< 2 Samuel 20 >

1 And there happened to be there a man of Belial, whose name [was] Sheba, the son of Bichri, a Benjamite: and he blew a trumpet, and said, We have no part in David, neither have we inheritance in the son of Jesse: every man to his tents, O Israel.
शबा नावाचा एक मनुष्य तेथे होता. हा बिक्रीचा मुलगा. बन्यामीन घराण्यातील हा शबा अगदी कुचकामी पण खोडसाळ प्रवृत्तीचा होता. त्याने एकदा रणशिंग फुंकले आणि लोकांस गोळा केले. आणि त्यांना म्हणाला, दावीदाकडे आपला भाग नाही. या इशायच्या मुलात आपला वाटा नाही. इस्राएलींनो, आपापल्या डेऱ्यात परत चला.
2 So every man of Israel went up from after David, [and] followed Sheba the son of Bichri: but the men of Judah clave unto their king, from Jordan even to Jerusalem.
हे ऐकून सर्व इस्राएल लोक दावीदाला सोडून बिक्रीचा मुलगा शबा याच्या मागे गेले. पण यहूदी लोक मात्र यार्देन नदीपासून यरूशलेमपर्यंत राजाच्या पाठीशी राहिले.
3 And David came to his house at Jerusalem; and the king took the ten women [his] concubines, whom he had left to keep the house, and put them in ward, and fed them, but went not in unto them. So they were shut up unto the day of their death, living in widowhood.
दावीद यरूशलेम येथील आपल्या घरी परतला. आपल्या दहा दासींना त्याने घराच्या निगराणीसाठी मागे ठेवले होते त्यांना त्याने एका खास घरात ठेवले. आणि त्यांच्यावर पहारा ठेवला. मरेपर्यंत या स्त्रिया तेथेच राहिल्या दावीदाने त्यांच्या उदरनिर्वाहाची सगळी नीट व्यवस्था केली पण पुन्हा त्यांच्याशी संबंध ठेवले नाहीत. त्यामुळे शेवटपर्यंत त्यांची स्थिती विधवेसारखी होती.
4 Then said the king to Amasa, Assemble me the men of Judah within three days, and be thou here present.
राजा अमासास म्हणाला, यहूदाच्या लोकांस तीन दिवसात येऊन मला भेटायला सांग. त्यावेळी तूही बरोबर राहा.
5 So Amasa went to assemble [the men of] Judah: but he tarried longer than the set time which he had appointed him.
तेव्हा अमासा यहूद्यांना बोलवून आणायला रवाना झाला. पण राजाने सांगितल्यापेक्षा जास्त वेळ त्यास लागला.
6 And David said to Abishai, Now shall Sheba the son of Bichri do us more harm than [did] Absalom: take thou thy lord’s servants, and pursue after him, lest he get him fenced cities, and escape us.
दावीद अबीशयला म्हणाला, अबशालोमापेक्षाही हा बिक्रीचा मुलगा शबा आपल्या दृष्टीने धोकादायक आहे. तेव्हा माझ्या हाताखालच्यांना घेऊन त्याचा पाठलाग कर. तटबंदी असलेल्या नगरात तो जायच्या आधीच त्यास गाठायला हवे. एकदा तो मजबूत बंदोबस्त असलेल्या नगरात शिरला की त्यास पकडणे अवघड जाईल.
7 And there went out after him Joab’s men, and the Cherethites, and the Pelethites, and all the mighty men: and they went out of Jerusalem, to pursue after Sheba the son of Bichri.
तेव्हा यवाब, बिक्रीचा मुलगा शबा याच्या पाठलागासाठी यरूशलेमेहून निघाला. त्याने बरोबर आपली माणसे, करेथी, पलेथी तसेच इतर सैनिक घेतले.
8 When they [were] at the great stone which [is] in Gibeon, Amasa went before them. And Joab’s garment that he had put on was girded unto him, and upon it a girdle [with] a sword fastened upon his loins in the sheath thereof; and as he went forth it fell out.
