< 2 शमुवेल 24 >
1 १ इस्राएलवर परमेश्वराचा पुन्हा एकदा कोप झाला. आणि त्याने दावीदाला इस्राएलांविरुध्द चेतवले. दावीद म्हणाला, “आधी इस्राएल आणि यहूदा यांची शिरगणती करा.”
Rəbbina qəl meeb İzraililqa avqaaqa. Mang'vee Davuduk'le eyhen: «Hoora, İzrailybıyiy Yahuder qəpqe». Məxür Mang'vee Davud İzrailybışilqa g'elil qı'ı.
2 २ राजा दावीद सेनापती यवाबाला म्हणाला, “दानपासून बैर-शेबापर्यंत इस्राएलच्या झाडून सर्व वंशातील लोकांची मोजदाद करा, म्हणजे मग मला लोकसंख्या किती आहे ते कळेल.”
Davudee cune k'anene g'oşunne xərıng'uk'le Yoavık'le eyhen: – Həşde Danile Beer-Şevalqamee, gırgıne İzrailyne nasılbışde yı'q'nee iviykre, manbı qəpqe. Zak'le manbı nimeenbı vuxhay ats'axhxhes ıkkan.
3 ३ पण यवाब राजाला म्हणाला, “आपले लोक कितीही असोत देव परमेश्वर त्यांना शतगुणित करो. तुम्हास हे सर्व पाहायला मिळो पण तुम्हास असे का करावेसे वाटते?”
Yoavee paççahık'le eyhen: – Yiğın millet nimeeniy, hasre Rəbbee, yiğne Allahee, manbı vəş nəqqees mançile geeb qee'ecen. Yiğne ulek'led man g'acecen. Nya'a, nişil-allane yizde xərıng'us paççahıs məxbına iş haa'as vukkan?
4 ४ पण राजा दावीदाचे शब्द यवाबाच्या शब्दांपेक्षा प्रभावी ठरले. आणि त्यांनी यवाबाला आणि इतर सैन्याधिकाऱ्यांना इस्राएल प्रजेची मोजदाद करण्यास सांगितले. तेव्हा ते सर्व या कामाला लागले.
Paççahın cuvab Yoavneyiy g'oşunne ç'ak'ınbışde cuvabıle ooqan ıxha. Yoaviy g'oşunun ç'ak'ınbı İzrailin millet qətqəs vüqqəva paççahısse qığeebaç'enbı.
5 ५ यार्देन ओलांडून त्यांनी अरोएर येथे तळ दिला. ही जागा नगराच्या उजवीकडे होती. (नगर याजेरच्या वाटेवर, गादच्या खोऱ्याच्या मध्यावर आहे.)
Manbışe İordanne damayle ılğeepç'ı, Aroer eyhene şaharne k'ane çadırbı giyxə. Mana şahar q'adaalyne yı'q'nee vuxha. Qiyğa manbı Qadıne nasılene cigabışile k'ena Yazer eyhene şahareeqa avayk'an.
6 ६ तेथून ते गिलादला आणि पुढे तहतीम होदशी या प्रदेशात गेले. दान्यान आणि तिथून वळसा घेऊन सीदोन येथे गेले.
Mançe manbı Gileadeeqa, Taxtim-Xodşi eyhene cigeeqa havayk'an. Mançeb Dan-Yaan eyhena şahar ılğevç'u, Sidonne şahareeqa qabı hiviyxhar.
7 ७ सोर (तायर) हा गड आणि हिव्वी व कनानी यांची नगरे इकडे ते गेले. तेथून यहूदा देशाच्या दक्षिण दिशेला बैर-शेबा इथपर्यंत गेले.
Sur eyhene g'aleeqa, Q'ivbışdeyiy Kana'anbışde gırgıne şaharbışeeqa manbı hapk'ın, hiviyxharanbı. Nekke qiyğab manbı qavaylenbı Yahudayne canubulyne Beer-Şeveeqa.
8 ८ सगळा देश पालथा घालून ते नऊ महिने वीस दिवसानी यरूशलेम येथे पोहोचले.
Yüç'ne vuzeyiy g'ane yiğee manbışe ölka k'anençe-qomaqamee gits'ibaxhana. Mançe İyerusalimeeqa siviyk'al.
9 ९ यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली. इस्राएलमध्ये तलवारधारी पुरुष आठ लक्ष होते. यहूदात ही संख्या पाच लक्ष होती.
Yoavee nimeeniy insanar vuxhava paççahık'le eyhe. İzrailee mane gahıl g'ılıncıka səyxəs əxəsda molyud vəş aazır, Yahudeeyir xhod vəş aazır igid ıxha.
