< 2 Chronicles 14 >

1 So Abiiah slept with his fathers, and they buryed him in the citie of Dauid, and Asa his sonne reigned in his steade: in whose dayes the lande was quiet ten yeere.
अबीयाला पुढे आपल्या पूर्वजांसोबत चिरविश्रांती मिळाली. दावीद नगरात लोकांनी त्याचे दफन केले. त्याचा पुत्र आसा हा त्यानंतर राज्य करु लागला आसाच्या कारकिर्दीत लोकांस दहा वर्षे शांतता लाभली.
2 And Asa did that was good and right in the eyes of the Lord his God.
आसाने परमेश्वर देवाच्या दृष्टीने चांगले आणि उचित असा कारभार केला.
3 For he tooke away the altars of the strange gods and the hie places, and brake downe the images, and cut downe the groues,
त्याने मूर्तीपूजेसाठी वापरात येणाऱ्या परक्या वेद्या काढून टाकल्या. उच्चस्थाने पाडली आणि पवित्र मानले जाणारे स्तंभ फोडून टाकले. आसाने अशेरा देवीचे खांबही उदध्वस्त केले.
4 And commanded Iudah to seeke the Lord God of their fathers, and to doe according to the Lawe and the comandement.
त्याने यहूदी लोकांस परमेश्वर देवाला अनुसरायची आज्ञा केली. त्यांच्या पूर्वजांचा देव तोच. त्या परमेश्वराने घालून दिलेल्या आज्ञा आणि नियम पाळायला फर्मावले.
5 And he tooke away out of all the cities of Iudah the hie places, and the images: therefore the kingdome was quiet before him.
यहूदाच्या सगळ्या नगरांमधली उच्चस्थाने आणि धूप जाळायच्या वेद्या आसाने काढून टाकल्या. आसाच्या कारकीर्दीत त्यामुळे राज्यात शांतता नांदत होती.
6 He built also strong cities in Iudah, because the lande was in rest, and he had no warre in those yeeres: for the Lord had giuen him rest.
या काळात आसाने यहूदात भक्कम तटबंदीची नगरे बांधली. परमेश्वराने शांतता दिल्यामुळे या काळात आसा युध्दमुक्त राहिला.
7 Therefore he saide to Iudah, Let vs builde these cities and make walles about, and towers, gates, and barres, whiles the lande is before vs: because we haue sought the Lord our God, we haue sought him, and he hath giuen vs rest on euery side: so they built and prospered.
आसा यहूदातील लोकांस म्हणाला, “ही नगरे बांधून त्याभोवती तटबंदी करु. त्यांना कोट, बुरुज, वेशी आणि अडसर करु. या प्रदेशात आपण राहत आहोत, तो आपलाच आहे. परमेश्वर देवाला अनुसरल्यामुळे हा देश आपल्याला मिळाला आहे. त्याने आपल्याला स्वास्थ्यही दिले आहे.” तेव्हा त्यांनी ते बांधले व यश मिळविले.
8 And Asa had an armie of Iudah that bare shieldes and speares, three hundreth thousande, and of Beniamin that bare shieldes and drewe bowes, two hundreth and foure score thousande: all these were valiant men.
आसाच्या सैन्यात यहूदाच्या वंशातील तीन लाख जण आणि बन्यामीन वंशातील दोन लाख ऐंशी हजार पुरुष होते. यहूदा लोकांकडे मोठ्या ढाली आणि भाले होते. बन्यामिनाकडे लहान ढाली होत्या. तसेच धनुष्यबाण होते. हे सर्व पराक्रमी आणि बलवान लढवय्ये होते.
9 And there came out against them Zerah of Ethiopia with an hoste of ten hundreth thousande, and three hundreth charets, and came vnto Mareshah.
पुढे जेरहने आसावर स्वारी केली. जेरह हा कूशी होता त्याच्याकडे दहा लाख सैनिक आणि तीनशे रथ होते. जेरह आपल्या सैन्याला घेऊन मारेशा नगरापर्यंत आला.
10 Then Asa went out before him, and they set the battell in aray in the valley of Zephathah beside Mareshah.
१०आसा त्याच्याशी सामना करायला निघाला. मारेशा जवळच्या सफाथाच्या खोऱ्यात त्यांची लढाई सुरू झाली.
11 And Asa cryed vnto the Lord his God, and saide, Lord, it is nothing with thee to helpe with many, or with no power: helpe vs, O Lord our God: for we rest on thee, and in thy Name are we come against this multitude: O Lord, thou art our God, let not man preuaile against thee.
११आसा आपल्या परमेश्वर देवाला हाक मारुन म्हणाला, “परमेश्वरा, या बलाढ्य सेनेपुढे दुर्बलांना तूच मदत करु शकतोस. तूच आमच्या मदतीला उभा राहा. आम्ही तुझ्यावर भरवसा ठेवून आहोत. तुझे नाव घेऊनच आम्ही या विशाल सेनेला तोंड देणार आहोत. परमेश्वर देवा, तुझ्यावर कोणी वर्चस्व मिळवू नये.”
12 So the Lord smote the Ethiopians before Asa and before Iudah, and the Ethiopians fled.
१२मग परमेश्वराने आसाच्या यहूदा सेनेकडून कूशी सैन्याचा पराभव करवला. कूशी सैन्याने पळ काढला.
13 And Asa and the people that was with him, pursued them vnto Gerar. And the Ethiopians hoste was ouerthrowen, so that there was no life in them: for they were destroyed before the Lord and before his hoste: and they caryed away a mightie great spoyle.
१३आसाच्या सैन्याने गरारपर्यंत कुशींचा पाठलाग केला. त्यामध्ये कूशींची एवढी प्राणहानी झाली की पुन्हा लढाईला उभे राहायचे बळ त्यांच्यात राहिले नाही. परमेश्वरापुढे आणि त्याच्या सैन्यापुढे ते पार धुळीस मिळाले. आसाच्या लोकांनी कूर्शींच्या मौल्यवान वस्तू लुटल्या.
14 And they smote all the cities rounde about Gerar: for the feare of the Lord came vpon them, and they spoyled all the cities, for there was exceeding much spoyle in them.
१४गरारच्या आसपासच्या सर्व गावांचा आसाच्या सैन्याने पराभव केला. तिथल्या लोकांनी परमेश्वराची धास्ती घेतली. या गावांमध्ये लुटण्यासारखे बरेच काही होते. ते आसाच्या सैन्याने घेतले.
15 Yea, and they smote the tents of cattel, and carried away plentie of sheepe and camels, and returned to Ierusalem.
१५मेंढपाळांच्या वस्त्यांवर आसाच्या सैन्याने धाड घातली. तेथून त्यांनी बरीच मेंढरे आणि उंट घेतले आणि ते यरूशलेमेला परतले.

< 2 Chronicles 14 >