< अनुवाद 4 >
1 १ आता अहो इस्राएल लोकहो, मी जे नियम आणि आज्ञा सांगतो त्या नीट ऐकून घ्या. त्यांचे पालन केलेत तर जिवंत रहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर जो देश तुम्हास देणार आहे त्याचा ताबा घ्याल.
Maintenant donc, ô Israël, écoutez les saintes, lois et les préceptes que je vous enseigne aujourd'hui à pratiquer, afin que vous viviez et multipliiez; et qu'entrés en la terre que le Seigneur Dieu vous donne, vous la partagiez.
2 २ माझ्या आज्ञांमध्ये तुम्ही कमी किंवा अधिक असे काही करु नका. अशासाठी की, तुमचा देव ह्याच्या ज्या आज्ञा मी तुम्हास देत आहे. त्या तुम्ही पाळाव्या.
Vous n'ajouterez rien aux choses que je vous prescris, vous n'en retrancherez rien; vous observerez les commandements du Seigneur votre Dieu que je vous intime aujourd'hui.
3 ३ बआल-पौराच्या विषयी परमेश्वराने काय केले हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहीले आहे; जे बआल-पौराच्या नादी लागले त्यांना तुमचा देव परमेश्वर याने तुमच्यामधून नष्ट केले आहे.
Vos yeux ont vu tout ce que le Seigneur votre Dieu a fait au sujet de Belphégor: le Seigneur votre Dieu a effacé de son peuple tout homme qui a marché dans les voies de Belphégor.
4 ४ परंतु तुमचा देव परमेश्वर याच्याशी जे जडून राहिले ते तुम्ही आज जिवंत आहा.
Et vous, les fidèles au Seigneur votre Dieu, tous vous vivez encore.
5 ५ पाहा माझा देव परमेश्वर याने आज्ञा दिली त्याप्रमाणे विधी आणि नियम मी तुम्हास शिकवले. तुम्ही जो देश ताब्यात घेण्यास जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे म्हणून मी ते सांगितले.
Je vous ai fait connaître la loi et les jugements comme me les a dictés le Seigneur, pour que vous les mettiez en pratique dans la terre où vous allez entrer et que vous vous partagerez.
6 ६ त्यांचे काटेकोरपणे पालन करा. म्हणजे तुम्ही सूज्ञ व समजूतदार आहात हे इतर देशवासीयांना कळेल. हे नियम ऐकून ते म्हणतील, खरेच, हे महान राष्ट्र बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.
Observez-les, exécutez-les; c'est là votre sagesse et votre intelligence aux yeux des nations qui entendront parler de toute cette loi, et elles diront: Voilà un peuple sage et intelligent, voilà un grand peuple.
7 ७ आपण आपला देव परमेश्वर ह्याचा धावा करतो तेव्हा तो आपल्या जवळच असतो, असे देव जवळ असणारे महान राष्ट्र दूसरे कोणते आहे?
Existe-t-il une autre grande nation dont Dieu s'approche comme le fait de vous le Seigneur notre Dieu, en toutes les circonstances ou nous l'invoquons?
8 ८ ज्या विधी आणि नियमांची शिकवण मी तुम्हास दिली तसे नियमशास्त्र असणारे दुसरे राष्ट्र तरी कोठे आहे?
Existe-t-il une grande nation qui ait en elle des jugements et des ordonnances pleines de justice, comme toute cette loi que j'annonce devant vous aujourd'hui?
9 ९ पण तुम्ही हे डोळ्यांत तेल घालून जपले पाहिजे. नाहीतर तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्या विसरून जाल. आपल्या मुला-नातवंडांना त्याची माहिती द्या.
Garde-toi toi-même, et veille attentivement sur ton âme; n'oublie rien des choses que tes yeux ont vues; qu'elles ne sortent de ton cœur aucun des jours de ta vie; et tu raconteras à tes fils, aux fils de tes fils,
10 १० ज्या दिवशी तुम्ही सर्व होरेब पर्वतापाशी तुमचा देव परमेश्वर याच्यामोर उभे होता, तो दिवस आठवा. परमेश्वर मला म्हणाला होता, मला काही सांगायचे आहे तेव्हा सर्वांना एकत्र बोलाव, म्हणजे आयुष्यभर ते माझ्याबद्दल भय बाळगतील. आपल्या मुलाबाळांनाही तशीच शिकवण देतील.
