< 2 शमुवेल 23 >
1 १ दावीदाची ही अखेरची वचने; इशायपुत्र दावीदाचा हा संदेश देवामुळे ज्याला थोरवी प्राप्त झाली त्याचा हा संदेश. याकोबाच्या देवाचा हा अभिषिक्त राजा इस्राएलाचा मधुर स्तोत्रे गाणारा गायक.
Estas son las últimas palabras de David: “Oráculo de David, hijo de Isaí, oráculo del varón puesto en lo alto, del ungido del Dios de Jacob, del dulce cantor de Israel:
2 २ परमेश्वराचा आत्मा माझ्या मार्फत बोलला. त्याचे शब्द माझ्या मुखी होते.
El Espíritu de Yahvé habla por mí, y sobre mi lengua se halla su palabra.
3 ३ इस्राएलचा देव हे बोलला, इस्राएलचा दुर्ग मला म्हणाला, “जो न्यायाने राज्य करतो, जो देवाविषयी आदर बाळगून राज्य करतो.
Me habló el Dios de Israel, dijo la Roca de Israel: Un dominador justo de los hombres que gobierna en el temor de Dios,
4 ४ तो मनुष्य सकाळच्या प्रकाशासारखा असेल, निरभ्र सकाळ असावी तसा असेल, पावसानंतर येणाऱ्या उन्हासारखा असेल. पाऊस कसा तर ज्याच्यामुळे जमिनीतून कोवळे गवत तरारून येते असा.
es como la luz de la aurora cuando se levanta el sol en una mañana sin nubes. A sus rayos, tras la lluvia, brota la hierba de la tierra.
5 ५ देवाने माझे घराणे बळकट व सुरक्षित केले देवाने माझ्याबरोबर एक कायमचा करार केला. तो सर्व दृष्टींनी माझ्या भल्याकरताच आहे याची त्याने खातरजमा करून घेतली. त्याने असा मजबूत करार केला आणि आता तो त्याचा भंग करणार नाही. हा करार म्हणजे माझा उध्दारच होय. हा करार म्हणजेच मला हवे होते ते सर्व काही होय. परमेश्वर माझ्या घराण्याची भरभराट करील.
¿No está así con Dios mi casa? pues Él hizo conmigo pacto eterno, firme en todo y bien guardado. Él es toda mi salud y el cumplimiento de todos mis deseos.
6 ६ पण दुष्ट माणसे काट्यांसारखी असतात. लोक काटा धरून ठेवत नाहीत, फेकून देतात.
Pero los hombres de Belial sean desechados todos como espinas, que no pueden tomarse con la mano.
7 ७ त्याचा स्पर्श झाला तर लाकडी आणि पंचधातूचा भाला टोचावा तशा वेदना होतात. होय असा मनुष्य काट्यासारखा असतो. त्यांना आगीच्या भक्ष्य स्थानी टाकतील आणि ती जळून खाक होतील.”
Quien quiere tocarlas, se arma de hierro o de un asta de lanza, y las quema en su mismo lugar.”
8 ८ दावीदाच्या पदरी असलेल्या वीरांची नावे अशी: योशेब-बश्शेबेथ तखमोनी हा रथावरच्या सेवकांचा मुख्य होता. असनी आदीनो म्हणूनही त्यास ओळखतात. त्याने एका वेळी आठशे जणांना ठार केले.
Estos son los nombres de los héroes que tenía David: Jesbam, hijo de Hacamoní, el principal de los tres. Blandió su lanza contra ochocientos hombres y los mató de una vez.
9 ९ त्याच्या खालोखाल अहोही येथील दोदय याचा मुलगा. एलाजाराने पलिष्ट्यांना आव्हान दिले त्यावेळी दावीदाबरोबर असलेल्या तीन वीरांपैकी हा एक. ते युध्दाच्या तयारीने आले, पण इस्राएल सैनिक पळून गेले होते.
Después de este, Eleazar, hijo de Dodó, hijo de Ahohí, que era uno de los tres valientes que estaban con David. Desafiaba a los filisteos, reunidos allí para batalla. Se habían dispersado ya los hombres de Israel,
10 १० थकून अंगात त्राण राहिला नाही तोपर्यंत एलाजार पलिष्ट्यांशी लढत राहिला. तलवारीला हात चिकटेपर्यंत त्याने लढा चालू ठेवला. परमेश्वराने त्या दिवशी मोठा विजय घडवून आणला. एलाजारची युध्दात सरशी झाल्यावर मग शत्रू सैनिकांच्या मृतदेहावरच्या वस्तू गोळा करायला तेवढे ते लोक तिथे आले.
cuando él se levantó e hirió a los filisteos hasta que se le cansó la mano y le quedó pegada a la espada. En aquel día obró Yahvé una gran liberación, y el pueblo volvió en pos de Eleazar, pero solo para tomar los despojos.
