< २ तीम. 4 >
1 १ देवासमोर आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की,
这就是我在上帝和耶稣基督面前,指导你要做的事情。当耶稣基督到来并建立他的王国,将对活人和死人进行审判。
2 २ वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर.
无论是否方便,都要讲述上帝之道;如果人们犯错,要告诉他们,警告他们,鼓励他们。当你这样做时,要用极大的耐心进行教导。
3 ३ मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील.
因为人们即将不再听得下真正的教导,那个时刻很快就会到来。到时候,他们会好奇地想要听不一样的教导,他们身边的老师,会讲述他们爱听的东西。
4 ४ सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते काल्पनिक कथांकडे लावतील.
他们不再聆听真理,反倒流连于谬误。
5 ५ पण तू सर्व परीस्थितीत सावधानतेने वाग, दुःख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर.
你要时刻保持明智,忍受磨难,进行传福音的工作,完成你的职责。
6 ६ कारण आता माझे अर्पण होत आहे व माझी या जगातून जाण्याची वेळ आली आहे.
我即将被牺牲;我离世的时候即将到来。
7 ७ मी सुयुद्ध केले आहे. मी माझी धाव संपवली आहे. मी विश्वास राखला आहे.
我已进行了一场良善的战斗,已跑完比赛,已坚持对上帝的信。
8 ८ आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मुकुट ठेवला आहे, तो त्यादिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.
现在有一个奖励留给了我,那是因遵循好事和正直良善而获得的冠冕。主(他是总能正确行事的法官)会在那一天给我这个冠冕。不只是给我,也给渴望他到来的所有人。
9 ९ माझ्याजवळ लवकर येण्याचा प्रयत्न कर.
请尽快到我这边来。。
10 १० कारण देमास मला सोडून थेस्सलनीका शहरास गेला आहे कारण त्यास जगाचे सुख प्रिय आहे. क्रेस्केस गलतीया प्रांतास गेला आहे व तीत दालमतीया प्रांतास गेला आहे. (aiōn )
因为底马因贪恋现今的世界,已离开我去了帖撒罗尼迦。革勒士去了加拉太,提多去了达马太。 (aiōn )
11 ११ लूक मात्र माझ्याजवळ आहे, जेव्हा तू येशील तेव्हा मार्कालाही तुझ्याबरोबर घेऊ नये कारण सेवेकरता तो मला उपयोगी आहे.
现在只有路加在我这里。请把马可带来,他可以帮助我的工作。
12 १२ तुखिकाला मी इफिस शहरास पाठवले आहे.
我已派推基古到以弗所去。
13 १३ त्रोवस शहरात कार्पाच्या घरी राहिलेला माझा झगा येताना घेऊन ये. तसेच माझी पुस्तके, विशेषतः चर्मपत्राच्या गुंडाळ्या घेऊन ये.
你来的时候,请带上我在特罗亚时留在加布那里的外衣。还有那些书,特别是那些羊皮书,也要带来。
14 १४ आलेक्सांद्र तांबटाने माझे खूप नुकसान केले आहे. त्याने केलेल्या त्याच्या कृत्यांबद्दल देव त्याची फेड करील.
铜匠亚历山大给我带来了很多麻烦,愿主根据他的行为审判他。
15 १५ त्याच्यापासून स्वतःचे रक्षण कर कारण त्याने आपल्या शिक्षणाला जोरदारपणे विरोध केला होता.
你也要提防他,因为他极力反对我所说的话。
16 १६ पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही. त्याऐवजी ते सर्व मला सोडून गेले. देवाकडून हे त्यांच्याविरुद्ध मोजले जाऊ नये.
我第一次辩护的时候,没有一个人支持我,反而离开我。但愿他们不会因此而受到责备。
17 १७ प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व परराष्ट्रीयांनी ती ऐकावी आणि त्याने मला सिंहाच्या मुखातून सोडवले.
但主站在我身边,给我力量,让我可以宣讲所有的福音信息,让所有外族人都能听见;他将我从狮口中救出来。
18 १८ प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्यास सदासर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन. (aiōn )
主必救我脱离一切邪恶之事,也必带我安全进入他在天上的王国。愿荣耀永远归给他。阿门。 (aiōn )
19 १९ प्रिस्कीला, अक्विला आणि अनेसिफरच्या घरातील लोकांस सलाम सांग.
替我问候百基拉、亚居拉和阿尼色弗一家人。
20 २० एरास्त करिंथ शहरात राहिला. त्रफिमाला मी मिलेता शहरात सोडले कारण तो आजारी होता.
以拉都留在了哥林多。因为特罗非摩病了,我就留他在米利都。
21 २१ तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर. युबुल, पुदेस, लीन व क्लौदिया व इतर सर्व बंधू तुला सलाम सांगतात.
请尽可能在冬天前赶过来。友布罗、布田、利奴、革老底亚和所有兄弟姐妹都向你问候。
22 २२ प्रभू तुझ्या आत्म्यासोबत असो. देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
主与你同在。愿他的恩典与你们同在。