< 1 शमुवेल 19 >
1 १ यानंतर शौलाने आपला पुत्र योनाथान याला व आपल्या सर्व चाकरांस असे सांगितले की, दावीदाला जिवे मारावे. तथापि शौलाचा पुत्र योनाथान याची दावीदावर फार प्रीती होती.
Beszélt Sául a fiához; Jónátánhoz és mind a szolgáihoz, hogy megöli Dávidot; Jonátán, Sául fia pedig kedvelte Dávidot nagyon.
2 २ योनाथानाने दावीदाला म्हटले की, “माझा बाप शौल तुला जिवे मारायास पाहत आहे. म्हणून आता सकाळपर्यंत सावध होऊन एकांती लपून राहा.
És tudtára adta Jónátán Dávidnak, mondván: Meg akar téged ölni Sául atyám, most hát óvakodjál, kérlek, reggel, maradj rejtekben és rejtőzz el;
3 ३ मी जाऊन ज्या शेतात तू आहेस तेथे आपल्या बापाजवळ उभा राहीन आणि तुझ्याविषयी मी आपल्या बापापाशी संभाषण करीन आणि जे पाहीन ते तुला कळवीन.”
én pedig kimegyek majd és állok atyám oldalára a mezőn, ahol te leszel, és én majd beszélek rólad atyámhoz és amit látok, tudtodra adom.
4 ४ तेव्हा योनाथानाने आपला बाप शौल याला दावीदाविषयी बरे बोलला आणि तो त्यास म्हणाला की, “राजाने आपला चाकर दावीद याचे वाईट करू नये कारण, त्याने तुमच्यासाठी फार चांगली कृत्ये केली आहेत.
És jót beszélt Jónátán Dávidról Sáulhoz, az atyjához és szólt hozzá: Ne vétkezzék a király szolgája ellen, Dávid ellen, mert nem vétett neked, s mert az ő tettei javadra vannak nagyon.
5 ५ त्यानेही आपले शिर हाती घेवून पलिष्ट्याला जिवे मारिले आणि परमेश्वराने अवघ्या इस्राएलासाठी मोठे तारण केले ते तुम्ही ते पाहून हर्षित झाला; तर दावीदाला निष्कारण मारताना निर्दोष रक्त तुम्ही का पाडावे?”
Tenyerére tette életét és megverte a filiszteust és az Örökkévaló nagy segedelmet művelt egész Izraelnek – láttad és örültél; miért vétkeznél hát ártatlan vér ellen, megölvén Dávidot ok nélkül?
6 ६ तेव्हा शौलाने योनाथानाची विनंती मानली आणि शौलाने अशी शपथ वाहिली, “परमेश्वराची शपथ मी त्यास मारणार नाही.”
És hallgatott Sául Jónátán szavára; és megesküdött Sául: Él az Örökkévaló, nem fog megöletni!
7 ७ मग योनाथानाने दावीदाला बोलावले आणि योनाथानाने त्यास या सर्व गोष्टी सांगितल्या. योनाथानाने दावीदाला शौलाजवळ आणले आणि तो त्याच्याजवळ पूर्वीसारखा राहू लागला.
Ekkor hívta Jónátán Dávidot, és tudtára adta Jónátán mind e dolgokat; erre odavitte Jónátán Dávidot Sáulhoz, és úgy volt előtte, mint tegnap, tegnapelőtt.
8 ८ यानंतर आणखी लढाई झाली आणि दावीदाने जाऊन पलिष्ट्यांशी लढून त्यांचा फार मोड केला आणि ते त्याच्यापुढून पळाले.
Tovább is volt a háború; és kivonult Dávid, harcolt a filiszteusokkal és megverte őket nagy vereséggel, és megfutamodtak előle.
9 ९ मग परमेश्वराचा पासून दुष्ट आत्मा शौलावर आला आणि तो आपला भाला हाती धरुन आपल्या घरी बसला असता दावीद हाताने वाद्य वाजवीत होता.
De lett az Örökkévalónak egy gonosz szelleme Sáulon; ő a házában ült, és dárdája kezében, Dávid pedig hárfázott kezével;
10 १० तेव्हा शौलाने भाल्याने दावीदाला भिंतीशी खिळण्यास पाहिले, परंतु तो शौलासमोरून निसटला आणि भाला भिंतीमध्ये घूसला. दावीदाने पळून आपला जीव त्या रात्री वाचवला.
ekkor oda akarta Sául a dárdával szegezni Dávidot a falhoz, de elszabadult Sául elől, és odaütötte a dárdát a falhoz, Dávid pedig megfutamodott és elmenekült azon éjjel.
11 ११ मग दावीदावर टपून सकाळी त्यास जिवे मारावे म्हणून शौलाने त्याच्या घरास दूत पाठविले आणि दावीदाची पत्नी हे वर्तमान त्यास सांगून असे बोलली की, “जर आज रात्री आपल्या जिवाचे रक्षण तुम्ही करणार नाही, तर सकाळी तुम्ही जिवे मारले जाल.”
És küldött Sául követeket Dávid házához, hogy őrizzék és hogy reggelre megöljék; de tudtára adta Dávidnak a felesége, Míkhál, mondván: Ha nem mented meg lelkedet ez éjjel, holnap meg vagy ölve.
12 १२ तेव्हा मीखलने दावीदाला एका खिडकीतून उतरवले आणि त्याने पळून जावून आपल्या जिवाचे रक्षण केले.
