< 1 Samuel 24 >

1 Bangʼ ka Saulo nosea lawo jo-Filistia, nowachne niya, “Daudi nitie e Thim En Gedi.”
असे झाले, शौल पलिष्ट्यांचा पाठलाग सोडून माघारी आल्यावर त्यास कोणी सांगितले की, दावीद एन-गेदीच्या रानात आहे.
2 Omiyo Saulo nokawo ji alufu adek; ji moyier kowuok e Israel duto, eka noikore mowuok kodhi dwaro Daudi gi joge but Rogo ma Nyakech pondoe.
तेव्हा शौल सर्व इस्राएलातून निवडलेल्या तीन हजार मनुष्यांस घेऊन रानबकऱ्याच्या खडकावर दावीदाचा व त्याच्या मनुष्यांचा शोध करायला गेला.
3 Nobiro e abila mar rombe man but yo; to kanyo ne nitie rogo, to Saulo nodonjo e rogono mondo olosre. Daudi gi joge bende ne osedonjo ei rogono.
आणि तो मेंढवाड्याजवळ रस्त्यावर आला तेथे एक गुहा होती तिच्यात शौल शौचास गेला आणि दावीद व त्याची माणसे त्या गुहेच्या अगदी आतल्या भागात बसली होती.
4 Jogo nowacho niya, “Ma e odiechiengʼ ma Jehova Nyasaye nowuoyo kuome kowacho ni, ‘Abiro keto jowasiki e lweti mondo itimne kaka idwaro!’” Eka Daudi nosudo lingʼ-lingʼ mongʼado riak law Saulo.
तेव्हा दावीदाच्या मनुष्यांनी त्यास म्हटले, “परमेश्वराने तुला सांगितले की, पाहा मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन आणि तुला जसे बरे दिसेल तसे तू त्याचे करशील; तो हाच दिवस आहे पाहा.” मग दावीदाने उठून शौलाच्या वस्त्राचा काठ हळूच कापून घेतला.
5 Bangʼe chuny Daudi nochandore nikech nosengʼado riak law Saulo.
त्यानंतर असे झाले की, दावीदाचे मन त्यास टोचू लागले. कारण त्याने शौलाचे वस्त्र कापून घेतले होते.
6 Nowachone joge niya, “Jehova Nyasaye ok oyie mondo atim gima kamano ni ruodha, ngʼat Jehova Nyasaye mowir, kata tingʼo lweta mondo ahinye; nikech en ngʼat mowir ma Jehova Nyasaye oyiero.”
आणि त्याने आपल्या मनुष्यांस म्हटले, “मी आपल्या धन्यावर परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये, कारण तो देवाचा अभिषिक्त आहे.”
7 Kamano Daudi nokwero joge kendo ne ok oyienegi mondo gitug dhawo gi Saulo. Omiyo Saulo nowuok e rogo modhi e yore.
असे बोलून दावीदाने आपल्या मनुष्यांना धमकावले आणि त्यांना शौलावर हल्ला करण्याची परवानगी दिली नाही. मग शौल उठून गुहेतून निघून वाटेने चालला.
8 Eka Daudi nowuok oko mar rogo mi oluongo Saulo, “Ruodha ma ruoth!” Kane Saulo ongʼiyo chien, Daudi nokulore piny monindo auma ka wangʼe ochiko piny.
नतर दावीदही उठून गुहेतून निघाला आणि शौलाच्या पाठीमागून हाक मारून बोलला, “हे माझ्या प्रभू, राजा.” तेव्हा शौलाने आपल्यामागे वळून पाहिले आणि दावीद आपले तोंड भूमीस लावून नमला
9 Nowachone Saulo niya, “Angʼo momiyo ichiko iti ka ji wachoni ni, ‘Daudi dwaro hinyi’?
मग दावीदाने शौलाला म्हटले, “पाहा दावीद तुझे वाईट करायला पाहतो असे लोकांचे बोलणे ते तुम्ही कशाला ऐकता?
10 Kawuononi iseneno gi wangʼi kaka Jehova Nyasaye ne oketi e lweta ei rogo. Jomoko ne owachona ni anegi, to ne aweyi; mi awacho ni, ‘Ok natingʼ lweta mar hinyo ruodha nikech en ngʼat Jehova Nyasaye mowir.’
१०पाहा आज तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले की, परमेश्वराने गुहेत आज तुम्हास माझ्या हाती दिले होते. तुम्हास जिवे मारावे असे कोणी मला सांगितले. पण मी तुम्हास सोडून दिले; मी बोललो की, मी आपला हात माझ्या प्रभूवर टाकणार नाही कारण तो देवाचा अभिषिक्त आहे.
