< Jeremiah 22 >

1 Thus saith the LORD; Go down to the house of the king of Judah, and speak there this word,
परमेश्वर असे म्हणतो, “यहूदाच्या राजाच्या घरास खाली जा आणि हे वचन तीथे घोषीत कर:
2 And say, Hear the word of the LORD, O king of Judah, that sittest upon the throne of David, thou, and thy servants, and thy people that enter in by these gates:
आणि तू असे म्हण, ‘यहूदाच्या राजा, जो तू दावीदाच्या सिंहासनावर बसतो, तो तू परमेश्वराचे वचन ऐक, आणि तू, तुझे चाकर आणि तुझे लोक जे या दारातून आत जातात, तेही ऐको.
3 Thus saith the LORD; Execute ye judgment and righteousness, and deliver the spoiled out of the hand of the oppressor: and do no wrong, do no violence to the stranger, the fatherless, nor the widow, neither shed innocent blood in this place.
परमेश्वर असे म्हणतो, “न्याय आणि न्यायीपण कर, आणि जो कोणी लूटलेला आहे, त्यास पीडणाऱ्याच्या हातातून सोडव. तुझ्या देशात राहणाऱ्या परदेशी, अनाथ, विधवा, कोणालाही त्रास देऊ नको, त्यांचे काही वाईट करू नको किंवा निरपराध्यांचे रक्त पाडू नको.
4 For if ye do this thing indeed, then shall there enter in by the gates of this house kings sitting upon the throne of David, riding in chariots and on horses, he, and his servants, and his people.
कारण जर तुम्ही असे केले, तर दावीदाच्या सिंहासनावर बसणारे राजे यरूशलेममध्ये, त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर, रथांतून आणि घोड्यावर स्वार या घराच्या दारातून आत जातील, तो व त्यांचे चाकर व त्याचे लोकही आत जातील.
5 But if ye will not hear these words, I swear by myself, saith the LORD, that this house shall become a desolation.
पण जर तुम्ही जे वचन मी बोललो ते ऐकले नाही, तर परमेश्वर असे म्हणतो पाहा, मी माझीच शपथ वाहतो की या राजवाड्यांचा नाश होईल.”
6 For thus saith the LORD unto the king’s house of Judah; Thou [art] Gilead unto me, [and] the head of Lebanon: [yet] surely I will make thee a wilderness, [and] cities [which] are not inhabited.
कारण यहूदाचा राजाच्या राजवाड्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो की, गिलादाप्रमाणे किंवा लबानोनच्या शिखराप्रमाणे तू आहेस, पण तरीही मी त्यास वाळवंटामध्ये पालटून टाकीन. निर्जन शहराप्रमाणे तो होईल.
7 And I will prepare destroyers against thee, every one with his weapons: and they shall cut down thy choice cedars, and cast [them] into the fire.
कारण मी तुझ्याविरूद्ध नाश करण्यास विध्वंसक पाठवायचे मी निवडले आहे. शस्त्रांसहित मनुष्ये, ते तुझे चांगले गंधसरु तोडून त्यांना अग्नीत पाडतील.
8 And many nations shall pass by this city, and they shall say every man to his neighbour, Wherefore hath the LORD done thus unto this great city?
“अनेक राष्ट्रे या नगरीजवळून जातील. त्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्या शेजाऱ्याला विचारेल ‘या भव्य नगरीच्या बाबतीत परमेश्वराने असे भयंकर कृत्य का केले?’
9 Then they shall answer, Because they have forsaken the covenant of the LORD their God, and worshipped other gods, and served them.
ह्यावर दुसरा उत्तर देईल, ‘यहूदातील लोक परमेश्वर देवाबरोबर झालेल्या कराराप्रमाणे वागले नाहीत. त्यांनी अन्य दैवतांना पूजले आणि त्यांच्या पाया पडले.”
10 Weep ye not for the dead, neither bemoan him: [but] weep sore for him that goeth away: for he shall return no more, nor see his native country.