10 १० हे काम पार पाडल्यावर मात्र दावीदाला मनोमन लाज वाटली. तो परमेश्वरास म्हणाला, “माझ्याहातून हे मोठे पाप घडले आहे. या माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा कर. माझा हा मोठाच मूर्खपणा झाला आहे.
Davudee millet qətqəs alikkıyle qiyğa, mang'us culecad cus naş qexhe. Mang'vee Rəbbik'le eyhen: – Mana iş hav'u, zı xəbna bınah opxhun. Rəbb, həşde hucoona ixhes ine g'ulune taxsirıke ılyheç'e, zı bəç'əriyvalla hav'u.
11 ११ दावीद सकाळी उठला, तेव्हा दावीदाचा संदेष्टा गाद याला परमेश्वराची वाणी प्रकट झाली.”
Davud qinne yiğıl miç'er oza qıxesse, Rəbbee Davudulqa hixhar ha'ane Qad peyğambarık'le eyhen:
12 १२ परमेश्वर त्यास म्हणाला, “दावीदाला जाऊन सांग, परमेश्वर म्हणतो, तुझ्यापुढे मी तीन गोष्टी ठेवतो त्यापैकी एकीची निवड कर.”
– Hoora, Davuduk'le eyhe, Rəbbee inva vod eyhe: «Yiğne ögilqa xhebılle kar gixhxhes. Mançin sa g'əyxe, Zı vak ha'as».
13 १३ गादने दावीदाकडे येऊन त्यास हे सर्व सांगितले. तो दावीदाला म्हणाला, “तिन्हीपैकी एकीची निवड कर. तुझ्या देशात सात वर्षे दुष्काळ पडावा, किंवा शत्रूंनी तीन महिने तुझा पाठलाग करावा, की तीन दिवस रोगराई पसरावी? विचार कर आणि मी परमेश्वरास काय सांगावे ते सांग.”
Qad Davudusqa arı, mang'uk'le eyhen: – G'əyxe, yighılle senna yiğne ölkee mısvalybı ıxhane vas ıkkan? Xheyible vazna hixu yiğne duşmanaaşine xılençe iykarasne ıkkan? Deşxheene, xhebılle yiğna yiğne ölkee yı'q'ı'n ık'arbı ıxhane ıkkan? Həşde yugba fıkır opxhun, ğu yiğın cuvab eyhe. Zı hark'ın zı G'axuvuyng'uk'le eyhes.
14 १४ दावीद गादला म्हणाला, “मी पेचात सापडलो आहे खरा! पण परमेश्वर दयाळू आहे. परमेश्वरच मला शिक्षा देवो लोकांच्या हाती मी पडू नये.”
Davudee Qadık'le eyhen: – Yizdemee geed dağamda vod. İnsanne xılyaqa gyapk'asse hasre Rəbbine xılyaqa gyapk'ecen. Rəbbiqa rəhı'm geeb vob.
15 १५ तेव्हा परमेश्वराने इस्राएलवर रोगराई ओढवू दिली. सकाळी तिची सुरुवात होऊन नेमलेल्या काळपर्यंत ती राहिली. दानपासून बैर-शेबापर्यंत सत्तर हजार माणसे मृत्युमुखी पडली.
Mane yiğıl miç'ediyle otçu, Vucee gyuvxhuna gah ç'əvuvxhesmee, Rəbbee İzraililqa yı'q'ı'n ık'arbı g'ıxele. Danile Beer-Şevalqamee yights'al aazır insan qek'a.
16 १६ यरूशलेमेच्या संहारासाठी देवदूताचा हात उंचावला. पण झाल्या गोष्टीबद्दल परमेश्वरास फार वाईट वाटले. लोकांचा संहार करणाऱ्या देवदूताला परमेश्वर म्हणाला, “आता पुरे तुझा हात खाली घे.” तेव्हा हा देवदूत अरवना यबूसी याच्या खळ्याजवळ होता.
İyerusalimeen insanar gyapt'asva malaaikın xıl hodakkemee, Rəbbis maabın insanar qiviykkın, malaaikık'le eyhen: – Ç'əv, xıl g'ayşe! Rəbbin malaaik mane gahıl Aravna donane sa insanne attayne k'ane ıxha. Aravna Yevusbışda ıxha.
