< במדבר 33 >
אלה מסעי בני ישראל אשר יצאו מארץ מצרים לצבאתם ביד משה ואהרן׃ | 1 |
१मोशे आणि अहरोन ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्राएल लोक सैन्याप्रमाणे मिसर देशामधून टोळ्यांनी बाहेर पडले. तेव्हा त्यांचे मुक्काम झाले ते हे आहेत.
ויכתב משה את מוצאיהם למסעיהם על פי יהוה ואלה מסעיהם למוצאיהם׃ | 2 |
२परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे ते कोठून निघाले ते कोठे गेले. त्यांच्या मजला त्यांच्या मुक्कामाप्रमाणे मोशेने लिहिल्या त्या या.
ויסעו מרעמסס בחדש הראשון בחמשה עשר יום לחדש הראשון ממחרת הפסח יצאו בני ישראל ביד רמה לעיני כל מצרים׃ | 3 |
३पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस सोडले. वल्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्राएलचे लोक विजयोत्सवात हात वर करून बाहेर पडले. मिसर देशाच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाहिले.
ומצרים מקברים את אשר הכה יהוה בהם כל בכור ובאלהיהם עשה יהוה שפטים׃ | 4 |
४मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले.
ויסעו בני ישראל מרעמסס ויחנו בסכת׃ | 5 |
५इस्राएल लोकांनी रामसेस सोडले आणि ते सुक्कोथाला गेले.
ויסעו מסכת ויחנו באתם אשר בקצה המדבר׃ | 6 |
६ते सुक्कोथाहून एथामाला गेले. लोकांनी तेथे रानाच्या काठावर तंबू दिले.
ויסעו מאתם וישב על פי החירת אשר על פני בעל צפון ויחנו לפני מגדל׃ | 7 |
७त्यांनी एथाम सोडले आणि ते पीहहीरोथला गेले. ते बआल-सफोन जवळ होते. लोकांनी मिग्दोलासमोर तंबू दिले.
ויסעו מפני החירת ויעברו בתוך הים המדברה וילכו דרך שלשת ימים במדבר אתם ויחנו במרה׃ | 8 |
८मग लोकांनी पीहहीरोथहून कूच करून आणि ते समुद्र ओलांडून रानात गेले. आणि एथाम रानात तीन दिवसाची मजल करून त्यांनी मारा येथे तळ दिला.
ויסעו ממרה ויבאו אילמה ובאילם שתים עשרה עינת מים ושבעים תמרים ויחנו שם׃ | 9 |
९लोकांनी मारा सोडले व ते एलिमाला जाऊन राहिले. तिथे बारा पाण्याचे झरे होते आणि सत्तर खजुराची झाडे होती.
ויסעו מאילם ויחנו על ים סוף׃ | 10 |
१०लोकांनी एलिम सोडले व त्यांनी तांबड्या समुद्राजवळ तंबू दिले.
ויסעו מים סוף ויחנו במדבר סין׃ | 11 |
११त्यांनी तांबडा समुद्र सोडला आणि सीन रानात तळ दिला.
ויסעו ממדבר סין ויחנו בדפקה׃ | 12 |
१२सीन रान सोडून ते दफका येथे तळ दिला.
ויסעו מדפקה ויחנו באלוש׃ | 13 |
१३लोकांनी दफका सोडले व ते आलूश येथे राहिले.
ויסעו מאלוש ויחנו ברפידם ולא היה שם מים לעם לשתות׃ | 14 |
१४लोकांनी आलूश सोडले व रफीदिमला तळ दिला. त्या जागी पिण्यासाठी पाणी नव्हते.
ויסעו מרפידם ויחנו במדבר סיני׃ | 15 |
१५लोकांनी रफीदिम सोडले व त्यांनी सीनाय रानात तळ दिला.
ויסעו ממדבר סיני ויחנו בקברת התאוה׃ | 16 |
१६त्यांनी सीनाय वाळवंट सोडले व किब्रोथ-हत्तव्वा येथे तळ दिला.
ויסעו מקברת התאוה ויחנו בחצרת׃ | 17 |
१७किब्रोथ-हत्तव्वा येथून ते हसेरोथला राहिले.
ויסעו מחצרת ויחנו ברתמה׃ | 18 |
१८हसेरोथ येथून त्यांनी रिथमाला तंबू दिला.
