< अनुवाद 15 >

1 प्रत्येक सात वर्षांच्या शेवटी तुम्ही कर्ज माफ करून टाकावे.
Naar syv Aar ere til Ende, skal du lade Henstand ske.
2 त्याची पद्धत अशी: प्रत्येकाने आपल्या इस्राएल बांधवाला दिलेले कर्ज रद्द करून टाकावे. त्यास परतफेड करायला सांगू नये. कारण परमेश्वरानेच त्यावर्षी कर्जमुक्ती जाहीर केली आहे.
Og saaledes skal der forholdes med denne Henstand: Hver Ejermand, som har laant noget ud af sin Haand, skal give Henstand med det, som han har laant ud til sin Næste; han skal ikke kræve sin Næste eller sin Broder, naar man har udraabt Henstand for Herren.
3 परक्याकडून हवी तर वसुली करावी, पण तुझ्या बांधवाकडे तुझे काही येणे असेल तर ते तू सोडून दे.
Den fremmede maa du kræve; men det, som du har hos din Broder, skal din Haand give Henstand med;
4 तुमच्या देशात कोणी गरीब असता कामा नये. कारण ही भूमी तुम्हास परमेश्वराने दिली आहे आणि तो तुम्हास भरभरुन आशीर्वाद देणार आहे
kun at ingen skal blive en Tigger iblandt eder; thi Herren skal meget velsigne dig i det Land, som Herren din Gud giver dig til Arv at eje det;
5 पण त्यासाठी तुम्ही तुमचा देव परमेश्वर याच्या आज्ञेत राहिले पाहिजे. मी आज सांगितलेल्या सर्व आज्ञा काळजीपूर्वक पाळा.
dersom du ikkun hører Herren din Guds Røst, saa at du tager Vare paa at gøre efter alle disse Bud som jeg byder dig i Dag.
6 मग तुमचा देव परमेश्वर आपल्या वचनानुसार तुमचे कल्याण करील. तुम्ही इतर राष्ट्रांना उसने द्याल पण उसने घ्यायची तुमच्यावर वेळ येणार नाही. तुम्ही इतर राष्ट्रावर सत्ता चालवाल पण तुमच्यावर इतरांची सत्ता चालणार नाही.
Thi Herren din Gud har velsignet dig, som han har tilsagt dig; og du skal laane til mange Folk; men du skal ikke tage til Laans; og du skal herske over mange Folk, men de skulle ikke herske over dig.
7 तुमचा देव परमेश्वर तुम्हास देणार असलेल्या या देशात एखादा मनुष्य गरीब असेल, त्यास मदत करायला हात आखडता घेऊ नका, स्वार्थीपणाने वागू नका.
Naar der vorder en fattig iblandt eder, en af dine Brødre, i en af dine Stæder i dit Land, som Herren din Gud giver dig: Da skal du ikke gøre dit Hjerte haardt og ikke lukke din Haand for din fattige Broder.
8 त्याच्यासाठी हात सैल सोडा आणि त्याच्या गरजेपुरते उसने द्या.
Men du skal oplade din Haand for ham, og du skal laane ham det, som er nok for hans Mangel, det som ham fattes.
9 कर्जमाफीचे वर्ष (सातवे वर्ष) आता जवळच आले आहे अशा दुष्ट विचाराने कुणाला मदत नाकारू नका. गरजूंच्या बाबतीत असे क्षुद्र विचार मनात आणू नका. त्याच्या बाबतीत अनुदार राहू नका. तसे केले तर ते तुमच्याविरुध्द परमेश्वराकडे गाऱ्हाणे गातील. आणि तुम्हास पाप लागेल.
Tag dig i Vare, at der ikke er en nedrig Tanke i dit Hjerte, at du siger: Det syvende Aar, Henstandsaaret, er nær, og at du er karrig imod din fattige Broder og ikke giver ham, og at han raaber over dig til Herren, og det skal være dig til Synd.
10 १० तेव्हा तुम्हास शक्य आहे ते त्यांना द्या. उदार अंत: करणाने द्या. या सत्कृत्याबद्दल तुम्हास परमेश्वर देवाचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यामध्ये तुम्हास यश मिळेल.
Du skal give ham og ikke lade dit Hjerte fortryde det, at du giver ham; thi Herren din Gud skal for denne Sags Skyld velsigne dig i alle dine Gerninger og i alt det, som du udrækker din Haand til.
11 ११ गरीब लोक तर देशात नेहमीच असणार म्हणून मी म्हणतो की त्यांना मदत करायला तयार राहा. आपल्या देशातील गरजवंतांना सढळ हाताने मदत करा.