Cette journée, ou en Horeb vous étiez devant le Seigneur votre Dieu, ce jour de l'Eglise, ou le Seigneur m'avait dit: Rassemble devant moi le peuple; qu'ils écoutent mes paroles, afin qu'ils apprennent à me craindre tous les jours de leur vie sur la terre, et qu'ils instruisent leurs fils.
11 ११ मग तुम्ही जवळ आलात व पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिलात. तेव्हा डोंगर उभा पेटला होता व त्याच्या ज्वाला आकाशाला भिडल्या होत्या. सर्वत्र काळेकुट्ट ढग आणि अंधार पसरला होता.
Et vous vous teniez au pied de la montagne, et la montagne était enflammée jusqu'au ciel, et il y avait alentour obscurité, ténèbres, tempête.
12 १२ परमेश्वर त्या अग्नीतून तुमच्याशी बोलला. तुम्हास आवाज ऐकू आला पण तुम्ही कोणती आकृतीही पाहीली नाही, फक्त वाणी ऐकू आली.
Et le Seigneur vous parlait du milieu du feu; il vous faisait entendre les commandements que vous recueilliez en vous-mêmes, et vous ne voyiez point sa face, mais vous entendiez sa voix.
13 १३ परमेश्वराने आपला करार करून तुम्हास सांगितले. त्याने तुम्हास दहा आज्ञा सांगितल्या व त्यांचे पालन करण्याविषयी तुम्हास आज्ञा दिली. त्याने त्या आज्ञा दोन दगडी पाट्यांवर लिहून दिल्या.
Et il vous instruisit de son alliance qui vous obligeait à suivre les dix commandements, et il les grava sur deux tables de pierre.
14 १४ त्याचवेळी तुम्ही ज्या देशात वस्ती करणार होता, तेथे पाळण्यासाठी आणखीही काही विधी नियम परमेश्वराने मला तुम्हास शिकवण्यास सांगितले.
En ce temps-là, le Seigneur me prescrivit de vous enseigner la loi de justice et les jugements, pour que vous les mettiez en pratique sur la terre où vous allez entrer, et que vous allez vous partager.
15 १५ होरेब पर्वतावरुन अग्नीतून परमेश्वर तुमच्याशी बोलला. त्यादिवशी तो तुम्हास दिसला नाही. कारण त्यास कोणताही आकार नव्हता.
Et vous veillerez attentivement sur vos âmes, car vous n'avez point vu d'image le jour où le Seigneur, en Horeb, vous parla du haut de la montagne, au milieu du feu.
16 १६ तेव्हा जपून असा. कोणत्याही सजीवाची प्रतिमा किंवा खोटी दैवते उभारण्याचे पाप करून स्वत: ला बिघडवू नका. स्त्री किंवा पुरुषासारखी दिसणारी मूर्ती करु नका.
Vous ne transgresserez point la loi, et vous ne vous ferez point d'image, point de représentation de mâle ou de femelle,
17 १७ जमिनीवरील संचार करणारे प्राणी किंवा आकाशात उडणारा पक्षी,
Point d'image des bêtes qui existent sur la terre, point d'image des oiseaux qui volent sous le ciel,
18 १८ जमिनीवर सरपटणारा जीव किंवा समुद्रातील मासा अशासारख्या कशाचीही प्रतीमा करू नका.
Point d'image des reptiles qui se traînent sur la terre, point d'image des poissons qui vivent dans les eaux au-dessous de la terre.
19 १९ तसेच आकाशातील सूर्य, चंद्र, तारे आणि इतर गोष्टी पाहाताना हबकून जावू नका. त्यांच्यापुढे लोटांगण घालून त्यांची उपासना करु नका. या गोष्टी तुमचा देव परमेश्वर याने आकाशाखालील सर्व लोकांस देऊन ठेवल्या आहेत.
Et qu'en regardant le ciel, en voyant le soleil, la lune, les étoiles et toute la parure des cieux, tu ne t'égares point jusqu'à les adorer et à sacrifier à des choses que le Seigneur ton Dieu a distribuées à toutes les nations sous le ciel.
20 २० पण तुम्हास परमेश्वराने मिसर देशाबाहेर आणले आणि तुम्हास स्वत: चे खास लोक केले. जणू लोखंड वितळविन्याच्या धधगत्या भट्टीतून त्याने तुम्हास बाहेर काढले आणि तुम्ही त्याच्या वतनाचे लोक आहा!
