< १पेत्र. 4 >

1 म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्रसामग्री परिधान करा कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे.
asmākaṁ vinimayena khrīṣṭaḥ śarīrasambandhe daṇḍaṁ bhuktavān ato hetoḥ śarīrasambandhe yo daṇḍaṁ bhuktavān sa pāpāt mukta
2 म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे.
itibhāvena yūyamapi susajjībhūya dehavāsasyāvaśiṣṭaṁ samayaṁ punarmānavānām icchāsādhanārthaṁ nahi kintvīśvarasyecchāsādhanārthaṁ yāpayata|
3 कारण परराष्ट्रीयांच्या इच्छेप्रमाणे करण्यास गेलेला काळ पुरे झाला. तेव्हा तुम्ही कामातुरपणात, वासनांत, दारूबाजीत, दंगलीत, तसेच बदफैली व अमंगळ मूर्तीपूजेत आपल्या मार्गाने गेलात.
āyuṣo yaḥ samayo vyatītastasmin yuṣmābhi ryad devapūjakānām icchāsādhanaṁ kāmakutsitābhilāṣamadyapānaraṅgarasamattatāghṛṇārhadevapūjācaraṇañcākāri tena bāhulyaṁ|
4 अशा बेतालपणाच्या स्वैराचरणात आता तुम्ही त्यांच्याबरोबर घुसत नाही, ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात.
yūyaṁ taiḥ saha tasmin sarvvanāśapaṅke majjituṁ na dhāvatha, ityanenāścaryyaṁ vijñāya te yuṣmān nindanti|
5 तरीही, देव जो जिवंतांचा व मृतांचा न्याय करण्यास तयार आहे त्यास ते आपला हिशोब देतील.
kintu yo jīvatāṁ mṛtānāñca vicāraṁ karttum udyato'sti tasmai tairuttaraṁ dāyiṣyate|
6 कारण, याकरिता, मृतांनादेखील शुभवर्तमान सांगण्यात आले होते; म्हणजे जरी मनुष्यांप्रमाणे त्यांचा देहात न्याय झाला तरी त्यांनी देवाप्रमाणे आत्म्यात जिवंत रहावे.
yato heto rye mṛtāsteṣāṁ yat mānavoddeśyaḥ śārīrikavicāraḥ kintvīśvaroddeśyam ātmikajīvanaṁ bhavat tadarthaṁ teṣāmapi sannidhau susamācāraḥ prakāśito'bhavat|
7 पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे म्हणून समंजस मनाचे व्हा आणि प्रार्थनेसाठी सावध रहा;
sarvveṣām antimakāla upasthitastasmād yūyaṁ subuddhayaḥ prārthanārthaṁ jāgrataśca bhavata|
8 आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की आपल्यात वाढती प्रीती ठेवा, कारण प्रीतीने पापांची रास झाकली जाते.
viśeṣataḥ parasparaṁ gāḍhaṁ prema kuruta, yataḥ, pāpānāmapi bāhulyaṁ premnaivācchādayiṣyate|
9 काही कुरकुर न करता तुम्ही सर्वजण एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा.
kātaroktiṁ vinā parasparam ātithyaṁ kṛruta|
10 १० तुम्ही देवाच्या बहुविध कृपेचे चांगले कारभारी या नात्याने, प्रत्येकास मिळालेल्या कृपादानाने एकमेकांची सेवा करा.
yena yo varo labdhastenaiva sa param upakarotṛ, itthaṁ yūyam īśvarasya bahuvidhaprasādasyottamā bhāṇḍāgārādhipā bhavata|
11 ११ जो भाषण करतो त्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे व जो सेवा करतो त्याने आपण आपली सेवा देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. म्हणजे, येशू ख्रिस्ताद्वारे, सर्व गोष्टींत देवाचे गौरव करावे, त्यास गौरव व पराक्रम ही युगानुयुग असोत. आमेन. (aiōn g165)
yo vākyaṁ kathayati sa īśvarasya vākyamiva kathayatu yaśca param upakaroti sa īśvaradattasāmarthyādivopakarotu| sarvvaviṣaye yīśukhrīṣṭeneśvarasya gauravaṁ prakāśyatāṁ tasyaiva gauravaṁ parākramaśca sarvvadā bhūyāt| āmena| (aiōn g165)
12 १२ प्रियांनो, तुमच्या परीक्षेसाठी, तुमची अग्निपरीक्षा होण्यात तुम्हास काही अपूर्व झाले, असे वाटून त्याचे नवल मानू नका.
he priyatamāḥ, yuṣmākaṁ parīkṣārthaṁ yastāpo yuṣmāsu varttate tam asambhavaghaṭitaṁ matvā nāścaryyaṁ jānīta,
13 १३ उलट तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखात भागीदार होत आहात म्हणून आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हाही फार मोठ्या आनंदाने तुम्ही उल्लासित व्हावे.
kintu khrīṣṭena kleśānāṁ sahabhāgitvād ānandata tena tasya pratāpaprakāśe'pyānanandena praphullā bhaviṣyatha|
14 १४ ख्रिस्ताच्या नावाकरता तुमची निंदा होत असेल तर तुम्ही धन्य! आहात कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे.
yadi khrīṣṭasya nāmahetunā yuṣmākaṁ nindā bhavati tarhi yūyaṁ dhanyā yato gauravadāyaka īśvarasyātmā yuṣmāsvadhitiṣṭhati teṣāṁ madhye sa nindyate kintu yuṣmanmadhye praśaṁsyate|
15 १५ पण तुमच्यातील कोणी खुनी किंवा चोर म्हणून, वाईट करणारा किंवा दुसर्‍याच्या कामात लुडबुड करणारा म्हणून कोणी दुःख भोगू नये.
kintu yuṣmākaṁ ko'pi hantā vā cairo vā duṣkarmmakṛd vā parādhikāracarccaka iva daṇḍaṁ na bhuṅktāṁ|
16 १६ ख्रिस्ती म्हणून जर कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्यास लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचे गौरव करावे.
yadi ca khrīṣṭīyāna iva daṇḍaṁ bhuṅkte tarhi sa na lajjamānastatkāraṇād īśvaraṁ praśaṁsatu|
17 १७ कारण देवाच्या घराण्यापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आता आली आहे आणि तो जर प्रथम आपल्यापासून झाला, तर जे देवाचे शुभवर्तमान मानीत नाहीत त्यांचा शेवट काय होईल?
yato vicārasyārambhasamaye īśvarasya mandire yujyate yadi cāsmatsvārabhate tarhīśvarīyasusaṁvādāgrāhiṇāṁ śeṣadaśā kā bhaviṣyati?
18 १८ नीतिमान जर कष्टाने तर जो भक्तिहीन व पापी ह्याला ठिकाण कोठे मिळेल?
dhārmmikenāpi cet trāṇam atikṛcchreṇa gamyate| tarhyadhārmmikapāpibhyām āśrayaḥ kutra lapsyate|
19 १९ म्हणून जे देवाच्या इच्छेप्रमाणे सोसतात त्यांनी चांगले करीत राहून, जो विश्वासू निर्माणकर्ता आहे त्याच्याहाती आपले जीव सोपवावेत.
ata īśvarecchāto ye duḥkhaṁ bhuñjate te sadācāreṇa svātmāno viśvāsyasraṣṭurīśvasya karābhyāṁ nidadhatāṁ|

< १पेत्र. 4 >