Thi fattige ville ikke ophøre at være i Landet; derfor byder jeg dig og siger, at du skal oplade din Haand for din Broder, for den, som trænger hos dig, og for din fattige i dit Land.
12 १२ एखादी इब्री स्त्री किंवा पुरुष तुम्ही दास म्हणून विकत घेतलेला असेल तर सहा वर्षे चाकरी झाल्यावर, सातव्या वर्षी त्यास मुक्त करा.
Naar din Broder, en Hebræer eller en Hebræerinde, sælges til dig, da skal han tjene dig i seks Aar, og i det syvende Aar skal du lade ham fri fra dig.
13 १३ पण त्यास रिक्त हाताने जाऊ देऊ नका.
Og naar du lader ham fri fra dig, da skal du ikke lade ham gaa tomhændet.
14 १४ तर तुझी गुरे, खळे, द्राक्षकुंड यातून उदार हाताने दे. तुमचा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने तुम्हास भरभरुन मिळाले आहे, त्या प्रमाणात त्यास दे.
Du skal rigeligen begave ham af dit smaa Kvæg og af din Lade og af din Perse; det som Herren din Gud velsigner dig med, deraf skal du give ham.
15 १५ आपण मिसरमध्ये दास होतो व तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास मुक्त केले हे लक्षात ठेवा. त्यासाठीच मी तुम्हास आज ही आज्ञा देत आहे.
Og du skal komme i Hu, at du var en Træl i Ægyptens Land, og at Herren din Gud udløste dig; derfor byder jeg dig dette Ord i Dag.
16 १६ असे घडेल की, तो तुम्हास म्हणेल, मी तुमच्यापासुन दूर जाणार नाही, कारण तुमच्यावर व कुटुंबावर प्रीती करीत असेल आणि आनंदात असल्यामुळे तो तुम्हास सोडून जायला तयार होणार नाही.
Og det skal ske, om han siger til dig: Jeg vil ikke gaa ud fra dig, fordi han elsker dig og dit Hus, fordi han lider vel hos dig:
17 १७ तेव्हा दरवाजाजवळ धरुन अरीने त्याचा कान टोचा. तो तुमचा कायमचा दास आहे हे त्यावरुन कळेल. दासीच्या बाबतीतही असेच करा.
Da skal du tage en Syl og stikke i hans Øre og i Døren, saa skal han være dig en Træl bestandig; og saaledes skal du og gøre ved din Tjenestepige.
18 १८ दासांना मुक्त करून जाऊ देताना तुम्हास जड वाटू नये. पगारी नोकराला तुम्हास द्यावे लागले असते त्याच्या निम्म्या पैशातच याने तुमची सेवा केली आहे हे लक्षात ठेवा. असे केलेत तर तुम्ही जे जे कराल त्यामध्ये तुमचा देव परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देईल.
Lad det ikke være for svart for dine Øjne, at du lader ham fri fra dig; thi han har tjent dig dobbelt, efter en Daglønners Løn, seks Aar; og Herren din Gud skal velsigne dig i alt det, du skal gøre.
19 १९ तुमच्या कळपातील सर्व जनावरांचा पहिला गोऱ्हा पवित्र मानून तो परमेश्वरास अर्पण करा. पहिला गोऱ्हा कामाला जुंपू नका. पहिल्या मेंढराची लोकर कातरू नका.
Alt det førstefødte, som fødes af dit store Kvæg og af dit smaa Kvæg, naar det er en Han, skal du hellige for Herren din Gud; du skal ikke arbejde med din Okses førstefødte og ikke klippe dine Faars førstefødte.
20 २० दरवर्षी या सगळ्या गोऱ्हांना तुमचा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी घेऊन जा. तेथे सर्व कुटुंबियांसमवेत परमेश्वरासमोर त्याचे मांस खा.
Du skal æde det hvert Aar for Herren din Guds Ansigt paa det Sted, som Herren skal udvælge, du og dit Hus.
21 २१ पण यापैकी एखाद्या जनावरात लंगडेपणा, आंधळेपणा असे काही व्यंग असेल तर तुमचा देव परमेश्वर ह्याला त्याचा बली देऊ नका.
Dog, om der er Lyde paa det, saa det er lamt eller blindt, hvad som helst slem Lyde det er, da skal du ikke ofre det for Herren, din Gud.
22 २२ वाटल्यास घरीच त्याचे मांस खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध कोणीही ते खावे.
Inden dine Porte skal du æde det, saavel den urene som den rene, som var det en Raa og en Hjort.
23 २३ फक्त त्याचे रक्तसेवन करु नये. ते तेवढे पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून द्यावे.
Dog skal du ikke æde Blodet deraf; du skal udøse det paa Jorden som Vand.

< अनुवाद 15 >