यवाब आणि त्याचे सैन्य गिबोनजवळच्या मोठ्या पहाडापाशी आले तेव्हा अमासा त्यांना सामोरा आला. यवाबाच्या अंगावर चिलखत होते. त्याने कमरबंद बांधला होता आणि म्यानात तलवार होती. यवाब आमासाच्या दिशेने चालू लागला तेव्हा त्याची तलवार म्यानातून निसटून पडली. यवाबाने ती उचलली आणि हातात धरली.
9 And Joab said to Amasa, [Art] thou in health, my brother? And Joab took Amasa by the beard with the right hand to kiss him.
त्याने अमासास विचारले, तुझे सर्व कुशल आहे ना? आणि अमासाचे चुंबन घेण्यास यवाबाने आपला उजव्या हाताने अमासाची दाढी धरून त्यास पुढे खेचले.
10 But Amasa took no heed to the sword that [was] in Joab’s hand: so he smote him therewith in the fifth [rib], and shed out his bowels to the ground, and struck him not again; and he died. So Joab and Abishai his brother pursued after Sheba the son of Bichri.
१०यवाबाच्या डाव्या हातातील तलवारीकडे अमासाचे लक्ष नव्हते. पण तेवढ्यात यवाबाने अमासाच्या पोटात तलवार खुपसली, आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. यवाबाला पुन्हा वार करावा लागलाच नाही. अमासा गतप्राण झाला. यवाब आणि त्याचा भाऊ अबीशय यांनी बिक्रीचा मुलगा शबा याचा शोध चालूच ठेवला.
11 And one of Joab’s men stood by him, and said, He that favoureth Joab, and he that [is] for David, [let him go] after Joab.
११यवाबाच्या सैन्यातील एक तरुण सैनिक अमासाच्या मृतदेहाजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “यवाब आणि दावीदाला ज्यांचा पाठिंबा आहे त्यांनी यवाबामागे जावे.”
12 And Amasa wallowed in blood in the midst of the highway. And when the man saw that all the people stood still, he removed Amasa out of the highway into the field, and cast a cloth upon him, when he saw that every one that came by him stood still.
१२अमासा रस्त्याच्या मध्याभागी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. येणारा जाणारा प्रत्येकजण थांबून हे दृष्य पाहतोय हे त्या तरुण सैनिकाच्या लक्षात आले. तेव्हा त्याने ते प्रेत रस्त्यावरून ढकलत शेतात नेऊन टाकले. त्याच्यावर एक कापड अंथरले.
13 When he was removed out of the highway, all the people went on after Joab, to pursue after Sheba the son of Bichri.
१३अमासाचा देह तिथून हलवल्यावर लोक ते सरळ ओलांडून यवाबाच्या मागे चालू लागले. मग त्यांनी यवाबाबरोबर बिक्रीचा पुत्र शबा याचा पाठलाग सुरू केला.
14 And he went through all the tribes of Israel unto Abel, and to Beth-maachah, and all the Berites: and they were gathered together, and went also after him.
१४इस्राएलांच्या सर्व वंशांमधून जाऊन, शबा आबेल व बेथ माका येथे गेला. सर्व बेरीही एकत्र येऊन शबाला मिळाले.
15 And they came and besieged him in Abel of Beth-maachah, and they cast up a bank against the city, and it stood in the trench: and all the people that [were] with Joab battered the wall, to throw it down.
१५यवाब आपल्या मनुष्यांसहीत आबेल-बेथ-माका येथे पोचला. त्याच्या सैन्याने नगराला वेढा दिला. तटबंदीभोवती त्यांनी माती कचऱ्याचा ढीग रचला. त्याच्यावरून भिंत पार करणे त्यांना सोयीस्कर ठरले असते. त्याचबरोबर त्यांनी भिंत पाडण्यासाठी भिंतीतील दगड फोडायला सुरुवात केली.
16 Then cried a wise woman out of the city, Hear, hear; say, I pray you, unto Joab, Come near hither, that I may speak with thee.