१०मेलेल्यां करिता रडू नको आणि शोक करू नको, परंतू जे कोणी पाडावपणात गेले आहेत त्याच्यासाठी रडा, कारण तो परतून त्याची जन्मभूमी पुन्हा कधीही पाहणार नाही.
11 For thus saith the LORD touching Shallum the son of Josiah king of Judah, which reigned instead of Josiah his father, which went forth out of this place; He shall not return thither any more:
११कारण यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा शल्लूम ह्याच्याबद्दल परमेश्वर असे म्हणतो: जो त्याचा पिता योशीया याच्याठिकाणी राज्य करीत होता, त्याने आपले ठिकाण सोडले आहे आणि तो परत येणार नाही.
12 But he shall die in the place whither they have led him captive, and shall see this land no more.
१२ज्या ठिकाणी त्यास निर्वासित केले, तो तेथेच मरणार आणि तो पुन्हा कधी हा राष्ट्र पाहणार नाही.
13 Woe unto him that buildeth his house by unrighteousness, and his chambers by wrong; [that] useth his neighbour’s service without wages, and giveth him not for his work;
१३जो अनीतीने आपले घर बांधतो आणि आपली वरची माडी अन्यायने बांधतो, जो आपली सेवा मोल न देता करून घेतो, त्यास हाय हाय!
14 That saith, I will build me a wide house and large chambers, and cutteth him out windows; and [it is] cieled with cedar, and painted with vermilion.
१४जो कोणी असे म्हणतो, “मी माझ्यासाठी उंच असे घर आणि विस्तीर्ण माड्या बांधीन.” जो आपल्यासाठी मोठ्या खिडक्या असलेले घर बांधतो. तो तक्तपोशीसाठी गंधसरु वापरतो आणि तक्तपोशीला लाल रंग देतो. त्यास हाय हाय!
15 Shalt thou reign, because thou closest [thyself] in cedar? did not thy father eat and drink, and do judgment and justice, [and] then [it was] well with him?
१५तुझ्या घरात खूप गंधसरु आहे म्हणून चांगला राजा आहेस काय? तुझे वडील खात, पीत नव्हते काय? तरी ते न्याय आणि नितीमानता करत असत. तेव्हा त्यांच्याबाबतीत सर्व सुरळीत झाले.
16 He judged the cause of the poor and needy; then [it was] well [with him: was] not this to know me? saith the LORD.
१६तो गरीब व गरजूंच्या बाजूने न्याय करीत असे, मला ओळखणे हेच नव्हे काय? परमेश्वर असे म्हणतो.
17 But thine eyes and thine heart [are] not but for thy covetousness, and for to shed innocent blood, and for oppression, and for violence, to do [it].
१७पण तुझ्या दृष्टीस आणि हृदयात अनीतीने मिळवलेली मिळकत आणि निर्दोष व्यक्तीचे रक्त पाडणे, आणि पीडणे व जूलूम करणे या शिवाय काही नाही.
18 Therefore thus saith the LORD concerning Jehoiakim the son of Josiah king of Judah; They shall not lament for him, [saying], Ah my brother! or, Ah sister! they shall not lament for him, [saying], Ah lord! or, Ah his glory!
१८यास्तव यहूदाचा राजा, योशीया, याचा मुलगा यहोयाकीम ह्याविषयी परमेश्वर असे म्हणतो की, हाय! माझ्या बंधू, किंवा हाय! माझ्या बहिणी, असे बोलून ते त्याच्याकरीता शोक करणार नाही. “हाय! स्वामी! हाय! प्रभू! असे बोलून ते विलाप करणार नाही.
19 He shall be buried with the burial of an ass, drawn and cast forth beyond the gates of Jerusalem.
१९एखाद्या गाढवाला पुरावे तसे यरूशलेममधील लोक यहोयाकीमचे दफन करतील. ते त्याचा मृतदेह ओढत नेऊन यरूशलेमेच्या वेशीबाहेर फेकून देतील.”
20 Go up to Lebanon, and cry; and lift up thy voice in Bashan, and cry from the passages: for all thy lovers are destroyed.
