< 1 राजे 6 >

1 अशा तऱ्हेने शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली. इस्राएल लोकांनी मिसर देशातून बाहेर निघाल्यापासून चारशे ऐंशी वर्षे झाली होती. इस्राएलाचा राजा म्हणून शलमोनाच्या कारकीर्दीचे हे चौथ्या वर्षी. जीव महिना जो दुसरा महिना होता त्यामध्ये तो परमेश्वराचे मंदिर बांधू लगला.
イスラエルの子孫のエジプトの地を出たる後四百八十年ソロモンのイスラエルに王たる第四年ジフの月即ち二月にソロモン、ヱホバのために家を建ることを始めたり
2 शलमोन राजाने परमेश्वरासाठी जे मंदिर बाधंले त्याची लांबी साठ हात, रूंदी वीस हात व उंची तीस हात होती.
ソロモン王のヱホバの爲に建たる家は長六十キユビト濶二十キユビト高三十キユビトなり
3 मंदिराची देवडीची लांबी वीस हात म्हणजे मंदिराच्या रूंदीएवढी होती, आणि मंदिरासमोर त्याची रूंदी दहा हात होती.
家の拝殿の廊は家の濶に循ひて長二十キユビト家の前の其濶十キユビトなり
4 मंदिराला अरुंद खिडक्या होत्या त्या बाहेरच्या बाजूने अरुंद आणि आतल्या बाजूने रुंद होत्या.
彼家に造り附の格子ある窻を施たり
5 मंदिराच्या मुख्य खोलीच्या लागून अनेक खोल्या एका रांगेत बांधल्या होत्या. तसेच मंदिराचे पवित्रस्थान व परमपवित्रस्थान यांच्या भिंतीस लागून सभोवार मजले केले.
又家の墻壁に附て四周に連接屋を建て家の墻壁即ち拝殿と神殿の墻壁の周圍に環らせり又四周に旁房を造れり
6 सर्वात खालच्या मजल्याची रूंदी पाच हात, मधल्या मजल्याची सहा हात व वरच्या मजल्याची सात हात होती; त्याने मंदिराच्या बाहेरच्या भिंतीस तोडे ठेवले होते, ते अशासाठी की, मंदीराच्या भिंतीत तुळ्या शिरू नयेत.
下層の連接屋は濶五キユビト中層のは濶六キユビトを第三層のは濶七キユビトなり即ち家の外に階級を造り環らして何者をも家の墻壁に挿入ざらしむ
7 भिंतीच्या बांधकामात कामगारांनी चांगले मोठे चिरे वापरले खाणीतूनच ते योग्य मापाने कापून काढले होते. त्यामुळे मंदिरात ते बसवताना हातोड्या, कुऱ्हाडी किंवा अन्य कुठल्या लोखंडी हत्याराचा आवाज झाला नाही.
家は建る時に鑿石所にて鑿り預備たる石にて造りたれば造れる間に家の中には鎚も鑿も其外の鐵器も聞えざりき
8 तळमजल्यावरील खोल्यांना मंदिराच्या दक्षिणेकडून आत जायला वाट होती. तिथून वरच्या मजल्यांवर जायला आतून जिने होते.
中層の旁房の戸は家の右の方にあり螺旋梯より中層の房にのぼり中層の房より第三層の房にいたるべし
9 शेवटी शलमोनाचे मंदिराचे बांधकाम संपले, मंदिराचा संपूर्ण अंतर्भाग गंधसरुच्या लाकडाने आच्छादलेला होता.
斯彼家を建終り香柏の橡と板をもて家を葺り
10 १० मंदिराभोवतालच्या खोल्यांचेही काम झाले, प्रत्येक मजल्याची उंची पाच पाच हात उंच होती. त्यातील गंधसरुच्या लाकडाचे खांब मंदिराला भिडले होते.
又家に附て五キユビトの高たる連接屋を建環し香柏をもて家に交接たり
11 ११ परमेश्वराचे वचन शलमोनाकडे आले तो म्हणाला,
爰にヱホバの言ソロモンに臨みて曰く
12 १२ “माझ्या सर्व आज्ञा आणि नियम तू पाळलेस तर तुझे वडिल दावीद यांना कबूल केले ते सर्व मी तुझ्यासाठी करीन.
