< इफि. 2 >

1 आणि तुम्ही आपले अपराध आणि पापामुळे मरण पावला होता,
पुरा यूयम् अपराधैः पापैश्च मृताः सन्तस्तान्याचरन्त इहलोकस्य संसारानुसारेणाकाशराज्यस्याधिपतिम् (aiōn g165)
2 ज्यामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, हे तुमचे कृत्य जगाच्या चालीरीतीप्रमाणे अंतरीक्षाचा राज्याधिपती जो सैतान, म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या दुष्ट आत्म्याचा अधिपती, ह्याच्या वहीवाटीप्रमाणे असे होते. (aiōn g165)
अर्थतः साम्प्रतम् आज्ञालङ्घिवंशेषु कर्म्मकारिणम् आत्मानम् अन्वव्रजत।
3 आम्ही सर्व यापूर्वी या अविश्वासणाऱ्यांमध्ये आपल्या शारीरिक वासनेने वागत होतो, शरीर आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो व आम्ही स्वभावाने इतरांप्रमाणे राग येणारे लोक होतो.
तेषां मध्ये सर्व्वे वयमपि पूर्व्वं शरीरस्य मनस्कामनायाञ्चेहां साधयन्तः स्वशरीरस्याभिलाषान् आचराम सर्व्वेऽन्य इव च स्वभावतः क्रोधभजनान्यभवाम।
4 पण देव खूप दयाळू आहे कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले.
किन्तु करुणानिधिरीश्वरो येन महाप्रेम्नास्मान् दयितवान्
5 आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे.
तस्य स्वप्रेम्नो बाहुल्याद् अपराधै र्मृतानप्यस्मान् ख्रीष्टेन सह जीवितवान् यतोऽनुग्रहाद् यूयं परित्राणं प्राप्ताः।
6 आणि आम्हास त्याच्याबरोबर उठवले आणि स्वर्गीय स्थानात ख्रिस्त येशूसोबत बसविले.
स च ख्रीष्टेन यीशुनास्मान् तेन सार्द्धम् उत्थापितवान् स्वर्ग उपवेशितवांश्च।
7 यासाठी की, येशू ख्रिस्तामध्ये त्याची आम्हांवरील प्रीतीच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याची महान कृपा दाखविता यावी. (aiōn g165)
इत्थं स ख्रीष्टेन यीशुनास्मान् प्रति स्वहितैषितया भावियुगेषु स्वकीयानुग्रहस्यानुपमं निधिं प्रकाशयितुम् इच्छति। (aiōn g165)
8 कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्याद्वारे तुम्हास शिक्षेपासून वाचवले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे दान देवापासून आहे,
यूयम् अनुग्रहाद् विश्वासेन परित्राणं प्राप्ताः, तच्च युष्मन्मूलकं नहि किन्त्वीश्वरस्यैव दानं,
9 आपल्या कर्मामुळे हे झाले नाही यासाठी कोणी बढाई मारू नये.
तत् कर्म्मणां फलम् अपि नहि, अतः केनापि न श्लाघितव्यं।
10 १० कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत जी ख्रिस्तामध्ये आहे जेणेकरूण आम्ही जीवनात चांगली कामे करावी जे देवाने आरंभीच योजून ठेवले होते.
यतो वयं तस्य कार्य्यं प्राग् ईश्वरेण निरूपिताभिः सत्क्रियाभिः कालयापनाय ख्रीष्टे यीशौ तेन मृष्टाश्च।
11 ११ म्हणून आठवण करा, एकेकाळी तुम्ही शरीराने परराष्ट्रीय होता आणि ज्यांची शरीराची सुंता मनुष्याच्या हाताने झालेली होती ते लोक स्वतःला सुंती असे म्हणत, ते त्यांना बेसुंती संबोधत.
पुरा जन्मना भिन्नजातीया हस्तकृतं त्वक्छेदं प्राप्तै र्लोकैश्चाच्छिन्नत्वच इतिनाम्ना ख्याता ये यूयं तै र्युष्माभिरिदं स्मर्त्तव्यं
12 १२ त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे होता, इस्राएलाच्या बाहेरचे होता, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाविरहित आणि देवहीन असे जगात होता.
