< 2 इतिहास 17 >
1 १ आसाच्या जागी आता यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा पुत्र इस्राएलाशी तोंड देता यावे म्हणून यहोशाफाटाने आपले बळ वाढवले.
Et Josaphat, son fils, régna à sa place, et il prévalut sur Israël.
2 २ त्याने यहूदाच्या सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये सैन्याच्या तुकड्या ठेवल्या आसाने काबीज केलेल्या एफ्राइमाच्या नगरांमध्ये तसेच यहूदामध्ये त्याने तटबंदी असलेली ठाणी वसवली.
Il mit des garnisons dans toutes les places fortes de Juda, et donna des chefs à toutes les villes de Juda et aux villes d'Ephraïm dont son père, Asa, s'était emparé.
3 ३ यहोशाफाटाला परमेश्वराचा पाठिंबा होता कारण लहान वयातच त्याने आपले पूर्वज दावीद यांच्यासारखी सत्कृत्ये केली होती. तो बआल देवतेच्या भजनी लागला नाही.
Et le Seigneur fut avec Josaphat, parce qu'il marcha dans les voies qu'avait d'abord suivies son père, et qu'il ne chercha point les idoles,
4 ४ आपल्या पूर्वजांच्या देवालाच तो शरण गेला. परमेश्वराच्या आज्ञा त्याने पाळल्या इतर इस्राएल लोकांसारखा तो वागला नाही.
Mais qu'il chercha le Seigneur Dieu de son père, et qu'il marcha selon les préceptes de son père, et non selon les œuvres d'Israël.
5 ५ परमेश्वराने यहोशाफाटाकरवी राज्य बळकट केले. यहूदाच्या लोकांनी यहोशाफाटासाठी नजराणे आणले त्यामुळे त्यास धन तसेच बहुमान मिळाला.
Et le Seigneur fit prospérer le royaume entre ses mains, et tout Juda offrit des présents à Josaphat, qui acquit ainsi beaucoup de gloire et de richesses.
6 ६ परमेश्वराच्या मार्गाने वाटचाल करण्यात यहोशाफाटाचे मन रमले. यहूदा प्रांतातील उच्चस्थाने आणि अशेरा देवीच्या मूर्ती त्याने काढून टाकल्या.
Et son cœur fut exalté dans les voies du Seigneur, et il détruisit les hauts lieux et les bois sacrés sur le territoire de Juda.
7 ७ आपल्या राज्याच्या तिसऱ्या वर्षात त्याने सरदारांना नगरांमधून यहूदी लोकांस शिकवण द्यायला पाठवले. बेन-हईल, ओबद्या, जखऱ्या, नथनेल आणि मीखाया हे ते सरदार होते.
En la troisième année de son règne, il envoya, pour enseigner dans les villes de Juda, ses chefs et les fils des hommes vaillants: Abdias, Zacharie, Nathanaël et Michée,
8 ८ त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असाएल, शामीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीया आणि तोब अदोनीया या लेवीचीही त्याने रवानगी केली. अलीशामा व यहोराम हे याजकही त्याने पाठवले.
Et, avec eux, les lévites Samaies, Nathanias, Zabdies, Asihel, Semiranaoth, Jonathas, Adonias, Tobias et Tobadonias; tous lévites, et les prêtres Elisama et Joram.
9 ९ हे सरदार, लेवी आणि याजक सर्व लोकांस शिकवले. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पुस्तक त्यांनी बरोबर घेतले होते. यहूदातील गावोगावी जाऊन ते लोकांस शिकवत गेले.
Et ils enseignèrent en Juda; ils avaient le livre de la loi du Seigneur, ils le lisaient dans les villes de Juda, et ils instruisaient le peuple.
10 १० यहूदाच्या आसपासच्या राजसत्तांनी परमेश्वराची धास्ती घेतली, त्यामुळे त्यांनी यहोशाफाटाबरोबर युध्द केले नाही.
Et un grand trouble, venant du Seigneur, se répandit parmi les rois qui entouraient Juda, et ils ne firent point la guerre à Josaphat.
11 ११ कित्येक पलिष्टयांनी यहोशाफाटासाठी चांदीच्या भेटी आणल्या. काही अरबी शेळ्यामेंढ्या घेऊन येत. त्यांनी असे सात हजार सातशे मेंढेरे आणि सात हजार सातशे बोकड त्यास दिले.
Les Philistins lui envoyèrent de l'argent et d'autres dons; les Arabes lui amenèrent sept mille sept cents moutons et béliers.
12 १२ यहोशाफाटाचे सामर्थ्य असे दिवसेंदिवस वाढत चालले. त्याने यहूदात किल्ले आणि कोठारांची नगरे बांधली.
Et Josaphat alla toujours croissant jusqu'à la magnificence, et il bâtit en Judée des palais et des forteresses.
13 १३ यहूदाच्या नगरात त्याची भरपूर कामे चालत असत. यरूशलेमामध्ये यहोशाफाटाने चांगली बळकट, धीट लढाऊ माणसेही ठेवली.
Et il exécuta de nombreux travaux en Judée, et eut à Jérusalem des guerriers vaillants.
14 १४ आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची गणती झालेली होती. ती पुढीलप्रमाणे यहूदातील सरदार असे अदना हा तीन लाख सैनिकांचा सेनापती होता.
En voici le dénombrement par familles paternelles; en Juda, commandants de mille hommes: Ednas le chef, et avec lui trois cent mille hommes vaillants;
15 १५ यहोहानानाच्या हाताखाली दोन लाख ऐंशी हजार सैनिक होते.
Joanan, et avec lui deux cent quatre-vingt mille hommes;
16 १६ जिख्रीचा पुत्र अमस्या हा त्या खालोखाल दोन लाख योध्दाचा मुख्य होता. त्याने आपणहून परमेश्वराच्या सेवेला वाहून घेतले होते.
Amasias, fils de Zari, plein de zèle pour le Seigneur, et avec lui deux cent mille vaillants;
17 १७ बन्यामिनांच्या वंशातील सरदार असे: एल्यादाच्या अखत्यारीत दोन लाख सैनिक धनुष्यबाण आणि ढाल वापरण्यात तरबेज होते. एल्यादा हा एक अतिशय शूर योध्दा होता.
Et en Benjamin: Eliada, et avec lui deux cent mille archers ou fantassins armés à la légère;
18 १८ यहोजाबादाकडे युध्दसज्ज असे एक लाख ऐंशी हजार पुरुष होते.
Et Jozabad, et avec lui cent quatre-vingt mille hommes aguerris.
19 १९ ही सर्व फौज राजा यहोशाफाट याच्या सेवेत होती. याखेरीज यहूदाच्या सर्व नगरांमधील किल्ल्यांवर त्याने माणसे नेमली होती.
Tels étaient ceux qui servaient le roi, outre ceux qu'il avait placés dans toutes les forteresses de la Judée.