१६नगरात एक चाणाक्ष स्त्री राहत होती. तिने नगरातून मोठ्याने ओरडून सांगितले, “माझे ऐका. यवाबाला येथे यायला सांगा. मला त्याच्याशी काही बोलायचे आहे.”
17 And when he was come near unto her, the woman said, [Art] thou Joab? And he answered, I [am he]. Then she said unto him, Hear the words of thine handmaid. And he answered, I do hear.
१७यवाब तिच्याशी बोलायला गेला. तिने त्यास तूच यवाब का, म्हणून विचारले. यवाबाने होकार भरला. तेव्हा ती म्हणाली, माझे ऐक. यवाब म्हणाला, “सांग मी ऐकतोय.”
18 Then she spake, saying, They were wont to speak in old time, saying, They shall surely ask [counsel] at Abel: and so they ended [the matter].
१८मग ती स्त्री म्हणाली, “पूर्वी लोक म्हणत, गरज पडली की आबेलमध्ये यावे, म्हणजे मागाल ते मिळते.”
19 I [am one of them that are] peaceable [and] faithful in Israel: thou seekest to destroy a city and a mother in Israel: why wilt thou swallow up the inheritance of the LORD?
१९इस्राएलमधील शांतताप्रिय, विश्वासू लोकांपैकी मी एक आहे. इस्राएलच्या एका महत्वाच्या शहराची तुम्ही नासधूस करत आहात. परमेश्वराच्या मालकीच्या वस्तूची तुम्ही मोडतोड का करता?
20 And Joab answered and said, Far be it, far be it from me, that I should swallow up or destroy.
२०यवाब म्हणाला, “मला कशाचाच नाश करायची इच्छा नाही. तुमच्या नगराची नासधूस मी करू इच्छित नाही.”
21 The matter [is] not so: but a man of mount Ephraim, Sheba the son of Bichri by name, hath lifted up his hand against the king, [even] against David: deliver him only, and I will depart from the city. And the woman said unto Joab, Behold, his head shall be thrown to thee over the wall.
२१पण एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील बिक्रीचा पुत्र शबा नावाचा एक मनुष्य तुमच्या नगरात आहे. दावीद राजाविरुध्द त्याने बंड केले आहे. त्यास माझ्यापुढे हजर केलेत तर नगराला धक्कालावणार नाही. तेव्हा ती स्त्री यवाबाला म्हणाली, ठीक आहे. त्याचे मुंडके भिंतीवरून तुझ्याकडे टाकण्यात येईल.
22 Then the woman went unto all the people in her wisdom. And they cut off the head of Sheba the son of Bichri, and cast [it] out to Joab. And he blew a trumpet, and they retired from the city, every man to his tent. And Joab returned to Jerusalem unto the king.
२२मग तिने गावातील लोकांस शहाणपणाने आपले म्हणणे पटवून दिले. तेव्हा लोकांनी बिक्रीचा पुत्र शबा याचे मुंडके धडावेगळे करून ते यवाबाकडे तटबंदी पलीकडे फेकले. यवाबाने रणशिंग फुंकले आणि सैन्याने नगर सोडले. जो तो आपल्या घरी परतला आणि यवाब यरूशलेम येथे राजाकडे आला.
23 Now Joab [was] over all the host of Israel: and Benaiah the son of Jehoiada [was] over the Cherethites and over the Pelethites:
२३यवाब इस्राएलचा सेनापती होता. यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता.
24 And Adoram [was] over the tribute: and Jehoshaphat the son of Ahilud [was] recorder:
२४अदोराम हा कष्टकरी लोकांचा प्रमुख होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस होता.
25 And Sheva [was] scribe: and Zadok and Abiathar [were] the priests:
२५शबा चिटणीस होता. सादोक आणि अब्याथार हे याजक होते.
26 And Ira also the Jairite was a chief ruler about David.
२६आणि याईरी ईरा हा दावीदाचा मुख्य सेवक होता.

< 2 Samuel 20 >