< १ करि. 4 >
1 १ आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने मानावे.
Niech więc każdy uważa nas za sługi Chrystusa i szafarzy tajemnic Boga.
2 २ या दृष्टीकोणातून हे गरजेचे आहे की जबाबदारी असलेल्या कारभाऱ्याने विश्वासू असले पाहिजे.
A od szafarzy wymaga się, aby każdy [z nich] okazał się wierny.
3 ३ पण तुम्हाकडून किंवा कोणा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्याय व्हावा ही मला लहान गोष्ट वाटत आहे, मी माझा स्वतःचा देखील न्याय करीत नाही.
Mnie jednak najmniej zależy na tym, czy będę przez was sądzony, czy przez sąd ludzki. Nawet sam siebie nie sądzę.
4 ४ कारण जरी माझा विवेक मला दोष देत नाही तरी त्यामुळे मी निर्दोष ठरतो असे नाही. प्रभू हाच माझा न्यायनिवाडा करणारा आहे.
Niczego bowiem w sobie nie dostrzegam, jednak nie jestem przez to usprawiedliwiony, lecz tym, który mnie sądzi, jest Pan.
5 ५ म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभू येईपर्यंत न्यायनिवाडा करुच नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंतःकरणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.
Dlatego nie sądźcie przed czasem, dopóki nie przyjdzie Pan, który oświetli to, co ukryte w ciemności, i ujawni zamiary serc. Wtedy każdy otrzyma pochwałę od Boga.
6 ६ आता, बंधूनो, तुमच्यासाठी मी या गोष्टी माझ्याकरिता व अपुल्लोसाकरीता उदाहरणाने लागू केल्या आहेत. यासाठी की, शास्त्रलेखापलीकडे कोणी स्वतःला न मानावे हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावे म्हणजे तुम्हापैकी कोणीही गर्वाने फुगून जाऊ नये म्हणजे एखाद्याला चांगली वागणूक देऊन दुसऱ्याला विरोध करू नये.
To wszystko zaś, bracia, odniosłem do samego siebie i do Apollosa ze względu na was, abyście się nauczyli na naszym przykładzie nie wykraczać ponad to, co jest napisane, żeby jeden nie pysznił się drugim przeciw innemu.
7 ७ कारण तुझ्यात व दुसऱ्यात फरक पाहतो तो कोण आहे? आणि तुला मिळाले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? ज्याअर्थी तुला सर्व मिळाले आहे, तर तुला मिळाले नाही अशी बढाई का मारतोस?
Kto bowiem czyni cię różnym? Cóż masz, czego byś nie otrzymał? A jeśli otrzymałeś, to dlaczego się chlubisz, jakbyś nie otrzymał?
8 ८ तुम्हास ज्याची गरज आहे ते सर्व आधीच तुमच्याकडे आहे. तुम्ही अगोदरच श्रीमंत झाला आहात, तृप्त झाला आहात, तुम्हास असे वाटते की आमच्याशिवाय तुम्ही राजे झाला आहात आणि तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर राजे बनलो असतो.
Już jesteście nasyceni, już jesteście bogaci, bez nas królujecie. I obyście królowali, abyśmy i my z wami królowali.
9 ९ कारण मला वाटते की देवाने आम्हास मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच मनुष्यांना जणू तमाशा असे झालो आहोत.
Bo uważam, że Bóg nas, apostołów, wyznaczył jako ostatnich, jakby na śmierć skazanych. Staliśmy się bowiem widowiskiem dla świata, aniołów i ludzi.
10 १० आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत!
My jesteśmy głupi dla Chrystusa, ale wy mądrzy w Chrystusie, my jesteśmy słabi, ale wy mocni, wy szanowani, a my wzgardzeni.
11 ११ अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, उघडे आहोत, अमानुषपणे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत.
Aż do tej chwili cierpimy głód i pragnienie, jesteśmy nadzy, policzkowani i tułamy się;
12 १२ आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, आमची निंदा होत असता आम्ही आशीर्वाद देतो.
I trudzimy się, pracując własnymi rękami. Gdy nas znieważają – błogosławimy, gdy nas prześladują – znosimy;
13 १३ जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत.
Gdy nam złorzeczą – modlimy się [za nich]. Staliśmy się jak śmiecie tego świata, [jak] odpadki u wszystkich, aż do tej chwili.
14 १४ मी तुम्हास हे लाजविण्यासाठी लिहित नाही, तर उलट मी तुम्हास माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करून देत आहे.
Nie piszę tego po to, aby was zawstydzić, ale napominam [was] jako moje umiłowane dzieci.
15 १५ कारण जरी तुम्हास ख्रिस्तामध्ये दहा हजार गुरू असले तरी पुष्कळ वडील नाहीत कारण ख्रिस्त येशूमध्ये शुभवर्तमानाच्या योगे मी तुम्हास जन्म दिला आहे.
Choćbyście bowiem mieli dziesięć tysięcy wychowawców w Chrystusie, to jednak nie [macie] wielu ojców. Ja bowiem przez ewangelię zrodziłem was w Chrystusie Jezusie.
16 १६ यास्तव मी तुम्हास बोध करतो की माझे अनुकरण करा.
Proszę was więc, bądźcie moimi naśladowcami.
17 १७ यासाठीच तीमथ्याला तुमच्याकडे पाठवले आहे. प्रभूमध्ये तो माझा प्रिय व विश्वासू पुत्र आहे. ज्याप्रमाणे मी सगळीकडे प्रत्येक मंडळीमध्ये शिकवतो, तसेच तो ख्रिस्तामधील माझ्या शिकवणुकीची आठवण करून देईल.
Dlatego to posłałem do was Tymoteusza, który jest moim umiłowanym synem i wiernym w Panu. On wam przypomni moje drogi w Chrystusie, jak nauczam wszędzie, w każdym kościele.
18 १८ पण जणू काय मी तुमच्याकडे येणार नाही, म्हणून काहीजण गर्वाने फुगले आहेत.
A niektórzy wbili się w pychę, jakbym nie miał przyjść do was.
19 १९ तरीही जर प्रभूची इच्छा असेल तर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि मग मला समजेल की, जे गर्वाने फुगून गेले ते किती चांगले आहेत हे पाहण्यासाठी नव्हे, तर ते किती सामर्थ्यशाली आहेत हे मी पाहीन.
Lecz przyjdę do was wkrótce, jeśli Pan zechce, i poznam nie słowa pysznych, ale [ich] moc.
20 २० कारण देवाचे राज्य बोलण्यावर अवलंबून नसते तर सामर्थ्यावर असते.
Królestwo Boże bowiem [przejawia się] nie w słowie, ale w mocy.
21 २१ तुम्हास काय पाहिजे? मी तुमच्याकडे तुम्हास शिक्षा करण्यासाठी काठी घेऊन यावे, की प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे?
Co chcecie? Czy mam przyjść do was z rózgą, czy z miłością i w duchu łagodności?