< Habakkuk 3 >

1 The prayer of Habakkuk the prophet:
संदेष्टा हबक्कूकची शिगयोनोथावर प्रार्थनाः
2 Yahweh, I have heard your report, and I am afraid. Yahweh, revive your work in the midst of these times; in the midst of these times make it known; remember to have compassion in your wrath.
परमेश्वरा, मी तुझी वार्ता ऐकली, आणि मी भयभीत झालो. हे परमेश्वर, तू आपले कार्य या समयामध्ये पुनर्जीवित कर; या समयामध्ये ते माहित करून दे. तुझ्या क्रोधात आमच्यावर दया करण्याची आठवण ठेव.
3 God came from Teman, and the Holy One from Mount Paran. (Selah) His glory covered the heavens, and the earth was full of his praise.
तेमानाहून देव येत आहे, पारान पर्वतावरून पवित्र परमेश्वर येत आहे, सेला. परमेश्वराचे वैभव स्वर्ग झाकते, आणि त्याच्या स्तुतीने पृथ्वी भरली.
4 With brightness like the light, two-pronged rays flash from his hand; and there he hid his power.
त्याच्या हातातली किरणे प्रकाशासारखी चमकत होते आणि परमेश्वराने तेथे त्याचे सामर्थ्य ठेवले आहे.
5 Deadly disease went before him, and the plague followed him.
रोगराई त्याच्या मुखासमोरून गेली, आणि मरी त्याच्या पायांजवळून निघते.
6 He stood and measured the earth; he looked and shook the nations. Even the eternal mountains were shattered, and the everlasting hills bowed down. His path is everlasting.
तो उभा राहिला आणि पृथ्वी मापली; त्याने पाहिले आणि राष्ट्रांचा थरकाप झाला. सर्वकाळच्या पर्वतांचेसुद्धा तुकडे होऊन ते विखरले गेले आणि सर्वकाळच्या टेकड्या खाली नमल्या, त्याचा मार्ग सदासर्वकाळ आहे.
7 I saw the tents of Cushan in affliction, and the fabric of the tents in the land of Midian trembling.
कूशानचे तंबू संकटात असलेले मी पाहिले, मिद्यान देशातील कनाती भीतीने कापत होत्या.
8 Was Yahweh angry at the rivers? Was your wrath against the rivers, or your fury against the sea, when you rode upon your horses and your victorious chariots?
परमेश्वरा, तू नद्यांवर रागावला होतास का? झऱ्यांवर तुझा राग होता का? समुद्रावर तू भडकला होता का? म्हणूनच तू आपल्या घोड्यांवर आणि आपल्या तारणाच्या रथांवर आरुढ झाला होतास काय?
9 You have brought out your bow without a cover; you put arrows to your bow! (Selah) You divided the earth with rivers.
तू आपले धनुष्य गवसणी बाहेर काढले आहे; तू आपल्या धनुष्यावर बाण चढवला आहे! (सेला). तू पृथ्वीला नद्यांद्वारे दुभागले आहे.
10 The mountains saw you and twisted in pain. Downpours of water passed over them; the deep sea raised a shout. It lifted up its waves.
१०पर्वत तुला पाहून वेदनेमध्ये वितळले! जलप्रवाह त्याच्यावरून चालला आहे; खोल समुद्राने आवाज उंचावला आहे, समुद्राने आपला हात उंचावला आहे.
11 The sun and moon stood still in their high places at the flash of your arrows as they fly, at the lightning of your flashing spear.
११चंद्र व सूर्य आपल्या जागी स्तब्ध झालेत, त्यांचे तेज लोपले. तुझे बाण सुटत असता त्यांच्या तेजाने, आणि तुझ्या झळकत्या भाल्याच्या चकाकीने ते दूर गेले आहेत!
12 You have marched over the earth with indignation. In wrath you have threshed the nations.
१२तू रागाच्या भरात पृथ्वीवरून चाल केली आणि क्रोधाने राष्ट्रे पायाखाली तुडविलीस.
13 You went out for the salvation of your people, for the salvation of your anointed one. You shatter the head of the house of the wicked to lay bare from the base up to the neck. (Selah)
१३तू तुझ्या लोकांच्या तारणासाठी, तुझ्या अभिषिक्ताच्या तारणासाठी पुढे गेलास! तू दुष्टाच्या घराचा माथा छिन्नविछिन्न केला आहे, व त्याचा पाया मानेपर्यंत उघडा केला आहे, सेला!
14 You have pierced the head of his warriors with his own arrows since they came like a storm to scatter us, their gloating was like one who devours the poor in a hiding place.
१४ते प्रचंड वादळाप्रमाणे आम्हास पांगवण्यास आले असता, तू त्यांचेच भाले त्यांच्या सैनिकांच्या डोक्यात भोसकले, गरीब मनुष्यास एकांतात खाऊन टाकावे, ह्यामध्ये त्यांची तृप्तता होती.
15 You have traveled over the sea with your horses, and heaped up the great waters.
१५पण तू तुझ्या घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावलेस, त्यामुळे समुद्र घुसळला गेला.
16 I heard, and my inner parts trembled! My lips quivered at the sound. Decay comes into my bones, and under myself I tremble as I wait quietly for the day of distress to come upon the people who invade us.
१६मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले, माझे ओठ आवाजाने कापले! माझी हाडे कुजण्यास सुरूवात झाली आहे, आणि मी आपल्या ठिकाणी कापत आहे. म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची, शत्रू आमच्यावर हल्ला करील, त्या दिवसाची वाट पाहत आहे.
17 Though the fig tree does not bud and there is no produce from the vines; and though the produce of the olive tree disappoints and the fields yield no food; and though the flock is cut off from the fold and there are no cattle in the stalls, this is what I will do.
१७जरी अंजिराच्या झाडांनी फळ दिले नाही आणि द्राक्षवेलींना काही उपज आले नाही, जैतूनाच्या झाडाच्या उपजाने जरी निराशा झाली आणि शेतांतून अन्न उगवले नाही, कळप वाड्यातून नाहीसे झाले असले, गोठ्यात गाई-गुरे उरली नसली,
18 Still, I will rejoice in Yahweh. I will be joyful because of the God of my salvation.
१८तरी मी परमेश्वराठायी आनंद करीन, माझ्या तारणाऱ्या देवाजवळ उल्लास करीन.
19 The Lord Yahweh is my strength and he makes my feet like the deer's. He makes me go forward on my high places. —To the music director, on my stringed instruments.
१९प्रभू परमेश्वर माझे बळ आहे, तो माझे पाय हरणींच्या पायासारखे करतो, आणि तो मला माझ्या उंचस्थानावर चालवील. (मुख्य वाजवणाऱ्यासाठी, माझ्या तंतुवाद्यावरचे गायन.)

< Habakkuk 3 >