11 ११ हरार येथील आगे याचा मुलगा शम्मा हा ही होता. पलिष्टी चालून आले तेव्हा एका कडधान्याच्या शेतात हे युध्द झाले. लोकांनी पलिष्ट्यां समोरून पळ काढला.
Después de él, Sammá, hijo de Agé, hararita. Se habían reunido los filisteos en Lehí, y había allí un pedazo de terreno sembrado de lentejas, y el pueblo iba huyendo delante de los filisteos.
12 १२ पण शम्मा शेताच्या ऐन मध्यावर उभा राहिला आणि त्याने एकट्याने त्यांना तोंड दिले. त्याने पलिष्ट्यांचा पराभव केला. परमेश्वराने इस्राएलाला त्यादिवशी मोठा विजय मिळवून दिला.
Entonces él se plantó en medio del campo, lo defendió y derrotó a los filisteos; y obró Yahvé una gran liberación.
13 १३ दावीद एकदा अदुल्लामच्या गुहेत होता आणि पलिष्टी सैन्याचा तळ खाली रेफाईच्या खोऱ्यात होता. त्यावेळी तीस शूरांपैकी तिघेजण दावीदाकडे जायला म्हणून सरळ गुहेपर्यंत अक्षरश: सरपटत गेले.
Tres de los treinta capitanes fueron a reunirse con David, al tiempo de la siega, en la cueva de Odollam, mientras una tropa de filisteos acampaba en el valle de Refaím.
14 १४ नंतर एकदा दावीद गडावर असताना पलिष्ट्यांची टोळी बेथलहेम येथे होती.
David estaba a la sazón en la fortaleza y había una guarnición de los filisteos en Betlehem.
15 १५ दावीद आपल्या गावाचे पाणी पिण्यासाठी व्याकुळ झाला तो म्हणाला, बेथलेहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी मला कुणी आणून दिले तर किती बरे होईल.
Se le vino entonces a David un deseo y dijo: “¡Ah, si yo pudiera beber del agua del pozo de Betlehem, que está junto a la puerta!”
16 १६ पण या तीन शूरांनी पलिष्ट्यांच्या ठाण्यातून धाडसाने तोंड देत मार्ग काढला आणि बेथलहेमच्या वेशीजवळच्या विहिरीतले पाणी काढून दावीदाला प्यायला आणून दिले. दावीदाने ते प्यायचे नाकारले. त्याने ते परमेश्वरास अर्पण म्हणून जमिनीवर ओतून दिले.
Con lo cual los tres valientes atravesaron el campamento de los filisteos, sacaron agua del pozo de Betlehem que está junto a la puerta, y la llevaron a David. Mas él no quiso beberla, sino que la derramó para Yahvé,
17 १७ दावीद म्हणाला, “परमेश्वरा, हे पाणी मी कसे पिऊ? हे पाणी मी प्यायलो तर ज्यांनी आपले प्राण माझ्यासाठी धोक्यात घातले त्यांचे रक्तच मी प्राशन केल्यासारखे होईल.” म्हणून तो ते पाणी प्याला नाही. त्या तीन शूर वीरांनी यासारखी अनेक धाडसे केली.
diciendo: “¡Lejos de mí, oh Yahvé, hacer tal cosa! ¿No es esta la sangre de los hombres que han expuesto su vida para buscarla?” Por tanto no quiso bebería. Esto hicieron los tres héroes.
18 १८ सरुवेचा मुलगा यवाब याचा भाऊ म्हणजे अबीशय. अबीशय या तीन वीरांचा नायक होता. आपल्या भाल्याने त्याने तीनशे शत्रू सैनिकांना ठार केले. आणि त्या तिघांमध्ये नाव मिळवले.
Abisai, hermano de Joab, hijo de Sarvia, era jefe de treinta. Enristró su lanza contra trescientos y los derrotó, y adquirió fama entre los tres.
19 १९ त्या तिघांमध्ये तो सर्वाधिक प्रसिद्ध होता. त्यांचा तो नायकही होता. पण तो पहिल्या तिघांच्यापैकी नव्हता.
Él era de los treinta el más distinguido y su jefe, mas no igualó a los tres.
