< 2 शमुवेल 18 >
1 १ दावीदाने आपल्या बरोबरच्या लोकांची शिरगणती केली. मग, शंभर-शंभर, हजार हजार मनुष्यांवर अधिकारी, सरदार नेमले.
And David numbered the people with him, and set over them captains of thousands and captains of hundreds.
2 २ सर्वांची त्याने तीन गटात विभागणी केली. यवाब, अबीशय यवाबाचा भाऊ आणि सरुवेचा मुलगा आणि गथ येथील इत्तय या तिघांना एकेक गटाचे प्रमुख म्हणून नेमले आणि सर्वांची रवानगी केली. तेव्हा राजा दावीद त्यांना म्हणाला, मी ही तुमच्याबरोबर येतो.
And David sent away the people, the third part under the hand of Joab, and the third part under the hand of Abessa the son of Saruia, the brother of Joab, and the third part under the hand of Ethi the Gittite. And David said to the people, I also will surely go out with you.
3 ३ पण लोक म्हणाले नाही तुम्ही आमच्याबरोबर येता कामा नये. कारण आम्ही युध्दातून पळ काढला किंवा आमच्यातले निम्मे लोक या लढाईत कामी आले तरी अबशालोमच्या लोकांस त्याची फिकीर नाही. पण तुम्ही एकटे आम्हा दहाहजारांच्या ठिकाणी आहात. तेव्हा तुम्ही शहरात रहावे हे बरे. शिवाय गरज पडली तर तुम्ही आमच्या मदतीला येणारच.
And they said, You shall not go out: for if we should indeed flee, they will not care for us; and if half of us should die, they will not mind us; for you [are] as ten thousand of us: and now [it is] well that you shall be to us an aid to help us in the city.
4 ४ तेव्हा दावीद राजा लोकांस म्हणाला, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करीन. राजा मग वेशीपाशी उभा राहिला. सैन्य बाहेर पडले, शंभर आणि हजाराच्या गटात ते निघाले.
And the king said to them, Whatsoever shall seem good in your eyes I will do. And the king stood by the side of the gate, and all the people went out by hundreds and by thousands.
5 ५ यवाब, अबीशय आणि इत्तय यांना राजाने आज्ञा दिली माझ्यासाठी एक करा, अबशालोमशी सौम्यपणाने वागा राजाची ही आज्ञा सर्वांच्या कानावर गेली.
And the king commanded Joab and Abessa and Ethi, saying, Spare for my sake the young man Abessalom. And all the people heard the king charging all the commanders concerning Abessalom.
6 ६ अबशालोमच्या इस्राएल सैन्यावर दावीदाचे सैन्य चालून गेले. एफ्राईमाच्या अरण्यात ते लढले.
And all the people went out into the wood against Israel; and the battle was in the wood of Ephraim.
7 ७ दावीदाच्या सैन्याने इस्राएलाचा पराभव केला. त्यांची वीस हजार माणसे त्यादिवशी मारली गेली.
And the people of Israel fell down there before the servants of David, and there was a great slaughter in that day, [even] twenty thousand men.
8 ८ देशभर युध्द पेटले. त्या दिवशी तलवारीला बळी पडली त्यापेक्षा जास्त माणसे जंगलामुळे मरण पावली.
And the battle there was scattered over the face of all the land: and the wood consumed more of the people than the sword consumed among the people in that day.
9 ९ अबशालोमचा दावीदाच्या अधिकाऱ्यांशी सामना झाला, तेव्हा अबशालोम खेचरावर बसून निसटायचा प्रयत्न करू लागला. ते खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या खालून जात असताना त्याच्या जाडजूड फांद्यामध्ये अबशालोमचे डोके अडकले. खेचर निघून गेले आणि अबशालोम अधांतरी लोंबकळत राहिला.
And Abessalom went to meet the servants of David: and Abessalom was mounted on his mule, and the mule came under the thick boughs of a great oak; and his head was entangled in the oak, and he was suspended between heaven and earth; and the mule passed on from under him.
10 १० एकाने हे पाहिले आणि यवाबाला सांगितले, अबशालोमला मी एला वृक्षावरून लोंबकळताना पाहिले.
And a man saw it, and reported to Joab, and said, Behold, I saw Abessalom hanging in an oak.
11 ११ यवाब त्या मनुष्यास म्हणाला, मग तू त्याचा वध करून त्यास जमिनीवर का पाडले नाहीस? मी तुला दहा रौप्यमुद्रा आणि एक पट्टा इनाम दिला असता.
And Joab said to the man who reported it to him, And, behold, you did see him: why did you not strike him there to the ground? and I would have given you ten [pieces] of silver, and a girdle.
