< Exodus 22 >
1 If any man steal an ox or a sheep, and kill or sell it: he shall restore five oxen for one ox, and four sheep for one sheep.
१एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापले किंवा विकून टाकले तर त्याने एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत.
2 If a thief be found breaking open a house or undermining it, and be wounded so as to die: he that slew him shall not be guilty of blood.
२चोर घर फोडत असता सापडला व जीव जाईपर्यंत मार बसला तर त्याच्या खुनाचा दोष कोणावर येणार नाही.
3 But if he did this when the sun is risen, he hath committed murder, and he shall die. If he have not wherewith to make restitution for the theft, he shall be sold.
३परंतु तो चोरी करत असता सूर्योदय झाला तर मरणाऱ्यावर खुनाचा दोष येईल. चोराने नुकसान अवश्य भरून द्यावे. त्याच्याजवळ काही नसेल तर चोरीच्या भरपाईसाठी त्याची विक्री करावी.
4 If that which he stole be found with him, alive, either ox, or ass, or sheep: he shall restore double.
४चोरलेला बैल, गाढव, मेंढरू वगैरे चोराच्या हाती जिवंत सापडले तर त्याने एकेकाबद्दल दुप्पट परत द्यावी.
5 If any man hurt a field or a vineyard, and put in his beast to feed upon that which is other men’s: he shall restore the best of whatsoever he hath in his own field, or in his vineyard, according to the estimation of the damage.
५कोणी आपले जनावर मोकळे सोडले ते दुसऱ्याच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात जाऊन चरले व खाल्ले तर आपल्या शेतातील किंवा द्राक्षमळ्यातील चांगल्यात चांगल्या पिकातून त्याने त्याचे नुकसान भरून द्यावे.
6 If a fire breaking out light upon thorns, and catch stacks of corn, or corn standing in the fields, he that kindled the fire shall make good the loss.
६जर कोणी काटेकुटे जाळण्यासाठी आग पेटवली व ती भडकल्यामुळे धान्याच्या सुड्या किंवा उभे पीक जळाले तर आग पेटवणाऱ्याने नुकसान भरून दिलेच पाहिजे.
7 If a man deliver money, or any vessel unto his friend to keep, and they be stolen away from him that received them: if the thief be found he shall restore double:
७कोणी शेजाऱ्याकडे आपला पैसा किंवा काही वस्तू ठेवण्यासाठी दिल्या आणि जर ते सर्व त्याच्या घरातून चोरीस गेले, तर चोर सापडल्यावर त्याच्या दुप्पट किंमत चोराने भरून द्यावी.
8 If the thief be not known, the master of the house shall be brought to the gods, and shall swear that he did not lay his hand upon his neighbour’s goods,
८परंतु जर चोर सापडला नाही, तर घरमालकाला देवासमोर घेऊन जावे म्हणजे मग त्याने स्वतः त्या वस्तुला हात लावला की नाही त्याचा न्याय होईल.
9 To do any fraud, either in ox, or in ass, or sheep, or raiment, or any thing that may bring damage: the cause of both parties shall come to the gods: and if they give judgment, he shall restore double to his neighbour.
९जर हरवलेला एखादा बैल, एखादे गाढव, मेंढरू किंवा वस्त्र यांच्यासंबंधी दोन मनुष्यात वाद उत्पन्न झाला, आणि ती माझी आहे अशी कोणी तक्रार केली तर त्या हक्क सांगणाऱ्या दोन्ही पक्षांनी देवासमोर यावे; ज्याला देव दोषी ठरवील त्याने आपल्या शेजाऱ्याला तिच्याबद्दल दुप्पट बदला द्यावा.
10 If a man deliver ass, ox, sheep, or any beast, to his neighbour’s custody, and it die, or be hurt, or be taken by enemies, and no man saw it:
१०एखाद्याने आपले गाढव, बैल, किंवा मेंढरू थोडे दिवस सांभाळण्याकरता आपल्या शेजाऱ्याकडे दिले, परंतु ते जर मरण पावले, किंवा जखमी झाले किंवा कोणी पाहत नसताना पकडून नेले;
11 There shall be an oath between them, that he did not put forth his hand to his neighbour’s goods: and the owner shall accept of the oath; and he shall not be compelled to make restitution.
११तर त्या दोघांमध्ये परमेश्वराची शपथ व्हावी. आपण शेजाऱ्याच्या मालमत्तेला हात लावला नाही असे सांगितले तर त्या जनावराच्या मालकाने त्याच्या शपथेवर विश्वास ठेवावा; मग त्या शेजाऱ्याला जनावराची किंमत भरून द्यावी लागणार नाही.
12 But if it were taken away by stealth, he shall make the loss good to the owner.
१२त्याच्यापासून खरोखर ते चोरीस गेले असेल तर त्याची किंमत मालकाला भरून द्यावी.
13 If it were eaten by a beast, let him bring to him that which was slain, and he shall not make restitution.
१३जर ते जनावर कोणी मारून टाकले असेल तर ते पुराव्यादाखल आणून दाखवावे म्हणजे त्यास भरपाई भरून द्यावी लागणार नाही.