ויסעו מרתמה ויחנו ברמן פרץ׃ | 19 |
१९रिथमा सोडून ते रिम्मोन-पेरेसला आले.
ויסעו מרמן פרץ ויחנו בלבנה׃ | 20 |
२०रिम्मोन-पेरेस सोडल्यावर त्यांनी लिब्नाला तळ दिला.
ויסעו מלבנה ויחנו ברסה׃ | 21 |
२१लोकांनी लिब्ना सोडले व रिस्सा येथे तळ दिला.
ויסעו מרסה ויחנו בקהלתה׃ | 22 |
२२रिस्सा सोडून ते कहेलाथा येथे तळ दिला.
ויסעו מקהלתה ויחנו בהר שפר׃ | 23 |
२३लोकांनी कहेलाथा सोडले व त्यांनी शेफेर पर्वतावर तंबू ठोकले.
ויסעו מהר שפר ויחנו בחרדה׃ | 24 |
२४शेफेर पर्वत सोडून लोक हरादांत आले.
ויסעו מחרדה ויחנו במקהלת׃ | 25 |
२५लोकांनी हरादा सोडले व मकहेलोथ येथे तळ दिला.
ויסעו ממקהלת ויחנו בתחת׃ | 26 |
२६मकहेलोथ सोडून ते तहथाला आले.
ויסעו מתחת ויחנו בתרח׃ | 27 |
२७लोकांनी तहथा सोडले व ते तारहला आले.
ויסעו מתרח ויחנו במתקה׃ | 28 |
२८तारह सोडून त्यांनी मिथकाला तळ दिला.
ויסעו ממתקה ויחנו בחשמנה׃ | 29 |
२९लोकांनी मिथका सोडले व हशमोना येथे तंबू दिला.
ויסעו מחשמנה ויחנו במסרות׃ | 30 |
३०हशमोना सोडून ते मोसेरोथला आले.
ויסעו ממסרות ויחנו בבני יעקן׃ | 31 |
३१त्यांनी मोसेरोथ सोडले व बनेयाकानाला तळ दिला.
ויסעו מבני יעקן ויחנו בחר הגדגד׃ | 32 |
३२बनेयाकान सोडून ते होर-हागिदगादला आले.
ויסעו מחר הגדגד ויחנו ביטבתה׃ | 33 |
३३होर-हागिदगाद सोडून त्यांनी याटबाथाला तंबू ठोकले.
ויסעו מיטבתה ויחנו בעברנה׃ | 34 |
३४याटबाथा येथून ते अब्रोनाला आले.
ויסעו מעברנה ויחנו בעציון גבר׃ | 35 |
३५अब्रोनाहून त्यांनी एसयोन-गेबेर येथे तळ दिला.
ויסעו מעציון גבר ויחנו במדבר צן הוא קדש׃ | 36 |
३६लोकांनी एसयोन-गेबेर सोडले व त्यांनी त्सीन रानात कादेश येथे तंबू दिला.
ויסעו מקדש ויחנו בהר ההר בקצה ארץ אדום׃ | 37 |
३७लोकांनी कादेश सोडले व त्यांनी होरला तंबू ठोकले. अदोम देशाच्या सीमेवरील हा एक पर्वत होता.
ויעל אהרן הכהן אל הר ההר על פי יהוה וימת שם בשנת הארבעים לצאת בני ישראל מארץ מצרים בחדש החמישי באחד לחדש׃ | 38 |
३८याजक अहरोनाने परमेश्वराची आज्ञा पाळली व तो होर पर्वतावर गेला. अहरोन त्याजागी मरण पावला. हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याचा चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याचा पहिला दिवस होता.
ואהרן בן שלש ועשרים ומאת שנה במתו בהר ההר׃ | 39 |
३९अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षाचा होता.
וישמע הכנעני מלך ערד והוא ישב בנגב בארץ כנען בבא בני ישראל׃ | 40 |
४०कनान देशातील नेगेब जवळ अराद शहर होते. अराद येथे असलेल्या कनानी राजाने इस्राएलचे लोक येत असल्याबद्दल ऐकले.
ויסעו מהר ההר ויחנו בצלמנה׃ | 41 |
४१लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू दिला.