11 Ne, wuora, ngʼi ine riak lawi ma an-go e lweta! Ne angʼade e riak lawi to ne ok anegi. Sani koro inyalo neno kendo fwenyo ni aonge gi paro mar timoni marach kata ngʼanyoni. Pok akethoni to in to ilawa mondo inega.
११आणखी माझ्या बापा, पाहा माझ्या हातात तुमच्या वस्त्राचा काठ आहे तो पाहा. कारण मी तुमच्या वस्त्राचा काठ कापला आणि तुम्हास जिवे मारले नाही. यावरुन माझ्या ठायी दुष्टाई किंवा फितूरी नाही आणि जरी तुम्ही माझा जीव घ्यायला पहाता, तरी मी तुमच्याविरुध्द पाप केले नाही, याची खात्री करून पाहा.
12 Mad Jehova Nyasaye ngʼad bura e kinda kodi. Mad Jehova Nyasaye chul kuor kuom gik maricho misetimona, an to lweta ok nomuli.
१२माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये परमेश्वर न्याय करो; माझा सूड परमेश्वर तुमच्यावर उगवो. परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही.
13 Mana kaka ngero machon wacho ni, ‘Joma timo timbe maricho ema timbe maricho wuok kuomgi’ omiyo ok abi keto lweta kuomi.
१३दुष्टापासून दुष्टाई निघते अशी पुरातन लोकांची म्हण आहे. परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही.
14 “En ngʼama ruodh Israel dwaro mondo onegi? Ilawo ngʼa? Guok motho koso kikun?
१४इस्राएलाचा राजा कोणाचा पाठलाग करण्यास निघाला आहे? कोणाच्या पाठीस आपण लागला आहात? एका मरण पावलेल्या कुत्र्याच्या! एका पिसवेच्या!
15 Mad Jehova Nyasaye bed jangʼad buchwa mondo opog wach e kindwa. Mad onon wach makare kendo otingʼa malo; mad ochwaka kendo oresa e lweti.”
१५यास्तव परमेश्वर न्यायाधीश होऊन माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये न्याय करो. हे पाहून तो माझा वाद करो आणि तुमच्या हातून मला सोडवो.”
16 Kane Daudi otieko wuoyo, Saulo nopenjo niya, “Mano en dwondi Daudi wuoda?” Eka noywak matek.
१६असे झाले की, दावीदाने शौलाशी हे शब्द बोलणे संपवल्यावर, शौल म्हणाला, “माझ्या मुला दावीदा ही तुझी वाणी आहे काय?” मग शौल गळा काढून रडला
17 Eka nowachone Daudi niya, “In ngʼama kare maloya. Isetimona maber, an to asetimoni marach.
१७आणि तो दावीदाला म्हणाला, “माझ्यापेक्षा तू अधिक न्यायी आहेस, कारण तू माझे बरे केले आहेस. परंतु मी तुझे वाईट केले आहे.
18 Koroni eka isewachona tim maber misetimona; Jehova Nyasaye noketa e lweti to ne ok inega.
१८तू माझ्याशी चांगले वर्तन करतोस हे तू आज उघड केले आहे. कारण परमेश्वराने मला तुझ्या हाती दिले होते तेव्हा तू मला जिवे मारले नाही.
19 Ka ngʼato onwangʼo jasike, bende oweye odhi ma ok ohinye? Mad Jehova Nyasaye chuli mathoth kuom gima itimona kawuononi.
१९कोणा मनुष्यास त्याचा वैरी सापडला तर तो त्यास चांगल्या रीतीने वाटेस लावील काय? तर तू आज जे माझे बरे केले त्याबद्दल परमेश्वर तुला उत्तम प्रतिफळ देवो.
20 Angʼeyo ni adieri ibiro bet ruoth kendo pinyruodh Israel nodhi nyime maber e bwo lochni.
२०आता पाहा मी जाणतो की, तू खचित राजा होशील आणि इस्राएलाचे राज्य तुझ्या हाती स्थापित होईल.
21 Koro singrina gi nying Jehova Nyasaye ni ok ningʼad nyikwaya kata rucho nyinga oko e od wuora.”
२१म्हणून आता तू माझ्याशी परमेश्वराची शपथ वाहा की, तू माझ्या मागे माझे संतान नाहीसे करणार नाहीस आणि माझ्या वडिलाच्या कुळातून माझे नाव नष्ट करून टाकणार नाहीस.”
22 Omiyo Daudi nosingore ne Saulo. Eka Saulo nodok dala, to Daudi gi joge nodhi e kargi mar pondo.
२२तेव्हा दावीदाने शौलाशी शपथ वाहिली. मग शौल घरी गेला आणि दावीद व त्याची माणसे गडावर चढून गेली.

< 1 Samuel 24 >