< 2 इतिहास 11 >
1 १ यरूशलेमेला आल्यावर रहबामाने एक लाख ऐंशी हजार उत्तम योध्दे जमवले. यहूदा आणि बन्यामीन या घराण्यांमधून त्यानेही निवड केली. इस्राएलाशी युध्द करून स्वत: कडे राज्य खेचून आणण्यासाठी त्यानेही जमवाजमव केली.
Da Rehabeam var kommet til Jerusalem, samlede han hele Judas og Benjamins Hus, 180 000 udsøgte Folk, øvede Krigere, til at føre Krig med Israel og vinde Kongedømmet tilbage til Rehabeam.
2 २ पण परमेश्वराचा मनुष्य शमाया याच्याकडे परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्यास म्हणाला,
Men da kom HERRENS Ord til den Guds Mand Sjemaja saaledes:
3 ३ “शमाया, यहूदाचा राजा, शलमोन पुत्र रहबाम याच्याशी तू बोल तसेच यहूदा आणि बन्यामीन इथल्या इस्राएल लोकांशीही बोल. त्यांना म्हणावे.
»Sig til Judas Konge Rehabeam, Salomos Søn, og til hele Israel i Juda og Benjamin:
4 ४ परमेश्वराचे म्हणणे असे आहे आपल्या बांधवांशी लढू नका. प्रत्येकाने घरी जावे. मीच हे सर्व व्हायला कारणीभूत आहे.” तेव्हा राजा रहबाम आणि त्याचे सैन्य यांनी परमेश्वराचा संदेश मानला आणि ते परत गेले. यराबामावर त्यांनी हल्ला केला नाही.
Saa siger HERREN: I maa ikke drage op og kæmpe med eders Brødre; vend hjem hver til sit, thi hvad her er sket, har jeg tilskikket!« Da adlød de HERRENS Ord og vendte tilbage og drog ikke mod Jeroboam.
5 ५ रहबाम यरूशलेमेमध्ये राहिला. हल्ल्यांचा प्रतिकार करायला सज्ज अशी भक्कम नगरे त्याने यहूदात बाधली.
Rehabeam boede saa i Jerusalem, og han befæstede flere Byer i Juda.
6 ६ बेथलेहेम, एटाम, तकोवा,
Saaledes befæstede han Betlehem, Etam, Tekoa,
7 ७ बेथ-सूर, शोखो, अदुल्लाम,
Bet-Zur, Soko, Adullam,
9 ९ अदोरइम, लाखीश, अजेका,
Adorajim, Lakisj, Azeka,
10 १० सरा, अयालोन व हेब्रोन या तटबंदी असलेल्या नगरांची डागडुजी केली. यहूदा आणि बन्यामीन मधली ही नगरे चांगली भक्कम करण्यात आली.
Zor'a, Ajjalon og Hebron, alle i Juda og Benjamin;
11 ११ किल्ले मजबूत झाल्यावर रहबामाने त्यांच्यावर नायक नेमले. अन्नसामग्री, तेल, द्राक्षरस यांचा साठा त्याने तेथे केला.
og han gjorde Fæstningerne stærke, indsatte Befalingsmænd i dem og forsynede dem med Forraad af Levnedsmidler, Olie og Vin
12 १२ प्रत्येक नगरात ढाली आणि भाले यांचा पुरवठा करून गावे अधिकच मजबूत केली. यहूदा आणि बन्यामीन मधील ही नगरे आणि तेथील लोक यांना रहबामाने आपल्या नियंत्रणाखाली ठेवले.
og hver enkelt By med Skjolde og Spyd og gjorde dem saaledes meget stærke. Ham tilhørte Juda og Benjamin.
13 १३ सर्व इस्राएलामधील याजक आणि लेवी रहबामाशी सहमत होते. ते त्यास येऊन मिळाले.