17 १७ लोकांस मारणाऱ्या देवदूताला दावीदाने पाहिले. दावीद परमेश्वरास म्हणाला, “माझे चुकले माझ्या हातून पाप घडले आहे. पण हे लोक मेंढरांसारखे माझ्या मागून आले. त्यांचे काहीच चुकले नाही. तेव्हा तू मला आणि माझ्या कुटुंबियांना शिक्षा कर.”
Davuduk'le millet gek'an malaaik g'acumee, Rəbbik'le eyhen: – Bınah hav'una zı vor, taxsir zal vod. Nya'a ine syuru xhineene insanaaşe hucoone hı'ı? Manbışil-alla zasiy yizde xizanıs caza hevle.
18 १८ त्या दिवशी गाद दावीदाकडे आला. तो म्हणाला, “अरवना यबूसीच्या खळ्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांध.”
Mane yiğıl Qad Davudusqa arı, eyhen: – Hark'ın Yevusbışda eyxhene Aravnayne attal Rəbbis q'urbanbı allya'an ciga ale'e.
19 १९ दावीदाने मग परमेश्वराच्या इच्छेनुसार गादच्या म्हणण्याप्रमाणे केले. तो अरवनाला भेटायला गेला.
Qadıne cuvabıka, Davud, Rəbbee əmr hav'uyn xhinne maqa hayk'an.
20 २० अरवनाने राजाला आणि त्याच्या सेवकांना येताना पाहिले. त्याने पुढे होऊन जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला.
Aravna avqa ilyakkımee, Davudıy cun insanar cusqa qöö g'ooce. Mana g'aqa qığeç'u, paççahne ögil ç'iyelqamee k'yorzul,
21 २१ अरवना म्हणाला, “माझे स्वामी का बरे आले आहेत? दावीद म्हणाला, तुझे खळे विकत घ्यायला. म्हणजे मग मी परमेश्वरा प्रित्यर्थ इथे एक वेदी बांधीन. मग रोगराई संपुष्टात येईल.”
eyhen: – Nəxürkenane yizda xərna paççah zasqa arı? Davudee eyhen: – Rəbbis q'urbanbı allya'an ciga alya'asdemee zı vake yiğna atta alivşes arı. Milletılin yı'qı'n ıkar ulyoozrecenva zı Rəbbis q'urbanbı alya'as.
22 २२ अरवना म्हणाला, “स्वामींनी मनाला येईल ते अर्पण करण्यासाठी घ्यावे. होमबलीसाठी हे बैल आहेत. इंधनासाठी मळणीची औते आणि बैलांचे सामान आहे.
Aravnee Davuduk'le eyhen: – Hasre yizde xərıng'vee, paççahee cune ulesqa yugda qöönmeen alyaat'u, Rəbbis q'urbanbı alle'ecen. Haane gyoxhxhan hı'ı q'urbanna allya'asın yatsbı aleet'e. Gyoxhxhan ha'asde osune cigee mıgrabıyiy yatsbışde gardanaqa qa'an karbı aleet'e.
23 २३ अरवना महाराज, हवे ते मी तुम्हास देईन, महराजांवर परमेश्वराची मर्जी असावी. अशीही कामना त्याने पुढे व्यक्त केली.”
Paççah, man gırgın zı vas hele. Aravnee meed eyhen: – Hasre Rəbb, yiğna Allah, vaka yugra ixhecen.
24 २४ पण राजा अरवनाला म्हणाला नाही, “तुला मी खरे सांगतो, मी ही जमीन विकतच घेणार आहे फुकटात मिळालेले मी होमबली म्हणून परमेश्वर देवाला अर्पण करणार नाही.” तेव्हा दावीदाने खळे आणि बैल पन्नास शेकेल चांदी देऊन विकत घेतले.
Paççaheeme Aravnayk'le eyhen: – Zı vake man ciga məxüdcad deş alyaat'as, zı mançike vas hək' qevles. Zas q'ərad gitxhuyn kar zasse Rəbbis, yizde Allahıs, gyooxhan haa'ana q'urban xhinne ablyaa'as dəəxə. Davudee attaykeyiy yatsbışike xhots'al nuk'ra qele.
25 २५ मग तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली, होमबली आणि शांत्यर्पणे केली. परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. इस्राएलवरील रोगराई परमेश्वराने संपुष्टात आणली.
Davudee maa'ad Rəbbis q'urbanbı allya'an ciga ali'ı, maa'ad gyoxhxhan ha'aniy medın q'urbanbı allya'a. Rəbbee ölkaynemee haa'ana düə q'abıl haa'ana, mançikad İzrailee yı'q'ı'n ık'arbı ç'əveedaxhenbı.