12 १२ तो मनुष्य म्हणाला, तुम्ही हजार रौप्यमुद्रा देऊ केल्या असत्या तरी मी राजकुमाराला इजा पोचू दिली नसती. कारण तुम्ही, अबीशय, आणि इत्तय यांना राजाने केलेला हुकूम आम्ही ऐकला आहे. राजा म्हणाला होता, लहान अबशालोमला घातपात होणार नाही याची काळजी घ्या.
And the man said to Joab, Were I even to receive a thousand shekels of silver, I would not lift my hand against the king's son; for in our ears the king charged you and Abessa and Ethi, saying, Take care of the young man Abessalom for me,
13 १३ अबशालोमला मी मारले असते तर राजाला ते समजलेच असते आणि तुम्ही मला शिक्षा केली असती.
so as to do no harm to his life: and nothing of the matter will be concealed from the king, and you will set yourself against me.
14 १४ यवाब म्हणाला, इथे वेळ दवडण्यात काही अर्थ नाही. अबशालोम अजून जिवंत असून एलावृक्षात अजून तसाच लटकत होता. यवाबाने तीन भाले घेतले आणि ते अबशालोमवर फेकले. भाले अबशालोमच्या हृदयातून आरपार गेले.
And Joab said, I will begin this; I will not thus remain with you. And Joab took three darts in his hand, and thrust them into the heart of Abessalom, while he was yet alive in the heart of the oak.
15 १५ यवाबाजवळ दहा तरुण सैनिक त्याचे लढाईतील मदतनीस म्हणून होते. त्यांनी भोवती जमून अबशालोमचा वध केला.
And ten young men that bore Joab's armor compassed Abessalom, and struck him and killed him.
16 १६ यवाबाने रणशिंग फुंकले आणि लोकांस अबशालोमच्या इस्राएली सैन्याचा पाठलाग थांबवायला सांगितले.
And Joab blew the trumpet, and the people returned from pursuing Israel, for Joab spared the people.
17 १७ यवाबाच्या मनुष्यांनी अबशालोमचा मृतदेह अरण्यातील एका खंदकात नेऊन टाकला. त्यावर दगडांची रास रचून तो खंदक भरून टाकला. अबशालोमाबरोबर आलेल्या इस्राएलींनी पळ काढला आणि ते घरी परतले.
And he took Abessalom, and cast him into a great cavern in the wood, into a deep pit, and set up over him a very great heap of stones: and all Israel fled every man to his tent.
18 १८ अबशालोमने राजाच्या खोऱ्यात पूर्वीच एक स्तंभ उभारलेला होता. आपले नाव चालवायला पुत्र नाही म्हणून त्याने त्या स्तंभाला स्वत: चेच नाव दिले होते. आजही तो अबशालोम स्मृतीस्तंभ म्हणून ओळखला जातो.
Now Abessalom while yet alive had taken and set up for himself the pillar near which he was taken, and set it up so as to have the pillar in the king's dale; for he said he had no son to keep his name in remembrance: and he called the pillar, Abessalom's hand, until this day.
19 १९ सादोकाचा मुलगा अहीमास यवाबाला म्हणाला मला धावत जाऊन ही बातमी राजाला सांगू दे. परमेश्वराने त्याच्या शत्रूचा नि: पात केला आहे हे मी त्यास सांगतो.
And Achimaas the son of Sadoc said, Let me run now and carry glad tidings to the king, for the Lord has delivered him from the hand of his enemies.
20 २० यवाब त्यास म्हणाला, आज तुला दावीदाकडे ही बातमी घेऊन जाता येणार नाही. नंतर जाऊन तू सांग पण आज नको. कारण खुद्द राजाचा पुत्र मरण पावला आहे.
And Joab said to him, You [shall] not [be] a messenger of glad tidings this day; you shall bear them another day; but on this day you shall bear no tidings, because the king's son is dead.
21 २१ मग यवाब कूश येथील एकाला म्हणाला, तू पाहिलेस त्याचे वर्तमान राजाला जाऊन सांग त्या मनुष्याने यवाबला अभिवादन केले मग तो दावीदाकडे निघाला.
And Joab said to Chusi, Go, report to the king all that you have seen. And Chusi did obeisance to Joab, and went out.
22 २२ सादोकाचा मुलगा अहीमास याने पुन्हा यवाबाकडे विनवणी केली. काय होईल ते होईल, पण मलाही त्या कूशीच्या पाठोपाठ धावत जाऊ दे. यवाब म्हणाला मुला तू ही बातमी नेऊन काय करणार? त्यासाठी काही तुला इनाम मिळायचे नाही.
And Achimaas the son of Sadoc said again to Joab, Nay, let me also run after Chusi. And Joab said, Why would you thus run, my son? attend, you have no tidings for profit if you go.