Præsterne og Leviterne i hele Israel kom alle Vegne fra, hvor de boede, og stillede sig til hans Tjeneste;
14 १४ लेवींनी आपली शेती आणि मालमत्ता सोडली आणि ते यहूदा व यरूशलेम येथे आले. परमेश्वराप्रीत्यर्थ याजकाचे काम करायला यराबाम आणि त्याचे पुत्र यांनी लेवींना हाकलून लावले म्हणून ते आले.
thi Leviterne forlod deres Græsmarker og Ejendom og begav sig til Juda og Jerusalem, fordi Jeroboam og hans Sønner afsatte dem fra Stillingen som HERRENS Præster,
15 १५ यराबामाने बोकड आणि वासरे यांच्या मूर्ती उच्चस्थानी स्थापन केल्या आणि त्यांच्या पूजेसाठी आपले याजक निवडले.
idet han indsatte sig Præster for Offerhøjene og Bukketroldene og Tyrekalvene, som han, havde ladet lave.
16 १६ इस्राएलच्या सर्व वंशातील जे लोक इस्राएलचा देव परमेश्वर याच्याशी एकनिष्ठ होते ते ही, लेवींनी इस्राएल सोडल्यावर, त्यांच्या पुर्वजांचा देव परमेश्वरास यज्ञार्पणे करण्यासाठी यरूशलेमेला आले.
Og i Følge med Leviterne kom fra alle Israels Stammer de, hvis Hjerte var vendt til at søge HERREN, Israels Gud, til Jerusalem for at ofre til HERREN, deres Fædres Gud;
17 १७ त्यामुळे यहूदाचे राज्य बळकट झाले. त्यांनी शलमोनाचा पुत्र रहबाम याला तीन वर्षे पाठिंबा दिला. या काळात त्यांनी दावीद आणि शलमोन यांच्यासारखेच आचरण ठेवले.
og de styrkede Juda Rige og hævdede Rehabeams, Salomos Søns, Magt i et Tidsrum af tre Aar. Thi i tre Aar fulgte han Davids og Salomos Veje.
18 १८ रहबामाने दावीदपुत्र यरीमोथ आणि इशायपुत्र अलीयाब ह्याची कन्या अबीहाईल ह्यांच्यापासून झालेली महलथ हिच्याशी विवाह केला;
Rehabeam ægtede Mahalat; en Datter af Davids Søn Jerimot og Abihajil, en Datter af Eliab, Isajs Søn.
19 १९ महलथापासून रहबामाला यऊश, शमऱ्या आणि जाहम हे पुत्र झाले.
Hun fødte ham Sønnerne Je'usj, Sjemarja og Zaham.
20 २० मग रहबामाने माकाशी विवाह केला. माका ही अबशालोमची कन्या. माकाला रहबामापासून अबीया, अत्थय, जीजा आणि शलोमीथ हे पुत्र झाले.
Senere ægtede han Absaloms Datter Ma'aka, som fødte ham Abija, Attaj, Ziza og Sjelomit.
21 २१ रहबामाचे आपल्या इतर पत्नी आणि उपपत्नी यांच्यापेक्षा माकावर अधिक प्रेम होते. माका अबशालोमची नात. रहबामाला अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी होत्या. त्यास अठ्ठावीस पुत्र आणि साठ कन्याहोत्या.
Rehabeam elskede Absaloms Datter Ma'aka højere end sine andre Hustruer og Medhustruer; han havde nemlig atten Hustruer og tresindstyve Medhustruer og avlede otte og tyve Sønner og tresindstyve Døtre.
22 २२ माकाचा पुत्र अबीया याला रहबामाने सर्व भावडांमध्ये अग्रक्रम दिला. कारण त्यास राजा करावे अशी त्याची इच्छा होती.
Og Rehabeam satte Ma'akas Søn Abija til Overhoved, til Fyrste blandt hans Brødre; thi han havde i Sinde at gøre, ham til Konge;
23 २३ रहबामाने मोठ्या चतुराईने आपल्या सर्व पुत्रांना यहूदा आणि बन्यामीन येथील भक्कम तटबंदी असलेल्या नगरांमध्ये विखरून ठेवले. त्यांना उत्तम रसद पुरवली. त्यांची लग्ने लावून दिली.
og han fordelte klogelig alle sine Sønner rundt i alle Judas og Benjamins Landsdele og i alle de befæstede Byer og gav dem rigeligt Underhold og skaffede dem Hustruer.