< Markus 8 >
1 I de Dage, da der atter var en stor Skare, og de intet havde at spise, kaldte han sine Disciple til sig og siger til dem:
१त्या दिवसात पुन्हा लोकांचा मोठा समुदाय जमला व त्यांच्याजवळ खावयास काही नव्हते. येशूने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यांना म्हणाला,
2 „Jeg ynkes inderligt over Skaren; thi de have allerede tøvet hos mig i tre Dage og have intet at spise.
२“मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही.
3 Og dersom jeg lader dem gaa fastende hjem, ville de vansmægte paa Vejen, og nogle af dem ere komne langvejsfra.‟
३मी जर त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते रस्त्यातच कासावीस होऊन पडतील आणि त्यांच्यातील काही तर दुरून आले आहेत.”
4 Og hans Disciple svarede ham: „Hvorfra skal nogen kunne mætte disse med Brød her i en Ørken?‟
४त्याच्या शिष्यांनी उत्तर दिले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्यात?”
5 Og han spurgte dem: „Hvor mange Brød have I?‟ Og de sagde: „Syv.‟
५त्याने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात.”
6 Og han byder Skaren at sætte sig ned paa Jorden; og han tog de syv Brød, takkede, brød dem og gav sine Disciple dem, at de skulde lægge dem for; og de lagde dem for Skaren.
६त्याने लोकांस जमिनीवर बसण्याची आज्ञा केली. त्याने सात भाकरी घेतल्या, आभार मानले व त्या मोडल्या व आपल्या शिष्यांजवळ त्या वाढण्यास दिल्या आणि त्यांनी त्या लोकांस वाढल्या.
7 Og de havde nogle faa Smaafisk; og han velsignede dem og sagde, at ogsaa disse skulde lægges for.
७त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते, त्यास त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढावयास सांगितले.
8 Og de spiste og bleve mætte; og de opsamlede af tiloversblevne Stykker syv Kurve.
८ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या त्यांनी भरल्या.
9 Men de vare omtrent fire Tusinde; og han lod dem gaa bort.
९तेथे सुमारे चार हजार पुरूष होते. मग येशूने त्यांना घरी पाठवले.
10 Og straks gik han om Bord i Skibet med sine Disciple og kom til Dalmanuthas Egne.
१०आणि लगेच तो आपल्या शिष्यांसह तारवात बसला व दल्मनुथा प्रदेशात गेला.
11 Og Farisæerne gik ud og begyndte at strides med ham og forlangte af ham et Tegn fra Himmelen for at friste ham.
११मग काही परूशी येऊन त्याच्याशी वाद घालू लागले. त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी त्यास स्वर्गातून चिन्ह मागितले.
12 Og han sukkede dybt i sin Aand og siger: „Hvorfor forlanger denne Slægt et Tegn? Sandelig, siger jeg eder, der skal ikke gives denne Slægt noget Tegn!‟
१२आपल्या आत्म्यात दीर्घ उसासा टाकून तो म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हास खरे सांगतो की, या पिढीला चिन्ह दिले जाणार नाही.”
13 Og han forlod dem og gik atter om Bord og for over til hin Side.
१३नंतर तो त्यांना सोडून पुन्हा तारवात जाऊन बसला व सरोवराच्या पलीकडच्या बाजूस गेला.
14 Og de havde glemt at tage Brød med og havde kun eet Brød med sig i Skibet.
१४तेव्हा शिष्य भाकरी आणण्याचे विसरले होते आणि तारवात त्यांच्याजवळ एकच भाकर होती.
15 Og han bød dem og sagde: „Ser til, tager eder i Vare for Farisæernes Surdejg og Herodes's Surdejg!‟
१५येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर यापासून सावध राहा.”
16 Og de tænkte med hverandre: „Det er, fordi vi ikke have Brød.‟
१६मग ते आपसात चर्चा करू लागले की, “आपल्याजवळ भाकरी नाहीत म्हणून तो बोलला की काय?”
17 Og da han mærkede dette, siger han til dem: „Hvorfor tænke I paa, at I ikke have Brød? Skønne I ikke endnu, og forstaa I ikke? Er eders Hjerte forhærdet?
१७ते काय बोलत होते हे ओळखून येशू त्यास म्हणाला, “आपणाजवळ भाकरी नाहीत याविषयी चर्चा का करता? अजून तुमच्या लक्षात आले नाही काय व तुम्हास समजूनही समजत नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय?
18 Have I Øjne og se ikke? Og have I Øren og høre ikke? Og komme I ikke i Hu?
१८डोळे असून तुम्हास दिसत नाही काय? कान असून तुम्हास ऐकू येत नाही काय? तुम्हास आठवत नाही काय?
19 Da jeg brød de fem Brød til de fem Tusinde, hvor mange Kurve fulde af Stykker toge I da op?‟ De sige til ham: „Tolv.‟
१९मी पाच हजार लोकांस पाच भाकरी वाटून दिल्या तेव्हा तुम्ही तुकड्यांमधून किती टोपल्या गोळा केल्या.” शिष्यांनी उत्तर दिले, “बारा.”
