< 2 इतिहास 2 >

1 परमेश्वराच्या नावासाठी एक मंदिर तसेच स्वत: साठी एक राजमहालही बांधायची शलमोनाने आज्ञा केली.
Hahoi Solomon ni BAWIPA min hanelah Bawkim buet touh hoi ama siangpahrang hanelah buet touh sak hanelah a kâcai.
2 डोंगरातून दगडांचे चिरे काढायला ऐंशी हजार लोक आणि ते वाहून नेण्यासाठी त्याने सत्तर हजार मजूर नेमले. मजुरांच्या कामावर देखरेख करण्यासाठी शलमोनाने तीन हजार सहाशे मुकादम नेमले.
Solomon ni hno ka phawt hane tami 70, 000 touh, thing ka bouk hane 80, 000 touh hoi ka taroun hanelah tami 3, 600 touh a rawi.
3 सोराचा राजा हिराम याला शलमोनाने निरोप पाठवला, “माझे पिता दावीद यांना जशी त्यांचे निवासस्थान बांधायला उपयोगी पडावे म्हणून तुम्ही गंधसरूचे लाकूड पाठवले होते. तशीच मदत मला करा.
Solomon ni Taire siangpahrang Huram koevah, apa Devit hanelah hno na sak pouh teh, ao nahane im sak pouh hanelah sidar thing na poe e patetlah na poe van haw.
4 मी माझ्या परमेश्वर देवाच्या नावाच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधणार आहे. तेथे आम्ही रोज परमेश्वरासमोर सुगंधी धूप जाळू तसेच एका खास मेजावर पवित्र भाकर ठेवू. शिवाय, रोज सकाळ संध्याकाळ शब्बाथाच्या दिवशी प्रत्येक नव चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वराने नेमून दिलेल्या सहभोजनाच्या दिवशी आम्ही होमार्पणे करु इस्राएल लोकांनी सर्वकाळ पाळायचा हा नियमच आहे.
Khenhaw! BAWIPA Cathut hanelah Bawkim buet touh sak hane ka kâcai. Hmuitui sawi vaiteh BAWIPA bawk nahane hmuen, Isarelnaw ni pou sak hane kâpoelawk, vaiyei ta nahane thuengnae, sabbath hoi, thapa rei nah hnin, BAWIPA Cathut min lahoi pawi hnin amom tangmin hmaisawi thuengnae pou sak hane, naw doeh. Hathateh Isarelnaw hanelah yungyoe e phunglam doeh.
5 आमचा परमेश्वर हा सर्व इतर देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून मी त्याच्यासाठी भव्य मंदिर उभारणार आहे.
Ka sak hane Bawkim teh kalenpounge lah ao han. Bangkongtetpawiteh, Cathut teh cathutnaw pueng hlak a lenpoung dawk.
6 परमेश्वरासाठी निवासस्थान बांधणे कोणाला कसे शक्य आहे? जेव्हा स्वर्ग किंवा संपूर्ण विश्वही त्यास सामावून घ्यायला अपुरे आहे. तेव्हा त्याच्यासाठी म्हणून मंदिर बांधणारा मी कोण? मी आपला त्याच्याप्रीत्यर्थ धूप जाळण्यासाठी फक्त एक ठिकाण बांधू शकतो एवढेच.
Kakaw pounge kalvan patenghai khout hoeh e Cathut teh apinimaw Bawkim a sak pouh thai han. Kai patetnaw ni hmuitui sawi nahane im hoeh laipateh, bangtelamaw im ka sak pouh thai han vaw.
7 तर, सोने, चांदी, पितळ आणि लोखंड या धातुकामात प्रवीण असा कारागिर तुम्ही माझ्याकडे पाठवून दिलात तर बरे. त्यास जांभळे, किरमिजी आणि निळे वस्त्र तयार करता यावे. कोरीव कामाचेही त्यास ज्ञान असावे. माझ्या पित्याने, दावीदाने निवडलेल्या इतर कारागिरांबरोबर तो इथे यहूदा आणि यरूशलेमेत काम करील.
Hatdawkvah, apa Devit ni a hmoun tangcoung e, Judah ram thung e hoi Jerusalem kho dawk e sui, ngun, rahum, sum, hahoi opaou, âthi, kamthim hni, hete hnonaw dawk thoumthainae hoi, kakuep e tami buet touh kai koe kaawm e hoi kâ kabawm hanelah patoun haw loe.
8 लबानोनातून माझ्यासाठी गंधसरू, देवदार आणि रक्तचंदन यांचे लाकूड इत्यादी पाठवावे. लबानोनातील तुझे लाकूडतोडे चांगले अनुभवी आहेत हे मला माहीत आहे तुमच्या सेवकांसमवेत माझे सेवक राहतील.
Lebanon e sidar thing hmaica thing hoi Algum thingnaw na patawn haw. Bangkongtetpawiteh, na taminaw teh lebanon thing tâtueng a thoum poung tie ka panue.
9 मी बांधायला घेतलेले मंदिर चांगले विशाल आणि सुंदर होणार असल्यामुळे मला मोठ्या प्रमाणावर लाकूड लागणार आहे.
