< 1 इतिहास 27 >
1 १ ही इस्राएल वंशजांच्या घराण्यातील प्रमुखांची यादी म्हणजे हजारांचे व शंभरांचे सरदार, त्याचप्रमाणे सैन्याचे अधिकारी, हे राजाची सेवा अनेक मार्गाने करत. प्रत्येक सैन्याचा गट हे वर्षाच्या सर्व महिन्यात सेवा करत असे. प्रत्येक गटात चोवीस हजार माणसे होती.
Now the number of the children of Israel, that is, the heads of families, and the captains of thousands and of hundreds, and the men in authority who were servants of the king in anything to do with the divisions which came in and went out month by month through all the months of the year, in every division were twenty-four thousand.
2 २ पहिल्या महिन्याच्या पहिल्या गटाचा प्रमुख याशबाम हा होता. याशबाम जब्दीएलचा पुत्र. याशबामच्या गटात चोवीस हजार जण होते.
Over the first division for the first month was Ishbaal, the son of Zabdiel; and in his division were twenty-four thousand.
3 ३ तो पेरेसच्या वंशातला होता. पहिल्या महिन्याच्या सर्व सेनाधिकाऱ्यांचा याशबाम प्रमुख होता.
He was of the sons of Perez, and the chief of all the captains of the army for the first month.
4 ४ अहोह इथला दोदय दुसऱ्या महिन्याच्या सैन्याचा प्रमुख असून मिक्लोथ हा त्यांचा नायक होता. त्याच्या गटात चोवीस हजार माणसे होती.
And over the division for the second month was Eleazar, the son of Dodai the Ahohite, the ruler; and in his division were twenty-four thousand.
5 ५ तिसऱ्या महिन्याचा तिसरा सेनापती बनाया. हा यहोयादाचा पुत्र. यहोयादा हा मुख्य याजक होता. बनायाच्या अधिपत्याखाली चोवीस हजार माणसे होती.
The third captain of the army for the third month was Benaiah, the son of Jehoiada the priest; and in his division were twenty-four thousand.
6 ६ हाच तो बनाया जो तीसांतला शूर व तीसांवर प्रमुख होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद बनायाच्याच गटात होता.
This is the same Benaiah who was the great man of the thirty, chief of the thirty; and in his division was Ammizabad his son.
7 ७ चौथ्या महिन्याचा चौथा सेनापती यवाबाचा भाऊ असाएल. त्यानंतर त्याचा पुत्र जबद्या हा पुढे आपल्या सेनापती झाला. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.
The fourth captain for the fourth month was Asahel, the brother of Joab, and Zebadiah his son after him; and in his division were twenty-four thousand.
8 ८ शम्हूथ हा पाचवा सेनापती. पाचव्या महिन्याचा हा सेनापती इज्राही होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.
The fifth captain for the fifth month was Shamhuth the Izrahite; and in his division were twenty-four thousand.
9 ९ इरा हा सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती. हा इक्केशाचा पुत्र असून तकोई नगरातला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.
The sixth captain for the sixth month was Ira, the son of Ikkesh the Tekoite; and in his division were twenty-four thousand.
10 १० सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलस पलोनी हा होता. हा एफ्राइमाच्या वंशातला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.
The seventh captain for the seventh month was Helez the Pelonite, of the sons of Ephraim; and in his division were twenty-four thousand.
11 ११ आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हूशाथी हा होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार जण होते.
The eighth captain for the eighth month was Sibbecai the Hushathite, of the Zerahites; and in his division were twenty-four thousand.
12 १२ नवव्या महिन्याचा नववा सरदार बन्यामिनी वंशातला अबीयेजर अनाथोथी हा होता. त्याच्या गटात चोवीस हजार सैनिक होते.
The ninth captain for the ninth month was Abiezer the Anathothite, of the Benjamites; and in his division were twenty-four thousand.
13 १३ दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती महरय. हा जेरह कुळातला असून नटोफाथी इथला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार पुरुष होते.
The tenth captain for the tenth month was Maharai the Netophathite, of the Zerahites; and in his division were twenty-four thousand.
14 १४ अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती बनाया. हा पिराथोनचा असून एफ्राइमाच्या वंशातला होता. त्याच्या गटात चोवीस हजार पुरुष होते.
The eleventh captain for the eleventh month was Benaiah the Pirathonite, of the sons of Ephraim; and in his division were twenty-four thousand.
15 १५ बाराव्या महिन्याचा बारावा प्रमुख हेल्दय. या अथनिएल कुळातला आणि नटोफाथी इथला होता. त्याच्या तुकडीत चोवीस हजार लोक होते.
The twelfth captain for the twelfth month was Heldai the Netophathite, of Othniel; and in his division were twenty-four thousand.
16 १६ इस्राएलाच्या वंशाचे हे प्रमुख असे होते: रऊबेन जिख्रीचा पुत्र अलियेजर. शिमोन: माकाचा पुत्र शफट्या.
And over the tribes of Israel: the ruler of the Reubenites was Eliezer, the son of Zichri; of the Simeonites, Shephatiah, the son of Maacah;
17 १७ लेवी कमुवेलचा पुत्र हशब्या. अहरोन: सादोक.
Of Levi, Hashabiah, the son of Kemuel; of Aaron, Zadok;
18 १८ यहूदा अलीहू. हा दावीदाचा एक भाऊ, इस्साखार: मीखाएलचा पुत्र अम्री.
Of Judah, Elihu, one of the brothers of David; of Issachar, Omri, the son of Michael;
19 १९ जबुलून ओबद्याचा पुत्र इश्माया. नफताली: अज्रीएलाचा पुत्र यरीमोथ.