२०“लबानोनच्या डोंगरावर जाऊन मोठ्याने ओरड. बाशानच्या डोंगरात तुझा आवाज उंच कर. अबारीमच्या डोंगरापासून ओरड, कारण तुझ्या सर्व मित्रांचा नाश केला जाईल.
21 I spake unto thee in thy prosperity; [but] thou saidst, I will not hear. This [hath been] thy manner from thy youth, that thou obeyedst not my voice.
२१तू सुरक्षित असता मी तुझ्याशी बोललो, पण तू म्हणालीस, मी ऐकणार नाही. तू तरुण असल्यापासून अशीच वागत आलीस. कारण तू माझी वाणी ऐकली नाहीस.
22 The wind shall eat up all thy pastors, and thy lovers shall go into captivity: surely then shalt thou be ashamed and confounded for all thy wickedness.
२२वारा तुझ्या सर्व मेंढपाळांना लांब पाळील, आणि तुझे मित्र पाडावपणात जातील. मग खरोखरच तू निराश होशील आणि तू केलेल्या सर्व वाईट गोष्टींमुळे लज्जित व फजीत होशील.
23 O inhabitant of Lebanon, that makest thy nest in the cedars, how gracious shalt thou be when pangs come upon thee, the pain as of a woman in travail!
२३जो तू राजा आहेस, तू आपल्या लबानोनाच्या राणात, जे तू गंधसरुमध्ये आपले घरटे करतोस, पण जेव्हा तुला यातनांच्या प्रसूतिवेदना जसे बाळंतपणे होतात, तेव्हा तू कशी केवीलवाणी होशील.”
24 [As] I live, saith the LORD, though Coniah the son of Jehoiakim king of Judah were the signet upon my right hand, yet would I pluck thee thence;
२४“परमेश्वर म्हणतो, मी जिवंत आहे, यहोयाकीमचा, यहूदाच्या राजा, याचा मुलगा, कोन्या, जरी तू माझ्या उजव्या हातातील मुद्रा असलास, तरीही मी तुला उखडून टाकले असते.
25 And I will give thee into the hand of them that seek thy life, and into the hand [of them] whose face thou fearest, even into the hand of Nebuchadrezzar king of Babylon, and into the hand of the Chaldeans.
२५कारण मी तुला, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व खास्दी, व जे तुझा जीव घेऊ पाहतात, आणि ज्यांना तू घाबरतो त्यांच्या हाती सोपवणार.
26 And I will cast thee out, and thy mother that bare thee, into another country, where ye were not born; and there shall ye die.
२६मी, तुला व तुझ्या आईला, जिने तुला जन्म दिला, तिला जो राष्ट्र तुमची जन्मभूमी नाही तिथे फेकून देईन. तेथेच तुम्ही दोघे मराल.
27 But to the land whereunto they desire to return, thither shall they not return.
२७आणि तुम्ही या भूमीत परत यायला पाहाल, पण ते परत येणार नाही.”
28 [Is] this man Coniah a despised broken idol? [is he] a vessel wherein [is] no pleasure? wherefore are they cast out, he and his seed, and are cast into a land which they know not?
२८कोणीतरी फेकून दिलेल्या, फुटक्या भांड्याप्रमाणे कोन्या हा आहे काय? कोणालाही नको असलेल्या भांड्याप्रमाणे यहोयाकीन आहे काय? तो व त्याची मुले का बाहेर फेकले आहेत? आणि माहीत नाही अश्या परक्या देशात त्यांना का फेकून देण्यात आले?
29 O earth, earth, earth, hear the word of the LORD.
२९हे भूमी, भूमी, भूमी, परमेश्वराचे वचन ऐक!
30 Thus saith the LORD, Write ye this man childless, a man [that] shall not prosper in his days: for no man of his seed shall prosper, sitting upon the throne of David, and ruling any more in Judah.
३०परमेश्वर असे म्हणतो, “यहोयाकीनाबद्दल हे लिहून घे. तो नि: संतान होईल, ‘तो त्याच्या दिवसात यशस्वी होणार नाही आणि त्याची कोणतीही संतान यशस्वी होऊन दावीदाच्या सिंहासनावर बसून यहूदावर राज्य करणार नाही.”

< Jeremiah 22 >