यत् तस्मिन् समये यूयं ख्रीष्टाद् भिन्ना इस्रायेललोकानां सहवासाद् दूरस्थाः प्रतिज्ञासम्बलितनियमानां बहिः स्थिताः सन्तो निराशा निरीश्वराश्च जगत्याध्वम् इति।
13 १३ पण आता, ख्रिस्त येशूमध्ये जे तुम्ही एकेकाळी देवापासून दूर होता, पण आता, येशू ख्रिस्तामध्ये ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आले आहात.
किन्त्वधुना ख्रीष्टे यीशावाश्रयं प्राप्य पुरा दूरवर्त्तिनो यूयं ख्रीष्टस्य शोणितेन निकटवर्त्तिनोऽभवत।
14 १४ कारण तोच आमची शांती आहे, त्याने यहूदी आणि विदेशी या दोघांना एक लोक असे केले. त्याच्या देहाने त्याने आम्हास एकमेकांपासून दुभागणारी आडभिंत पाडून टाकली.
यतः स एवास्माकं सन्धिः स द्वयम् एकीकृतवान् शत्रुतारूपिणीं मध्यवर्त्तिनीं प्रभेदकभित्तिं भग्नवान् दण्डाज्ञायुक्तं विधिशास्त्रं स्वशरीरेण लुप्तवांश्च।
15 १५ त्याने आज्ञाविधीचे कायदे आणि नियमशास्त्र आपल्या देहाने रद्द केले. यासाठी की स्वतःमध्ये दोघांचा एक नवा मनुष्य निर्माण करून शांती आणावी.
यतः स सन्धिं विधाय तौ द्वौ स्वस्मिन् एकं नुतनं मानवं कर्त्तुं
16 १६ त्याने वधस्तंभावर वैर जीवे मारून त्याच्याव्दारे एका शरीरात दोघांचा देवाबरोबर समेट करावा.
स्वकीयक्रुशे शत्रुतां निहत्य तेनैवैकस्मिन् शरीरे तयो र्द्वयोरीश्वरेण सन्धिं कारयितुं निश्चतवान्।
17 १७ ख्रिस्त आला आणि त्याने जे दूर होते त्यांना अणि जे जवळ होते त्यांना शांतीची सुवार्ता सांगितली.
स चागत्य दूरवर्त्तिनो युष्मान् निकटवर्त्तिनो ऽस्मांश्च सन्धे र्मङ्गलवार्त्तां ज्ञापितवान्।
18 १८ कारण येशूच्याद्वारे, आम्हा दोघांचा एका पवित्र आत्म्यात देवाजवळ प्रवेश होतो.
यतस्तस्माद् उभयपक्षीया वयम् एकेनात्मना पितुः समीपं गमनाय सामर्थ्यं प्राप्तवन्तः।
19 १९ यामुळे तुम्ही आता परके आणि विदेशी नाही. तर त्याऐवजी तुम्ही पवित्रजनांच्या बरोबरचे सहनागरीक आणि देवाचे कुटुंबीय आहात
अत इदानीं यूयम् असम्पर्कीया विदेशिनश्च न तिष्ठनतः पवित्रलोकैः सहवासिन ईश्वरस्य वेश्मवासिनश्चाध्वे।
20 २० तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या शिक्षणाच्या पायावर बांधलेली इमारत आहात आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे.
अपरं प्रेरिता भविष्यद्वादिनश्च यत्र भित्तिमूलस्वरूपास्तत्र यूयं तस्मिन् मूले निचीयध्वे तत्र च स्वयं यीशुः ख्रीष्टः प्रधानः कोणस्थप्रस्तरः।
21 २१ संपूर्ण इमारत त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभूमध्ये पवित्र भवन होण्यासाठी वाढत आहे.
तेन कृत्स्ना निर्म्मितिः संग्रथ्यमाना प्रभोः पवित्रं मन्दिरं भवितुं वर्द्धते।
22 २२ त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा इतरांबरोबर देवाच्या आत्म्याद्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र बांधले जात आहात.
यूयमपि तत्र संग्रथ्यमाना आत्मनेश्वरस्य वासस्थानं भवथ।

< इफि. 2 >