汝今此家を建つ若し汝わが法憲に歩みわが律例を行ひわが諸の誡命を守りて之にしたがひて歩まばわれはが汝の父ダビデに言し語を汝に固うすべし
13 १३ मी इस्राएल लोकांमध्ये राहील आणि त्यांना सोडून मी जाणार नाही.”
我イスラエルの子孫の中に住わが民イスラエルを棄ざるべし
14 १४ शलमोनाने मंदिर बांधण्याचे काम पूर्ण केले.
斯ソロモン家を建終れり
15 १५ मंदिराच्या दगडी भिंतींना जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाचे आतून आच्छादन होते. दगडी जमीन देवदारुच्या लाकडाने मढवलेली होती.
彼香柏の板を以て家の墻壁の裏面を作れり即ち家の牀板より頂格の墻壁まで木をもて其裏面をはりまた松の板をもて家の牀板をはれり
16 १६ मंदिराच्या आत मागच्या बाजूला वीस हात लांबीचा परमपवित्र गाभारा होता. त्याच्याही भिंती खालपासून वरपर्यंत गंधसरुचा लाकडाने मढवलेल्या होत्या.
又家の奧に二十キユビトの室を牀板より墻壁まで香柏をもて造れり即ち家の内に至聖所なる神殿を造れり
17 १७ मंदिराचा मुख्य दर्शनीभाग या पवित्र गाभाऱ्यासमोर होता. त्याची लांबी चाळीस हात होती.
家即ち前にある拝殿は四十キユビトなり
18 १८ हा भाग सुध्दा गंधसरुने मढवलेला होता. त्यातून भिंतीच्या दगडाचे काहीच दर्शन होत नव्हते. या लाकडावर उमललेली फुले आणि रानकाकड्या यांचे कोरीव काम केलेले होते.
家の内の香柏は瓠と咲る花を雕刻める者なり皆香柏にして石は見えざりき
19 १९ आणखी मागे मंदिराच्या अंतर्भागात शलमोनाने परमेश्वराच्या कराराच्या कोशासाठी गाभारा करवून घेतला होता.
神殿は彼其處にヱホバの契約の櫃を置んとて家の内の中に設けたり
20 २० याची लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी वीस हात होती. त्याने तो शुद्ध सोन्याने मढविलेला होता. गंधसरुची केलेली वेदीही त्याने सोन्याने मढवलेली होती.
神殿の内は長二十キユビト濶二十キユビト高二十キユビトなり純金をもて之を蔽ひ又香柏の壇を覆へり
21 २१ शलमोनाने हा गाभारा शुद्व सोन्याने मढवला होता. खोलीसमोर त्याने धूप जाळायला चौथरा बांधला तोसुद्धा सोन्याने मढवून त्याभोवती सोन्याच्या साखळ्या लावल्या.
又ソロモン純金をもて家の内を蔽ひ神殿の前に金の鏈をもて間隔を造り金をもて之を蔽へり
22 २२ परमपवित्र गाभाऱ्यासमोरच्या वेदीसह सर्व मंदिर सोन्याने मढवून त्याने काम समाप्त केले.
又金をもて殘るところなく家を蔽ひ遂に家を飾ることを悉く終たりまた神殿の傍にある壇は皆金をもて蔽へり
23 २३ कारागिरांनी जैतून लाकडाचे दोन करुब देवदूत बनवले. त्यांना पंख होते. करुब देवदूतांची उंची प्रत्येकी दहा दहा हात होती. ते परमपवित्र गाभाऱ्यात ठेवले.
神殿の内に橄欖の木をもて二のケルビムを造れり其高十キユビト
24 २४ करुबाचा एक पंख पाच हात व दुसरा पंख पाच हात होता. एका पंखाच्या टोकापासून दुसऱ्या पंखाच्या टोकापर्यंत दहा हात अंतर होते.
其ケルブの一の翼は五キユビト又其ケルブの他の翼も五キユビトなり一の翼の末より他の翼の末までは十キユビトあり
25 २५ दुसरा करुबही दहा हात उंच होतो; दोन्ही करुब एका मापाचे व एका आकाराचे होते.
