< 2 इतिहास 22 >
1 १ यहोरामाच्या जागी यरूशलेमेच्या लोकांनी यहोरामाचा सर्वांत धाकटा पुत्र अहज्या याला राजा केले. यहोरामाच्या छावणीवर हल्ला करायला आलेल्या अरबी लोकांबरोबर जे लोक आले होते त्यांनी यहोरामाच्या इतर सर्व थोरल्या पुत्रांना मारुन टाकल्यामुळे यहूदात अहज्या राज्य करु लागला.
Derefter gjorde Jerusalems innbyggere hans yngste sønn Akasja til konge i hans sted; for alle de eldre var blitt drept av den røverflokk som var kommet til leiren sammen med araberne. Således blev Jorams sønn Akasja konge i Juda.
2 २ त्यावेळी अहज्या बेचाळीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या व ती अम्रीची नात.
Akasja var to og tyve år gammel da han blev konge, og regjerte ett år i Jerusalem; hans mor hette Atalja og var en datter av Omri.
3 ३ अहज्याची वागणूकही अहाबाच्या घराण्याप्रमाणेच होती. कारण अहज्याच्या आईने त्यास दुराचरण करण्यास प्रवृत्त केले.
Også han vandret på samme veier som Akabs hus; for hans mor forførte ham med sine råd til ugudelighet.
4 ४ अहाबाच्या कुटुंबियांनी केले तसेच, परमेश्वरास मान्य नसलेले पापाचरण अहज्याने केले. अहज्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर अहाबाच्या घराण्याने त्यास सल्ला द्यायला सुरुवात केली. त्याचे हे सल्ले अहज्याच्या भल्याचे नव्हते. त्या अयोग्य सल्ल्यामुळेच त्याच्यावर मृत्यू ओढवला.
Han gjorde hvad ondt var i Herrens øine, likesom Akabs hus; for efter hans fars død var de hans rådgivere til hans egen ødeleggelse.
5 ५ अहाब कुटुंबाच्या मसलतीनुसार अहज्या राजा योरामाच्या बरोबर अरामाचा राजा हजाएल याच्याशी लढण्यास रामोथ-गिलाद येथे गेला. योराम हा इस्राएलचा राजा अहाब याचा पुत्र. योराम या लढाईत अराम्याकडून जखमी झाला.
Det var også deres råd han fulgte da han sammen med Israels konge Joram, Akabs sønn, drog ut i krig mot Hasael, kongen i Syria, og stred mot ham ved Ramot i Gilead. Men syrerne såret Joram.
6 ६ तो हजाएलाशी रामा येथे लढताना अरामी लोकांच्या हातून जे घाय त्यास झाले होते ते बरे व्हावेत म्हणून तो इज्रेल येथे गेला. अहाबाचा पुत्र यहोराम हा इज्रेल येथे आजारी होऊन पडला होता म्हणून यहूदाचा राजा यहोराम ह्याचा पुत्र अजऱ्या त्याच्या समाचारास गेला.
Da vendte han tilbake for å la sig læge i Jisre'el for de sår han hadde fått ved Rama da han stred mot kongen i Syria Hasael, og Judas konge Asarja, Jorams sønn, drog ned til Jisre'el for å se til Joram, Akabs sønn, fordi han var syk.
7 ७ अहज्या (किंवा यहोआहाज) योथामाला भेटायला आलेला असतांना परमेश्वराने अहज्याला मृत्युमुखी केले. त्याचे असे झाले की आल्याबरोबर अहज्या योरामाबरोबर निमशीचा पुत्र येहू याला भेटायला गेला. अहाबाच्या घराण्याच्या नाशासाठी परमेश्वराने येहूची योजना केली होती.
Men det var Gud som vilde at Akasja skulde gå til grunne, og derfor styrte det så at han kom til Joram; for da han var kommet dit, drog han med Joram ut mot Jehu, Nimsis sønn, som Herren hadde salvet til å utrydde Akabs hus,
8 ८ अहाबाच्या घराण्याला शासन करीत असता येहूला यहूदाचे सरदार आणि अहज्याच्या सेवेत असलेले अहज्याचे आप्त आढळले. त्या सरदारांना आणि आप्तांना येहूने ठार केले.
og så hendte det at Jehu, da han fullbyrdet dommen over Akabs hus, møtte Judas høvdinger og Akasjas brorsønner, som var i Akasjas tjeneste, og drepte dem.
9 ९ यानंतर येहूने अहज्याचा शोध घेतला. येहूच्या मनुष्यांनी त्यास तो शोमरोनात लपायच्या प्रयत्नात असताना पकडले. अहज्याला त्यांनी येहूसमोर हजर केले, नंतर त्यांनी त्यास ठार केले आणि त्याचे दफन केले. ते म्हणाले, “अहज्या हा यहोशाफाटाचा वारस. यहोशाफाट जिवाभावाने परमेश्वरास शरण गेला होता.” यहूदाचे राज्य सांभाळण्याइतके अहज्याचे घराणे समर्थ राहिले नव्हते.
Så søkte han efter Akasja, og han blev grepet mens han holdt sig skjult i Samaria, og de førte ham til Jehu og drepte ham. Så begravde de ham; for de sa: Han er en sønn av Josafat, som søkte Herren av alt sitt hjerte. Men det var ingen igjen av Akasjas hus som var i stand til å overta kongedømmet.
10 १० अथल्या ही अहज्याची आई. तिने आपला पुत्र मरण पावला आहे हे पाहिल्यावर तीने यहूदाच्या सर्व राजवंशाचा संहार केला.
Da Akasjas mor Atalja fikk vite at hennes sønn var død, tok hun sig for å utrydde hele kongeætten i Judas hus.
11 ११ पण राजाची कन्या यहोशबाथ हिने अहज्याचा पुत्र योवाश याला लपवले. योवाश आणि त्याची दाई यांना तिने आतल्या शयनगृहात ठेवले. यहोशबाथ ही राजा यहोरामाची कन्या आणि यहोयादा या याजकाची पत्नी. अहज्या तिचा भाऊ यहोशबाथाने योवाशाला लपवल्यामुळे अथल्या त्यास मारु शकली नाही.
Men kongedatteren Josabat tok Joas, Akasjas sønn, og førte ham hemmelig bort fra kongesønnene som skulde drepes, og førte ham og hans amme inn i sengkammeret; der skjulte Josabat, kong Jorams datter, presten Jojadas hustru, ham - for hun var søster til Akasja - for Atalja, så hun ikke fikk drept ham.
12 १२ परमेश्वराच्या मंदिरात त्यास याजकांच्या सहवासात सहा वर्षे लपवून ठेवले होते. या काळात अथल्याने त्या जागेवर राज्य केले.
Siden var han hos dem i Guds hus og blev holdt skjult i seks år, mens Atalja regjerte i landet.