Thing moikapap rakueng hanelah ka sannaw teh nange na sannaw koe kambawk van naseh. Bangkongtetpawiteh, sak han ka noe e Bawkim teh kalen pounge hoi kângairu hane kawilah ao.
10 १० लाकडांसाठी वृक्षतोड करणाऱ्या तुमच्या सेवकांना मी पुढीलप्रमाणे मोबदला देईन: वीस हजार कोर गहू, वीस हजार कोर जव, वीस हजार बुधले द्राक्षरस आणि वीस हजार बुधले तेल.”
Thing ka bouk e na sannaw hanelah, satun kor 20, 000, misur bath 20, 000 hoi satui bath 20, 00 ka poe a han telah lawk na thui.
11 ११ मग सोराचा राजा हिरामाने शलमोनाला लिखीत उत्तर पाठवले. त्यामध्ये त्याने असा निरोप पाठवला की, शलमोना, परमेश्वराचे आपल्या प्रजेवर प्रेम आहे. म्हणून तर त्याने तुला त्यांचा राजा म्हणून नेमले.
Taire siangpahrang Huram ni, BAWIPA ni a taminaw lungpataw dawkvah ahnimae siangpahrang lah na coung sak e doeh telah Solomon koe ca lahoi bout a patawn.
12 १२ हिराम पुढे म्हणाला, “इस्राएलाचा परमेश्वर देव धन्य असो. स्वर्ग आणि पृथ्वीची निर्मिती त्यानेच केली. दावीद राजाला त्याने सूज्ञ पुत्र दिला आहे. शलमोना, तू सूज्ञ आणि समजदार आहेस. तू परमेश्वरासाठी मंदिर तसेच स्वतःसाठी राजवाडा बांधण्याची तयारी करीत आहेस.
Huram ni, Isarelnaw e BAWIPA Cathut, talai hoi kalvan kasakkung BAWIPA hanelah Bawkim hoi siangpahrang im sak hanelah lungangnae hoi panuethainae a capa siangpahrang Devit koe kapoekung teh yawhawinae awmseh.
13 १३ हूरामबी नावाचा एक कुशल व विवेकी कारागीर मी तुझ्याकडे पाठवतो.
Hatdawkvah thoumthainae hoi ka kuep e Huram heh ka patoun.
14 १४ त्याची आई दान वंशातील असून त्याचे पिता सोर नगरातले होते. हा कारागीर सोने, चांदी, पितळ, लोखंड, दगड आणि लाकूड यांच्या कामात तरबेज आहे. जांभळे, निळे आणि अत्यंत तलम असे उंची किरमिजी वस्त्र करण्यातही तो निपुण आहे. त्यास सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीची योग्य नक्षी, कोरून काढू शकतो. तो तुझ्या आणि तुझ्या पित्याच्या, माझा स्वामी दावीद याच्या कसबी कारागिरांबरोबर काम करील.
A manu teh dan miphun, A na pa teh Taire miphun lah ao. Huram teh sui, ngun, rahum, sum, talung hoi thing hetnaw hoi aphunphun ka sak thai e tami lah ao. Âthi hni, opaou hni kamthim hni hoi lukkarei naw hai koung a kawng thai, Hatdawkvah BAWIPA na pa Devit e thaw katawknaw hoi cungtalah rei tawk naseh.
15 १५ माझ्या स्वामींनी गहू, जव, तेल आणि द्राक्षरस देण्याचे कबूल केले आहे ते सर्व आमच्या नोकरांना द्यावे.
Ka BAWIPA ni a dei tangcoung e patetlah satun, barli, satui hoi misur naw hah ka sannaw koe patawn awh lawih.
16 १६ लबानोनातून तुम्हास हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओंडक्यांचे तराफे करून आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोहोचते करु. तेथून ते तुम्ही यरूशलेमेला न्यावे.”
Hottelah, kaimouh ni Lebanon mon dawk e thingnaw, na ngai yit touh ka tâtueng vaiteh tui dawk hoi Joppa totouh na phu han telah atipouh.
17 १७ शलमोनाचा पिता दावीद याने जशी इस्राएलातील सर्व उपऱ्या लोकांची गणना केली होती, त्याप्रमाणे शलमोनाने गणती केली. या गणनेत त्यांना एक लाख त्रेपन्न हजार सहाशे उपरे लोक मिळाले.
Solomon ni Isarel ram dawk e a na pa Devit ni a touk tangcoung e miphun alouke tami bout a touk navah 153, 600 touh a pha.
18 १८ शलमोनाने त्यापैकी सत्तर हजार जणांना ओझी वाहायला निवडले आणि ऐंशी हजार लोकांस डोंगरातून दगड काढायच्या कामासाठी निवडले. उरलेल्या तीन हजार सहाशे उपऱ्यांना या काम करणाऱ्यांवर देखरेख करणारे मुकादम म्हणून नेमले.
Hahoi hno ka phawt hanelah tami 70, 000 hoi, mon dawk e thing ka tâtueng hane 80, 000, hoi thaw katawknaw khenyawnkung lah, 3,600 touh, touh lah a hmoun.

< 2 इतिहास 2 >