Et le Seigneur vous a choisis, il vous a tirés de la terre d'Egypte, de la fournaise de fer d'Egypte, afin que vous soyez pour lui son peuple, son héritage, comme vous l'êtes aujourd'hui.
21 २१ तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावर कोप झाला व त्याने शपथेने सांगितले की मी यार्देन नदीपलीकडे पाऊल ठेवू शकणार नाही. तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिलेल्या वतनात तुम्ही प्रवेश करणार आहात, तेथे मला प्रवेश नाही.
Et le Seigneur, à cause des paroles que vous aviez dites, s'est irrité contre moi, et il a juré que je ne traverserais pas le Jourdain, et que je n'entrerais pas en la terre que le Seigneur votre Dieu vous donne pour héritage.
22 २२ त्यामुळे मी येथेच देह ठेवणार आहे. मी यार्देन नदीपलीकडे येऊ शकत नसलो तरी तुम्ही तो चांगला प्रदेश ताब्यात घ्या.
Voilà que je meurs en cette terre; je ne traverserai pas le Jourdain: c'est vous qui le passerez, et qui vous partagerez cette terre fortunée.
23 २३ तेथे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्याशी केलेला पवित्र करार विसरू नका व त्याच्या आज्ञा पाळा. कोणत्याही प्रकारे कोणत्याही आकाराची मूर्ती करु नका.
Veillez sur vous; n'oubliez pas l'alliance que le Seigneur votre Dieu a faite pour vous, ne manquez pas à la loi; ne faites pas pour vous d'image sculptée des choses que vous a désignées le Seigneur.
24 २४ कारण मूर्तीपूजेचा त्यास तिटकारा आहे. परमेश्वर देव ईर्ष्यावान असून तो क्षणात भस्म करणारा अग्नी आहे.
Car le Seigneur ton Dieu est un feu qui consume, c'est un Dieu jaloux.
25 २५ तुम्हास पुत्रपौत्र होऊन त्या देशात तुम्ही दीर्घकाळ राहिल्यावर जर तुम्ही बिघडून कोणत्याही वस्तूची कोरीव मूर्ती कराल आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते कराल तर त्यास क्रोध येईल.
Or, quand tu auras des fils et des fils de tes fils, quand vous aurez duré longtemps sur la terre, si vous manqué à la loi, si vous faites des images sculptées de quelque créature, si devant le Seigneur vous faites le mal au point de l'irriter,
26 २६ तर आज मी तुम्हास सावध करत आहे; याला स्वर्ग आणि पृथ्वी साक्षी आहेत, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही यार्देन नदी ओलांडून जात आहात तेथून तुमचा लवकरच अगदी नायनाट होईल; तेथे तुम्ही फार दिवस राहणार नाहीत, पण तुमचा समूळ नाश होईल.
Aujourd'hui, devant vous, je prends à témoin le ciel et la terre, que vous serez effacés de cette terre où vous allez entrer, en passant le Jourdain, pour vous la partager; vous n'y demeurerez pas longtemps, mais vous serez exterminés.
27 २७ परमेश्वर देव तुम्हास वेगवेगळ्या राष्ट्रात विखरून टाकील. आणि जेथे जेथे तो पाठवील तेथे तुमची संख्या अगदीच अल्प राहील.
Et le Seigneur vous dispersera parmi toutes les nations, et un petit nombre des vôtres survivra parmi les Gentils, chez qui le Seigneur vous conduira.
28 २८ तेथे तुम्ही मनुष्यांनी घडवलेल्या दगडी अगरलाकडी दैवतांची, जे पाहू शकत नाहीत, ऐकत नाहीत, खात नाहीत की वास घेत नाहीत अशांची सेवा कराल.
Et là, vous servirez des dieux étrangers, œuvre de la main des hommes, bois ou pierre, qui ne verront, ni n'entendront, ni ne mangeront; qui n'auront point d'odorat.
29 २९ परंतु तेथूनही तुम्ही परमेश्वरास, आपल्या देवाला पूर्ण जिवेभावे शरण गेला तर तो तुम्हास पावेल.
Et là, vous chercherez le Seigneur votre Dieu, et vous le trouverez, lorsqu'en votre affliction vous le chercherez de tout votre cœur et de toute votre âme.
30 ३० या सर्व गोष्टी घडतील, तुम्ही संकटात पडाल तेव्हा तुम्ही पुन्हा आपला देव परमेश्वर ह्याच्याकडेच परतून याल व त्यास शरण जाल.