他のケルブも十キユビトなり其ケルビムは偕に同量同形なり
26 २६ आणि एका करुबाची उंची दहा हात होती, दुसऱ्या करुबाचीही तेवढीच होती.
此ケルブの高十キユビト彼ケルブも亦しかり
27 २७ हे करुब देवदूत आतल्या परमपवित्र गाभाऱ्यात बसवले होते. ते एकमेकांना लागून असे ठेवले होते की त्यांचे पंख खोलीच्या बरोबर मध्यभागी एकमेकांना भिडत होते. आणि बाहेरच्या बाजूला भिंतीच्या कडेला स्पर्श करत होते.
ソロモン家の内の中にケルビムを置ゑケルビムの翼を展しければ此ケルブの翼は此墻壁に及び彼ケルブの翼は彼の墻壁に及びて其兩翼家の中にて相接れり
28 २८ हे करुब सोन्याने मढवले होते.
彼金をもてケルビムを蔽へり
29 २९ दर्शनी भाग आणि गाभारा यांच्या भिंतींवरही करुबांची चित्रे कोरलेली होती. खजुरीची झाडे आणि फुलेही कोरली होती.
家の周圍の墻壁には皆内外ともにケルビムと棕櫚と咲る花の形を雕み
30 ३० दोन्ही खोल्यांची जमीन आतली व बाहेरील सोन्याने मढवली होती.
家の牀板には内外ともに金を蔽へり
31 ३१ शलमोनाने जैतूनाच्या लाकडाचे दरवाजे करून ते परमपवित्र गाभाऱ्याचे प्रवेशद्वार म्हणून लावले. दारांभोवतालच्या बाह्या व कपाळपट्टी यांनी भिंतीचा पाचवा भाग व्यापला होता.
神殿の入口には橄欖の木の戸を造れり其木匡の門柱は五分の一なり
32 ३२ जैतून लाकडाच्या या दारांवर करुब देवदूत, खजुरीची झाडे आणि फुले कोरलेली असून ती सोन्याने मढवली होती.
其二の扉も亦橄欖の木なりソロモン其上にケルビムと棕櫚と咲る花の形を雕刻み金をもて蔽へり即ちケルビムと棕櫚の上に金を鍍たり
33 ३३ त्याने मंदिराच्या दारासाठीही जैतून लाकडाच्या चौकटी बसवल्या होत्या; त्याने भिंतीचा चौथा भाग व्यापला होता;
斯ソロモン亦拝殿の戸のために橄欖の木の門柱を造れり即ち四分の一なり
34 ३४ त्याचे दोन दरवाजे देवदारू लाकडाचे होते प्रत्येक दरवाज्याला दोन दोन दुमटण्या होत्या.
其二の戸は松の木にして此戸の兩扉は摺むべく彼戸の兩扉も摺むべし
35 ३५ त्यावरही पुन्हा करुब, खजुरीची झाडे, उमलेली फुले यांचे कोरीव काम असून ती दारे सोन्याने मढवली होती.
ソロモン其上にケルビムと棕櫚と咲る花を雕刻み金をもてこれを蔽ひて善く其雕工に適はしむ
36 ३६ मग त्याने आतले अंगण बाधले. त्याभोवती भिंत बांधली. दगडी चिऱ्यांच्या तीन ओळी आणि गंधसरुची एक ओळ अशा त्या होत्या.
また鑿石三層と香柏の厚板一層をもて内庭を造れり
37 ३७ वर्षाचा चौथा महिना जीव मध्ये त्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला.
第四年のジフの月にヱホバの家の基礎を築き
38 ३८ अकराव्या वर्षी बूल महिन्यात म्हणजेच वर्षाच्या आठव्या महिन्यात मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. शलमोनाला मंदिर बांधायला सात वर्षे लागली. मंदिराचे बांधकाम नियोजित नमुन्या प्रमाणे तंतोतंत झाले.
第十一年のブルの月即ち八月に凡て其箇條のごとく其定例のごとくに家成りぬ斯ソロモン之に建るに七年を渉れり

< 1 राजे 6 >