Of Zebulun, Ishmaiah, the son of Obadiah; of Naphtali, Jerimoth, the son of Azriel;
20 २० एफ्राईम वंशाचा अजऱ्याचा पुत्र होशेथ. पश्चिम मनश्शेः पदायाचा पुत्र योएल.
Of the children of Ephraim, Hoshea, the son of Azaziah; of the half-tribe of Manasseh, Joel, the son of Pedaiah;
21 २१ गिलादातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाचा अधिकारी जखऱ्याचा पुत्र इद्दो. बन्यामीन वंशाचा अधिकारी अबनेरचा पुत्र यासीएल.
Of the half-tribe of Manasseh in Gilead, Iddo, the son of Zechariah; of Benjamin, Jaasiel, the son of Abner;
22 २२ दान वंशाचा यरोहामाचा पुत्र अजरेल. हे झाले इस्राएलांच्या वंशाचे प्रमुख.
Of Dan, Azarel, the son of Jeroham. These were the captains of the tribes of Israel.
23 २३ दावीदाने इस्राएलमधील पुरुषांची मोजदाद करायचे ठरवले. इस्राएलाची लोकसंख्या आकाशातील ताऱ्यांएवढी करीन असे परमेश्वराने सांगितले होते म्हणून इस्राएलांची लोकसंख्या वाढली होती. तेव्हा दावीदाने वीस वर्षाचे आणि त्याहून कमी वयाचे पुरुष यांची मोजणी केली नाही.
But David did not take the number of those who were under twenty years old, for the Lord had said that he would make Israel like the stars of heaven in number.
24 २४ सरुवेचा पुत्र यवाब याने मोजदाद करायला सुरुवात केली पण तो ते काम पूर्ण करु शकला नाही. देवाचा इस्राएलाच्या लोकांवर कोप झाला. त्यामुळे ही मोजणी दावीद राजाच्या बखरीत नोंदवलेली नाही.
The numbering was started by Joab, the son of Zeruiah, but he did not go on to the end; and because of it, wrath came on Israel and the number was not recorded in the history of King David.
25 २५ राजाच्या मालमत्तेची जपणूक करणारे आधिकारी पुढीलप्रमाणे: अदीएलाचा पुत्र अजमावेथ हा राजाच्या भांडारांचा प्रमुख होता. उज्जीयाचा पुत्र योनाथान शेतातल्या, नगरातल्या, गावातल्या आणि किल्ल्यातल्या भांडारांचा प्रमुख होता.
And Azmaveth, the son of Adiel, was controller of the king's property; Jonathan, the son of Uzziah, had control of all store-houses in country places and in the towns and little towns and strong places;
26 २६ कलूबचा पुत्र एज्री हा शेतात काम करणाऱ्यांवरचा प्रमुख होता.
Ezri, the son of Chelub, had authority over the field-workers and farmers;
27 २७ रामा येथील शिमी रामाथी हा द्राक्षीच्या मळ्यांवर होता. द्राक्षीच्या मळ्यांच्या उत्पन्नावर व द्राक्षरसाच्या कोठ्यांवर जब्दी शिफमी हा होता.
Shimei the Ramathite was responsible for the vine-gardens; Zabdi the Shiphmite was responsible for the produce of the vine-gardens and for all the stores of wine;
28 २८ गदेरी हा बाल-हानान जैतूनाची झाडे आणि पश्चिमेकडच्या डोंगराळ भागातली उंबराची झाडे याचा प्रमुख होता. योवाश जैतूनाच्या तेलाच्या कोठाराचा प्रमुख होता.
Baal-hanan the Gederite was responsible for the olive-trees and the sycamore-trees in the lowlands; and Joash for the stores of oil;
29 २९ आणि शित्रय शारोनी हा शारोनात चरणाऱ्या गुरांचा मुख्य होता. अदलयचा पुत्र शाफाट हा दऱ्याखोऱ्यातील गुरांवरचा मुख्य होता.
And Shitrai the Sharonite was responsible for the herds in the grass-lands of Sharon, and Shaphat, the son of Adlai, for those in the valleys;
30 ३० ओबील इश्माएली हा उंटांवरचा प्रमुख होता. येहद्या मेरोनोथ गाढवांवर मुख्य होता.
Obil the Ishmaelite had control of the camels and Jehdeiah the Meronothite of the she-asses;
31 ३१ याजीज हगारी मेंढरांवर मुख्य होता. दावीद राजाच्या मालमत्तेचे हे सर्व अधिकारी होते.
The flocks were in the care of Jaziz the Hagarite. All these were the controllers of King David's property.
32 ३२ दावीदाचा काका योनाथान हा सूज्ञ मंत्री आणि लेखक होता. हखमोनी याचा पुत्र यहीएल याच्यावर राज पुत्राच्या लालनपालनाची जबाबदारी होती.
Now Jonathan, David's father's brother, expert in discussion, and a man of good sense, was a scribe; and Jehiel the son of Hachmoni, had the care of the king's sons;
33 ३३ अहिथोफेल राजाचा मंत्री आणि हूशय राजाचा मित्र होता. हा अर्की लोकांपैकी होता.
And Ahithophel was the king's expert in discussion and Hushai the Archite was the king's friend.
34 ३४ अहिथोफेलाची जागा पुढे यहोयादा आणि अब्याथार यांनी घेतली. यहोयादा हा बनायाचा पुत्र. यवाब हा राजाचा सेनापती होता.
After Ahithophel was Jehoiada, the son of Benaiah, and Abiathar; and the captain of the king's army was Joab.