Et tous ces discours te retrouveront à la fin des jours, et tu te convertiras au Seigneur ton Dieu, et il entendra ta voix,
31 ३१ आपला देव परमेश्वर दयाळू आहे. तो तुम्हास अंतर देणार नाही. तो तुमचा सर्वनाश होऊ देणार नाही. तो तुमच्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही.
Car le Seigneur ton Pieu est un Dieu miséricordieux; il ne l'abandonnera pas, il ne te détruira point, il n'oubliera pas l'alliance qu'avec tes pères le Seigneur ton Dieu a jurée.
32 ३२ असा चमत्कार कधी घडला आहे का? कधीच नाही. पूर्वीचे आठवून बघा. तुमच्या जन्मा आधीपासूनच्याही सर्व गोष्टी आठवा. देवाने पृथ्वीवर मनुष्य निर्माण केला. तेव्हापासून आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या सर्व गोष्टी पाहा. असा महान चमत्कार कोणाच्या ऐकण्यात तरी आहे का?
Interrogez les premiers jours, les jours écoulés avant vous, depuis le jour ou Dieu a créé l'homme sur la terre; demandez, d'une extrémité à l'autre du ciel, s'il est jamais rien arrivé de semblable à cette grande parole de Dieu, si l'on a rien ouï de semblable;
33 ३३ अग्नीमधून साक्षात देव तुमच्याशी बोलला, ते तुम्ही ऐकले आणि तरीही तुम्ही जिवंत आहात. असे कधी दुसऱ्या राष्ट्राच्या बाबतीत घडले आहे?
Si jamais nation a entendu la voix du Dieu vivant, parlant du milieu du feu, comme tu l'as entendue: et tu vis encore;
34 ३४ दुसऱ्या राष्ट्रात जाऊन त्यातून एक राष्ट्र आपलेसे करायचे असा दुसऱ्या कुठल्या देवाने प्रयत्न तरी केला आहे का? नाही ना? पण आपल्या परमेश्वर देवाने मिसर देशात तुमच्यासाठी महान गोष्टी केल्याचे तुम्ही स्वत: पाहिले, त्याने तुमच्यासाठी संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी हात आणि उगारलेला भूज ह्याद्ववारे भयप्रद कार्ये केली.
Si Dieu, se mêlant à une nation, a entrepris, pour la posséder en propre, de la prendre au milieu des peuples par des épreuves, par des signes et des prodiges, des combats, une main puissante, et un bras très-haut, et de grandes merveilles, comme toutes celles que le Seigneur notre Dieu a faites en Egypte sous tes veux;
35 ३५ परमेश्वर हाच खरा देव आहे हे तुम्हास कळावे म्हणून त्याने तुम्हास हे दाखवले. त्याच्यासारखा दुसरा देव नाही.
Afin que tu saches que le Seigneur ton Dieu est Dieu, et que nul ne l'est que lui.
36 ३६ तुम्हास शिकवण द्यावी म्हणून त्याने आकाशातून आपली वाणी ऐकवली. पृथ्वीवर आपला महान अग्नी त्याने दाखवला व त्यातून त्याचे शब्द तुम्ही ऐकले.
Du haut du ciel sa voix s'est fait entendre pour t'instruire, et, sur la terre, il t'a montré son grand feu, et, du milieu du feu, tu as ouï sa parole,
37 ३७ त्याचे तुमच्या पूर्वजांवर प्रेम होते. म्हणून त्याने तुमची निवड केली. त्यामुळेच त्याने तुम्हास आपल्या महान सामर्थ्याने मिसर देशातून बाहेर आणले. तो तुमच्या पाठीशी राहिला.
Parce qu'il a aimé tes pères, et qu'il t'a choisi, toi, leur postérité, et que lui-même t'a fait sortir d'Egypte par sa grande puissance;
38 ३८ तुम्ही जसे पुढे जाल तसे त्याने तुमच्यापेक्षा मोठ्या व समर्थ राष्ट्रांना हुसकून लावले आणि तेथे तुमचा शिरकाव करून दिला. त्यांचा प्रदेश त्याने तुम्हास राहण्यासाठी दिला. आजही तो हे करत आहे.
Pour exterminer devant ta face des nations grandes et plus fortes que toi, pour t'introduire en leur terre, et te la donner en héritage, comme tu l'as aujourd'hui.