23 २३ अहीमास म्हणाला; “काहीही होवो, मला धावत जाऊ द्या.” तेव्हा यवाबाने त्यास म्हटले, “धाव.” अहीमास मग यार्देनच्या खोऱ्यातून धावत निघाला. त्याने त्या कूशीला मागे टाकले.
And he said, Why should I not run? and Joab said to him, Run. And Achimaas ran along the way of Kechar, and outran Chusi.
24 २४ राजा वेशीच्या दोन दरवाजांमध्येच बसला होता. तेव्हा पहारेकरी तटबंदीवरील छपरावर चढला. त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्यास एक मनुष्य धावत येताना दिसला.
And David was sitting between the two gates: and the watchman went up on the top of the gate of the wall, and lifted up his eyes, and looked, and behold a man running alone before him.
25 २५ पहारेकऱ्याने हे राजाला ओरडून मोठ्याने सांगितले. राजा दावीद म्हणाला, तो एकटाच असेल तर त्याचा अर्थ तो काहीतरी बातमी घेऊन येत आहे. धावता धावता तो मनुष्य शहराच्या जवळ येऊन पोहचतो तोच,
And the watchman cried out, and reported to the king. And the king said, If he be alone, [there are] good tidings in his mouth. And the man came and drew near.
26 २६ पहारेकऱ्याने आणखी एकाला धावत येताना पाहिले. पहारेकरी द्वाररक्षकाला म्हणाला, तो पाहा आणखी एक मनुष्य एकटाच धावत येतोय तेव्हा राजा म्हणाला, तो ही बातमी आणतोय.
And the watchman saw another man running: and the watchman cried at the gate, and said, And look, another man running alone. And the king said, He also brings glad tidings.
27 २७ पहारेकरी म्हणाला, पहिल्याचे धावणे मला सादोकाचा मुलगा अहीमास याच्यासारखे वाटते. राजा म्हणाला, अहीमास चांगला गृहस्थ आहे. त्याच्याजवळ चांगलीच बातमी असणार
And the watchman said, I see the running of the first as the running of Achimaas the son of Sadoc. And the king said, He [is] a good man, and will come to [report] glad tidings.
28 २८ अहीमासने “सर्व कुशल असो, असे म्हणून राजाला वाकून अभिवादन केले. पुढे तो म्हणाला, परमेश्वर देवाला धन्यवाद द्या. धनीस्वामी, तुमच्याविरुध्द ज्यांनी उठाव केला त्यांना परमेश्वराने पराभूत केले आहे.”
And Achimaas cried out and said to the king, Peace. And he did obeisance to the king with his face to the ground, and said, Blessed [be] the Lord your God, who has delivered up the men that lifted up their hands against my lord the king.
29 २९ राजाने विचारले अबशालोमचे कुशल आहे ना? अहीमास म्हणाला, यवाबाने मला पाठवले तेव्हा मोठी धांदल उडालेली दिसलेली, पण ती कशाबद्दल हे मला कळले नाही.
And the king said, [Is] the young man Abessalom safe? and Achimaas said, I saw a great multitude [at the time] of Joab's sending the king's servant and your servant, and I knew not what was there.
30 ३० राजाने मग त्यास बाजूला उभे राहून थांबायला सांगितले. अहीमास त्याप्रमाणे पलीकडे झाला आणि थांबला.
And the king said, Turn aside, stand still here. And he turned aside, and stood.
31 ३१ मग तो कूशी आला. तो म्हणाला, माझ्या स्वामीसाठी ही बातमी आहे. तुमच्या विरूद्ध पक्षाच्या लोकांस परमेश्वराने चांगली अद्दल घडवली.
And, behold, Chusi came up, and said to the king, Let my lord the king hear glad tidings, for the Lord has avenged you this day upon all them that rose up against you.
32 ३२ राजाने त्यास विचारले, अबशालोम ठीक आहे ना? त्यावर कूशीने सांगितले तुमचे शत्रू आणि तुमच्या वाईटावर असलेले लोक या सगळ्यांची त्या तरुण माणासा सारखी, अबशालोमासारखीच गत होवो.
And the king said to Chusi, Is it well with the young man Abessalom? and Chusi said, Let the enemies of my lord the king, and all whoever have risen up against him for evil, be as that young man.
33 ३३ यावरुन अबशालोम मरण पावला हे राजाला उमगले. तो फार शोकाकुल झाला. वेशीच्या भिंतीवर बांधलेल्या खोलीत तो गेला. तेथे त्यास रडू कोसळले, आपल्या दालनात जाताना तो म्हणाला, “अबशालोम, माझ्या पुत्रा, तुझ्या ऐवजी मीच मरायला हवे होते माझ्या पुत्रा!”
And the king was troubled, and went to the chamber over the gate, and wept: and thus he said as he went, My son Abessalom, my son, my son Abessalom; would God I had died for you, [even] I [had died] for you, Abessalom, my son, my son!