20 २० यहोयादा याचा मुलगा बनाया हाही एक होता. तो एका पराक्रमी मनुष्याचा पुत्र होता. तो कबसेल इथून आलेला होता. बनायाने बरेच पराक्रम गाजवले मवाबमधील अरीएलच्या दोन मुलांना त्याने मारले. एकदा बर्फ पडत असताना त्याने गुहेत शिरून सिंह मारला.
Banaías, hijo de Joiadá, varón fortísimo y de grandes hazañas, natural de Cabseel, mató a los dos Ariel de Moab. En un día de nieve bajó y mató un león en una cisterna.
21 २१ एका धिप्पाड मिसरी मनुष्यासही त्याने मारले. या मिसरी मनुष्याच्या हातात भाला होता तर बनायाच्या हातात फक्त काठी. बनायाने त्याचा भाला हिसकावून घेतला आणि त्याच्याच भाल्याने त्या मिसरी मनुष्याचा जीव घेतला.
Mató, además a un egipcio, varón de alta estatura. Tenía el egipcio en su mano una lanza, pero (Banaías) bajó contra él con su báculo, y arrancando la lanza de la mano del egipcio lo mató con esa misma lanza.
22 २२ बनायाने अशी बरीच कृत्ये केली त्यानेही या तिघांइतकाच नावलौकिक मिळवला.
Tales cosas hizo Banaías, hijo de Joiadá, y tuvo renombre entres los tres valientes.
23 २३ तो तीस वीरांच्या तीस वीर-दावीदाच्या अतिशय शूर सैनिकांचा गट म्हणजे हे लोक होत. यापेक्षा तो अधिक प्रसिद्ध होता. पण तरी पहिल्या तिघांच्या पदाला तो पोचला नाही. दावीदाने त्यास आपल्या अंगरक्षकांचा प्रमुख म्हणून नेमले.
Él era el más considerado entre los treinta, pero no alcanzó a los tres. David lo hizo consejero suyo.
24 २४ यवाबाचा भाऊ असाएल हा त्या तिसातला एक होता. बाकीच्या वीरांची नावे पुढीलप्रमाणे: बेथलहेममधील दोदो याचा मुलगा एलहानान,
Entre los treinta figuraban: Asael, hermano de Joab; Elhanán, hijo de Dodó, de Betlehem;
25 २५ शम्मा हरोदी, अलीका हरोदी,
Sammá de Harod; Elicá de Harod;
26 २६ हेलस पलती, इक्केश तकोई याचा मुलगा ईरा,
Heles el paltita; Irá, hijo de Iqués, de Tecoa;
27 २७ अबीयेजर अनाथोथी, मबुन्नय हूशाथी,
Abiéser de Anatot; Mobonai, husatita;
28 २८ सलमोन अहोही, महरय नटोफाथी,
Selmón ahotita; Maharai de Netofá;
29 २९ बाना नटोफाथी याचा मुलगा हेलेब, बन्यामीनच्या वंशातील, गिबामधला रीबय याचा मुलगा इत्तय,
Heleb, hijo de Baaná, de Netofá; Itai, hijo de Ribai, de Gabaá de los hijos de Benjamín;
30 ३० बनाया पिराथोनी, गाश झऱ्याजवळचा हिद्दय,
Banaías, de Faratón; Hidai, de los valles de Gaas;
31 ३१ अबी-अलबोन अर्बाथी, अजमावेथ बरहूमी,
Abialbón de Arbat; Azmávet de Barhum;
32 ३२ अलीहाबा शालबोनी, याशेन घराण्यातला योनाथान,
Eliabá de Saalbón, Bené-Jasén, Jonatán;
33 ३३ शम्मा हारारी, शारार अरारी याचा मुलगा अहीयाम,
Sammá de Harar; Ahiam, hijo de Sarar, de Aror;
34 ३४ माकाथीचा मुलगा अहसबय याचा मुलगा अलीफलेट, अहिथोफेल गिलोनी याचा मुलगा अलीयम,
Elifálet, hijo de Ahasbai, hijo del maacateo; Eliam, hijo de Aquitófel gilonita;
35 ३५ हेस्री कर्मेली, पारय अर्बी
Hesrai de Carmel; Farai arbita;
36 ३६ सोबा मधील नाथोन याचा मुलगा इगाल, बानी यादी,
Igal, hijo de Natán, de Soba; Baní gadita;
37 ३७ सेलक अम्मोनी, सरुवेचा मुलगा यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी,
Sélec ammonita y Naharai de Beerot, escuderos de Joab, hijo de Sarvia;
38 ३८ ईरा इथ्री, गारेब इथ्री,
Irá de Jéter; Gareb de Jéter;
39 ३९ उरीया हित्ती, असे एकंदर सदतीस.
Urías, el heteo; en total treinta y siete.