39 ३९ तेव्हा, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वर हाच देव आहे, दुसरा कोणीही नाही. हे आज तुम्ही नीट समजून घ्या व लक्षात ठेवा.
Sache donc, et répète toujours en ta pensée, que le Seigneur ton Dieu est Dieu, au haut du ciel et ici-bas sur la terre, et que nul n'est Dieu que lui.
40 ४० आज मी तुम्हास त्याचे नियम व आज्ञा सांगणार आहे, त्या पाळा. त्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे भले होईल. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या प्रदेशात तुमचे वास्तव्य दीर्घकाळ राहील. तो प्रदेश कायमचा तुमचाच होईल.
Observe sa loi et ses commandements que je t'intime aujourd'hui, afin que tu sois heureux, et tes fils après toi, afin que tu vives de longs jours sur la terre que le Seigneur ton Dieu te donne à perpétuité.
41 ४१ मग मोशेने यार्देन नदीच्या पूर्वेला तीन नगरांची निवड केली.
Après cela, Moïse sépara, sur la rive droite du Jourdain, trois villes,
42 ४२ अशासाठी की, पूर्वी काही वैर नसताना, अजाणतेपणी एखाद्याने कोणाची चुकून हत्या केली तर त्यास ह्यातल्या एखाद्या नगराचा आसरा घेता यावा. मृत्यूदंडाला सामोरे जावे लागू नये.
Où pût se réfugier le meurtrier qui, involontairement et sans précédente haine, aurait tué son prochain, afin qu'à l'une de ces villes il put trouver refuge, et vivre:
43 ४३ ती नगरे अशी: रऊबेन वंशासाठी रानातील माळावरचे बेसेर नगर, गाद वंशासाठी गिलाद प्रदेशातील रामोथ नगर आणि मनश्शेच्या वंशासाठी बाशान प्रदेशातील गोलान नगर.
Bosor, dans le désert, en la plaine de Ruben; Ramoth en Galaad, appartenant à Gad; et Gaulon en Basan, appartenant à Manassé.
44 ४४ इस्राएल लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर मोशेने त्यांना हे नियमशास्त्र, दिले.
Voici la loi que Moïse exposa devant Israël.
45 ४५ इस्राएली लोक मिसरातून बाहेर आले तेव्हा मोशेने हे निर्बंध सांगितले. ते बेथपौरच्या समोरच्या खोऱ्यात यार्देन नदीच्या पूर्वेला होते.
Voici les témoignages, les préceptes et les jugements que Moïse fit connaître aux fils d'Israël après leur sortie d'Egypte,
46 ४६ म्हणजेच हेशबोन नगरातील अमोऱ्यांचा राजा सीहोन याला पराजित केले त्याच्या देशात यार्देनेच्या पूर्वेस म्हणजे बेथ-पौराच्या समोरील खोऱ्यात (मोशे आणि इस्राएलाच्या लोकांनी मिसर देशातून बाहेर पडल्यावर सीहोनचा पराभव केला होता.)
Sur la rive du Jourdain, dans la vallée voisine du temple de Phégor, en la terre du roi des Amorrhéens, Séhon, qui habitait Esebon, et que vainquirent Moïse et les fils d'Israël, après leur sortie d'Egypte.
47 ४७ त्यांनी हा देश आणि बाशानाचा राजा ओग याचाही देश ताब्यात घेतला. अमोऱ्यांचे हे दोन्ही राजे यार्देन नदीच्या पूर्वेकडे राहत असत.
Alors, ils partagèrent sa terre et la terre de Og, roi de Basan; tous les deux étaient des rois amorrhéens; ils régnaient sur la rive orientale du Jourdain,
48 ४८ आर्णोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून सरळ सिर्योन (म्हणजेच हर्मोन) पर्वतापर्यंत हा प्रदेश पसरलेला आहे.
Depuis Aroer, sur le bord du torrent d'Arnon, jusqu'à la montagne d'Hermon, dans le royaume de Sehon;
49 ४९ यार्देन नदीच्या पूर्वेकडील संपूर्ण खोरे, दक्षिणेला अराबा (मृत) समुद्रापर्यंतचा विस्तार, आणि पूर्वेला पिसगा पर्वताच्या पायथ्यापर्यंत एवढा हा प्रदेश त्यांनी काबीज केला होता.
C'est-à-dire sur tout le territoire d'Araba, sur la rive orientale du Jourdain, au-dessous du rocher d'Asedoth.