योजनेप्रमाणे जेव्हा काळाची पूर्णता होईल तेव्हा तो स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वकाही ख्रिस्तामध्ये एकत्र आणील.
Aby w zarządzeniu pełni czasów wszystko zebrał w jedno w Chrystusie, i to, co w niebiosach, i to, co na ziemi.
11 ११ देवाचे लोक म्हणून आम्ही पूर्वीच ख्रिस्तामध्ये त्याच्या योजनेप्रमाणे नेमले गेलो होतो, जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो,
W nim, [mówię], w którym też dostąpiliśmy udziału, przeznaczeni według postanowienia tego, który dokonuje wszystkiego według rady swojej woli;
12 १२ ह्यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवाची स्तुती यहूदी आमच्याकडून व्हावी, ज्याच्यावर आम्ही आधीच आशा ठेवली.
Abyśmy istnieli dla uwielbienia jego chwały, [my], którzy wcześniej położyliśmy nadzieję w Chrystusie.
13 १३ ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुद्धा खऱ्या वचनाची आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे.
W nim i wy [położyliście nadzieję], kiedy usłyszeliście słowo prawdy, ewangelię waszego zbawienia, w nim też, gdy uwierzyliście, zostaliście zapieczętowani obiecanym Duchem Świętym;
14 १४ त्याच्या प्रियजनांची खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा पुरावा आहे जेणेकरून देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी.
Który jest zadatkiem naszego dziedzictwa, aż nastąpi odkupienie nabytej własności, dla uwielbienia jego chwały.
15 १५ म्हणून तुमच्यामधील असलेला प्रभू येशूवरचा विश्वास व तुमची पवित्रजनांवरची प्रीती विषयी ऐकून
Dlatego i ja, gdy usłyszałem o waszej wierze w Pana Jezusa i o miłości względem wszystkich świętych;
16 १६ मीही तुमच्यासाठी देवाला धन्यवाद देण्याचे आणि माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करण्याचे थांबवले नाही.
Nie przestaję dziękować za was, czyniąc o was wzmiankę w moich modlitwach;
17 १७ मी अशी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हास आपल्या ओळखीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;
[Prosząc], aby Bóg naszego Pana Jezusa Chrystusa, Ojciec chwały, dał wam Ducha mądrości i objawienia w poznaniu jego [samego];
18 १८ म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हास हे समजावे की, त्याच्या बोलवण्याच्या आशेची निश्चितता काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र लोकात किती आहे,
Ażeby oświecił oczy waszego umysłu, abyście wiedzieli, czym jest nadzieja jego powołania, czym jest bogactwo chwały jego dziedzictwa w świętych;
19 १९ आणि आपण जे विश्वास ठेवणारे त्या आपल्यासाठी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय ते तुम्ही त्याच्या शक्तीशाली पराक्रमाच्या कामावरून ओळखून घ्यावे.
I czym jest przemożna wielkość jego mocy wobec nas, którzy wierzymy, według działania potęgi jego siły.
20 २० त्याने ती कृती ख्रिस्ताच्याद्वारे करून त्यास मरणातून उठविले आणि स्वर्गात देवाच्या उजव्या बाजूला बसविले.
Okazał ją w Chrystusie, gdy go wskrzesił z martwych i posadził po swojej prawicy w [miejscach] niebiańskich;
21 २१ त्याने त्यास सर्व अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभूत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे याकाळी नव्हे तर येणाऱ्या काळीही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा फार उंच केले. (aiōn )
Wysoko ponad wszelką zwierzchnością i władzą, mocą, panowaniem i [ponad] wszelkim imieniem wypowiadanym nie tylko w tym świecie, ale i w przyszłym. (aiōn )
22 २२ देवाने सर्वकाही ख्रिस्ताच्या पायाखाली केले आणि त्यास सर्वांवर मंडळीचे मस्तक म्हणून दिले.
I wszystko poddał pod jego stopy, a jego samego dał jako głowę ponad wszystkim kościołowi;
23 २३ हेच ख्रिस्ताचे शरीर. जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याने ते भरलेले आहे.
Który jest jego ciałem [i] pełnią tego, który wszystko we wszystkich napełnia.