20 „Og da jeg brød de syv til de fire Tusinde, hvor mange Kurve fulde af Stykker toge I da op?‟ Og de sige til ham: „Syv.‟
२०“आणि चार हजारांसाठी मी सात भाकरी मोडल्या, तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या गोळा केल्या?” शिष्यांनी उत्तर दिले, “सात.”
21 Og han sagde til dem: „Hvorledes forstaa I da ikke?‟
२१मग येशू त्यांना म्हणाला, “अजूनही तुम्हास समजत नाही काय?”
22 Og de komme til Bethsajda. Og man fører en blind til ham og beder ham om, at han vil røre ved ham.
२२ते बेथसैदा येथे आले. तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व आपण त्यास स्पर्श करावा अशी विनंती केली.
23 Og han tog den blinde ved Haanden og førte ham uden for Landsbyen og spyttede paa hans Øjne og lagde Hænderne paa ham og spurgte ham, om han saa noget.
२३मग त्याने आंधळ्याचा हात धरून त्यास गावाबाहेर नेले मग येशू त्या आंधळ्याच्या डोळ्यांवर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्यास विचारले, “तुला काही दिसते काय?”
24 Og han saa op og sagde: „Jeg ser Menneskene; thi jeg ser noget ligesom Træer gaa omkring.‟
२४त्याने वर पाहिले आणि म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत असे वाटते कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरीही ती चालत आहेत.”
25 Derefter lagde han atter Hænderne paa hans Øjne, og han blev klarsynet og var helbredet og kunde se alle Ting tydeligt.
२५नंतर येशूने पुन्हा आपले हात त्या मनुष्याच्या डोळ्यावर ठेवले. त्याने डोळे उघडले तेव्हा त्यास दृष्टी आली आणि त्यास सर्वकाही स्पष्ट दिसू लागले.
26 Og han sendte ham hjem og sagde: „Du maa ikke gaa ind i Landsbyen, [ej heller sige det til nogen i Landsbyen.‟]
२६येशूने त्याला, “त्या गावात पाऊल देखील टाकू नको” असे सांगून घरी पाठवून दिले.
27 Og Jesus og hans Disciple gik ud til Landsbyerne ved Kæsarea Filippi; og paa Vejen spurgte han sine Disciple og sagde til dem: „Hvem sige Menneskene, at jeg er?‟
२७मग येशू व त्याचे शिष्य फिलीप्पा कैसरीया नामक प्रदेशास जाण्यास निघाले. वाटेत त्याने त्याच्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून ओळखतात?”
28 Og de sagde til ham: „Johannes Døberen; og andre: Elias; men andre: En af Profeterne.‟
२८त्यांनी त्यास उत्तर दिले, “काहीजण म्हणतात, तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान, तर इतर काही एलीया समजतात, तर दुसरे काही तुम्ही संदेष्ट्यांपैकी एक आहात असे म्हणतात.”
29 Og han spurgte dem: „Men I, hvem sige I, at jeg er?‟ Peter svarede og siger til ham: „Du er Kristus.‟
२९मग येशूने त्यांना विचारले, “तुम्हास मी कोण आहे असे वाटते?” पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त आहेस.”
30 Og han bød dem strengt, at de ikke maatte sige nogen dette om ham.
३०येशू शिष्यांना म्हणाला, “मी कोण आहे हे कोणालाही सांगू नका.”
31 Og han begyndte at lære dem, at Menneskesønnen skulde lide meget og forkastes af de Ældste og Ypperstepræsterne og de skriftkloge og ihjelslaas og opstaa efter tre Dage.
३१तो त्यांना शिकवू लागला, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी. वडील, मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे, त्यास जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे.
32 Og han talte dette frit ud. Og Peter tog ham til Side og begyndte at sætte ham i Rette.
३२त्याने हे स्पष्टपणे सांगितले, तेव्हा पेत्राने येशूला बाजूला घेतले व तो त्यास दटावू लागला.
33 Men han vendte sig og saa paa sine Disciple og irettesatte Peter og siger: „Vig bag mig, Satan! thi du sanser ikke, hvad Guds er, men hvad Menneskers er.‟
३३परंतु येशूने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! कारण तू देवाच्या गोष्टीकडे लक्ष लावीत नाहीस, तर मनुष्याच्या गोष्टीकडे लक्ष लावतोस.”
34 Og han kaldte Skaren tillige med sine Disciple til sig og sagde til dem: „Den, som vil følge efter mig, han fornægte sig selv og tage sit Kors op og følge mig!
३४नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांस बोलावले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्यामागे यायचे असेल तर त्याने स्वतःला नाकारावे. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.
35 Thi den, som vil frelse sit Liv, skal miste det; men den, som mister sit Liv for min og Evangeliets Skyld, han skal frelse det.
३५जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल व जो कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.
36 Thi hvad gavner det et Menneske at vinde den hele Verden og at bøde med sin Sjæl?
३६मनुष्याने सर्व जग मिळविले व आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ?
37 Thi hvad kunde et Menneske give til Vederlag for sin Sjæl?
३७जीवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल?
38 Thi den, som skammer sig ved mig og mine Ord i denne utro og syndige Slægt, ved ham skal ogsaa Menneskesønnen skamme sig, naar han kommer i sin Faders Herlighed med de hellige Engle.‟
३८देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”