14 If a man borrow of his neighbour any of these things, and it be hurt or die, the owner not being present, he shall be obliged to make restitution.
१४जर कोणी आपल्या शेजाऱ्याकडून त्याचे जनावर मागून घेतले मालक तेथे हजर नसताना त्या जनावराला जर इजा झाली किंवा ते मरण पावले तर त्या मालकाला त्याची किंमत अवश्य भरून द्यावी;
15 But if the owner be present, he shall not make restitution, especially if it were hired and came for the hire of his work.
१५जर त्या वेळी तेथे जनावराजवळ मालक असेल तर मग भरपाई करावी लागणार नाही; किंवा ते जनावर भाड्याने घेतले असले तर त्याचे नुकसान भाड्यातच आले आहे.
16 If a man seduce a virgin not yet espoused, and lie with her: he shall endow her, and have her to wife.
१६आणि मागणी झाली नाही अशा कुमारिकेला फसवून जर कोणी तिला भ्रष्ट केले तर त्याने पूर्ण देज देऊन तिच्याशी लग्न केलेच पाहिजे;
17 If the maid’s father will not give her to him, he shall give money according to the dowry, which virgins are wont to receive.
१७तिच्या पित्याने त्यास ती देण्यास नकार दिला तर भ्रष्ट करणाऱ्याने तिच्या पित्याला कुमारिकेच्या रीतीप्रमाणे पैसा तोलून द्यावा.
18 Wizards thou shalt not suffer to live.
१८कोणत्याही चेटकिणीला जिवंत ठेवू नये.
19 Whosoever copulateth with a beast shall be put to death.
१९पशुगमन करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.
20 He that sacrificeth to gods, shall be put to death, save only to the Lord.
२०परमेश्वराशिवाय दुसऱ्या दैवतांना बली करणाऱ्याला अवश्य जिवे मारावे.
21 Thou shalt not molest a stranger, nor afflict him: for yourselves also were strangers in the land of Egypt.
२१उपऱ्याचा छळ करू नये किंवा त्याच्यावर जुलूम करू नको. कारण मिसर देशात तुम्हीही उपरी होता.
22 You shall not hurt a widow or an orphan.
२२विधवा किंवा अनाथ यांना तुम्ही जाचू नका
23 If you hurt them they will cry out to me, and I will hear their cry:
२३तुम्ही त्यांना कोणत्याही रीतीने जाचाल आणि ती मला हाक मारतील तर मी त्यांचे ओरडणे अवश्य ऐकेन;
24 And my rage shall be enkindled, and I will strike you with the sword, and your wives shall be widows, and your children fatherless.
२४व माझा राग तुम्हावर भडकेल व मी तुम्हास तलवारीने मारून टाकीन म्हणजे तुमच्या स्रिया विधवा व तुमची मुले पोरकी होतील.
25 If thou lend money to any of my people that is poor, that dwelleth with thee, thou shalt not be hard upon them as an extortioner, nor oppress them with usuries.
२५तुझ्याजवळ राहणाऱ्या माझ्या एखाद्या गरीब मनुष्यास तुम्ही उसने पैसे दिले तर त्याबद्दल तुम्ही व्याज आकारू नये.
26 If thou take of thy neighbour a garment in pledge, thou shalt give it him again before sunset.
२६तू आपल्या शेजाऱ्याचे पांघरुण तुझ्याजवळ गहाण ठेवून घेतले तर सूर्य मावळण्याआधी तू त्याचे पांघरुण त्यास परत करावे;
27 For that same is the only thing wherewith he is covered, the clothing of his body, neither hath he any other to sleep in: if he cry to me, I will hear him, because I am compassionate.
२७कारण त्याचे अंग झाकायला तेवढेच असणार. ते घेतले तर तो काय पांघरूण निजेल? त्याने गाऱ्हाणे केले तर मी त्याचे ऐकेन, कारण मी करुणामय आहे.
28 Thou shalt not speak ill of the gods, and the prince of thy people thou shalt not curse.
२८तू आपल्या देवाची निंदा करू नको किंवा तुझ्या लोकांच्या राज्यकर्त्याला शाप देऊ नको.
29 Thou shalt not delay to pay thy tithes and thy firstfruits: thou shalt give the firstborn of thy sons to me.
२९आपल्या हंगामातले व आपल्या फळांच्या रसातले मला अर्पण करण्यास हयगय करू नको. तुझा प्रथम जन्मलेला पुत्र मला द्यावा;
30 Thou shalt do the same with the firstborn of thy oxen also and sheep: seven days let it be with its dam, the eighth day thou shalt give it to me.
३०तसेच प्रथम जन्मलेले बैल व मेंढरे, यांना जन्मल्यापासून सात दिवस त्यांच्या आईजवळ ठेवावे व आठव्या दिवशी ते मला द्यावेत.
31 You shall be holy men to me: the flesh that beasts have tasted of before, you shall not eat, but shall cast it to the dogs.
३१तुम्ही माझे पवित्र लोक आहात म्हणून फाडून टाकलेल्या पशूंचे मांस तुम्ही खाऊ नये; ते कुत्र्यांना घालावे.