És lebocsátotta Míkhál Dávidot az ablakon; elment, megszökött és megmenekült.
13 १३ मग मीखलने एक मूर्ती घेऊन पलंगावर ठेवली आणि तिच्या डोकीखाली बकऱ्याच्या केसांची उशी ठेवून तीजवर पांघरूण घातले.
És vette Míkhál a teráfimot és tette az ágyba, a kecskeszőr párnát pedig tette feje alá; és betakarta ruhával.
14 १४ जेव्हा शौलाने दूत दावीदाला धरायास पाठविले, तेव्हा तिने म्हटले की, “तो दु: खनाईत आहे.”
És küldött Sául követeket, hogy hozzák el Dávidot; mondta: Beteg ő.
15 १५ मग शौलाने दावीदाला पाहायास दूत पाठवून म्हटले की, “मी त्यास जीवे मारावे म्हणून त्यास पलंगावर असतानाच माझ्याकडे आणा.”
Erre küldte Sául a követeket, hogy nézzék meg Dávidot, mondván: Hozzátok őt fel hozzám ágyastól, hogy megöljem.
16 १६ ते दूत घरात आले असता पाहा पलंगावर मूर्ती होती व तिच्या डोकीखाली बकऱ्यांच्या केसांची उशी होती.
Odajöttek a követek, és íme, a teráfim az ágyon; a. kecskeszőr párna pedig feje alatt.
17 १७ तेव्हा शौलाने मीखलला म्हटले की, “तू मला का फसविले आणि माझ्या वैऱ्याने निभावून पळून जावे म्हणून त्यास का पाठवून दिले?” मग मीखल शौलाला म्हणाली, “त्याने मला म्हटले की मला जाऊ दे, मी तुला का मारावे?”
Ekkor szólt Sául Míkhálhoz: Miért csaltál meg így, hogy elbocsátottad ellenségemet és megmenekült? Szólt Míkhál Sáulhoz: Ő mondta nekem: bocsáss el, miért öljelek meg?
18 १८ याप्रमाणे दावीदाने पळून जाऊन आपल्या जिवाचे रक्षण केले. आणि शमुवेलाजवळ रामामध्ये येऊन त्याने आपणाला शौलाने जे सगळे केले होते ते सांगितले; तेव्हा तो व शमुवेल जाऊन नायोथात राहिले.
Dávid pedig elszökött és menekült, eljött Sámuelhez Rámába, és elmondta neki mindazt, amit cselekedett vele Sául. Erre elment ő meg Sámuel és letelepedtek Nájótban.
19 १९ मग शौलाला कोणी असे सांगितले की, पाहा दावीद रामा येथे नायोथात आहे.
Tudtára adták Sáulnak, mondván: Íme Dávid Nájóthan van, Rámában.
20 २० तेव्हा शौलाने दावीदाला धरायास दूत पाठविले परंतु भविष्यवाद्याची मंडळी भविष्यवाद करीत असता आणि शमुवेल त्यांच्यावर मुख्य आहे हे जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा देवाचा आत्मा शौलाच्या दूतांवर आला आणि तेही भविष्यवाद करू लागले.
Küldött tehát Sául követeket, hogy hozzák el Dávidot; de látták a próféták csoportját, amint prófétálnak, Sámuel pedig ott áll felügyelve rájuk; akkor lett Istennek szelleme Sául követein és prófétáltak ők is.
21 २१ मग हे शौलाला सांगितले असता, त्याने आणखी दूत पाठविले, आणि तेही भविष्यवाद करू लागले. मग शौलाने तिसऱ्या वेळेस आणखी दूत पाठविले, आणि तेही भविष्यवाद करू लागले.
Mikor tudtára adták Sáulnak, küldött más követeket, de azok is prófétáltak; újból is küldött Sául követeket, harmadszor, de azok is prófétáltak.
22 २२ तेव्हा तो सुद्धा रामास जायास निघाला आणि सेखूमध्ये एका मोठ्या विहीरीजवळ येऊन त्याने असे विचारिले की, “शमुवेल व दावीद कोठे आहेत?” मग कोणी एकाने म्हटले, “पाहा ते रामातल्या नायोथात आहेत.”
Elment tehát ő is Rámába és eljutott a nagy gödörhöz, mely Székúban van, kérdezte és mondta: Hol vannak Sámuel és Dávid? Mondták: Íme Nájótban, Rámában.
23 २३ तेव्हा शौल रामातल्या नायोथात गेला आणि देवाचा आत्मा त्यावर आला आणि तो जाताना रामातल्या नायोथापर्यंत भविष्यवाद करीत गेला.
Elment tehát oda Nájótba, Rámában; és lett őrajta is Isten szelleme és egyre járva prófétált, míg el nem jutott Nájótba, Rámában.
24 २४ मग त्यानेही आपली अंगवस्त्रे काढून शमुवेलापुढे भविष्यवाद केला आणि तो संपूर्ण दिवस आणि ती सर्व रात्र तो उघडा पडून राहीला; या कारणास्तव ते म्हणू लागले की, शौलही भविष्यवक्त्यांपैकी आहे की काय?
Levetette ő is ruháit és prófétált ő is Sámuel előtt, és feküdt meztelenül azon egész nap és egész éjjel. Azért mondják: Hát Sául is a próféták között van?