ויסעו מצלמנה ויחנו בפונן׃ | 42 |
४२त्यांनी सलमोना सोडले व ते पूनोनला आले.
ויסעו מפונן ויחנו באבת׃ | 43 |
४३पूनोन सोडून त्यांनी ओबोथाला तळ दिला.
ויסעו מאבת ויחנו בעיי העברים בגבול מואב׃ | 44 |
४४लोकांनी ओबोथ सोडले व ते इये-अबारीमाला आले. हे मवाब देशाच्या सीमेवर होते.
ויסעו מעיים ויחנו בדיבן גד׃ | 45 |
४५मग ईयीमाहून (इये-अबारिम) ते दीबोन-गादला आले.
ויסעו מדיבן גד ויחנו בעלמן דבלתימה׃ | 46 |
४६लोकांनी दीबोन-गाद सोडले व अलमोन-दिलाथाईमाला आले.
ויסעו מעלמן דבלתימה ויחנו בהרי העברים לפני נבו׃ | 47 |
४७अलमोन-दिलाथाईमहून त्यांनी नबोजवळच्या अबारीम पर्वतावर तंबू दिला.
ויסעו מהרי העברים ויחנו בערבת מואב על ירדן ירחו׃ | 48 |
४८लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरीहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते.
ויחנו על הירדן מבית הישמת עד אבל השטים בערבת מואב׃ | 49 |
४९त्यांनी मवाबाच्या मैदानात यार्देनतीरी त्यांचे तंबू बेथ-यशिमोथापासून आबेल-शिट्टीमापर्यंत होते.
וידבר יהוה אל משה בערבת מואב על ירדן ירחו לאמר׃ | 50 |
५०आणि मवाबाच्या मैदानामध्ये यार्देनेपाशी यरीहोजवळ परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
דבר אל בני ישראל ואמרת אלהם כי אתם עברים את הירדן אל ארץ כנען׃ | 51 |
५१इस्राएल लोकांशी बोल, त्यांना या गोष्टी सांग, तुम्ही यार्देन नदी पार कराल. तुम्ही कनान देशात जाल.
והורשתם את כל ישבי הארץ מפניכם ואבדתם את כל משכיתם ואת כל צלמי מסכתם תאבדו ואת כל במתם תשמידו׃ | 52 |
५२तिथे जे लोक तुम्हास आढळतील त्यांना देशातून घालवा. तेव्हा तुम्ही त्यांच्या कोरीव पुतळयांचा आणि मूर्तीचा नाश करा. त्यांच्या उंचावरच्या पुजेच्या ठिकाणांचा नाश करा.
והורשתם את הארץ וישבתם בה כי לכם נתתי את הארץ לרשת אתה׃ | 53 |
५३तुम्ही तो प्रदेश घ्या आणि तिथेच रहा. कारण मी हा देश तुम्हास वतन करून दिला आहे.
והתנחלתם את הארץ בגורל למשפחתיכם לרב תרבו את נחלתו ולמעט תמעיט את נחלתו אל אשר יצא לו שמה הגורל לו יהיה למטות אבתיכם תתנחלו׃ | 54 |
५४तुमच्यातील प्रत्येक कुळाने चिठ्ठ्या टाकून देश वतन करून घ्या. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल. लहान कुळाला लहान भाग मिळेल. एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल. आपआपल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हास वतन मिळेल.
ואם לא תורישו את ישבי הארץ מפניכם והיה אשר תותירו מהם לשכים בעיניכם ולצנינם בצדיכם וצררו אתכם על הארץ אשר אתם ישבים בה׃ | 55 |
५५परंतु तुम्ही आपणापुढून त्या देशात राहणाऱ्यांना बाहेर घालवले नाही जर तुम्ही त्यांना तिथेच राहू दिले तर ते तुम्हास डोळ्यातील कुसळासारखे तुमच्या कुशीत काट्यासारखे बोचतील. तुम्ही ज्या देशात रहाल त्या देशात ते अनेक संकटे आणतील.
והיה כאשר דמיתי לעשות להם אעשה לכם׃ | 56 |
५६मी तुमच्याबाबत काय करणार आहे ते मी तुम्हास दाखवले आहे. आणि जर तुम्ही त्यांना त्या देशात राहू दिले तर मी ते सर्व तुमच्याबाबतीत करीन.